तांदूळ, दूध, दहि, कोथिंबीर (बारीक चिरून).
फोडणीकरता (अंदाज आणि आवडीप्रमाणे) - तेल, मोहरी-जिरे, सुक्या लाल मिरच्या (लहान तुकडे करून), हिरव्या मिरच्या (अगदी बारीक कापून किंवा उभ्या अर्ध्या कापून), कढिपत्ता.
प्रमाणः दोन माणसांकरता
तांदूळ - एक वाटी
दूध - दोन ते अडीच वाट्या (गरम करून, साईसकट)
दही - २-३ टेबलस्पून
तांदूळ धुऊन काहीसा मऊ भात करून घ्यावा. तो होत असतानाच दुसर्या भांड्यात तेल घालून गरम झाल्यावर मोहरी-जिरे (हिंग नको), सुक्या मिरच्या, हिरव्या मिरच्या, कढिपत्ता घालून फोडणी करून घ्यावी. भात गरम असतानाच फोडणीत घालावा. चवीप्रमाणे मीठ घालून कालवून घ्यावा. त्यात दूध कोमट करून घालावे. साय असेल तर ती सुध्दा घालावी. पुन्हा कालवून झाकून ठेवावे. ५-७ मिनिटांत सगळे दूध भातात शोषले जाते. गार झाल्यावर आयत्यावेळी जेवढे हवे तेवढे दही घालून, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून नीट कालवून वाढावा.
- आवडत असेल तर तळणीच्या मिरच्या वेगळ्या तळून कुस्करून घालाव्यात.
- ऑफिसमध्ये किंवा सहलीला वगैरे घेऊन जाताना थोडेच दही घालून करावा. म्हणजे आंबट होत नाही.
थेन्क्यू थेन्क्यू मी दही+
थेन्क्यू थेन्क्यू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी दही+ दूध + भात+ मीठ+ साखर+ आल्याचा कीस असं कालवून घेते. जिरे, मोहरी , कढीपत्ता, दाणे, साम्डग्या मिर्च्या अशी फोडणी करून थंड करते आणि नन्तर सर्व एकत्र करते. कालवताना मिर्च्या जरा कुस्करल्या जातील अशा बेताने कालवते. ऑप्शनल - बारीक चिरलेले कांदे किंवा काकडी, बुंदी, कोथिंबीर, डाळिबाचे दाणे इ.
माझे उन्हाळ्यातले फेवरेट स्टेपल फूड!
वाह्ह ! परवाच स्मितागद्रे कडे
वाह्ह ! परवाच स्मितागद्रे कडे खाल्ला हा प्रकार. अप्रतिम होता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भिड्यांची मधुरा , आमची मधुरा अन स्मिता ह्यांनी त्याचा शेवट गोड केला::फिदी:
चव अजून आठवतेय. आता ह्या विकेंड्ला करणारच .
उष्णतेची लाट आली आहे तर
उष्णतेची लाट आली आहे तर त्यामुळे आज दही बुत्ती केली होती. इथली आले किसून घालण्याची टीप आवडली.
दक्षिणेत कर्नाटक, तमिळनाडूत
दक्षिणेत कर्नाटक, तमिळनाडूत हॉटेलांत मिळतो तयार. वेगवेगळ्या चवीचा (दही कोणते घातले आहे यामुळे) असतो. फेब्रुवारीत चिक्कमगळुरू येथे एका हॉटेलात (हॉटेल सौंदर्या, बस डेपो समोर) दही बुत्तीचे (curd rice म्हणायचे) पार्सल घेतले होते. फारच चांगला होता भात. सुका मेवा वरती टाकला होता आणि दही चांगले होते. सतत इडली वडे आणि तिखट चटण्या खाल्ल्यास हा भात बरा वाटतो..
येस, इकडे छान मिळतो दहीभात.
येस, इकडे छान मिळतो दहीभात. मुलं लहान असताना बाहेर जेवायला गेल्यावर एक डिश हमखास दहीभाताची घ्यायचो, म्हणजे त्यांनी बाकी काही नाही खाल्लं तरी दहीभाताने नक्की पोट भरायचं.
Pages