Submitted by विश्या on 24 February, 2015 - 04:50
आजपर्यंत क्रिकेट च्या इतिहासामध्ये फक्त चारच खेळाडू एकदिवसीय सामन्यामध्ये द्विशतक करू शकले आहेत .
सचिन तेंडुलकर
वीरेंद्र सेहवाग
रोहित शर्मा
ख्रिस गेल .
इथून पुढील काळात असे किती आणि कोण कोण खेळाडू द्विशतक करू शकतील ?
आपले मत आणि प्रतिक्रिया कळवा - क्रिकेट च्या जनकारापैकी कोणाचा अंदाज बरोबर येईल याची चर्चा हि आपण याच धाग्यावर करुत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सेहवाग काय सवतीचा मुलगा आहे ?
सेहवाग काय सवतीचा मुलगा आहे ?
कबीर बरे नाव सुचवले - विसरून
कबीर बरे नाव सुचवले - विसरून गेलो होतो .
त्रिशतकही होईल कोणाचे तरी
त्रिशतकही होईल कोणाचे तरी लौकरच..
हे शर्मा, गेल वगैरे मारू शकतातच..
तसेच अबड्या सारखे इम्प्रोव्हाईज करणारे वा मॅकीसारखे लीलया षटकार मारणारे टाकू शकतात एवढा स्कोअर.
पण यासाठी खेळायला लवकर येणारा हवा, धोनीसारखा मारायची क्षमता असूनही मागे आल्याने नाही मारू शकत.
सर्वात पहिले सचिनने मारले त्याला मानायला हवे..
आता एक भविष्यवाणी लिहून घ्या - अजिंक्य रहाणे मारणार एक दिवस द्विशतक हे नक्की!
माझी भविष्यवाणी - शिखर धवन
माझी भविष्यवाणी - शिखर धवन आणि ग्लेन maxvell मारू शकेल
द्विशतक्स? द्विशतकं तरी लिहा
द्विशतक्स? द्विशतकं तरी लिहा तिथं
केन विलियमसन मारेल लवकरच
शिखर, रोहीत (पुन्हा), वॉर्नर
शिखर, रोहीत (पुन्हा), वॉर्नर आणि मॅकल्लम.
मॅक्सवेल वर आला तर.
२० बॉलच्य आत ५० ला बरेच कँडिडेट आहेत.
रोहीत, रैना, धोनी,
मॅकल्लम, राँची, कोरी अँडर्सन
वॉर्नर, बेली, मॅक्स्वेल
डीविलियर्स, मिलर,
फिंच
गेल, रसेल, सॅमी
काही दिवसात पहिल्या आणि
काही दिवसात पहिल्या आणि अखेरच्या पाच ओव्हर्समध्ये मैदानात फलंदाज, पंच, गोलंदाज आणि यष्टीरक्षक एवढेच असावेत असा नियम येणार आहे
तेव्हा अश्विन आणि जेम्स फॉकनरलाही चान्स आहे
रोहित....येस पुन्हा करेल असे वाटते, खेळतो तेव्हा मोठी खेळी करतो
गेलही अजून एखादे करेल
मॅक्कलम....मे बी
डी व्हिलियर्स !
डी व्हिलियर्स !
कोणीतरी पाकी फलंदाजांचेही नाव
कोणीतरी पाकी फलंदाजांचेही नाव घ्या रे .. उमर अकमल, शाहीद आफ्रिदी वा गेला बाजार मिसबाह, युनिस खान वगैरे ..
आणि नुसते नाव घेऊ नका, तर ही नावे शोएब अख्तर समोर घ्या
कोणीपण असेना … तो एक माणूस
कोणीपण असेना … तो एक माणूस असेल…. :
::खोखो: :खोखो::खोखो::खोखो::खोखो::खोखो::खोखो::खोखो::खोखो::खोखो:
माणूस वरून आठवले, एकदिवसीय
माणूस वरून आठवले,
एकदिवसीय मधील पहिले द्विशतक झळकवणारा माणूस नसून बाईमाणूस होते ... बेलिंडा क्लार्क !!!!
मेलात तुम्ही आता ऋन्मेष
मेलात तुम्ही आता ऋन्मेष
नाही हां, पैली गोष्ट म्हणजे
नाही हां,
पैली गोष्ट म्हणजे माझ्या विधानामागे चिडवणे नसून बाईमाणसांचे कौतुकच होते की इथे त्यांनी पुरुषांनाही मागे टाकले
(तसेही क्रिकेटसंबंधित धाग्यांवर बाईमाणसांची हजेरी तुलनेत कमीच असते त्यामुळे हे विधान सर्वदूर जाणार नाही ती गोष्ट वेगळी)
दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषांचेही कौतुक होते, जंटलमेन्स गेम मधील जंटल माणसे लेडीज फर्स्ट म्हणत द्विशतक ठोकायचे थांबले होते.
जंटलमेन्स गेम मधील जंटल माणसे
जंटलमेन्स गेम मधील जंटल माणसे लेडीज फर्स्ट म्हणत द्विशतक ठोकायचे थांबले होते. <<<
अजब वाक्ये पेरता तुम्ही प्रतिसादात!
विराट कोहली हे नाव कोणीच
विराट कोहली
हे नाव कोणीच घेतले नाही.
कोणालाच वाटत नाही का?
गेलचे सोडता बाकीचे सगळे
गेलचे सोडता बाकीचे सगळे द्विशतकं भारतीय पीच वरचे आहेत.
मॅक्कलम, वॉर्नर, अॅरॉन फिंच,
मॅक्कलम, वॉर्नर, अॅरॉन फिंच, रोहीत शर्मा (पुन्हा अॅटलिस्ट एकदा), एबीडी आणि ओपनिंगला आला तर रहाणे.
सचिन आणि इतरांच्या द्विशतकात एक महत्वाचा फरक म्हणजे, फक्तं चार फिल्डर्स ३० यार्ड सर्कलच्या बाहेर असण्याचा नियम येण्यापूर्वी त्याने २०० केले. तसंच त्याच्या २०० मध्ये सर्वात कमी - फक्तं ३ सिक्स आहेत. २५ फोर आणि ३ सिक्स अशा ११८ रन्स सोडता उरलेल्या ८२ रन्स त्याने पळून काढल्या होत्या आणि त्यादेखील ३७ व्या वर्षी!
दादा गांगुलीने पुन्हा जन्म
दादा गांगुलीने पुन्हा जन्म घेतला तर मारेल तो द्विशतक ..
त्याच्या काळात तो मोठमोठी शतके मारायचा..
मॅक्कलम, अॅरॉन फिंच, रोहीत
मॅक्कलम, अॅरॉन फिंच, रोहीत शर्मा (पुन्हा अॅटलिस्ट एकदा), एबीडी >> +१ ( वॉर्नर ला वगळून)
गंगूने १८३ केलेत म्हणजे भोज्याला हात लावून परतलाय.
दादाने १८३ केलेले.. तो सामना
दादाने १८३ केलेले.. तो सामना ती इनिंग नाही विसरू शकत आपण.. धमाल आलेली.. त्याआधी कधी असे कोणा भारतीय फलंदाजाला टोलवताना याचि देही याची डोळा बघितले नव्हते.. लंकेचा पार कचरा केला होता, मुरलीसकट..
द्रविडनेही १५० वगैरे मारलेले, पण ते दादाच्या उत्तुंग षटकारांमुळे झाकोळले गेले..
त्याआधी कधी असे कोणा भारतीय
त्याआधी कधी असे कोणा भारतीय फलंदाजाला टोलवताना याचि देही याची डोळा बघितले नव्हते.>> no offense पण सचिनचे 95 च्या World Cup मधल्या लंका नि australia च्या विरुद्ध च्या innings किंवा desert storm पाहिले नव्हतेस का ?
१९९६ - जाडेजा - वकार युनूस?
१९९६ - जाडेजा - वकार युनूस?
सचिनच्या desert storm मधील
सचिनच्या desert storm मधील पहिली आपल्याला फायनलला पोचवणारी शेवटी शेवटी जेव्हा त्याने पोचवायचे ठरवले तेव्हा ईंटरेस्टींग झालेली आणि त्यात कॉमेंटरीनेही धमाल उडवलेली.. तरी पण दादाच्या वेळी स्लॉग ओवर्समध्ये त्याने फटकवायला घेतल्यावर हे काहीतरी नवीनच बघतोय असाच फील आलेला.. १८३ हा आकडाच खूप मोठा होता.. आणि त्यातही दादाचे षटकार बघणे नेत्रसुख असायचे.. माझ्यासाठी तरी.. दादा खेळला तर मी हायलाईट्स न चुकता बघायचोच.. त्याची जागा सेहवाग, सचिन, लक्ष्मण कोणीही नाही घेऊ शकत.. अर्थात हा माझ्या आवडीचा भाग झाला.. आताही मला कोहलीपेक्षा रोहित शर्माचे फटके बघायला मजा येते,, आणि आता अजिंक्य रहाणे चे फटके बघायला तर आपण पैसे मोजू शकतो.. युवराजबातही असे बोलू शकतो, जेव्हा तो भरात असतो तेव्हा त्याच्यासारखा स्ट्रोकप्लेअर जगात नाही.. ६ चेम्डूत सहा षटकार तोच मारू शकतो.. आणि ते देखील स्लॉगमध्ये भेटलेय तर नाही तर खणखणीत स्ट्रोक!.. यार म्हणून तो मला हवाच होता.. जिंकणे म्हणजेच सारे काही नसते, आवडीच्या खेळाडूंच्या खेळी आणि फटके बघणेही बरेच समाधान देऊन जाते.. असो, आपली आपली आवड. पोस्ट भरकटली असेल तर क्षमस्व आणि शुभरात्री
जिंकणे म्हणजेच सारे काही
जिंकणे म्हणजेच सारे काही नसते, आवडीच्या खेळाडूंच्या खेळी आणि फटके बघणेही बरेच समाधान देऊन जाते
>>>>
टोटली राँग!
मॅच जिंकणे हे कधीही महत्वाचे!
५० रन्स पळून काढल्या आणि मॅच जिंकली आणि १० फोर मारल्य पण मॅच हरली तर त्या पळून काढलेल्या ५० रन्सचं मोल जास्तं ठरतं.
१९९६ - जाडेजा - वकार युनूस?
१९९६ - जाडेजा - वकार युनूस? >>> मी तेव्हा अंड्यात होतो
पण दादाची आतिषबाजीचा काळ जास्त होता, असावा.. एखाद दोन ओवर नव्हत्या फोडल्या..
आणो एखादा फलंदाज वैयक्तिक १०० नम्तर १५० आणि नम्तर २०० वर झेपावतोय सोबत भारताचे ३०० च नाही तर ३७२ वगैरे होताहेत.. १९९९ साली हें ३७२ होताहेत.. हे सारेच वंडरफुल्लम होते
ती मॅच टाँटनच्या ग्राऊंडवर
ती मॅच टाँटनच्या ग्राऊंडवर (सॉमरसेटमध्ये) होती. तिथे स्ट्रेट बाऊंड्री बरीच लहान आहे. अर्थात याचा गांगुलीला फायदा झाला होता. सुरवातीच्या ६०-७० रन्स द्रविड त्याच्यापुढे होता. इनफॅक्ट द्रविडनेच आधी सेंच्युरी पूर्ण केली होती. गांगुली १०० झाल्यावर उधळला.
आपली आपली आवड.>अर्थातच.
आपली आपली आवड.>अर्थातच. माझ्यासाठी गंगूची बेश्ट inning ढाक्यात आपला पहिला ३००+ चेस होता ती होती. सचिन ने jump start करून दिलेली inning but someone had to stay and make sure to carry on and Ganguly did that to perfection. त्याचे पुढे येऊन खेळलेले, विशेषतः स्पिनर्स ला लॉफ्टेड शॉट्स मस्तच असायचे.
असामी, त्या मॅचला गांगुली आणि
असामी,
त्या मॅचला गांगुली आणि रबिंद्र रामनारायण सिंग नामक ऑलराऊंडरची मस्तं पार्टनरशीप झाली होती.
आणि शेवटच्या साकलेनच्या ओव्हरमध्ये २ बॉलमध्ये ३ रन्स हव्या असताना हृषिकेश कानेटकरने मारलेली फोर अजरामर ठरली होती!
त्यावेळी वन-डे मधला तो रेकॉर्ड चेस होता!
बरोबर स्पार्टा, रॉबिन सिंग
बरोबर स्पार्टा, रॉबिन सिंग झकास खेळला होता, एकदम professional inning होती त्याची. साकलेनला सुरूवातीला सचिन ने मारलेले फोर नि मग त्याने लेंग्थ अॅडजस्ट करून त्याला आऊट करणे, those were class acts.
त्यावेळी वन-डे मधला तो रेकॉर्ड चेस होता! >> हो नि मग ३००+ ची चटक झाली कोहलीमूळे
हो नि मग ३००+ ची चटक झाली
हो नि मग ३००+ ची चटक झाली कोहलीमूळे
>>>>
चटक
पण खरं आहे! ही इंडीयन टीम काय वाटेल ते चेस करु शकते असं वाटतं
Pages