मी अमि यांच्या 'जुन्या कपड्यांचे काय करावे' या धाग्यावर मी आधी याबद्दल लिहिले आहे. तिथे खुप जणांना हि कल्पना आवडली म्हणून नवीन धागा काढून ती परत इथे डकवते आहे. अधिक अधिक लोकांपर्यंत हि कल्पना पोचावी म्हणून.
मुळात हि कल्पना माझी नाही. मी नेट वर पाहून हि उचलली आहे.
लेकाचे टि शर्ट नेहमी कामवाल्या बाईंना देते पण नेट वर मेमरी क्विल्ट पाहिल्यावर थोडे टी शर्ट वापरून हे बनवले. मुलगा मोठा होतोय, असे रंगीबेरंगी कपडे कदाचित पुढे वापरणार नाही. हि आठवण रंगीत दिवसांची.
हे मीच बनवलं आहे. मला शिलाई मशीन चालवता येत नाही. म्हणून हाताने शिवले आहे. मी अंदाजाने एक आकार ठरवून पुठ्ठा कापून घेतला आणि त्याच्या मदतीने टि शर्ट चे एका आकाराचे तुकडे कापून घेतले आणि एकमेकांना जोडले. मागे एक जाड चादर लावली आहे. त्याच्या पहिल्या शाळेचा बॅच/खिसा पण लावलाय. फार सुबक असं नाही झालंय काम पण, आठवणी महत्वाच्या.
अप्रतिम. कल्पना खूप आवडली.
अप्रतिम. कल्पना खूप आवडली.
छान झालंय
छान झालंय
सुरेख
सुरेख
छानयं !
छानयं !
मस्त आहे.
मस्त आहे.
मस्त!
मस्त!
मस्त आहे. आठवणी खरंच
मस्त आहे. आठवणी खरंच महत्वाच्या.
खूप सुंदर दिसते आहे. कल्पना
खूप सुंदर दिसते आहे. कल्पना चांगली आहे.होजियरी शिवताना त्रास नाही झाला का? कापड ताणले जाते आणी शिवण वेडीवाकडी येते.
प्राची, खुप छान. मलाही अनु
प्राची, खुप छान.
मलाही अनु सारखाच प्रश्न पडलाय. होजीयरी वर मशिन मारायला त्रास होतो.
मी हाताने शिवले आहे. आधी
मी हाताने शिवले आहे. आधी म्हटल्याप्रमाणे फार सुबक असे काम नाही दिसत पण तरी ....
ओह आत्ता वाचले.
ओह आत्ता वाचले.
मस्तच आहे
मस्तच आहे
सुरेख्च कल्प ना आ व ड ली
सुरेख्च कल्प ना आ व ड ली
छाने..
छाने..
मस्त कल्पना.हाताने शिवलेले
मस्त कल्पना.हाताने शिवलेले वाटत नाहीये छान झालय.
मस्तच आहे. हाताने शिवलंय
मस्तच आहे. हाताने शिवलंय तरीही सफाई छान आहे शिवणाला.
किती मस्त.. अशा रुपात लहानपण
किती मस्त.. अशा रुपात लहानपण जपणं, हि कल्पनाच सुंदर आहे.
मस्तच आहे. हाताने शिवलंय
मस्तच आहे. हाताने शिवलंय तरीही सफाई छान आहे शिवणाला.>>++११
सुंदर आहे.
मस्त आहे
मस्त आहे
तुमच्या सर्वांचे प्रतिसाद
तुमच्या सर्वांचे प्रतिसाद वाचून प्रचंड आनंद झालाय. खरच सांगते मी शिवणकाम फारसे करत नाही. भरतकाम, क्रोशा वगैरे पूर्वी आवडीने करायचे आताशा तेही बंदच आहे.
माझी आजी वयाच्या ८० वर्षापर्यन्त हाताने कपडे शिवायची. मशीनची शिवण उसवेल पण माझी नाही असे ठासून सांगायची. आम्ही तिने शिवलेली अंगडी-टोपडी घालूनच लहानचे मोठे झालो. माझ्या लेकाला मात्र ते सुख नाही मिळालं.
तुकडे-तुकडे जोडून केलेली दुपटी तर तिची खासियत होती. त्यात ती भिरभिरे, पोपट, बदक असे काय काय बनवायची. हे शिवताना मनात तिचाच विचार हटकून यायचा. ती असती तर तिने निगुतिने हे शिवून दिलं असतं. कदाचित ती वरून बघत असेल माझ्याकडे म्हणून हे नीट झालं असेल माझ्याकडून.
सगळ्यांचे मनापासुन आभार.
खुप छान झालय !
खुप छान झालय !