!! श्री गणेशा !!
पुणे बेंगलोर महामार्गावरती कोल्हापूर च्या आधी २० किमी मागे हायवे टच माझे छोटेसे गाव आहे "किणी" प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला माझ्या गावाची यात्रा असते, वारणा नदीचा पूल ओलांडून कोप जिल्यात प्रवेश्ल्यानंतर काहीच किमी अंतरावर माझे गाव आहे , हा त्याचा फाटा .
यात्रा १७ फेबु मंगळवार पासून असल्यामुळे मी सोमवार पासूनच सुट्टी घेतली आणि गावी आलो .
हे माझे छोटेसे घर (होम स्वीट होम)
हे माझ्या गावाचे मारुती मंदिर .
हे माझ्या गावाचे शंकराचे मंदिर
महाशिवरात्रीचा पहिल्या दिवशी उपवास व जागर असतो , सायंकाळी ७ ते १० च्या दरम्यान दंडवत असते , घरापासून ते मंदिरापर्यंत दंडवत घालत जात असतात जवळपास १०० ते १२५ लोक ज्यांनी दंडवत घालून देवाला साकडे घालत असतात , पुढे वाजंत्री असतात कैकाडी समाजाची ५ ते ६ लोक वाजंत्रीचे काम सांभाळतात तर ३ एक लोक कंदील घेऊन पुढे असतात .
रात्रीचा एकादशीचा उपवास असल्यामुळे संद्याकाळी फक्त वरई आणि शेंगदाण्याची आमटी हा फराळ असतो
घरातील स्त्रीमंडळी रात्रभर पुरणपोळी करण्यात जागरण घालतात तर अमी रात्री मंदिराजवळ सासनकाठी आणि त्यांच्या जागा मिळवण्यासाठी धडपडत असतो .
पिक - मंदिराची रोषणाई
पहिला दिवस झाल्यानंतर दुसरा दिवस असतो तो मुख्य यात्रेचा , या दिवशी गावाच्या मुख्य चौकात छानशी यात्रा भरते , खेळण्यांची दुकाने , भेळ, ice क्रीम चे गाडे, मोठ मोठाले पाळणे , आकाश पाळणा हा आमचा सर्वात आवडता पाळणा , डान्सिंग पाळणा , गोल चक्राचे पाळणे , अनेक ठिकाणी हवा भरून फुगवलेले मोठ मोठे बाहुले .
सकाळ पासून दुपारी ४ ते ५ पर्यंत यात्रा फिरून झाली कि संध्याकाळी चालू होतो तो सासनकाठी नाचवण्याचा कार्यक्रम , जवळ पास ५० फुल उंच बांबूला योग्य प्रकारे सजऊन, मारुतीची मूर्ती खांद्याच्या लेवल ला बसवलेली असते त्याला अतिशय छान शी सजावट केलेली असते आणि आणि ती उचलून खांद्यावर घेण्यासाठी एक मोठा रुंद असा लाकडाचा तुकडा अडवा बसवलेला असतो खाली चित्रात दाखवलेला आहे तसा ,
सासनकाठीच्या चारीबाजूने ओढण्या बांधलेल्या असतात ज्यामुळे नाचवताना जर तोल गेला तर त्या ओढण्यामुळे तोल सावरता येतो .गुलाल , आणि संगीताच्या तालावर भक्ती भावाने सासनकाठ्या मंदिरापासून ते गावातील मुख्य रस्त्यापर्यंत नाचवत आणल्या जातात , जवळपास रात्रीचे १० पर्यंत हा कार्यक्रम चाललेला असतो
दोन दिवस यात्रा लहान मुलांसाठी तर तिसरा दिवस असतो मोठ्या मुलांचा तरुणाईचा .
बैल गाडी शर्यत , घोडा गाडी शर्यत , यांचे राउंड भरवेल जातात गावातील मुख्य रस्त्यापासून ते गावाच्या वेशिजवलिल झाडाला गोल येडा मारून यावा लागतो (या वर्षी शर्यतीवर बंदी असल्यामुळे कोणत्याही शर्यती भारावल्या नव्हत्या)
शर्यतींचा कार्यक्रम झाला कि संद्याकाळी भरते ते कुस्तांचे आकाड .
बाहेरगावातून तसेच गावातील कुस्ती लढवणारे पैलवान जीवाची बाजी लाऊन आपले कौशल्य सदर करतात . आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा हि जपतात .
दिवसभर हा सारा पसारा आवरला कि संध्याकाळ असते ती मस्त मधिरेचि नशा आणि सोबत वषाड म्हणजेच हड्डी चे जेवण , जे ते आपल्या परीने जेवण बनवतात नातेवाईक आणि मित्र मंडळीना आमंत्रित केलेले असते .
मांसाहारी जेवणाची धुंदी आणि मधिरेचि नशा उतरली कि चौथ्या दिवशी असतो तो माजोरंजन आणि गावाच्या महिलांना पाहता येईल यासारखा कलापथक (ओर्केष्ट्रा) ठेवलेला असतो .(कलापथकाचे फोटोज चुकून डिलीट झाले त्यामुळे टाकले नाहीत (क्षमस्व ). )
सलग दोन दिवस ओर्केष्ट्रा आणि मग या या वर्षीच्या अद्भुत सोहळ्याची सांगता होते , ज्या साठी अखंड वर्षभर वाट पाहिलेली असते असा सोहळा संपतो
एक सुंदर सायंकाळ माझ्या घराच्या छतावरून घेतलेला हा फोटो - NH4 च्या मागून नारळीच्या मध्ये हळू हळू सुर्य परतीच्या मार्गावर चालला आहे .
घरातील बच्चे कंपनीसोबत घेतलेले काही सेल्फी .
माझ्यासार्की गावाबाहेर राहणारी मुले यात्रेच्या प्रतीक्षेत असतात , कधी एकदा यात्रा येते आणि गावी जातो .बाकी पुढील वर्षी पुढच्या यात्रे बद्दल लिहीन .
धन्यवाद
वि भो .
छान आहेत फोटो. बच्चे कंपनी
छान आहेत फोटो.
बच्चे कंपनी आणि पुरणपोळीचा फारच गोड !
धन्यावाद रावि
धन्यावाद रावि
मज्जा असते तर ४-५ दिवस.
मज्जा असते तर ४-५ दिवस. बच्चेकंपनी गोड आहे.
सगळेच फोटो मस्त आहेत. सासन
सगळेच फोटो मस्त आहेत.
सासन काठी, किणी गाव फारच जिव्हाळ्याचे
छान आहेत सगळेच फोटो.. मी
छान आहेत सगळेच फोटो..:)
मी वारणेला होते कॉलेजला ,त्यामुळे तो रस्ता खूप ओळखीचा आहे...आम्ही किणी वाठार ला उतरायचो आणि मग तिथून वारणेला...
हे फोटो बघून त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.
कॉलेज संपल्यापासून गेलेच नाही तिकडे...अगदी जाऊन आल्यासारख वाटल...
छान फोटो.
छान फोटो.
मस्त फोटोज
मस्त फोटोज
मस्त जत्रा वृतांत ! आमीही
मस्त जत्रा वृतांत ! आमीही जत्रेला जाऊन आल्या सारखे वाटले.
माही जत्रा यात्रा....अशी काही
माही जत्रा यात्रा....अशी काही नावे ग्रामीण संस्कृतीच्या मातीत रुतून बसली आहेत की अशा गावातील मुलगा असो वा मुलगी कोणत्याही कारणास्तव ते गाव सोडून मुंबईपुणेदिल्लीबंगलोरहैद्राबाद अशा गावी कामानिमित्ताने नोकरीनिमित्ताने गेला/गेली असली तरी जत्रेच्या दिवसाची चातकासारखी वाट पाहातात आणि तो दिवस जवळ आला की आंतरिक ओढीने गावाकडे सुसाट वेगाने येतात....रमतात त्या आठवणीत.
किणीघुणकी ह्या भागात मी अन्य निमित्ताने गेलो आहे. पण थेट जत्रेत सामील होता आले नाही कधी. विशालशी इथे नेटवर ओळख झाल्यावर त्याने अगत्याने मला आणि अन्य सदस्यांना किणीला आग्रहाने बोलाविले....काही कारणामुळे ते या वर्षी जरी जमले नाही तरी पुढील खेपी नक्की करणार ही जत्रा....त्यातही पुरणपोळ्यांसाठी खास.
सारेच फोटो फार बोलके आहेत विशाल...विशेषतः तुझ्या घरचा आणि पोरांसमवेतचे तर खासच.
लय भारी विशालभाऊ,
लय भारी विशालभाऊ, महाशिवरात्रीची जत्रा वर्णन, फोटो सगळंच.
जागू, कंसराज, जिप्सी, आणि
जागू, कंसराज, जिप्सी, आणि चौथा कोनाडा - धन्यवाद ,
सासन काठी, किणी गाव फारच जिव्हाळ्याचे <<<< कोणासाठी ?
लतांकुर - आता वारणा हि फारच बदलले आहे , पण आपल्या भागातील गोडवा तरी तोच आहे अजून .
मामा , अन्जुताई , आपणास प्रथमता धन्यवाद , या वर्षी जरी यात्रेस यायला नाही जमले तरी पुढील वर्षी नक्कीच बेत करू आपण , हव तर गटग करू .
विशाल, खूप छान फोटो आणि
विशाल, खूप छान फोटो आणि वर्णन. जत्रेला जावून आल्या सारखे वाटले. मी अश्या जत्रा नाही पहिल्या आहेत. त्यामुळे मस्त वाटले. त्यातल्या त्यात फक्त अंगणेवाडीची जत्रा बघितली आहे.
बच्चे कंपनी चे फोटोझ मस्त आहेत.
धन्यावाद : - सामि , तुमि हव
धन्यावाद : - सामि , तुमि हव तर पुढिल वर्शि अमच्या गावि या यात्रेला
खूप छान, जगाच्या पाठीवर
खूप छान, जगाच्या पाठीवर कुठेही जा आपल्या गावच्या मातीची ओढ रहातेच!
अरे वाह!! मस्त जत्रा आहे की.
अरे वाह!!
मस्त जत्रा आहे की.
जत्रा म्हणा किंवा म्हाई / माहि गावचं चैतन्य वेगळच.
लिखाण करण्याच्या फ्लो मध्ये काहि शुद्धलेखनाच्या चुका होतात तिकडे थोडसं लक्ष दे रे भाउ.
छान आहे जत्रा अन फोटोही.
छान आहे जत्रा अन फोटोही. आमच्या गावच्या (हिंगोली) दसरा जत्रेची फार आठवण आली.
खूप छान फोटो आणि वर्णन
खूप छान फोटो आणि वर्णन विशाल.
लिखाण करण्याच्या फ्लो मध्ये
लिखाण करण्याच्या फ्लो मध्ये काहि शुद्धलेखनाच्या चुका होतात तिकडे थोडसं लक्ष दे रे भाउ. >>> नक्कीच लक्ष द्यायला हवे , पुढील लिखाणामध्ये काळजी घेईन .
खूप छान, जगाच्या पाठीवर कुठेही जा आपल्या गावच्या मातीची ओढ रहातेच!>>> १०००% सहमत
अनघा आणि सृ ............. धन्यवाद .
खूप छान
खूप छान
सामि , तुमि हव तर पुढिल वर्शि
सामि , तुमि हव तर पुढिल वर्शि अमच्या गावि या यात्रेला > धन्यवाद विशाल.
छान ..
छान ..
शिन्दे निल्या + मंजू >>>>>>
शिन्दे निल्या + मंजू >>>>>> धन्यावाद
छान
छान
धन्यावाद - नारु
धन्यावाद - नारु
मस्त लिहिलय ! प्र. ची. बी
मस्त लिहिलय ! प्र. ची. बी भारी हायेत भावा... मजा आली वाचताना.
धन्यावाद दादाश्री .......
धन्यावाद दादाश्री .......
(No subject)
वाह, मस्तं वाटलं जत्रा
वाह, मस्तं वाटलं जत्रा बघून.
फोटो मस्तं आहेत. छान लेख.