Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 January, 2014 - 22:13
गझलेतील प्रत्येक शेर दणकेबाज किंवा उत्तम होतोच असे नाही... मात्र बर्याचदा गझलेतला एखादा किंवा दुसरा शेर मनात रुंजी घालून रहातो. असे हासिल-ए-गझल शेर त्या गझलकाराच्या नावासहित इथे शेअर करु या. किंवा कित्येकदा आपण एखादा शेर लिहून जातो..पुढे त्याची गझल होत नाही असे फुटकळ शेर इथे शेअर करु या.
सर्व शेर प्रतिसादात लिहावेत ही विनंती.
--डॉ.कैलास गायकवाड.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एक हझलीश शेर झाला होता परवा:
एक हझलीश शेर झाला होता परवा:
ती म्हणाली आठला येईन मी
सात पंचावन्न झाले की अता
ती म्हणाली आठला येईन मी सात
ती म्हणाली आठला येईन मी
सात पंचावन्न झाले की अता
वा.
हा गझलेचा शेर आहे.
आहे खरा तसा गझलेचा, पण
आहे खरा तसा गझलेचा, पण फस्सकन् हसूच येत आहे तो म्हणून पाहिल्यावर
वा ! सुंदर कल्पना.
वा ! सुंदर कल्पना.
शिल्पकार आला नि वेडा उचलून
शिल्पकार आला नि वेडा उचलून घेउन गेला
महतप्रयासाने केलेले काळजास दगडाचे !
सुप्रिया
वा वा
वा वा
आजकाल शेरांच्या ओळींचा क्रम
आजकाल शेरांच्या ओळींचा क्रम बदलून पाहायचा चाळा लागला आहे.
क्रम बदलला की एकदम वेगळेच वाटू लागते.
समीरजींचे नवे दोनही शेर आवडले
समीरजींचे नवे दोनही शेर आवडले बेफीजींचा हझलेचा शेरही मस्तच सुप्रियाताईंचाही शेर छान
क्रम बदलला की एकदम वेगळेच वाटू लागते.<< हो हो ! आणि अनेकदा शेराची मजाही वाढून बसते असेही मी पाहिले आहे
एक माझा नवा शेर अजूनतरी सुटाच आहे हा..
पदर हा तुझा की जणू एक योगी
क्षणार्धात 'नि:संग' शिकवून जातो
पदर हा तुझा की जणू एक
पदर हा तुझा की जणू एक योगी
क्षणार्धात 'नि:संग' शिकवून जातो
वा वा. मूडमध्ये दिसताय!
बेफिजी बदल केला धन्यवाद !
बेफिजी बदल केला
धन्यवाद !
वा वा. मूडमध्ये दिसताय! <<<
वा वा. मूडमध्ये दिसताय! <<< हाहाहा समीरजी
धन्स
कुण्णाला सांगू नकात बरका
कसे वाटेल कोणी ऐकले तर
"अशी" इच्छा कशी व्हावी कळेना
पदर हा तुझा की जणू एक
पदर हा तुझा की जणू एक योगी
क्षणार्धात 'नि:संग' शिकवून जातो
वा वैवकु..
निःसंग वरून माझा एक शेर आठवला
निःसंग वरून माझा एक शेर आठवला -
इथे एक संदर्भ निःसंग करतो
कसे पाठ केलेस तू बारकावे ?
--सुशांत..
इथे एक संदर्भ निःसंग करतो कसे
इथे एक संदर्भ निःसंग करतो
कसे पाठ केलेस तू बारकावे ?<<<
व्वा
(इथे ह्या साध्यासुध्या शब्दात केवढी मजा असू शकते हे दाखवणारा समर्थ शेर)
पदर हा तुझा की जणू एक
पदर हा तुझा की जणू एक योगी
क्षणार्धात 'नि:संग' शिकवून जातो<<<
व्वा
मूडमध्ये दिसताय<<<
वैवकु, सुशांत, समीरजी क्या
वैवकु, सुशांत, समीरजी क्या ब्बात!!!
अफलातून!!!
तू दिसलीस की बरे वाटते अन
तू दिसलीस की बरे वाटते
अन हसलीस की खरे वाटते
व व बेफिजी, वैवकु, सुशांत एक
व व बेफिजी, वैवकु, सुशांत एक से बढकर एक !!
एकांताच्या उंबरठ्यावर विनोद
एकांताच्या उंबरठ्यावर विनोद झाला
कुणीतरी गर्दीस म्हणाले .......'माणुसघाणी' !!
-सुप्रिया
उठतात पापण्याही दचकून
उठतात पापण्याही दचकून मध्यरात्री
येऊ नका सुखांनो फसवून मध्यरात्री ..!
इतकीच चांदण्यांनो बड़दास्त चोख ठेवा,
माझी व्यथा दिसावी उजळून मध्यरात्री...!
~ अनिल आठलेकर..
एकांताच्या उंबरठ्यावर विनोद
एकांताच्या उंबरठ्यावर विनोद झाला
कुणीतरी गर्दीस म्हणाले .......'माणुसघाणी' !! >> व्वा !
माझी व्यथा दिसावी उजळून मध्यरात्री...!>> क्या बात.
कधीकधी वाटते असे की- कधीकधी
कधीकधी वाटते असे की-
कधीकधी का असे वाटते..
--सुशांत..
माय ही माझी मराठी एक शीलालेख
माय ही माझी मराठी एक शीलालेख आहे
अमृताला जिंकणारी ग्यानबाची मेख आहे
एका ओळीमधे वेदना मावत
एका ओळीमधे वेदना मावत नाही
तरी मनाला लिहिल्यावाचुन र्हावत नाही.
--डॉ.कैलास गायकवाड
अफलातून मेजवानी
अफलातून मेजवानी धागा.....
जियो डोक्टर......
डॉक, एक मेहेफिल अब नेरूळ मे ड्यु है..... !
शुअर...कधी करायची?
शुअर...कधी करायची?
काल बोलला नदीवरचा पूल तो नाही
काल बोलला नदीवरचा पूल तो
नाही अजून गेला खेटून पावसाळा
( शायर माहीत नाही)
काल बोलला नदीवरचा पूल तो नाही
काल बोलला नदीवरचा पूल तो
नाही अजून गेला खेटून पावसाळा
हा चुकीचा शेर आहे. मला वाटतं खात्री असेल तरच शेर द्यावेत. माझा एक शेर तुझ्यासाठी न इथले
असाच चुकीच्या पध्दतीने कोट करण्यात आला आहे.
समीर
तुझ्यासाठी न इथले<<<<
तुझ्यासाठी न इथले<<<< पुस्तकात पाहून शाहनिशा करण्यात येइल !!
एक शेरः परिस्थितीने ढाल
एक शेरः
परिस्थितीने ढाल टाकली केव्हाची पण
तलवारीला चिथावण्याची खोड न मेली
समीर चव्हाण
Pages