वांग्याची काप भाजी

Submitted by आरती on 15 February, 2015 - 12:21
wangyache kaap
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

लांबट - निमुळती वांगी,
आलं-लसूण,
हिरवी मिरची,
धणे-जिरे पूड,
हिंग-हळद,
मीठ,
तेल.

क्रमवार पाककृती: 

आल-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट करून घ्या. त्यातच धणे-जिरे पूड,हळद,हिंग आणि मीठ घालून एकत्र कालवून घ्या. वांग्याचे पातळ काप करून घ्या. त्यांना सुरीच्या टोकाने थोडे टोचे द्या. एकत्र केलेले मिश्रण प्रत्येक कापावर थोडेथोडे घालून हाताच्या अंगठ्याने थोडे दाबून पसरवा. जेणे करून ते आत जाईल. पसरट भांड्यात / तव्यावर थोडेसे तेल तापवून ते नीट पसरवून घ्या. एकावर एक येणार नाहीत अशा पद्धतीने सगळे काप भांड्यात / तव्यावर शिजायला ठेवा. झाकण ठेऊन एक वाफ येऊ द्या. काप उलटून पुन्हा एक वाफ येऊ द्या.

कुरकुरीत हवे असतील तर आच कमी करून झाकण न ठेवता अजून थोडावेळ गॅसवरच ठेवा.

[हा फोटो काढला त्यादिवशी मिक्सर नसल्याने मी, आल-लसूण-मिरची कटर मधून बारीक केले होते. त्यामुळे नीट पसरले गेले नव्हते.]

वाढणी/प्रमाण: 
एका वांग्याचे एका माणसाला पुरे.
अधिक टिपा: 

मला ज्यांनी पा.कृ सांगितली त्यांनी भाजी म्हणून केली होती. त्यामुळे आधी पोळी बरोबरच खायचो. पण कमी तिखट आणि थोडे कुरकुरीत केले तर नुसते पण मस्त लागतात.
यातच काही बटाट्याचे काप घालून पण छान लागते.
बरेच जणांकडे आल, लसुण, मीरची पेस्ट करून ठेवलेली असतेच त्यामुळे ही भाजी 'झटपट' प्रकारात मोडते.
वांगी खूप आधीपासून चिरून पाण्यात घालून ठेऊ नयेत. काप चवीला पांचट होतात.

माहितीचा स्रोत: 
न्यूजर्सीला माझ्याकडे स्वयपाकाला येणाऱ्या काकु.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा ! मस्त पाकृ . फोटोही मस्त
माझ्याकडे झब्बू आहे तसा पण तो चालेल का असा प्रश्न आहे . कारण ते फक्त काप आहेत . फोटो टाकू का ?

मस्त.

मस्त वाटतेय भाजी.. वांगे आवडती भाजी सो लवकरच करुन पाहण्यात येईल.. फोटु खतरनाक आलाय..भुक लागली.. Proud

Sayali Paturkar | 16 February, 2015 - 14:36 नवीन
आरती तुमच्या पा. कृ हमखास आवडणार्‍या असतात..

+१ Proud

जीएस, Biggrin

वांगे अतिशय आवडते. त्यामुळे करून बघेन. फोटो मस्तच.

जाईचा पण फोटो मस्त.

तांदूळ पीठ लावून काप करते पण असे नाही केले कधी.

प्राची, संपदा
कसल्या उत्साही आहात, लगेच केली पण Happy

प्रतिसादाबद्दल सगळ्यांना धन्यवाद.

जीएस,
ते अर्धेच कॉपीपेस्ट झाले आहे पण मी पुर्ण समजुन वाचते आहे. Wink

शनिवारी केले होते असे वांग्याचे काप. तव्यावरच अर्धे संपले .उरलेल्यांचा फोटो काढत बसले असते तर माझ्या वाट्याला एकही आला नसता Happy

लय भारी प्रकार