लांबट - निमुळती वांगी,
आलं-लसूण,
हिरवी मिरची,
धणे-जिरे पूड,
हिंग-हळद,
मीठ,
तेल.
आल-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट करून घ्या. त्यातच धणे-जिरे पूड,हळद,हिंग आणि मीठ घालून एकत्र कालवून घ्या. वांग्याचे पातळ काप करून घ्या. त्यांना सुरीच्या टोकाने थोडे टोचे द्या. एकत्र केलेले मिश्रण प्रत्येक कापावर थोडेथोडे घालून हाताच्या अंगठ्याने थोडे दाबून पसरवा. जेणे करून ते आत जाईल. पसरट भांड्यात / तव्यावर थोडेसे तेल तापवून ते नीट पसरवून घ्या. एकावर एक येणार नाहीत अशा पद्धतीने सगळे काप भांड्यात / तव्यावर शिजायला ठेवा. झाकण ठेऊन एक वाफ येऊ द्या. काप उलटून पुन्हा एक वाफ येऊ द्या.
कुरकुरीत हवे असतील तर आच कमी करून झाकण न ठेवता अजून थोडावेळ गॅसवरच ठेवा.
[हा फोटो काढला त्यादिवशी मिक्सर नसल्याने मी, आल-लसूण-मिरची कटर मधून बारीक केले होते. त्यामुळे नीट पसरले गेले नव्हते.]
मला ज्यांनी पा.कृ सांगितली त्यांनी भाजी म्हणून केली होती. त्यामुळे आधी पोळी बरोबरच खायचो. पण कमी तिखट आणि थोडे कुरकुरीत केले तर नुसते पण मस्त लागतात.
यातच काही बटाट्याचे काप घालून पण छान लागते.
बरेच जणांकडे आल, लसुण, मीरची पेस्ट करून ठेवलेली असतेच त्यामुळे ही भाजी 'झटपट' प्रकारात मोडते.
वांगी खूप आधीपासून चिरून पाण्यात घालून ठेऊ नयेत. काप चवीला पांचट होतात.
अरे वा ! मस्त पाकृ . फोटोही
अरे वा ! मस्त पाकृ . फोटोही मस्त
माझ्याकडे झब्बू आहे तसा पण तो चालेल का असा प्रश्न आहे . कारण ते फक्त काप आहेत . फोटो टाकू का ?
व्वा मस्त दिसतायत वांग्याचे
व्वा मस्त दिसतायत वांग्याचे काप. वांग आवडत त्यामुळे करुन बघणार नक्की.
जाई. , टाक की झब्बू फोटो.
जाई. , टाक की झब्बू फोटो.
हा झब्बू ! चालेल का शंका आहे
हा झब्बू ! चालेल का शंका आहे
मस्त दिसतेय भाजी.
मस्त दिसतेय भाजी.
जाई, फोटो कातिल आलाय.
जाई, फोटो कातिल आलाय.
थॅंक्स मनीतै !
थॅंक्स मनीतै !
जाई., मस्त फोटो. एकदम
जाई., मस्त फोटो. एकदम खुसखुशीत झालेत काप.
छान दिसतेय चवीला पण मस्त झाली
छान दिसतेय चवीला पण मस्त झाली असेल .
जाई कुरकुरीत करण्यासाठी तू थोडी तांदळाची पिठी लावलियेस का ?
छानच दिसताहेत !
छानच दिसताहेत !
सही दिसत आहेत काप!
सही दिसत आहेत काप!
मस्त.
मस्त.
आरती, मस्त फोटो...
आरती, मस्त फोटो...
आज ही भाजी केली. यम्मी!!! मला
आज ही भाजी केली. यम्मी!!! मला आवडली
मस्त वाटतेय भाजी.. वांगे
मस्त वाटतेय भाजी.. वांगे आवडती भाजी सो लवकरच करुन पाहण्यात येईल.. फोटु खतरनाक आलाय..भुक लागली..
आरती तुमच्या पा. कृ हमखास
आरती तुमच्या पा. कृ हमखास आवडणार्या असतात..
नक्की क रुन बघेन..
मस्त फोटो!!
मस्त फोटो!!
Sayali Paturkar | 16
Sayali Paturkar | 16 February, 2015 - 14:36 नवीन
आरती तुमच्या पा. कृ हमखास आवडणार्या असतात..
+१
जीएस,
जीएस,
वांगे अतिशय आवडते. त्यामुळे
वांगे अतिशय आवडते. त्यामुळे करून बघेन. फोटो मस्तच.
जाईचा पण फोटो मस्त.
तांदूळ पीठ लावून काप करते पण असे नाही केले कधी.
वा मस्तच दिसताहेत काप मी पण
वा मस्तच दिसताहेत
काप मी पण करते पण डाळीच्या पिठात आणि रव्यात घोळवून करते
चवीला कातिलच लागतात
आजच केली भाजी, खरंतर कापच .
आजच केली भाजी, खरंतर कापच :). मस्त लागले त्यामुळे फोटो काढायच्या आधीच संपले
मस्त लागले त्यामुळे फोटो
मस्त लागले त्यामुळे फोटो काढायच्या आधीच संपले>>
हा हा.
प्राची, संपदा कसल्या उत्साही
प्राची, संपदा
कसल्या उत्साही आहात, लगेच केली पण
प्रतिसादाबद्दल सगळ्यांना धन्यवाद.
जीएस,
ते अर्धेच कॉपीपेस्ट झाले आहे पण मी पुर्ण समजुन वाचते आहे.
शनिवारी केले होते असे
शनिवारी केले होते असे वांग्याचे काप. तव्यावरच अर्धे संपले .उरलेल्यांचा फोटो काढत बसले असते तर माझ्या वाट्याला एकही आला नसता
लय भारी प्रकार
आवडल्याचे सांगीतल्याबद्दल
आवडल्याचे सांगीतल्याबद्दल धन्यवाद, मेधा