Submitted by किमया देवलसी on 1 February, 2012 - 06:36
हॅरी पॉटरच्या जे. के. रोल्लिन्ग्बाईन्सारखे आणखी एक वेड लावणारे लेखक म्हणजे डेन ब्राउन. यांची सगळीच पुस्तके. विशेषतः "द दा विन्सी कोड " एका वेगळ्याच विश्वात आपल्याला घेउन जातात. पुस्तकात विषयाच्या अनुषंगाने येणारी चित्रांबद्दल, एखाद्या संस्थेबाबत, धर्म , आचार विचार, आजचे तंत्रज्ञान (द डिसेप्शन पौइन्ट) या संदर्भात येणारी माहिती त्या त्या विषयात आपल्याला हळूवारपणे नेउन सोडते. या पुस्तकांबद्दल, या लेखकाबद्दल चर्चा करण्यासाठी हा धागा.
टीपः या विषयावर आणखी कुठे चर्चा झाली असेल तर जरूर कळवावे मी माझे लिखाण तिथेच हलवेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा वा वा.... माझा अजुन एक
वा वा वा.... माझा अजुन एक आवडता लेखक
डा विन्सी वाचले आहे... मराठीत
डा विन्सी वाचले आहे... मराठीत
चला चिमूरी तुम्हाला पण ह
चला चिमूरी तुम्हाला पण ह लेखक आवडतो म्हटल्यावर आता या धाग्याला सुद्धा मरण नाही..:P:-P
भारीच कि. बरीच वर्षे झाली
भारीच कि. बरीच वर्षे झाली वाचुन. आता पुन्हा वाचायला हवीत.
फक्त डिजिटल फोर्ट्रेस आवडलं नव्हतं, म्हणजे शेवट अगदी काहितरीच वाटला होता.
चिमूरी तुम्हाला पण ह लेखक
चिमूरी तुम्हाला पण ह लेखक आवडतो म्हटल्यावर आता या धाग्याला सुद्धा मरण नाही>>>>>>>> त्यापेक्षा जामोप्याने दा विन्ची मराठीतुन वाचलं आहे म्हटल्यावर तर नाहीच नाही
रच्याकने, मला लास्ट सिम्बॉलचा शेवट नाही आवडला.. खोदा पहाड निकला चुहा असं काहितरी वाटलं...
मस्त मस्त. रॉबर्ट लँग्डन जाम
मस्त मस्त.
रॉबर्ट लँग्डन जाम हुशार माणूस. आपण त्याचे पंखे आहोत.
चर्चा वाचण्यास उत्सुक.
पेज टर्नर्स असतात त्याची
पेज टर्नर्स असतात त्याची पुस्तके.
:रुमालः
मला अँजल्स अँड डेमन्स आवडलं
मला अँजल्स अँड डेमन्स आवडलं होतं. दा विन्ची कोड पण छान होतं. लास्ट सिम्बॉल अति प्रेडिक्टेबल वाटलं होतं. आणि युरोपच्या इतिहासाची ती मजा यु एसमधे वाटली नाही.
मला फकस्त एन्जल्स अँड डेमन्स
मला फकस्त एन्जल्स अँड डेमन्स आणि दा विन्ची कोड आवडतात. बाकीची कैच्याकै आहेत हेमावैम!
मला मनापासून थ्रिलर्स आवडतात ती फोर्सिथची. १९९० च्या आधीची. त्यांची सर इतर कुणाच्याही थ्रिलर्सना नाही
वरदा, जेम्स हॅडली चेज नाही का
वरदा, जेम्स हॅडली चेज नाही का वाचली - त्याची थ्रिलर्स 'ओपन' असल्यामुळे जास्त आवडत - हिचकॉकच्या सिनेमांसारखी.
अॅलिस्टर मॅकलीन पण.
चेज अजिबातच क्लिक नाही झाला.
चेज अजिबातच क्लिक नाही झाला. मॅक्लीन आणि इतर वाचायचे सुरुवातीला पण एकदा फोर्सिथ हातात पडल्यावर प्युअर अॅक्शन थ्रिलर्स आवडेनासे झाले. मग अगदीच काही नसलं तर वाचत असे अशी पुस्तकं. एरवी अगाथा ख्रिस्ती आणि वुडहाऊस नित्य ठेवून इतर सर्व नैमित्तिक पुस्तकं असायची.
फोर्सिथ माझा पण आवडता. चेज पण
फोर्सिथ माझा पण आवडता. चेज पण आवडतो. अगाथा ख्रिस्ती तर ग्रेट आहेच आहे.
खरंतर वाचायला थ्रिलर्स हा आवडता प्रकार.
पण इथे दिनू तपकीरीचा चर्चा करूयात.
लॉस्ट सिंबॉल बद्दल <<< खोदा
लॉस्ट सिंबॉल बद्दल
<<< खोदा पहाड निकला चुहा असं काहितरी वाटलं...
आणि युरोपच्या इतिहासाची ती मजा यु एसमधे वाटली नाही. फिदीफिदी >>> ह्या दोन्हीला अनुमोदन!
फारच ओढून ताणून होतं ते !
मला दा विन्सी आणि एंजेल्स अँड डेमन्स दोन्ही आवडली होती. डिसेप्शन पॉईंटचा प्लॉट खूप चांगला होता. शेवटपर्यंत चांगलं होतं. शेवट फार विचित्र होता पण !! त्यामुळे सगळी मजा गेली.
डिजिटल फॉट्रेस लहानपणी लिहील्यासारखं वाटलं.
आता नवीन पुस्तकावर काम चालू आहे असं फेसबूक वर वाचलं .
>> मला फकस्त एन्जल्स अँड
>> मला फकस्त एन्जल्स अँड डेमन्स आणि दा विन्ची कोड आवडतात. बाकीची कैच्याकै आहेत हेमावैम!
+१
डॅन ब्राऊनचे फक्त 'डिसेप्शन
डॅन ब्राऊनचे फक्त 'डिसेप्शन पॉईंट' वाचून झालेय, छोटा भाऊ 'दा विन्ची कोड' वाच म्हणुन मागे लागलाय, पण ते आणि 'एन्जल्स अँड डेमन्स' यांचे चित्रपट आगोदरच पाहून झाल्यामुळे एनर्जी खर्च नाही करावीशी वाटत. 'लॉस्ट सिंबॉल' आहे माझ्याकडे, पण त्याच्या आगोदरच काही पुस्तके नंबर लावून आहेत. 'डिजीटल फोर्टेस' साठी लायब्ररीयनच्या मागे लागलोय, बघू कधी प्रसन्न होते ते
येस्स, डॅन ब्राऊन. आवडली पण
येस्स, डॅन ब्राऊन. आवडली पण झपाटून नाही टाकलं. (पुस्तकं वाचल्याला आता काही वर्ष झाली आहेत.)
लास्ट सिंबॉलबद्दल अनुमोदन. त्या रशियन भावल्यांसारखं एका पिरॅमिडमधून दुसरा पिरॅमिड ... असं काहीसं, अनेक आवर्तनं होऊन वाचक पकेपर्यंत सुरू होतं.
डिसेप्शन पॉइंट कुठले? डिजिटल
डिसेप्शन पॉइंट कुठले? डिजिटल फोर्ट्रेस म्हणजे ते कोड ब्रेक करणारे मशिन असते ते ना?
दोन पुस्तकामधे कन्फ्युज झालेय.
डिजिटल फोर्ट्रेस म्हणजे ते
डिजिटल फोर्ट्रेस म्हणजे ते कोड ब्रेक करणारे मशिन असते ते ना?>>>>>> बरोबर..
आवडली पण झपाटून नाही टाकलं.>>>>>>> +१
मला फकस्त एन्जल्स अँड डेमन्स
मला फकस्त एन्जल्स अँड डेमन्स आणि दा विन्ची कोड आवडतात.>>> मलाबी सेम!
जेफ्री आर्चरने डेन ब्राऊन हा लेखकच नव्हे या आशयाची टीका मध्यंतरी केली होती!
जेम्स हॅडली चेज सगळ्यात आवडता!!! त्याचा जुना पब्लिशर, कव्हरवर उगाच उघड्यावागड्या बाया टाकायचा (आता ते बंद झालेय!), मूळ कथेत तसलं काय नाय!!!!!!!!!!!
>> मला फकस्त एन्जल्स अँड
>> मला फकस्त एन्जल्स अँड डेमन्स आणि दा विन्ची कोड आवडतात. बाकीची कैच्याकै आहेत हेमावैम! +१ >>>++१
<<रॉबर्ट लँग्डन जाम हुशार
<<रॉबर्ट लँग्डन जाम हुशार माणूस. आपण त्याचे पंखे आहोत.>> मी पण....
मला सुद्धा दा विंसी आणि डिसेप्शन पॉइंट जास्त आवडते... डिजिटल फोर्ट्रेस आणि लास्ट सिंबॉल थोडे किचकट वाटले समजायला.
मी दा विंसी ईंग्र्जी आणि मरथी दोन्हीमध्ये वाचले पण ते ईंगलीशच जास्त चंगले वाटले..
प्रसीक, चित्रपटावर जाऊ नक पुस्तके खरेच छान आहेत. दा विंसी तर वाचून बघाच.
लास्ट सिंबॉल बद्दल अगदी अगदी.
लास्ट सिंबॉल बद्दल अगदी अगदी. द विंची कोड मस्त. मेरी बद्दल नॅट जिओ वर एक सुरेख फिल्म आहे तिच्या बद्दल कसे गैरसमज पसरवले गेले त्याची. एंजल्स पण जरा टूमच आहे. म्हणजे स्क्रीन प्ले साठी लिहील्याचे फीलिन्ग येत राहते. मायकेल क्रिच्टन पण आवड्तो. ज्युरासिक पार्क व इतर मस्त आहेत. स्फीअर जरा बोअर आहे. तो ही शेवटी स्क्रीनप्ले साठीच लिहीतो आहे असे वाट्ते. मंजे पुस्तकात मनाला चालना देणारे जास्त हवे ना कि व्हिज्युअल्स?
लुड लुम ? ( करेक्ट उच्चार सांगा ) टॉम क्लॅन्सी, डर्क पिट ची अंडर वॉटर साहसे, लॉरेन्स सँडर्स हा पण मजेशीर. डेडली सिन्स मालिका, तसेच फायनान्शिअल क्राइम्स वरील मस्त पुस्तके. इंग्रजी भाषेतील विनोद अगदी प्रत्येक न्युरॉनला हळूवार स्पर्श करूनहसवून जातील इतके मस्त. त्याच्या पुस्तकात न्युयॉर्क शहराचे फार छान वर्णन असते.
लुडलुमच्या ट्रेन फ्रॉम सालोनिका असलेल्या पुस्तकाचे फिल्मीकरण व्हावे असे मला फार वाटत असे.
खूप नाट्यपूर्ण कथा आहे. परत मिळवून वाचते. नाव विसरले. आंतरजालाच्या जमान्यात हा बाफ म्हणजे अजून फार काही हरवले नाहिये असे वाटले.
> प्रत्येक न्युरॉनला हळूवार
> प्रत्येक न्युरॉनला हळूवार स्पर्श
अमा, न्युरॉन्सना स्पर्श झाला तर काय होईल सांगता येत नाही. बहुतेक तुमच्या वाक्यानी माझ्या न्युरॉन्सना झाला
<<आंतरजालाच्या जमान्यात हा
<<आंतरजालाच्या जमान्यात हा बाफ म्हणजे अजून फार काही हरवले नाहिये असे वाटले.>> +१
एकदम कॉलेजचे दिवस आठवले. मॅक्लीन, फोर्सिथ, लुडलम (??), चेज, टॉम क्लॅन्सी, अर्ल स्टॅन्ले गार्डनर, अगाथा ख्रिस्ती, जी. के. चेस्टरटन (फादर ब्राउन), हिचकॉक, आर्थर हेली, केन फॉले, जॉन ल कार, असे काय काय लेखक अधाशासारखे वाचून काढले होते. जेफ्री आर्चर, सिडने शेल्डन, विल्बर स्मिथ आणि रॉबिन कुक मात्र फारसे कधीच आवडले नाहीत. ग्रिशम ची काही चांगली आहेत पण नंतर रीपिटिटिव होतात (बहुतेकांची तीच स्थिती आहे म्हणा..)
असो, फारच अवांतर पोस्ट झाली! पण दा विन्ची कोड मस्तच. शेवटासकट एकदम जमून गेलीये कादंबरी.
कुणीतरी थ्रिलर्ससाठी नवा धागा उघडा ना...
कुणीतरी थ्रिलर्ससाठी नवा धागा
कुणीतरी थ्रिलर्ससाठी नवा धागा उघडा ना....... १०० % मोदक
एक एरिक व्हॉन लस्ट बाडर कि
एक एरिक व्हॉन लस्ट बाडर कि काय नावाचा लेखकु आहे त्याचे एक तरुण इजिप्शिअन मुलगी व तिचा खच्चीकरण केलेला पण तिच्यावर प्रेम करणारा गुलाम ह्यांचे फॅरो च्या काळातले वर्णन असलेले पुस्तक आहे. मंजे दोन तीन आहेत. ती मुलगी मोठी व म्हातारी होते. तिच्या जीवनातील चढ उतार, फॅरो शी लग्न इत्यादि व तिचा खजिना लपविण्यासाठी त्याने केलेली मेहनत. जुनी देवळे बांधणे इत्यादी रंजक माहिती व मसाला आहे. अतिशय टाइमपास लेखन आहे. मोठ्या ट्रेन जर्नी साठी ब्येस्ट.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/4350
इथे इंग्रजी रहस्यकथांची बरीच चर्चा झाली आहे. डॅन ब्राऊनला एक्स्क्लुजिव्हिटी द्या. बाकीच्यांबद्दल ह्या वरच्या धाग्यावर लिहा
दा विंची कोड हे पुस्तक सही
दा विंची कोड हे पुस्तक सही आहे. मी सिनेमा नाही पाहिला. काल तूनळीवर शोधून पाहिला पण ट्रेलर सोडून काही आढळले नाही. दा विंची चा शेवट करताना मी शेवटची ५० एक पाने एका सुपरमार्केटमधे वाचली होती. रात्रीचे १२ वाचले होते आणि मला ते पुस्तक ठेववतच नव्हते. शेवट सही केला आहे. एक प्रश्न पडतो. हे सगळ कितपत सत्य आहे. म्हणजे दा विंचीमधील होली ग्रेलबद्दल जे काही सांगितले आहे ते खरे आहे का?
पण ह्या पुस्तकामधे काही पात्रे आली की पाने पलटवली आहेत. जसे की फाश आणि अरिंगझवा व गैरे पात्र मी फारसे मन लावून नही वाचली. सोफिया नेव्हू, रॉबर्ट लिन्गडन, टिबींग, ही पात्रे मस्त रंगवली आहेत.
एन्जल्स अँड डेमन्स पुस्तक आधी
एन्जल्स अँड डेमन्स पुस्तक आधी वाचले, वाचले म्हणजे ७-८ वेळा पारायणे केली आणि नंतर कधीतरी चित्रपट बघण्यात आला आणी मग लक्षात आले की पुस्तक वाचण्यात जी मजा आहे ती त्याच पुस्तकावर बनवलेला चित्रपट पहाण्यात बिल्कुल नाही.
सर्वात आधी दा विन्ची कोड, मग एन्जल्स अँड डेमन्स आणी मग लॉस्ट सिम्बल. आवड उतरत्या क्रमाने.
डॅन ब्राउन ची सगळी पुस्तके
डॅन ब्राउन ची सगळी पुस्तके वाचली आहेत. सद्ध्या इन्फर्नो वाचते आहे. अर्धे वाचून झाले आहे. अजून तरी मजा येते आहे. फ्लोरेन्सचे खूप छान वर्णन आहे!!
दा विंची कोड आणि एंजल्स अॅंड डीमन्स चित्रपट मात्र तितकेसे आवडले नाहीत. पण टॉम हँक्स रॉबर्ट लँग्ड्न म्हणून पर्फेक्ट वाटला!!
लॉस्ट सिंबॉल बद्दल... खोदा पहाड निकला चुहा असं काहितरी वाटलं...आणि युरोपच्या इतिहासाची ती मजा यु एसमधे वाटली नाही. >> +१
डिसेप्शन पॉईंटचा प्लॉट खूप चांगला होता. शेवटपर्यंत चांगलं होतं. . शेवट फार विचित्र होता पण !! त्यामुळे सगळी मजा गेली. >>+१
Pages