साखर - अर्धी वाटी
पाणी - अर्धी वाटी
जाड बुडाचे लांब हॅंडल असलेले पातेले
दोन काटे चमचे
एक खोलगट पातेले
वर्तमानपत्र
1. जाड बुडाच्या पातेल्यात साखर आणि पाणी टाकून मध्यम आचेवर ढवळावे.
2. हळू हळू साखरेचा पाक तयार होईल
3. साधारण 4-5 मिनिटात पाकाचा रंग बदलून पिवळसर होईल.
4. चमचा पाकात बुडवून वरपर्यंत खेचत आणल्यास अतिशय बारीक धागा तयार झाल्याचे दिसेल.
4. गॅस बंद करा.
5. दुसरीकडे एका वर्तमानपत्रावर खोलगट पातेले ठेवा.
6. 2 काटे चमचे समांतर धरून पाकात बुडवा
5. खोलगट भांड्यावर चमच्यातल्या पाकाने आडव्या रेषा मारा.
6. साखरेचे धागे तयार झालेले दिसतील.
7. पुरेसे धागे तयार झाल्यावर उचलून हवा तो आकार द्या.
1. आईसक्रीम किंवा केकचे डेकोरेशन करण्यासाठी ह्या शुगर नेस्टचा वापर करता येऊ शकतो.
2. गरम साखरेपासून त्वचा वाचवा.
3. पातेल्यात पाक वाळल्यास अतिशय कडक होतो. वॉश करण्यासाठी कडक पाणी घालून भिजत ठेवा.
4. हा खेळ करताना आजूबाजूची भांडी दूर ठेवा. चिकट झाल्यास मी जबाबदार नाही
मस्त दिसतंय
मस्त दिसतंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टाकला
टाकला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गोग्गोड दिसतेय हे घरटे.
गोग्गोड दिसतेय हे घरटे.:स्मित:
भारी!
भारी!
मस्त दिसतंय घरटं एकतारी पाक
मस्त दिसतंय घरटं
एकतारी पाक लागेल की दोनतारी?
२ काटे चमचे म्हणजे दोन्ही काटेच लागतील ना?
आणि धागे उचलून आकार द्या म्हणजे काय? ते भांड्यापासून अलग होतात का? वाळल्यावर कडक होतात का?
मला बुड्डीका बाल हा प्रकार
मला बुड्डीका बाल हा प्रकार आठवला.
मस्त आहे स्नू कृती.
केरामल पुडिंग करताना भांडे
केरामल पुडिंग करताना भांडे धुताना फार कष्ट पडले होते
मंजुडी, थॅंक्स. पाकाच्या
मंजुडी,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थॅंक्स.
पाकाच्या वरची स्टेज साधारण Caramel होईल अशी.. हो. दोन काटे घेतले की धाग्यांची डेन्सिटि चांगली मिळते.
धागे आरामात भांड्यापासून विलग होतात. वाळल्यावर कडक होतात पण ढोबळ आकार देता येऊ शकतो.
भारी.. याला मस्त सोनेरी रंग
भारी.. याला मस्त सोनेरी रंग येतो, दिसतोही छान.
एक्स्पर्ट लोक हवेतल्या हवेत असे धागे तयार करताना बघितले आहेत.
स्नूने पातेले घेतले म्हणजे
स्नूने पातेले घेतले म्हणजे धागे पातेल्यापासून वेगळे होत असेल. काचेच्या वाडग्यात प्रयोग केला तरी चालेल बहुतेक.
काऊ, कॅरामेल करताना साखर पातेल्यात करपवल्यामुळे तसे झाले. इथे १-२ तारी पाक करुन काट्याने त्याच्या तारा काढायच्या आहेत. तारा काढून इकडून तिकडे त्या काट्याने ट्रान्स्फर करताना तो तारांमधला पाक गार होऊन घट्ट होत असावा.
हो ना गं स्नू?
अगदी बरोबर. फक्त 2 तरी
अगदी बरोबर.
फक्त 2 तरी पाकाच्या वरची लेवल. म्हणजे सोनेरी रंग येतो.
खोलगट पातेल्याचा फायदा असा की
खोलगट पातेल्याचा फायदा असा की धागे केवळ कडांच्या आधारे विसावतात आणि पातेल्यात मध्यभागी हाताने धरून उचलता येते. सपाट ताटावर केल्यास चिकटतील.
मस्त दिसतयं!
मस्त दिसतयं!
मस्तच दिसतय. पण वाटतय तितक
मस्तच दिसतय. पण वाटतय तितक काही हे सोप नसणार!!
नक्की करुन पहाण्यात येइल.
नक्की करुन पहाण्यात येइल.
मस्त दिसतयं! पण फार प्रयत्न
मस्त दिसतयं! पण फार प्रयत्न करावे लागतील मला.
जबरी
जबरी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाही नाही. फार सोप्पं आहे.
नाही नाही. फार सोप्पं आहे. मला जमलं म्हणजे कोणालाही जमेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओगले आज्जींनी एका पेल्यावर
ओगले आज्जींनी एका पेल्यावर मळलेली कणीक थापून, त्यावर तेल लावून असे धागे सोडायला सांगितले आहेत. ( असे अंधुकसे आठवतेय :-० )
कौशल्याचे काम आहे. आपण फोटो
कौशल्याचे काम आहे. आपण फोटो बघून छान छान म्हणणारे.
केरामल पुडिंग करताना भांडे
केरामल पुडिंग करताना भांडे धुताना फार कष्ट पडले होते>>>>:हहगलो: सॉरी पण फार ह्सू आले.
छान दिसतेय!
छान दिसतेय!
खुपच गोड दिसत य
खुपच गोड दिसत य
मस्त दिसतेय.
मस्त दिसतेय.
मस्त दिसतेय. गम्मत म्हणून
मस्त दिसतेय.
गम्मत म्हणून करून बघायला हरकत नाही.
मस्त दिसतंय. करून बघायच्या
मस्त दिसतंय. करून बघायच्या ऐवजी तू घरी आणून दे असलं घरटं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सोपे कॅरेमल पुडिंग ट्राय
सोपे कॅरेमल पुडिंग ट्राय केलेले बरेच जण सांगतील पातेले कसे धुवायचे ते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सोनपापडी पण अश्याच प्रकारे करतात फक्त पाकात डा. पिठ पण असते.
सगळ्यांना धन्यवाद अल्पना,
सगळ्यांना धन्यवाद
अल्पना, गटग ठरव लवकर. सगळ्यांसाठी घेवून येईन. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मागे एकदा केला होता हा
मागे एकदा केला होता हा प्रयोग.
पाक जसा जसा थन्ड होत गेला तसे तसे वेगवेगळ्या रंगाचे आणि आकराचे धागे बनत गेले. मज्जा येते हे करताना.
प्राची, मस्त
प्राची, मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)