Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11
सध्या फ्लिपकार्ट , अॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.
**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मिन्ट्रा - फ्लिपकार्टने
मिन्ट्रा - फ्लिपकार्टने घेतलीय
मस्त अनुभव... कुर्ती व्हरायटी जोरदार!
नापतोल- ठीक ठीक अनुभव. चादरी घेतल्या होत्या
हो, डीविनिता, नापतोलविषयी
हो, डीविनिता, नापतोलविषयी लिहायच विसरले. थॅन्क्स
अॅमेझॉन - लॅक्मे कोम्पॅक्ट
अॅमेझॉन - लॅक्मे कोम्पॅक्ट - MRP price पेक्षा २६/- ने फ्री अन फास्त डिलीव्हरी मिळाला. मोबाईल वगैरे ओळस्खीच्या लोकांनी स्वस्तात घेतलेत.
flipcart - कुर्ती बाजारभावातच पण fast delivery मिळाली. शनी दुपारी खरेदी - सोम सकाळी मिळाले.
snapdeal - samsung earphone with delivery charges असून ८ दिवस लावलेन.
माझा ऑनलाईन शॉपिंगचा अनुभव
माझा ऑनलाईन शॉपिंगचा अनुभव नेहमी चांगलाच राहिलाय.
फेव्हरिट साईट स्टार सी जे. उत्तम दर्जा, वेळेत डिलिव्हरी. स्नॅप डिल सुद्धा चांगलं आहे . मी एकदा एक काजळ पेन्सिल घेतली ती त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती पण त्यानी त्याचे पैसे परत पाठवले. बाकी कपडे वगैरे घेतले त्यात साईज माझ्या साईडनेच चुकला होता.
इंडिइबझार चा अनुभव पण मस्तच.
होम शॉप १८ सो सो आहे. दिवाळीत मी लंच बॉक्सेस ऑर्डर केले होते. आज येईल आज येइल (त्यांचा समस येत होता सारखा) एक दिवस मी पुर्ण वाट पहात राहिले. कारण कॅश ऑन डिलिव्हरी होतं. तो माणूस कुरिय र घेऊन रात्री ८ ला आला नंतर एक दिवस त्यातल्या एका डब्याचं झाकण चिरलं गेलं. त्यामुळे ती साईट मनातून उतरलीच
नेहेमी करत नाही,सहसा आसपास
नेहेमी करत नाही,सहसा आसपास जवळच्या टप्प्यात मिळणार नाहीत अशा गोष्टींचीच खरेदी ऑनलाईन केली आहे.
अॅमेझॉन, मिन्ट्रा, होमशॉप१८, रेडिफ अशा साईट्सवरून शॉपिंग केलंय. बाजारभावापेक्षा कायमच स्वस्त डील्स मिळाली. अनुभव उत्तम.
मी आतापर्यंत फक्त पुस्तकंच
मी आतापर्यंत फक्त पुस्तकंच मागवली आहेत. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन इंडिया आणि नुकतच पुस्तकजत्रा वरून. तिन्ही ठिकाणचे अनुभव चांगलेच आहेत.
रेडिफच्या शॉपिंग साइटवरून
रेडिफच्या शॉपिंग साइटवरून कधीही खरेदी करू नये.
मला एकदम स्वस्तामधे ट्रॅव्हल हेअर ड्रायर मिळाला म्हणून घेतला.
आल्यावर वस्तू बॉक्स उघडून प्लगात लावून चालू करून बघितली आणि भुस्स होऊन मोटर जळाली. त्याच प्लगपिनेत य वस्तू सुखेनैव चालतात माझ्या.
त्यांना फोन केला तर म्हणे परत पाठवा वस्तू मग आम्ही नवीन वस्तू किंवा रिफण्ड पाठवू. मी वस्तू परत पाठवली तर त्यांनी चुकीचा पत्ता दिला होता त्यामुळे कुरिअर परत आले. म्हणजे माझे तेही पैसे वाया गेले.
यावर त्यांची भाषा अत्यंत मग्रूर होती.
माझा एक पाय सतत शहराच्या बाहेर असल्याने जास्त पाठपुरावा करणे जमले नाही. कुरीअरवाल्याने मला फोन करून सांगितले की वस्तू परत आलीये काय करू. तेव्हा मी दीड महिना मुंबईच्या बाहेर असणार होते. ते सांगितल्यावर कुरीअरवाला म्हणे आठवड्यात घेऊन नाही गेलात वस्तू तर मी काही करू शकत नाही. म्हणलं मग वाट बघू नका. कचर्यात टाका आत्ताच.
मी आतापर्यत Fabfurnish,
मी आतापर्यत Fabfurnish, Pepperfry, Snapdeal, Flipcart , Domino Pizza आणि Amazon.in वरुन प्रत्येकी ५०० रु ते २०००० रु खरेदी केली. २०% ते ७०% डिस्काऊटं मिळाले. यामध्ये फर्निचर, शोभेच्या वस्तू, बेड्शीट्स, पुस्त
के आणि पिझ्झा आहेत.
जर जी वस्तू तुम्ही घेणार आहे त्या वस्तुविषयी तुम्हाला जुजबी माहिती असेल (किंमत, साईज, मॅटेरिय्ल)
, इंटरनेट सुरक्षाविषयी/ E Money (Credit Card/ Debit Card/ Net Banking) वापरण्याविषयी जुजबी माहिती असेल आणि डिल शोधण्यात तुम्ही माहिर असाल तर ऑनलाईन शॉपिगसारख्या दुसरा चांगला पर्याय नाही.
बुकमायशो चिक्कारवेळा
बुकमायशो चिक्कारवेळा वापरलंय. त्यांची सर्व्हिस छान आहे.
एकदा लोकलबनिया वरून भाज्याबिज्या मागवलेल्या पण क्वालिटी पसंतीस आली नाही. आपला तर रानडेरोड झिंदाबाद!
Me mazya muli lahan aslyamule
Me mazya muli lahan aslyamule maximum shopping onlineach karte.....firstcry.com,amazon.in, star cj,yancha aajparyantacha experience the bestach aahe....amazon warun agadi lahanat lahan wastuhi free delivery milte....
स्नॅपडीलवरून होमियोपॅथीच्या
स्नॅपडीलवरून होमियोपॅथीच्या कॅल्शियमच्या गोळ्या मागविल्या होत्या.
फ्लिपकार्टचा अनुभव मस्तच. मोबाईल घेतला आहे.मात्र नेक्स्ट डे डिलिव्हरीसाठी सांगूनही न मिळाल्याने ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी मेल पाठवला होता.फ्लिपकार्टची ,ऑर्डर कॅन्सल करतो ,पण दुसर्या दिवशी पाठवू का अशी विचारणा करणारी मेल आल्याने हो म्हटले. मोबाईल २ दिवस उशीरा मिळाला.परत मेल पाठवली की मी नेक्स्ट डे डिलिव्हरीसाठी वेगळे पैसे ( ९० रु.)भरूनही असं कसं झाले.मला ३ दिवसाच्या उशीराबद्द्ल २७०/- पर्यंत कोणतीही गोष्ट घ्यायला सांगितली. मला फक्त दिलगिरी हवी होती .त्यानंतर शॅम्पू, लिप्स्टिक्स घेतल्या.या सर्वांचे पैसे cash on delivery दिले.
बुकमायशो चिक्कारवेळा वापरलंय.
बुकमायशो चिक्कारवेळा वापरलंय. त्यांची सर्व्हिस छान आहे. <<
+१०००
Limeroad.com
Limeroad.com
जाई.... मी फ्लिपकार्ट
जाई....
मी फ्लिपकार्ट व्यतिरिक्त अन्य कोणतीही सुविधा वापरलेली नाही...त्याला कारण म्हणजे फ्लिपकार्टने दिलेली वा देत असलेली अत्युत्तम अशी सेवा. पुस्तके असोत, लहान मुलांची खेळणी, कपडे, गिफ्ट आर्टिकल्स असोत, बूट चप्पल्स असोत, एचपी प्रिटर्स, मोबाईल्स, चादरी बेडशीट्स...इ. असे विविध प्रकार मी मागविले त्यांच्याकडून. ऑर्डर तर नेहमीच कॅश ऑन डिलिव्हरी अशीच घेतली आहे आणि त्यांच्याही ग्राहकावर एकदा विश्वास बसला म्हणजे ऑर्डर कितीची आहे त्याची ती मॅनेजमेन्ट चिंता करीत नाही. एकदा तर चक्क ४४ हजार रुपयांची ऑर्डर झाली....(दोघातिघांची एकत्रित होती) तरीही माझ्याकडून ऑर्डरवर कन्फर्म क्लिक झाल्याझाल्या त्यांच्याकडून दुसर्याच मिनिटाला मोबाईलवर ऑर्डर स्वीकारल्याची पावती आली. तीन दिवसाच्या आत सर्व सामानांची अतिशय योग्यरितीने घरपोच डिलिव्हरीही झाली. पॅकिंग तर इतके सुंदर आणि व्यवस्थित की ते उघडण्यासाठी आम्हालाच झटापट करावी लागली.
शिवाय फ्लिपकार्टची स्वतःचीच कुरिअर सेवा असल्याने त्यांच्याकडूनही अदबशीर सेवादेखील मिळते, तेही महत्त्वाचेच ना.
स्नॅपडीलचा अनुभव उत्तम. १००
स्नॅपडीलचा अनुभव उत्तम.
१०० पासून १०००० पर्यंत कॅश ऑन डीलिव्हरी खरेदी केली आहे. अनेक साईट्स मेट्रोज सोडलेत तर बाकी शहरांतून कॅश ऑन डिलिव्हरी देत नाहीत.
कोणत्याही साईटवरून काहीही मागवण्याआधी व्हेंडर व त्या वस्तूला मिळालेले रेटिंग्स व रिव्ह्यूज नक्की वाचावेत. फक्त किंमत वाचून ऑर्डर करू नये.
सध्या आमच्या घरी पण जोरदार
सध्या आमच्या घरी पण जोरदार ऑनलाईन खरेदी होत असते. बाजारभावापेक्षा कायमच स्वस्त डील्स मिळाली. . फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे वस्तू असते. फिचर्स जसेच्या तसे असतात . बरेच कपडे,बूट आणि फ्रीज ह्या तीन गोष्टींची आत्ता पर्यंत ऑनलाईन खरेदी झालेली आहे. नेहमी कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन वापरला आहे . खरेदी फक्त स्नेप्डील आणि फ्लिपकार्ट वरूनच केली आहे . दोन्हीचा अनुभव उत्तम
एखादी वेबसाईट authentic आहे
एखादी वेबसाईट authentic आहे का नाही हे पडताळण्याचे काय मार्ग आहेत?
Flipcart बदलापुरमध्ये dilevry
Flipcart बदलापुरमध्ये dilevry नाही देत
फ्लिपकार्टवाले बर्याच ठिकाणी
फ्लिपकार्टवाले बर्याच ठिकाणी डिलिव्हरी देत नाहीत.
रिटेल विक्रेत्यासारखे दुकान उभारावे न लागल्याने वस्तू बाजारभावापेक्षा भरपूर स्वस्त किमतीत देणे या लोकांना परवडते. परंतू भारतीय कुरियर सेवांचा अनुभव अर्थात वस्तूची बेदरकार हाताळणी, पॅकेजवरील हँडलिंग इन्स्ट्रक्शन्सचे पालन न करणे या बाबी अत्यंत कॉमन.
हातात मिळणारी वस्तू बहुतेकदा 'स्लाईटली डॅमेज्ड' असते. उदा. पोचे पडणे, स्क्रॅच येणे इ. विशेषतः मोठ्या व जड वस्तूंबाबत हे होते, असा माझा अनुभव आहे.
तुमचा याबाबतीतला अनुभव काय?
डॉक्टर.... फ्लिपकार्टवाल्यांच
डॉक्टर....
फ्लिपकार्टवाल्यांची कुरिअरबाबतची अडचण असावी (असा माझा एक ढोबळ असा तर्क आहे). ऑर्डर नोंदविण्यापूर्वी ते ग्राहकाला त्याच्या गावाचा पिन कोड टाईप करायला सांगतात. तो टाईपला म्हणजे एका सेकंदात त्यांचे उत्तर स्क्रीनवर येते "या ठिकाणी सेवा उपलब्ध आहे" किंवा "नाही". बर्याच मोठ्या शहरात फ्लिपकार्टने स्वतःच्या कुरिअर सेवा चालू केल्या आहेत, ते चांगलेच आहे. तरीही ज्या ठिकाणी त्याना अन्य कंपनीची सेवा घेणे मान्य नसेल त्या ठिकाणी ते डिलिव्हरी देत नाहीत असे दिसत्ये.
"....हातात मिळणारी वस्तू बहुतेकदा 'स्लाईटली डॅमेज्ड' असते. उदा. पोचे पडणे, स्क्रॅच येणे इ...."
~ मला हा अनुभव आतापर्यंत तरी आलेला नाही. विविध कपडे, इस्त्री, प्रिंटर, मोबाईल्स, पेन्स, थर्मास, कूकर, बूट्स इत्यादी वस्तू मी फ्लिपकार्टकडून घेतल्या आहेत....(पुस्तके अर्थातच प्रामुख्याने)....पण एकदाही डॅमेज्ड अवस्थेत कोणतीही वस्तू आलेली नाही.
आतापर्यंत फक्त एकदाच ओनलाईन
आतापर्यंत फक्त एकदाच ओनलाईन शॉपिंग केलं आहे. फ्लिपकार्टवरुन मोबाईल खरेदी. द्राविडी प्राणायाम झाला होता खरं तर. इथून मस्कत मधून ऑनलाईन मोबाईल बूक केला. पुण्यात घरच्या पत्त्यावर डिलिवरी मागितली होती आणि मोबाईल नं सुद्धा घरचाच दिला होता. वर अशोकमामा म्हणाले त्याप्रमाणे पीन कोड टाकून डिलिवरी देतात की नाही याची खात्री करुन घेतली होती आधीच. 'delivery within 3 days' असं असलं तरी दुसर्याच दिवशी मोबाईल वर पार्सल निघालं असा समस सोबत डिलिवरी बॉय चा नं सुद्धा मिळाला. डिलिवरी बॉय पार्सल घेऊन घरी निघताना समजलं की कार्ड नाही चालणार, कॅशच पाहिजे. घरी त्यावेळी पुरेशी कॅश नसल्याने, त्याला अर्ध्या रस्त्यातून दुसरीचकडे बहिणीच्या ऑफिसमधे जाऊन तिकडे डिलिवरी द्यायला लावलं. विनातक्रार डिलिवरी केली त्याने. पॅकिंग एकदम व्यवस्थित.
कोणत्याही साईटवरून काहीही मागवण्याआधी व्हेंडर व त्या वस्तूला मिळालेले रेटिंग्स व रिव्ह्यूज नक्की वाचावेत. फक्त किंमत वाचून ऑर्डर करू नये.>>> +१
मिन्त्रावरुन बरेचदा शॉपिंग
मिन्त्रावरुन बरेचदा शॉपिंग केली आहे. पण कपड्यांची क्वालिटी खुप चीप वाटली. साड्या मागवल्या होत्या त्या बर्या होत्या पण सगळी ऑर्डर एकाच वेळी आली नाही.
फ्लिपकार्टचा आतापर्यंतच अनुभव
फ्लिपकार्टचा आतापर्यंतच अनुभव बेश्ट.. स्नॅप्डील एकदम भिक्कार. बहिणीने हेअरड्राय + बॅग असं कॉम्बो मागवलं. हेअर ड्रायर बंद पडलेला आणि बेक्कार क्वॉलिटीची बॅग. परत करुन दुसर्यांदा आल्या दोन्ही वस्तु त्याही तशाच. कपडे वगैरे ऑनलाईन मागवायला थोडी भिती वाटते. साईझच्या इश्यु न होणार्या गोष्टी ऑनलाईन मागवायला बेस्ट..
फ्लिपकार्ट वरून बरेचदा वस्तु
फ्लिपकार्ट वरून बरेचदा वस्तु मागवल्यात, भारतात असताना खरेदीला जायचा वेळ वाचवायचा असल्यास हा ऑप्शन मस्त आहे.. सो फार खेळणी, पुस्तके,कपडे मागवले आहेत, कपडे पोत, रंग जसे दिसतात तसेच असतात, पण एखाद कपड्याचे अस्तर फारच जाड निघाले, असे झाले आहे खरे!
ली कूपर वगैरे कं. ची टॉप्स मस्त मिळालीत यावेळी.
कायमच ५/१०००० टोटल च्या आसपासचीच ऑर्डर करते म्हणजे एखादी जास्त महागडी वस्तू मागवून बांबू बसू नये म्हणुन.
साईज वगैरे अक्षरशः स्वतः मोजून मगच फायनल करावी
कोणत्याही साईटवरून काहीही
कोणत्याही साईटवरून काहीही मागवण्याआधी व्हेंडर व त्या वस्तूला मिळालेले रेटिंग्स व रिव्ह्यूज नक्की वाचावेत. फक्त किंमत वाचून ऑर्डर करू नये. <<
कोणती साइट निगेटिव्ह रिव्ह्यूज तसेच ठेवते त्यांच्या साईटवर?
अरे हो फ्लिपकार्टवरून मी एकदा
अरे हो फ्लिपकार्टवरून मी एकदा परफ्युम मागवला होता. तिथेही काही प्रॉब्लेम नाही आला.
कोणती साइट निगेटिव्ह
कोणती साइट निगेटिव्ह रिव्ह्यूज तसेच ठेवते त्यांच्या साईटवर?>>> नी, होय. मी रीव्यु वाचुनच माझ्या आईसाठी मोबाईल पाठवला होता. छान न स्वस्त मिळाला.
http://www.amazon.in दोन
http://www.amazon.in दोन दिवसात येतात डिलेव्हरी खुप ऑड ठिकाणी राहत असलो तरी
आणि लहान मुलांसाठी www.firstcry.com उत्तम आहेत.
पण Flipcart आमच्या ईथे डिलीव्हरी देत नाहीत
नी, एक कोणती तरी साईट आहे
नी, एक कोणती तरी साईट आहे (आत्ता नाव आठवत नाहीये).
आपलं प्रोडक्ट सर्च केलं की ते कोणत्या कोणत्या साईट्सवर उपलब्ध आहे आणि कोणत्या कॉस्टने त्याची लिस्ट येते.
गूड बॅड दोन्ही रिव्यूज
रेडिफचा माझा अनुभव त्यांचे
रेडिफचा माझा अनुभव त्यांचे इमेल्स, सगळ्या पावत्या वगैरेंच्या फोटोसकट त्यांच्या साइटवर टाकला होता.
ज्या कंपनीचा तो घाणेरडा हे ड्रा होता त्याही साइटवर टाकला होता.
साळसूदपणे दोघांनी तो मेसेज उडवला.
Pages