कथा..भाग १
पुर्वरंग :
तो झपाझप पावलं उचलत
होता .लांबचा पल्ला गाठायचा होता त्याला .वाटेत
होत निबिड रान.दिवस मावळायच्या आत
त्याला ते रान पार करायचं होत .
रानातून जाताना त्याचा जीव कातावून
गेला होता .या भितीच्या धक्क्यात
त्याच्या पायाची गती वाढली होती व तो अधिक
त्वरेनं पावलं उचलत होता .रान लवकर संपाव
असं त्याला वाटत होत .पण
रस्ता काही संपेना.रान एव्हाना पार व्हायला हवं
होत .पण अजून काही तसं झालं नहूत.
तो चालतच होता .हळूहळू दिवस
मावळायला लागला .आता त्याच्या ध्यानात आलं
होतं की कुठंतरी आपण चुकीची पायवाट
पकडली आणि आता आपण या जंगलात कुठे
आहोत हेच त्याला उमजेनासं झालं होतं .
आता रात्र याच जंगलात काढल्यावाचून पर्याय
नहूता.कारण दिशाच समजत नसताना चालत
राहिलो तर आपण या जंगलात फारच आत जाऊन
हरवून बसू असे त्याला वाटत होते .रात्रतर
या जंगलातच काढायची पण कशी .या जंगलात
तर बरीच श्वापदं असावी असा त्याचा कयास
होता .जमीनीवर थांबलो तर उध्याची सकाळ
नाही बघता येणार या विचारात त्यानं
सोबतच्या कु-हाडीन काही लाकड तोडून मचान
बनवली .सोबत आणलेली भाकरी त्यानं अंधार
पडायच्या आत खाऊन घेतली व तो मचानावर
जाऊन बसला .आता अंधार पडू
लागला होता .हि रात्र कशी काढायची याच
विचारात होता तो.
इतक्यात त्याला दुरवर उजेड वाटला.निट
काही दिसत नसलं तरी झोपडी असेल व तिथून
तो उजेड येत असावा असा कयास त्याने
बांधला .आता काय करावं
असा प्रश्नही त्याला पडला होता .कारण
मचानावरुन तर तो उजेड
किंवा दिवा त्याला दिसत होता पण खाली उतरुन
चालायला सुरूवात केल्यावर तो दिसेल
की नाही याची खात्री नहूती व आता जर तिकडे
जाताना आपण वाट चुकलो तर
ही जागाही सापडणार नाही व
ती झोपडीही.काही वेळ मनाची चलबिचल
झाल्यावर त्यानं मचानावरच राहण्याचा निर्णय
घेतला .
त्यानं ठरविलं सकाळ झाल्यावर
आता दिसणाऱ्या दिव्याच्या दिशेनं
जायचं .ती झोपडी सापडली की तिथं
पुढच्या रस्त्याची चौकशी करायची व मग
आपला रस्ता पकडायचा .रात्रभर
येणाऱ्या वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज ऐकून
तो घाबरला होता .रात्रभर जागाच
होता तो पहाटे कधीतरी त्याला झोप
लागली .त्याला जाग आली तोपर्यंत दिवस बराच
वर आला होता . त्यानं काल दिसत
असलेल्या दिव्याच्या दिशेनं पाहिलं तर
तो दिवा कुठं दिसत नहूता व झोपडीसारख
काही दिसत नहूतं. पण त्या दिव्याच्या दिशेनं
अंदाजानेच जायचं त्यानं ठरवलं व तो तडक
त्या दिशेनं चालू लागला .किमान त्याच्या मते
तरी तो योग्य मार्गावर होता .पण बराच वेळ
चालूनही त्याला कुठंही झोपडी नाही सापडली .आता वेळही बराच
झाला होता व त्याला आता भुकेची जाणीव होऊ
लागली होती .एवढं निबिड वन पण
त्याला खायचा असं काही मिळत नहूतं.
........ क्रमशः
भाग २
सुरूवात चांगली आहे पण मोठे
सुरूवात चांगली आहे पण मोठे भाग टाका
छान
छान