Submitted by स्नू on 5 February, 2015 - 01:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
तेल २ टी स्पून
पालक १ जुडी
लसूण ५-६ पाकळ्या ठेचून अथवा किसून
हिरवी मिरची २ (मध्यम तिखट)
मीठ (नेहमीपेक्षा कमीच)
मलई २-३ टेबलस्पून
क्रमवार पाककृती:
१. पालक स्वच्छ धुवून कापून घ्यावा. छोट्या पानाचा पालक स्वादिष्ट बनतो.
२. कढईत तेल तापल्यावर लसूण, मिरची आणि बारीक कापलेला पालक टाकावा आणि मिश्रण हलवत राहावे.
३. ७-८ मिनिटातच पालक शिजून गोळा होईल.
४. पालक शिजल्यावर त्यात मीठ टाकावे. (नेहमीपेक्षा मीठ कमी घालावे. पालक फार पटकन खारट होतो.
५. गॅस मंद करून मलई टाकावी आणि पुन्हा एकदा भाजी एकसारखी करावी.
६. गॅस बंद करा.
७. झाली भाजी तयार.
वाढणी/प्रमाण:
२ जण
अधिक टिपा:
मलई टाकल्यावर गॅस फार वेळ चालू ठेवू नये.
माहितीचा स्रोत:
माझी आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदमच फास्ट होणारी भाजी आहे.
एकदमच फास्ट होणारी भाजी आहे. पालकात मलई घालून पाहिली नव्हती. मस्तच लागत असेल.
ह्यावेळेस माझ्याकडून चुकून
ह्यावेळेस माझ्याकडून चुकून हळद घातली गेली आहे पण घालायची गरज नसते. हिरवागार रंग जास्त चांगला दिसतो.
पालकात मलई पहिल्यांदाच ऐकलंय.
पालकात मलई पहिल्यांदाच ऐकलंय. मी आधी चुकून मकई पालकच वाचलं होतं.
आमच्या घरी आवडू शकेल हा प्रकार. करुन बघते.
अल्पना, हो. चव आवडते इकडे
अल्पना, हो. चव आवडते इकडे सगळ्यांना.
सोप्पी आणि छान पाककृती.
सोप्पी आणि छान पाककृती.
रच्याकने, ७-८ मिनिटातच पालक शिजून गोळा होईल असे लिहिले आहे तर लागणारा वेळ ५ मिनिटे लिहिले आहे ते जरा बदलुन टाका.
नरेश माने, धन्यवाद. संपादित
नरेश माने, धन्यवाद. संपादित केले आहे.
chhaan prakaar !
chhaan prakaar !
स्नू, वा वा!! किती सोप्पी
स्नू, वा वा!! किती सोप्पी रेसिपी आहे.. पण मस्त लागत असणार, हे लक्षात येतेय.. फोटोसुद्धा मस्तच!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे, छान आहे रेसिपी.. चविष्ट
अरे, छान आहे रेसिपी.. चविष्ट आणी सोप्पी..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे वा! मस्तं रेसिपी. (मी
अरे वा! मस्तं रेसिपी.
(मी हळदीबद्दलच विचारणार होते.
साहित्यात, कृतीत हळद नाही आणि भाजी मात्रं पिवळी दिसतेय.)
स्नू, आजच, लग्गेच बनवली बघ
स्नू,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![20150205_122428-1.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u28559/20150205_122428-1.jpg)
आजच, लग्गेच बनवली बघ भाजी तुझ्या रेसिपीने... मस्तच झाली होती अगदी!! फ्रोझन स्पिनॅच वापरल्याने अक्षरशः ५ च मिनिटात झाली..
हे बघः
साने, वाह...दिसते पण छान
साने, वाह...दिसते पण छान आहे..
साती, सानीच्या भाजीचा फोटो
साती, सानीच्या भाजीचा फोटो बघा.. हाच रंग खरा..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्नू, मस्त रेसिपी
स्नू, मस्त रेसिपी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दोन्ही फोटो मस्त आहेत. मी
दोन्ही फोटो मस्त आहेत.
मी असा दही पालक करते.
चिरलेला पालक आणि हिमि किंचित तेलावर परतायचा. झाकण ठेवून छान मऊ शिजू द्यायचा. मग थंड झाल्यावर त्यात फेटलेलं दही, जिरंपूड, मीठ घालून एकत्र करायचं आणि हिंग, जिरं सुक्या मिरचीची तुपाची फोडणी द्यायची.
या पद्धतिने पालकाचा
या पद्धतिने पालकाचा उग्रपणाहि कमी होत असेल न १ मस्त प्रकार.
धन्यू मंजुडी, पुढच्यावेळी
धन्यू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंजुडी, पुढच्यावेळी तुझी रेसिपी पण ट्राय करणार!! आठवड्यातून किमान एकदा तरी घरात पालक शिजत असल्याने मला छान छान व्हरायटीज मिळत आहेत, याचा आनंदच आहे..
मंजुडी, डाएट पालक म्हणता येईन
मंजुडी, डाएट पालक म्हणता येईन तुझ्या रेसीपीला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फास्ट बनणारी रेसिपी आहे आणि
फास्ट बनणारी रेसिपी आहे आणि खूप सोप्पीसुद्धा..
आज केली होती. मी मलई टाकून
आज केली होती. मी मलई टाकून भाजी कधीच करत नाही, जड होईल म्हणून.
आज पहिल्यांदा ट्राय केली आणि खूप छान झाली:-) रेसिपी साठी धन्यवाद.