शनिवारी नेरुळला एक जाहिरात नजरेला पडली, handwriting jobs, work from home, earn Rs 4800 per week.
जाहिरात वाचुन थोडी उत्सुकता वाटली, काँप्युटरच्या जमान्यात हस्तलिखिताच्या कामाला आठवडा ४८०० मिळताहेत याचे आश्चर्यही वाटले. लगेच फोन लावला. कसे लिहायचे त्याचे ट्रेनिंग देणार, दर आठवड्याला असायनमेंट मिळणार आणि मग पैसे असा सोप्पा रुट. याचे ४८०० मिळणार? कायतरी लोच्या आहे नक्की ही घंटी वाजली डोक्यात. फोनवरुन पत्ता घेतलेलाच. घराच्या जवळच होता. म्हटले इतके वर्षे स्कॅमबद्दल वाचतोय पण प्रत्यक्ष स्कॅम करणारी माणसे काही पाहिली नव्हती, आता लगे हाथ पाहुनही घेऊया.
काल गेलो दिलेल्या पत्त्यावर आणि माहिती घेऊन आलो. एका जुनाट इमारतीत तळमजल्यावरच्या गाळ्यात एक ऑफिस. आत दाराला लागुनच एक टेबल-खुर्ची आणि बसायला सोफा. त्याच्यापुढे एक पार्टिशन. आम्ही गेलो तेव्हा एक मुलगी खुर्चीत आमचीच वाट पाहात बसल्यासारखी बसलेली आणि एक मुलगा फोनवर बोलत असलेला. बोलण्यावरुन तो आमच्यासारख्याच कोणाशीतरी बोलत होता एवढे कळले. बोलता बोलता तो पार्टीशनाअड गडप झाला तो नंतर उगवलाच नाही.
खुर्चीवरच्या मुलीने लगेच माहिती द्यायला सुरवात केली. त्याचा गोषवारा खालीलप्रमाणे:
१. २०० रुपये भरुन रेजिस्ट्रएशन करायचे, मग आपली एक टेस्ट घेऊन आपण जॉबला लायक आहोत का ते ठरवणार.
२. लायक ठरलो तर ७०० रुपये भरुन ट्रेनिंग घ्यायचे.
३. ट्रेनिंगनंतर आपल्याला एका पुस्तकाची ७० पाने मिळणार. चारपाच पुस्तके पडलेली टेबलावर. पाने पुर्ण पिवळी पडलेली, अक्षरे १ मीमी आकाराची.
४. मी पुस्तक उघडुन पाहिले, इंग्रजीत होते. पाने दोन्ही बाजुला पांढरे पेपर लावुन स्टेपल केलेली होती. पुस्त्काचे नाव गाव काही पत्ता लागत नव्हता. ७० -७० पाने फाडुन स्टेपल केलेली. पाने फाडताना निदान जो भाग सुरू आहे तो तरी संपतोय का एवढे पाहायचेही कष्ट घेतले नव्हते. पुस्तकाचे नाव कुठेही सापडत नव्हते.
५. कॅपिटल लेटर्समध्ये पुस्तकाची पाने कॉपी करायची.
६. पहिला आठवडा गप्प बसायचे कारण आपला प्रोजेक्ट चेक करायला इतका वेळ जातो. एका बॅचमध्ये ३५-४० लोक असतात. त्यामुळॅही वेळ लागतो. नंतर लोक विविध कारणांनी सोडुन जातात आणि म्हणुन वेळ कमी लागतो प्रोजेक्ट अप्प्रुव व्हायला.
७. ६० शब्दापर्यंत चुकांना ठराविक रक्कम कापणार. त्याच्यापेक्षा जास्त चुका असतील तर मग गेलात कच-यात.
८. एकदा पहिली ७० पाने अप्रुव झालीत की मात्र तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रोजेक्टचे पैसे दोन दिवसात मिळणार.
९. दिवसा कमीतकमी ८ तास तरी लिखाणाला द्यावे लागणार एवढे लिखाण असते ७० पानांचे.
१०. एक प्रोजेक्टला दोन हस्ताक्षरे चालतात.म्हणजेच दोन माणसे करु शकतात.
११. हे सगळे लिखाण कोणासाठी? तर हे लिखाण वापरुन त्यावरुन संवाद बनवुन मग चित्रपट, मालिका इ.इ. कामासाठी वापरणार..
हे शेवटचे ऐकुन मला धक्का बसला. आधीच कॅपिटलमधले लिहिलेले वाचायला त्रास होतो, त्यात दहा जणांनी वेगवेगळ्या अक्षरात लिहिलेले लिखाण वाचुन त्यावरुन चित्रपटाचे कथा-संवाद म्हणजे खुपच फारफेच्ड झाले... यापेक्षा फोटोकॉपी का नाही वापरत, तर म्हणे फोटोकॉपी नीट येत नाही, लेखकाच्या हक्काचा प्रश्न येतो इ.इ.
हे एवढे कशासाठी करायचे हे ऐकल्यावर हा स्कॅम असणारच याबद्दल खात्री झाली. पण काय प्रकारचा स्कॅम हे कळत नाही. माणशी ९०० रुपये गोळा करुनही कितीसे हाती लागतील??
कोणी ऐकलेय का या प्रकाराबद्दल? मी नेटवर सर्च केले पण हँडरायटींग जॉब स्कॅम म्हणुन काही सापडले नाही.
धन्यवाद मामी .बाफ वाचला . दोन
धन्यवाद मामी .बाफ वाचला .
दोन वर्षाँपूर्वी मेकैनिकला सांगितले की ग्रीसिंग करून दे वॉल्व बदलू नको .तर म्हणाला पासष्ट रुपये सर्विस चार्ज लागेल गैरंटी नाही .करून घेतले अजून ठीक आहे .सर्विसिंगच्या पावत्या ठेवायच्या .दाखवल्या की गपचिप काम करतात .असो थोडे विषयांतर झाले इकडे .
बाफ क्र node 22818 वर कॉपी पेस्ट केले .
भरत ,बरोबर .गिऱ्हाईकाची
भरत ,बरोबर .गिऱ्हाईकाची फसवणूक ,व्यापारी लबाडी ,घोटाळा ,बनवाबनवी यात फरक आहे .
मामी , त्याला स्कॅम नाही
मामी , त्याला स्कॅम नाही म्हणता येणार. Unfair TRADE Practice म्हणता येईल. >>> ओ येस. बरोबर.
ऐशुच्या एका मैत्रिणीकडुन थोडी
ऐशुच्या एका मैत्रिणीकडुन थोडी माहिती मिळाली. मुंबईत राहणा-या तिच्या दोन मैत्रिणीं तिथेच कुठेतरी असली जाहिरात पाहुन फसल्या. सुट्टीत करायचा उद्योग म्हणुन त्या गेल्या. भारंभार लिहुन घेतले आणि चुका भरपुर म्हणुन पैसे द्यायचे नाकारले. एकीचे नशीब चांगले होते, तिला एका प्रोजेक्टचे थोडे पैसे मिळाले, अर्थात सांगितले तेवढे नाही, खुप कमी. पण दुसरीला काहीही मिळाले नाही. तिने अगदी काळजीपुर्वक लिहिलेल्या प्रोजेक्टमध्येही ६० च्या वर चुका झाल्या असे सांगुन तिला कटवले. दोघींनी नंतर नाद सोडुन दिला.
मामी , त्याला स्कॅम नाही
मामी , त्याला स्कॅम नाही म्हणता येणार. Unfair TRADE Practice म्हणता येईल.
भरतजी, हे सिध्द झाल्यास भारतीय दंडविधानाखाली काही दंड अथवा शिक्षेची तरतुद आहे का ? किमान पक्षी यांना
शॉप अॅक्ट/ इनकॉर्पोरेशन / कंपनी अॅक्ट द्वारा प्रतिबंधीत करणे गरजेचे आहे.
मामींनी धाग्याची लिंक दिलीय.
मामींनी धाग्याची लिंक दिलीय. तिथे भ र पू र चर्चा झालेली आहे. वाचता येईल का?
रिडर्स डायजेस्टचे
रिडर्स डायजेस्टचे स्विपस्टेक्स पण स्कॅम असतात का?
मी एकदा रिडर्स डायजेस्टचे नाव आहे म्हणून आणि गंमत/ उत्सुकता म्हणून एनरोल केले. पण शॉर्टलिस्ट होण्यासाठी हे खरेदी करा, ते खरेदी करा असा पत्रांचा जो काही रतिब सुरू झाला तो थांबता थांबेना. शेवटी घर बदलले तेव्हा त्या त्रासातून सुटका झाली.
हो, रिडर्स डायजेस्टचे
हो, रिडर्स डायजेस्टचे स्विपस्टेक्स पण स्कॅम असतात. माझ्या एका परिचिताला भुर्दंड पडलेला आहे.
पण बक्षीस मिळालेल्यांची नावे
पण बक्षीस मिळालेल्यांची नावे ते वृत्तपत्रातून,त्यांच्या इश्युमधून आणि वेबसाइटवर जाहीर करतात.
स्वीपस्टेक्ससाठी म्हणून नाही, पण त्यांची अनेक प्रॉडक्ट्स घेतली आहेत. पुस्तकांच्या किंमती कंटेण्टच्या दृष्टीने फार जास्त वाटतात. कागद, बांधणी, इ. फार मस्त असते.
तरीही तीन वर्षांत मला फालतू बक्षीसही मिळालेले नाही. गेल्या वर्षभरात बंदच झालेत स्वीपस्टेक्स.
शेवटी घर बदलले तेव्हा त्या
शेवटी घर बदलले तेव्हा त्या त्रासातून सुटका झाली. >>>>
माझ्या ओळखीचे एक रिटायर
माझ्या ओळखीचे एक रिटायर झालेले काका याला बळी पडलेले आहेत..
१५०० रुपये अक्कलखाती जमा...
२ आठवडे काम केल त्यानी ..
४८०० कुठले... चुका होतातच कितीही नाही म्हटल तरी ...
६० च्या वर चुका झालेल्या त्यान्च्या ... २०० रु. दिले फक्त..
बिचारे..
नन्तर काम मागायला गेले तर नवीन पुस्तक आल नाहीये म्हणून सान्गितल त्याना...
पण पदरचा वेळ खर्चून प्रत्यक्ष
पण पदरचा वेळ खर्चून प्रत्यक्ष जाऊन, ही माहिती मिळवलीस त्याबद्दल कौतुक वाटलं तुझं.>>>>> १००
आजच्या सकाळ - पुणे टुडे मधे
आजच्या सकाळ - पुणे टुडे मधे (
http://epaper3.esakal.com/16Sep2014/Enlarge/PuneCity/Pune1Today/page4.htm , ६वा कॉलम , खालून दुसरी ) अशीच जाहिरात पाहिली आणि साधनाच्या या बाफ ची आठवण झाली.
दुनिया झुकती है झुकानेवाला
दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये!>>>
exactly . लोकांना ठगाव्ण्याचे उद्योग आहेत . मी पण एका ठिकाणी जावून बघून आले काय भानगड आहे ती. १००० रुपये deposit भरायचं. १ आठवड्यातच प्रोजेक्ट complete झाला पाहिजे. ८ व्या दिवशी घेतला जाणार नाही. आणि १ आठवड्यात लिहून पूर्ण होणार नाही असंच लिखाण दिलं जातं.
सकाळसारखे पेपर्स केवळ पैसे
सकाळसारखे पेपर्स केवळ पैसे मिळतात म्हणून अशा जाहिराती छापतात याचे खूप वाईट वाटते....
बाहेरच्या देशांत अनेक लोक घरून काम करतात नि पैसे मिळवतात उदा. vanetworking किंवा wahm भारतात अशी चांगली वेबसाईट नाही की कामे हि संकलितरीत्या आढळत नाहीत.
सकाळच काय झाडून सर्व पेपरांना
सकाळच काय झाडून सर्व पेपरांना या जाहिराती असतातच. नुकताच माझा एक रुमपार्टनर सुद्धा हँड रायटिंग जॉबच्या स्कॅमला बळी पडला..
पिंगु, त्याला हा बीबी दाखवला
पिंगु, त्याला हा बीबी दाखवला नाही काय?
शनिवारी असेच फिरत होतो पायी पायी नेरुळमध्ये, तर याच कंपनीच्या जाहीराती अजुन ब-याच ठिकाणी दिसल्या... १०० पत्रके लावली तर १० जण तरी चौकशी करतील आणि त्यातला एकजण फसेल. १०० पत्रकांसाठी १०० रुपये जरी गेले तरी उरलेले ८०० आपल्या खिशात
अशाच हँडरायटिंग जॉब स्कॅमला
अशाच हँडरायटिंग जॉब स्कॅमला माझी मावस बहीणही बळी पडली.
त्या लिखाणाचे काय करतात याचे उत्तर जवळ जवळ तीनदा विचारल्यावर असे मिळाले की - हे लिखाण स्कॅन करुन इंटरनेटवर प्रकाशीत करतात आणि विद्यार्थ्याना ते ऑनलाईन उपलब्ध होतं.
एकदा करुन बघायला काय हरकत आहे अस विचार करुन घातले पैसे .....
आणि आश्चर्य म्हणजे ही तिची दुसरी वेळ होती.
या आधी अशाच वर्णनाच्या एका ऑफ़िस मधुन १००० रु किंमतीचे मटेरिअल आणुन मश्रुम उगवायचे अशा टाइपची प्रोसिजर होती. जाहीरात करताना 'फ़क्त पकेजींग करुन दर आठवड्याला १००० रु कमवा' अशी होती. ट्रेनिंग साठी ७०० आणि मटेरिअलचे ३०० असे १००० भरल्याशिवाय नेमके काय करायचे तेच सांगत नव्हते. आता भरलेच आहेत पैसे तर करुन पाहु म्हणुन सुरु केले. तयार माल खरेदी करायची हमी सुध्दा घेतली होती.
मिळालेल्या मटेरिअलमधे पोतंभर पेंढा, एक केमिकल आणि मश्रुमच्या बिया इतकेच होते. सांगीतल्याप्रमाणे प्रक्रिया करुनही काहीच उगवले नही!
पैसे पाण्यात! कारण माल तयारच झाला नाही..
आणि आश्चर्य म्हणजे ही तिची
आणि आश्चर्य म्हणजे ही तिची दुसरी वेळ होती.
काहीजण जरा जास्तच आशावादी असतात....
रेड हेडेड लीग... सेम टू सेम!
रेड हेडेड लीग... सेम टू सेम!
पुण्यात धनश्री अशा नावाने हे
पुण्यात धनश्री अशा नावाने हे मश्रुमचे प्रकरण अनेक वर्षे चालू आहे.. कुठलाही कायदेशीर बडगा नाही त्याना
इथे आहे बघा... कितीजण रोज फसत
इथे आहे बघा... कितीजण रोज फसत असतील नाही?
.
.
माझी बहिण हि त्या मश्रूम च्या
माझी बहिण हि त्या मश्रूम च्या उद्योगाला फसली होती . छोटे छोटे मश्रुम्स उगवले होते . पण फक्त ४ -५ च
आमची पोरगी फसली, तिला म्हणले
आमची पोरगी फसली, तिला म्हणले अग प्रिन्टेंड टेक्स्ट स्कॅन करुन कॉम्प्युटरला वाचता येते, कॉपी होते, तर हाती लिहायचे कारण काय? फसवेगिरी आहे, किती रुपये घालवलेत?
त्या काही बोलल्या नाहीत, अन मी पण ताणले नाही (कारण सगळ्यात महत्वाचे कारण होते की बापाला पुरेसा पैसा कमावता येत नाहि तर पोरे काहीतरी प्रयत्न करणारच ना? मग त्यात फसल्या तरी मूळचा दोष कुणाकडे? असो. )
aho tila ha bb dakhavayachaa
aho tila ha bb dakhavayachaa naa...
anyways, eka drushtine bare jhaale. aataa tya parat kadhi fasnaar naahit. he paise shikshanala gele ase samajaa.
मी २००६ मध्ये मश्रुम्स केले
मी २००६ मध्ये मश्रुम्स केले होते, आले होते २००-३०० पण ते सुकवून त्याचे फारच कमी होतात आणि ते फक्त सुकवलेलेच घेतात. नंतर खोली रंगवायला १८००० खर्च आला
मश्रुम निदान खाता तरी येतात.
मश्रुम निदान खाता तरी येतात. हँडरायटींगचे कागद काय करणार? रद्दीवाला त्यांचे ४-५ रुपडे पण देणार नाही..
आज अश्या स्कॅमविरुद्ध तक्रार
आज अश्या स्कॅमविरुद्ध तक्रार झाल्याची बातमी आली तेव्हा हा धागा आठवला.
http://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai/home-cheating/articlesh...
बापरे..... काय सॉल्लिड डोके
बापरे..... काय सॉल्लिड डोके आहे....
माझाही अनुभव ऐका.
मागे टेस्टींग जॉब च्या जाळ्यात मी अडकणार होते. जॉब सोडुन २-३ महिने झाले होते. थोडे फ्रस्ट्रेशन आले होते. लेक्चरर शीप मिळायची होती. तेंव्हा काँप्युटर वर टेस्टींग करायच्या जॉब ची अॅड पहिली होती. फोन केला तर त्यांनी सांगितले की अनेक वेब साईट्स नव्या लॉन्च होतात तेंव्हा साईट नॅव्हीगेशन नीट होते की नाही ते टेस्ट करायची कामे आहेत. दिवसाला साधारण ८ तास काम. रोज किती साईट्स करायच्या त्याचा त्यांचा काही बेंच मार्क होता. आता आठवत नाही पण साधारण रोज १०-१२ साईट्स व्हिजिट करायच्या असे सांगितले होते. ह्याचाच अर्थ चांगला बँड विड्थ घ्या. इलेक्ट्रिसिटी, आपला वेळ इ.इ. तसेच ट्रेनींग साठी ५००० रु भरायचे होते. ३ दिवस ऑनलाइन ट्रेनिंग. काम सुरु झाले की, प्रत्येक साईट व्हीजीट केली, टेस्ट केली की त्यांच्या साईट वर जाऊन एन्ट्री करायची.
रोजचे २०० डॉलर्स मिळणार. म्हणजे १०,००० ( तेंव्हा डॉलर साधारण ५० रु होता). मी त्यांना विचारले की इकडे तुम्ही आमच्या बँकेत पैसे भरणार डायरेक्ट, तर टी. डी. एस. कापणार का? त्या वर ते लोक गोंधळले. त्यांना कळेना काय उत्तर द्यावे. मग एक कोणी शहाणा फोन वर आला. तो म्हाणाला की ह्या अश्या कामांसाठी दिलेला मोबदला टी.डी.एस. च्या लॉ खाली येत नाही. मग मात्र माझी सटकली. मी विचारले की कोणता लॉ? तर उत्तर मिळाले टी.डी.एस. अॅक्ट १९४४...... हसावे की रडावे समजेना. एकंदर त्यांची लायकी समजली होतीच. त्याला सॉलिड्ड घेतला मग.....
त्याला म्हणाले तुमचे दुर्दैव आज की तुम्ही ही माहिती एका सी.ए. ला सांगत आहात. तुमचा सगळा स्कॅम अत्ताच्या अत्ता रीपोर्ट करीन. त्या बरोबर फोन बन्द झाला. परत केला तर एंगेज !!!!
लोकांची डोकी सॉलिड चालतात. गरजुंचा फायदा घ्यायला लोकं ट्पलेलीच आहेत. सगळाच प्रकार हॉरीबल होता. आता मी गरजु नव्हते म्हणुन ठीक. मला एक टाईम पास हवा होता. पण लोकं फसतातच ना..... टेस्टींग नीट नाही तुमचा पर्फॉर्मन्स ठीक नाही, ह्या कारणांनी त्यांनी ठरलेले पैसे दिलेच नसते.....
असो वेळीच सावरले.
सुज्ञ माणसाने कधीच 'पैसे भरुन
सुज्ञ माणसाने कधीच 'पैसे भरुन काम' असल्या फालतू प्रकाराकडे जाऊ नये. असला धंदा करणारे लोक आपल्या रोजगारासाठी नव्हे, त्यांच्याच पोटापाण्याची व्यवस्था करत असतात.
भाईंदरला ओसवाल शॉपिंग सेंटरमध्ये असलेले कॉलसेंटर मिरारोडमध्ये स्टेशनपासून जवळच उजव्या हाताला असलेले कॉलसेंटर हे त्याचेच उदाहरण आहेत, मुख्य म्हणजे हे इतक्या लोकांना गंडवत असूनदेखील पोलिस त्यांना काहीच करताना दिसत नाहीत!
छान आहे हा धागा… चांगली
छान आहे हा धागा… चांगली माहिती मिळाली. लोकं गरज म्हणून काम करायला जातात आणि त्यांची अशी फसवेगिरी होते. माझ्या एका मित्रालाही हा असाच अनुभव आलेला आहे. धागा पहिला आणि तो प्रसंग आठवला.
इथे पुण्यातच ऐकलेला
इथे पुण्यातच ऐकलेला किस्सा,
लहान मुलांचे पालकांसोबतचे थोपू वरचे फोटो पाहून तुमचा मुलगा/मुलगी किती गोड आहे, त्याला advertisement मध्ये घेतील अस सांगायचं. पोरं टिव्हीवर दिसणार हे ऐकून बरेच पालक हुरळून जातात. मग ऑफिस मध्ये बोलवायचं. सगळी माहिती द्यायची आणि मुलाचे फोटोसेशन करावे लागेल सांगायचे, फोटोसेशनचा खर्च किती तर सात हजार रुपये! मग ते फोटो ad वाल्यांकडे पाठवणार आणि सिलेक्शन झाले कि कळवणार (म्हणे)
@ प्रकु लहान मुलांचे
@ प्रकु
लहान मुलांचे पालकांसोबतचे थोपू वरचे फोटो पाहून तुमचा मुलगा/मुलगी किती गोड आहे, त्याला advertisement मध्ये घेतील अस सांगायचं. पोरं टिव्हीवर दिसणार हे ऐकून बरेच पालक हुरळून जातात.>>>>>>>>>>>>>
सैराट मधल्या "तात्या " ची निवड याच पद्धतीने झालेली आहे स्वतः मंजुळेंनी त्याचा निवडी बाबत चा हा किस्सा एका वाहिनीवर सांगितला होता .
त्यांनीही त्याचे फोटो फेसबुक वरच पाहिले होते त्यानंतर त्यांनी त्याच्या पालकांशी संपर्क साधला होता .
अर्थात असे होणे प्रत्येकाच्या नशिबी नाही लाखात एक अशी शक्यता असू शकते.
धागा वाचला, प्रतिसाद वाचले
धागा वाचला, प्रतिसाद वाचले नाहीत. माझा अनुभव वेगळा आहे. नाशिकमध्ये नुकताच आलो होतो तेव्हा मला एक लोगो डिझाइनची रिक्वायरमेंट आली. श्रीगणेश रायटींग सर्विसेस असे नाव होते. बिजनेस हाच सांगितलेला. माझ्या कामाच्या स्वरुपानुसार मी सगळी बिजनेसची माहिती घेऊनच लोगो बनवतो. म्हणजे त्यात अर्क उतरला पाहिजे. तेव्हा यांची सगळी माहिती-प्रोसेस माहिती पडली. मला हे पहिल्या क्षणातच फ्रॉड आहे असे कळले, पण कायदेशीर बाजूंमध्ये आधीच पकडता येत नसल्याने, प्राथमिकदृष्ट्या यात स्कॅम सिद्ध करता येत नाही. मी त्यांना लोगो तयार करुन देऊन रितसर पैसे घेतले. स्कॅममध्ये अडकणारे त्यांचे ते बघत राहतील. पण शक्य तितक्या लोकांना अशी गडबड आहे हे सांगून ठेवले.
माझे तर स्पष्ट मत आहे, स्कॅम करणारे हे अतिशय हुशार असतात, चूक नेहमी फसणारांचीच असते.
"इफ इट्स टू गुड टू बी ट्रु देन इट्स अ स्कॅम" आणि "इफ इट दॅट सो इझी एवरीबडी वुड हॅव बीन डुइंग इट" ही ब्रह्मवाक्ये कायम लक्षात ठेवावी. ग्रीड गोत्यात आणते.
ह्या शनिवारी एका नवीन
ह्या शनिवारी एका नवीन जाहिरातीचे पोस्टर्स मुंबईत पाहिले. रायटिंग जॉब्स, महिना 18 ते 45 हजार कमवा. मी मोबाईल रिपेअरला देऊन इकडे तिकडे हिंडत असताना पाहिल्यामुळे फोटो काढता आला नाही. मुलीला सांगितले तेव्हा ती म्हणाली की हा हँड रायटिंग सारखाच स्कॅम आहे. ते मेलवर लिखाणाचे फोटो मिळणार, त्यातले बघून टाईप करायचे. रजिस्ट्रेशनचे 4 हजार भरायचे.
मला तर आदिम काळापासून ही प्रकरणे सुरू आहेत असे वाटू लागलेय . आणि इतक्या निष्ठेने धंदा टिकलाय म्हणजे बकरेही भरपूर मिळत असावेत. दुनिया झुकती है, बस आपको पता होना चाहीये कैसे झुकानेकीं!
ताई ,आमच्या शेजारी असणाऱ्या
ताई ,आमच्या शेजारी असणाऱ्या एका ताईने आणले होते.असे पुस्तक लिहायला पैसे ही भरले होते.तुम्ही सांगितला तोच रेट आणि चुकांना पैसे कापणार त्याही साठच चुका;पण त्यांना ते जमले नाही कारण खाडाखोड ही करायची नाही व अक्षरे खूपच बारीक होते.बंद केले त्यांनी पण पैसे गेले भरलेले .स्थळ -कोल्हापूर
माझ्या ओळखीत नुकताच घडलेला
माझ्या ओळखीत नुकताच घडलेला प्रसंग. माझ्या मामाचा जावई नोकरीत आहे पण माणसे सहसा दुसऱ्या जास्त पगाराच्या नोकऱ्या शोधत असतात. याला नेटवर अशीच एक साईट सापडली. त्यावर पोस्ट केलेले जॉब्स खूप आकर्षक होते. अजून माहिती हवी तर रजिस्ट्रेशन करायचे, फक्त 300 रु.
300 रु म्हणून त्याने रेजिस्ट्रेशन केले. ते होईपर्यंत त्याच्या खात्यातून 25,000 गेले होते. त्याची अवस्था खूपच बिकट झाली कारण त्याचा पगार त्या दिवशी खात्यात आला होता. पोलीस तक्रार केलीय, तपास सुरू आहे व सध्या ती साईटही डाऊन आहे.
अरे गेल्या महिन्यातच मिहि या
अरे गेल्या महिन्यातच मिहि या handwriting job बद्दल वाचुन फोन केला होता ११०० भरायचे अन ते मराठी साठी १३००० अन इंग्रजी साठी ९००० देणार होते.. typing job साठी २१०० भरायचे... ९० पाने लिहायची ५ दिवसात.. अन पहिल्या २० चुका माफ अन मग झालेल्या चुकांचे पैसे वजा ७० चुका नंतर पैसे नाहित पण काम पुर्ण करुन द्यायचे.. ती मुलगी मग मागेच लागली मी नकोच म्हटलं..
मी गेलो होतो असा एक कॉल
मी गेलो होतो असा एक कॉल आल्यावर. पीडीएफ मधील मजकूर त्यांच्या एका सॉफ्टवेअर मध्ये टाईप करायचा होता. डेमोमधे दाखवणाऱ्या पीडीएफ मधील मजकूर सुटसुटीत आणि व्यवस्थित वाचता येणारा असतो. एक महिन्यातच प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर कसे ६०-७० हजार मिळतील ते सांगितले. चुका झाल्यावर किती रक्कम वजा होईल ते सांगितले. १५००० सेक्युरिटी डिपॉझीट भरायचे होते. एका वेळेला वाटले कि करून बघूया पण प्रत्यक्षात प्रोजेक्टसाठी मिळणाऱ्या पीडीएफ मधील मजकूर खूपच छोट्या अक्षरात आणि किचकट असतो असे त्या कंपनीचा रिव्यू बघून कळले होते. चुका होणाऱ्या रकमेचे कॅल्क्युलेशन केले तेव्हा समजले कि हातात काहीही येणार नाही आणि १५००० सुद्धा जातील. म्हणून त्या ऑफरला नकार देऊन तिथून निघालो.
1- दिड वर्षापुर्वी आम्ही तिघी
1- दिड वर्षापुर्वी आम्ही तिघी मैत्रिणी गेलो होतो अशा hand writing jobची जाहिरात बघुन. ₹240 एका पेजसाठी, आठवड्याला पेमेंट आणि जवळपास 25-30 स्टेपल पेजेस एकाच आठवड्यात लिहायचे नाहीतर पुर्ण पेमेंट नाही. रजिस्ट्रेशन चार्जेस ₹800 प्रत्येकी.
अजुनही आम्ही गेलेल्या ठिकाणाची जाहिरात सकाळ पुणेclassified मधे येतात. आणि address दगडुशेठ मंदिरासमोर असा आहे.3rd/4th floor वर so called office आहे त्यांच! तिथे असणार्या मुलीने तिथे गेल्यावर आमचा उल्लेख client असा केला तेव्हाच ते प्रकरण गोलमाल आहे ते कळाल आणि वेळीच काढता पाय घेतला.
Pages