शेजारच्या निधीची आई मंजू काकू आज अगदीच चिडलेल्या 'आज दांड्काच घालते हिच्या पाठीत आणि गप्पच करते कायमचं' बडबडत त्या पुढे निघून गेल्या. ह्यांना काय झालंय आता एवढ्या रात्री कुणाला मारायला निघाल्या कुणाचे दिवस भरलेत बाई एवढ्यात मी हसत मस्करीतच निधीला विचारलं…
निधी - 'गेले चार दिवस-रात्र वैरागडे मावशींच्या शेजारची कुत्री किंकाळून रडतेय रात्र रात्र विचित्र आवाज काढते. तिच्या आवाजाने कुणाला झोप येत नाहीचेय पण कुत्र्यांचं असं रडणं अपशकून मानलं जातं अगं. माणसांना दिसत नाही असं अमानवी त्यांना दिसत असतं म्हणतात. कुणाचा काळ आलेला सुद्धा कळतं म्हणे आणि मग हे आपल्याला माहिती असतांना सारखा सारखा तसा आवाज कानावर पडला कि राग नाही का येणार मनु .… कुणास ठावूक तिला असं काय दिसतंय' …
बापरे मी डोळे विस्फारून निधीकडे बघत होते कुठल्याश्या गूढ कथेचा तुकडा प्रत्यक्ष अभिनयासकट अनुभवतेय असं उगाच जाणवलं…. भानावर आले तेव्हा काकू दांडका घेऊन गेल्यात हे लक्षात आलं काकू खरंच त्या कुत्रीला मारणार बिरणार कि काय असा विचार मनात आला आणि मी निधीचा हात धरून खेचतच वैरागडे मावशींच्या घराकडे धावले …. आम्ही पोचतोय तोवर काकूंचा दुर्गावतार पार उतरला होता झांशीच्या राणीचा फील गळून पडून हातातली दांडकारुपी तलवार खाली कोसळली होती. आणि काकूंचा चेहेरा पुरताच मीना कुमारी झाला होता.
अरेच्चा !! आत्ताच दहा मिनिटाआधी तनफनत आलेली काकू अशी काय झालीय.…
वैरागडे मावशी तेवढ्यात बोलत्या झाल्या. शेजारच्या मोकळ्या प्लॉटवर राहणारी, परिसरातल्या सर्व माणसांना जीव लावणाऱ्या 'पिंकी'ला (एरियातील लहान मुलांनी ठेवलेले नाव) मागल्या महिन्यात ३ पिल्लं झाले होते. ती जाता येता त्यांच्याशी खेळतांना दिसे… त्या इवल्या इवल्या पिल्लांची लहान मुलांनाही गम्मत वाटायची त्यांना मस्ती करतांना त्यांच्या भोवताल रेंगाळत खेळायला आवडायचं…ती पिल्ल येणाऱ्या जाणाऱ्यांच्या पायाशी घुटमळायची. मग वाटसरूच्याही चेहेऱ्यावर स्मित तराळायचं…अस सगळं नेमानं चालू होतं .… आमचं सर्वांच लक्ष एवढ्या पुरतंच होतं.
'मग' -निधीने विचारलं
मग खूप थंडी पडायला लागली पारा ६d च्याही खाली घसरला रात्री प्रचंड शीतलहरी सुरु होत्या. त्या तीन दिवसात तिचे तीनही पिल्लू गेलेत.
'नाही …स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स देवा' -काकू
मी निःशब्द झाले गळा मन आणि डोळे भरून आले …
वैरागडे मावशी पुढे 'त्यानंतर दोन दिवस ती तीनही पिल्लांचे शव पोटाशी घेऊन बसली होती. कुणालाही हात लावायला द्यायची नाही. पण दोन दिवसा आधी त्या पिल्लांना महानगर पालिकेच्या गाडीने उचलून नेले ... तेव्हापासून तिचे हे असे झाले आहे.'
दहा मिनीट सर्व स्तब्ध शांत झालं मंजू काकूंच्या तोंडून शब्दही बाहेर पडला नाही. गेट शेजारी मुसमुसत बसलेल्या पिंकीच्या नजरेत नजर न मिसळता काकू खाली मान घालुन चालू लागल्या. आम्ही काकूंच्या मागे मागे शांतपणे चालत राहीलो.
कुत्र्यांना कुणाचा काळ आलेला अमानवी असं काहीतरी आधीच दिसतं म्हणे … निधी सुद्धा तिच्या ह्याच वाक्यावर विचार करत असेल का माझ्यासारखीच… माझ्या डोक्यात भुंगा फिरत राहिला मग रात्रभर
.
.
कुत्र्यापेक्शा माणसाची
कुत्र्यापेक्शा माणसाची सन्ख्या खुप जास्त आहे.. त्यामुळे असे वाटते की ५० % लोक जर श्वानप्रेमी बनले तर कुत्रे असे थंडीने मरणार नाही.
(No subject)
कथा आहे कि सत्य? लिखाण आवडले.
कथा आहे कि सत्य? लिखाण आवडले. प्रत्येक (सस्तन प्राणी) आईचे दु़:ख़्ख खोल्वर रुतणारेच असते..
टीप = मी हिवाळ्यामधे पिल्ले झालेली पाहीली नाहीत. मह्णून जरा आश्चर्य वाटले.
हि सत्य कथा आहे … १३
हि सत्य कथा आहे … १३ जानेवारीला तिच्या तीनही पिल्लांची शवं महानगरपालिका उचलून घेऊन गेली आहे. यापुढे आश्चर्य वाटून घेऊ नका हिवाळ्यात पिल दिसलीत तर… ती असतात हे कन्फर्म आहे
मयी, स्प्ष्टीकरणाबद्दल
मयी, स्प्ष्टीकरणाबद्दल धन्यवाद.
:)
माणूस असो वा इतर प्राणी शेवटी
माणूस असो वा इतर प्राणी शेवटी आईचंच प्रेम ते.
खरय!
खरय!
आमच्या पण सोसायटीत एका
आमच्या पण सोसायटीत एका कुत्रीने हिवाळ्यात पिल्लं घातली आहेत. ५.
Hmmm ti astat hivalyat
Hmmm ti astat hivalyat
तुम्ही अश्या प्रेगनंट किंवा
तुम्ही अश्या प्रेगनंट किंवा पिल्ले दिलेल्या कुत्र्याला एखादा त्यातल्यात्यात सुरक्षित कोपरा आणि एखादे जुने फाटके बेड्शीट किंवा पोते देउ शकता. तसेच मातेला प्यायला दूध आणि पपीजना ग्लूकोज बिस्किटे देउ शकता.
अनेक एन जी ओ स्ट्रेज साठी काम करतात तुमच्या एरिआतील एन जी ओ शोधून त्यांना माहिती द्या. ते पुढील स्टेप्स घेतील.
मुंबईसारख्या जागी अनेक सोसायट्यांमध्ये स्ट्रे डॉग्ज ना वीष घालून मारले जाते. पपीजनातर लगेचच कारन संख्या वाढायला नको ह्या उद्देश्याने. पपीज ना अतिशय हाल करूनही मारले जाते. ही वस्तु स्थिती आहे. तुमच्या सोसायटीचे नियम चेक करा. व त्या प्रमाणे कृती करा नाहीतर उगीच भांडणे.
नॉन डॉग लवर्स लॉबी शी पंगे घेउन एनर्जी व वेळ वाया घालवू नका. बेस्ट लक
अमा | 2 February, 2015 -
अमा | 2 February, 2015 - 11:20
तुम्ही अश्या प्रेगनंट किंवा पिल्ले दिलेल्या कुत्र्याला एखादा त्यातल्यात्यात सुरक्षित कोपरा आणि एखादे जुने फाटके बेड्शीट किंवा पोते देउ शकता. तसेच मातेला प्यायला दूध आणि पपीजना ग्लूकोज बिस्किटे देउ शकता. >>>>>>>>>>>>> सहमत. पण बरेचसे लोक एवढे जागरुक नसतात. बेड्शीट किंवा पोते तर सोडा पण बरेचसे लोक अशा कुत्र्याला काही खायला सुद्धा देत नाहित.
पण बरेचसे लोक एवढे जागरुक
पण बरेचसे लोक एवढे जागरुक नसतात. बेड्शीट किंवा पोते तर सोडा पण बरेचसे लोक अशा कुत्र्याला काही खायला सुद्धा देत नाहित.>>>>>>>>>>>>कुणी मुद्दाम करायचे म्हणूनही असे करत नाही. आम्ही येत जात पिंकीला पाहायचो ती मजेत असायची खायला प्यायला तिला कमी नव्हतीच परिसरात. पण व्यस्त जीवनशैलीत आणि त्या मुक्या प्राण्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे कळत सुद्धा नाही. सतत कुणीतरी रस्त्यावरच्या प्रत्येक कुत्र्याकडे लक्ष ठेवून राहणे शक्य असतं का ?? आणि कुत्र का होईना कुणासोबतही असं व्हावं अस कुणाला वाटत का ?
Me swata ek dog lover aahe
Me swata ek dog lover aahe pan amchya society madhe bakichya wings che construction chalu astana magchya bajula workers chya jhopdya ubharlya gelya....tyamule stray dogs Cha sulsulat jhala arthat tyana bharpur khayla milayche mhanun...
Tyache praman evde wadhle ki society chya aavarat khelnarya Ani cycle chalavnarya lahan mulanchya angavar te dhavun yayla lagle...don lahan mulana chavle dekhil....
Ashya goshtimule lokana dogs vishayi prem watay nasave....mala mulgi jhalyapasun me sudha thodi ghabrtech tila ektila khelayla jau Det nahi...