जेरी

Submitted by sanika11 on 29 July, 2009 - 02:03

बालकविता(?) लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न. मी माझ्या मुलीसोबत रोज ही सिरीयल लहान होऊन बघतो. मला ती सिरीयल फार आवडते..त्यातूनच ह्या ओळी लिहाव्या असे वाटले.
बरं, TOM हा शब्द माबो वर कसा टाईप करायचा...?

पिटुकले कान, पिटुकली माझी ढेरी
मी तुमचा दोस्त, नाव माझे जेरी

खातो केक कधी, TOMची मी चेरी
मी तुमचा दोस्त, नाव माझे जेरी

मी लपता-पळता, TOMला येते घेरी
मी तुमचा दोस्त, नाव माझे जेरी

करत मज्जा, TOMची ऊडवी भंबेरी
मी तुमचा दोस्त, नाव माझे जेरी

खट्याळ मी, TOMसंगे मारतो फेरी
मी तुमचा दोस्त, नाव माझे जेरी

गुलमोहर: 

:स्मित:, मस्त

मस्त आहे कविता Happy

TOm = टॉम

--------------------------------------------
संवादाचा तुटता धागा, वाद घेतसे त्याची जागा
दुखावलेले हळवे मन, सांधत बसते वेडे क्षण
गेला क्षण हा काल असे, उद्या न वेड्या येत असे
आज आजची करुया बात, टाकुन देऊन अपुली कात

Happy अरे वाह... मी तर एकटा पण टॉम अँड जेरी बघतो... Happy मस्त

धन्यवाद.
कविता,
टॉम बद्दल विशेष धन्यवाद

आमच्याकडे सातत्याने धावणारे हे दोन प्राणी. टिव्हीच्या आत बर का !
.........................................................................................................................
भेटती अनोळखी चेहरे कधी कधी
आपले जणू नवे चेहरे कधी कधी