थंडीचा मौसम सुरु झाला की उत्तर भारतात(खास करून पंजाब, दिलली वगैरे ) शक्करकंद घेवून गाड्या लागतात. उत्तर भारतातून हि रेसीपी अर्थात पलीकडे गेली असणार.
४ लाल रताळी
शक्करकंद मसाला १:
अर्धा चमचा चाट मसाला,
बारीक चिरलेली कोरडी केलेली पुदीना पानं,
पादेलोण किंवा काला नमक,
१ चमचा लाल मिर्च,
चिमटीभर काळं मिरी
वरील सर्व एकत्र करून ठेवावं.
आणि सगळ्यात शेवटी वेगळ्या कपात २ चमचे लिंबू रस,२ चमचे ताजा गोड संत्रा रस एकत्र करून तयार ठेवावा. नाहितर लिंबू व संत्र ताजे काप्पोन पिळावे.
दुसरा प्रकारः
पुदीना चटणी: ४-५ ताजी पुदीना पानं, लिंबू रस एक चमचा,कोथींबीर्, २ चमचे संत्रा रस, पाव चमचा लाल मिर्च, काळंमिरी चिमटीभर, काला नमक एकत्र बारीक वाटून ठेवावं.
कुरकुरीत पीठी कवरः एक चमचा तांदूळाचं पीठ, चवीला मीठ, चिमटीभर आरारूट पीठी.
प्रकार १:
१.स्वच्छ धूवून रताळी शेगडीवर भाजावी. तोवर बाजूला बसून हात शेकत गप्पा माराव्या शेगडीच्या गरमीत.
२.रताळी काळी झाली की सालीसकटच कुस्करावी ओबडधोबड. वरील शक्करकंद मसाला #१ टाकून लिंबू व संत्रा रस पिळून मग गरमा गरम खावं.
रताळ्याची गोडसर चव, आंबट तिखट चव एकदम मस्त लागते. शेवटी द्रोणात उरलेला लिंबू रस व संत्रा रस प्यावा.
दुसरा प्रकार :
जरा खटपटीचा आहे. पण तोही छान लागतो.
भाजलेलया रताळ्याला गोल फोडी करून कापलयावर गरम असतानाचा वरची पीठी लगेच भुरभुरावी. आणि लोण्यात दोन तीन मिनिटंच तळून (शॅलो फ्राय) काढून मग प्लेट मध्ये मांडून वरून पुदीना चटणी लावावी. शेजारी गोड दह्यात जरासा चाट मसाला टाकून द्यावा.
एक घास दह्याचा, एक घास गरमागरम शक्करकंद-पुदीना चटणी एकत्रित मस्त लागतं.
पहा करून. नक्की आवडेल.
थंडी पळून जाईल. मस्त चटकदार सोपा पदार्थ नाश्ता म्हणून खातात.
शेगडीवर कोळश्यात भाजलेली रताळी मस्त लागतात, नसेल तर गॅस आहेच. पण उकळू नका. ती चव येणार नाही.
रताळी काळी झाली तर आतून नैसर्गिक साखर करपून चव छान लागते.
मग, सुरण आणावे लागेल.
मग, सुरण आणावे लागेल.
छानच.
छानच.
मामी, बटाटे चालतील का ?
मामी, बटाटे चालतील का ?
अगं जाई, बटाटे हवे असतील तर
अगं जाई, बटाटे हवे असतील तर मॅकडोनल्डमध्ये जाऊन वेजेस खा.
ओह ! हे जरा प्रकरण माझ्या
ओह ! हे जरा प्रकरण माझ्या आवाक्यातले वाटत होते. म्हणून बटाट्यांनी रिप्लेस करत होते
मस्त प्रकार.. मी पण शक्करकंदी
मस्त प्रकार.. मी पण शक्करकंदी कि चाट असा एक प्रकार लिहिला होता.
मामी फोटो छानच. गराडू मराठीच नाव आहे.
कोनफळालापण कधी कधी गराडू म्हणतात. मुंबईच्या बाजारात ते छोटेच मिळतात पण चांगली माती असली तर मोठेही होतात. माझ्या घरात ५ किलोचा कंद तयार झाला होता.
Pages