दिनांक १७ जानेवारी २०१५ रोजी कोथरुडमधील देवयानी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक वैद्यकीय शिबीर भरवण्यात आले होते. ह्या शिबीरात तनिष्का ह्या सकाळ पेपर्सने स्थापन केलेल्या महिलांच्या व्यासपीठाशी संलग्न अश्या अनेक सदस्यांनी सहभाग नोंदवला. ह्या शिबीरात सुरुवातीला दीपप्रज्वलन झाले. सकाळ पेपर्सचे श्री डी आर कुलकर्णी (तनिष्का - पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हा प्रमुख व प्रमुख उपसंपादक) ह्यांनी ह्या शिबीराचे हेतू विशद केले. त्यानंतर श्री सुतार ह्यांचे भाषण झाले. त्यानंतर देवयानी मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक डॉ. श्रीरंग लिमये (अस्थिरोग तज्ञ) ह्यांनी आपले विचार मांडले. तसेच डॉ. स्वप्ना लिमये (स्त्रीरोगतज्ञ) व डॉ. वैशाली पाठक (फिजिशियन) ह्यांनी महिलांच्या आरोग्यासंबंधी महत्वाची माहिती दिली व महिलांनी विचारलेल्या सर्व शंकांचे निरसनही केले. विशेषतः, शिबीराच्या ह्या सत्रात प्रत्येक वयोगटातील महिलेने कोणताही त्रास होत नसतानासुद्धा कोणकोणत्या तपासण्या केल्याच पाहिजेत ही अतिशय महत्वाची माहिती पुरवण्यात आली.
अश्या प्रकारचे उपक्रम अनेक रुग्णालयांमध्ये होत असतात. चांदणी चौक ते वारजे ह्या हायवेलगत, डेक्कन जिमखाना ते कर्वेनगर ह्या भागात व पौड रोड परिसरात अनेक लहानमोठी रुग्णालये आहेत. बहुधा सर्वात मोठे रुग्णालय दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे असावे. ह्या रुग्णालयांच्या तुलनेत देवयानी रुग्णालय हे नवीन व अद्ययावत रुग्णालय आहे.
देवयानी रुग्णालयाशी सुरुवातीला माझा संबंध आला तो माझ्या सासर्यांना अॅडमीट केले तेव्हा! त्यानंतर माझ्या वडिलांचा हात फ्रॅक्चर झाला तेव्हा त्यांच्यावरील शस्त्रक्रिया तेथेच झाली व मध्यंतरी मला स्वतःलाच उच्च रक्तदाबाचा त्रास झाला तेव्हा मीही तेथेच उपचार घेतले. माझ्या सोसायटीत राहणार्या एका ४२ वर्षे महिलेला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा आम्ही तिला तेथेच अॅडमीट केले होते. एकदा एका रस्त्यावरील अपघातग्रस्त प्रौढालाही मी तेथे नेलेले होते. गेल्या काही महिन्यांत विविध कारणांनी देवयानी रुग्णालयाशी माझा परिचय होत गेला व त्या रुग्णालयाची खासियत मला अधिकाधिक समजत गेली. किंबहुना, एकापेक्षा अधिक खास बाबी! आजवर मी अनेक रुग्णालयांचे अनुभव घेतलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मला देवयानीची काही वैशिष्ट्ये जाणवली ती अशी:
१. कोथरुड हे गेल्या काही वर्षात जणू कायापालट झालेले असे एक उपनगर असून येथे सर्व आर्थिक स्तरातील नागरीक फार मोठ्या प्रमाणावर राहतात. कोथरूडची लोकसंख्या तूर्त सहा ते सात लाखाच्या दरम्यान आहे असे समजते. ह्या भागात असलेल्या रुग्णालयांवर रुग्णांचा बराच भारही पडत आहे व अनेक रुग्णालयांच्या काही ना काही मर्यादाही आहेत, जसे सर्व 'निदान व उपचार यंत्रणा' नसणे, पार्किंग प्लेसचा प्रॉब्लेम, रुग्णाकडे वैयक्तीक लक्ष पुरवले जाणे वगैरे! देवयानी हे रुग्णालय भर डहाणूकर कॉलनीत असून बहुसंख्य कोथरुडकरांसाठी ते कुठूनही दहा ते बारा मिनिटांत पोचण्यासारखे आहे. ह्या रुग्णालयाची स्वतःची पार्किंग प्लेस तर आहेच पण आजूबाजूला सार्वजनिक जागेतही पाकिंग करणे शक्य आहे. देवयानी हे एक अत्याधुनिक रुग्णालय असून तेथे उपलब्ध असलेल्या 'निदान व उप्चार यंत्रणा' तसेच इतर सुविधा आपण वेबसाईटवर पाहू शकताच. इतर कित्येक रुग्णालयांच्या तुलनेत देवयानी हे प्रथमदर्शनीच छाप पाडते ते तेथील अत्यंत स्वच्छ इन्टेरियर्समुळे! एखाद्या स्टार हॉटेलसारखी येथील अंतर्गत रचना आहे. एलेव्हेटर्स अत्याधुनिक, पुरेसे व वेगवान आहेत. रिसेप्शन, प्रवेशद्वार, विविध विभाग, चोवीस तास चालू असलेले औषधांचे स्टोअर, अद्ययावत संगणक प्रणाली व अत्यंत मित्रत्वाने वागणारे कर्मचारी हे सगळेच घटक व्यवस्थापनाचा रुग्णाबाबतचा केअरिंग अॅप्रोच दर्शवतात. इमर्जन्सी सेवेसाठी सर्व कर्मचारी व यंत्रणा त्वरीत कार्यान्वित होतात. मुळात रुग्णालयात येणारा रुग्ण व त्याचे नातेवाईक हे नेहमीच काहीसे भेदरलेले, गोंधळलेले व खर्चाचा आकडा किती असेल ह्या चिंतेत असलेले असतात. अश्या नागरिकांना हमखास दिलासा मिळेल असे वर्तन सर्व कर्मचारी वर्गाचे आहे. भारतासारख्या देशात जेथे कस्टमर ओरिएन्टेशन ही संज्ञा अजून रुजूही शकलेली नाही तेथे ह्या रुग्णालयात अगदी मामा, मावशी हे कर्मचारीसुद्धा रुग्णाशी हसतमुख नाते निर्माण करतात. ह्या सगळ्याच्या मुळाशी डॉ. श्रीमती देवयानी लिमये, डॉ. श्रीरंग लिमये व डॉ. स्वप्ना लिमये ह्यांची सेवाभावी विचारधारा आहे हे सहज जाणवते. रुग्णालयात अजून स्वतःची केटरिंग व्यवस्था नाही. मात्र त्या परिसरात पन्नास मीटर्सच्या त्रिज्येत आहार, फळे, ज्यूस असे सर्व काही मिळते. माझ्या अनुभवाप्रमाणे येथील चार्जेसही इतर रुग्णालयांइतकेच आहेत.
२. रुग्णालयात भरती होणार रुग्ण व त्याचे नातेवाईक ह्यांची सर्वात मोठी मानसिक गरज म्हणजे 'माझी सर्वांना काळजी आहे' ह्या इच्छेची पूर्तता होणे! देवयानीमध्ये नेमके हेच होते. अनावश्यक व्यावसायिकता न आणता डॉ. श्रीरंग लिमये, डॉ. स्वप्ना लिमये व डॉ. वैशाली पाठक हे सर्व रुग्णांशी आत्मीयतेचे नाते जोडतात.
३. देवयानीने पुण्यातील एकाहून एक तज्ञ डॉक्टरांना आपल्याशी संलग्न करून घेतलेले असून त्यांच्या नियमीत भेटी तेथे असतात.
४. प्रवेश, भरतीदरम्यानच्या उपचारांचा खर्च, मेडिकल स्टोअरमधील आर्थिक व्यवहार व डिसचार्जच्या वेळच्य अप्रक्रिया अतिशय सुलभपणे पार पडतात.
श्रीमती देवयानी लिमये ह्या स्वतः स्त्रीरोग तज्ञ असून त्या आता ७८ वर्षांच्या आहेत. त्यांनीच स्थापन केलेले हे रुग्णालय आधी त्याच परिसरात थोड्या लहान स्वरुपात होते. आता ते भव्य स्वरुपात पुनर्निर्मीत झालेले असून रुग्णांसाठी अतिशय सहाय्यभूत ठरत आहे. देवयानी रुग्णालयामध्ये इतरही विविध योजना आहेत, स्वतःच्या रुग्णवाहिकाही आहेत. अतिशय मोठ्या रुग्णालयांमधील गोंधळून टाकणारा पसारा आणि अतिशय लहान रुग्णालयांमधील मर्यादीत उपचार ह्या दोघांच्या तुलनेत हे मिडियम साईझ मात्र अत्याधुनिक रुग्णालय निश्चितच खूप सोयीचे आहे.
खाली काही छायाचित्रे देत आहे.
प्रवेशद्वारः
रिसेप्शनः
इमारतः
डॉ. श्रीरंग लिमये शिबीराचे शुभारंभीय भाषण करताना:
सकाळचे श्री डी आर कुलकर्णी महिलांना उपक्रमाची माहिती देताना:
व्यासपीठावर डॉ. श्रीरंग लिमये, डॉ. श्रीमती देवयानी लिमये, डॉ. स्वप्ना लिमये व डॉ. वैशाली पाठकः
डॉ. स्वप्ना लिमये महिलांना मार्गदर्शन करताना:
डॉ. वैशाली पाठक उपस्थित महिलांच्या शंकांची उत्तरे देताना:
धन्यवाद!
========================
-'बेफिकीर'!
----------------------------------
मायबोलीच्या धोरणानुसार लेखात काही छोटे बद्ल केले आहेत : वेबमास्तर
@बेफिकीर - तुमचा उद्देश
@बेफिकीर - तुमचा उद्देश चांगला असेल ही आणि डॉक्टर लिमये पण चांगल्या असतील पण हा लेख अगदी पूर्ण पणे त्या रुग्णालयाची जहीरात वाटते आहे.
तुम्ही असे कुठलेच विशेष प्रसंग लिहीले नाहीत की त्यातुन हॉस्पिटल बद्दल बाकीच्या हॉस्पिटल पेक्षा वेगळे मत तयार व्हावे.
तुम्ही लिहीलेल्या सर्व गोष्टी फक्त नावे बदलुन "शाश्वत" किंवा "संह्याद्री" ला लागू होत असाव्यात.
मला तर पौड रोड वरच्या कृष्णा हॉस्पीटल चा अनुभव पण चांगला आहे.
इथे गोंधळ घालणार्य अप्रत्येक
इथे गोंधळ घालणार्य अप्रत्येक व्यक्तीला इब्लिसदादा!
रुग्णालयाची माहीती देता आली आणि तसे प्रतिसाद आले तर बरं होईल असं वाटतंय मला तरी
मायबोलीच्या धोरणानुसार लेखात
मायबोलीच्या धोरणानुसार लेखात काही छोटे बद्ल केले आहेत : वेबमास्तर
लेखाच्या खाली हे वाक्य नुतकेच वाचले. आता मायबोलीच्या धोरणानुसार सगळं सुरू असताना मायबोलीवर तरी वेबमास्तरांपेक्षा आपण मोठे आहोत की काय याचा लोकांनी विचार केलेला बरा.
कोकणस्थ +१
कोकणस्थ +१
म्हणजे मायबोलीच्या धोरणात बसत
म्हणजे मायबोलीच्या धोरणात बसत नव्हते.
मा. वेबमास्तर, आपण जातीने
मा. वेबमास्तर,
आपण जातीने लक्ष घातल्याबद्दल अनेक आभार!
एक नम्र विनंती आहे - मी लेख हरिडली पुन्हा वाचून पाहिला, नेमके बदल लक्षात आले नाहीत. आपल्याला ते विचारून त्रास देणे योग्य नाही ह्याची जाणीव आहे. पण मायबोलीच्या धोरणात काय बसत नव्हते हे लक्षात आणून दिलेत तर नक्की मदत होईल व पुढे काळजी घेता येईल.
तसेच, आपण स्वतः जातीने ह्यात लक्ष घालण्यासाठी आलाच आहात तर काही दुर्दैवी व अशोभिवंत प्रतिसाद नष्ट झाले तर उपकृत होईन. ह्या लेखाच्या माध्यमातून मला व्यक्तीगत फायदा काहीच नव्हता, त्यामुळे तश्या अर्थाचे प्रतिसाद वेदनादायक आहेत. हे विशेष महत्वाचे नाहीच, आपण येथे आलात म्हणून सुचवून पाहिले इतकेच!
स्नेहाभिलाषी!
-'बेफिकीर'!
बेफिकीर, तुमचे attitude
बेफिकीर, तुमचे attitude पुन्हा आवडले
ओह, समजले वेमा
ओह, समजले वेमा

All animals are equal. Some
All animals are equal.
Some are more equal.
जाहिरात असो वा नसो... माहिती
जाहिरात असो वा नसो... माहिती ऊपयुक्त आहे. धन्यवाद!
बाकी, सर्व डॉ. लोकांचे फोटो त्यांच्या पूर्वपरवानगीनेच ईथे टाकलेत न एव्हडे पहा [वेमा. च्या नजरेतून ते सुटले नसेलच..!].. त्या संबंधी काहितरी नियमावली असेलच.
ता.क.: आजकाल जे जे चांगलं आहे त्याची जाहिरात होणे आवश्यकच आहे.. त्या अर्थी ऊघडपणे जाहिरात करायची असेल तर 'रंगीबेरंगी' चा पर्याय ऊपलब्ध आहे बहुतेक? फोटो मधील संपर्क क्र. वगैरे अशा गोष्टी मात्र शक्यतो जाहिरातीतच दिलेल्या योग्य ठरतात असे वाटते.
अपना सामान्य ग्यान
अपना सामान्य ग्यान बढाईये...
(Published in Part III, Section 4 of the Gazette of India, dated 6th April,2002)
MEDICAL COUNCIL OF INDIA
NOTIFICATION
New Delhi, dated 11th March, 2002
No. MCI-211(2)/2001/Registration. In exercise of the powers conferred under section 20A read with section 33(m) of the Indian Medical Council Act, 1956 (102 of 1956), the Medical Council of India, with the previous approval of the Central Government, hereby makes the following regulations relating to the Professional Conduct, Etiquette and Ethics for registered medical practitioners, namely:-
Short Title and Commencement:
These Regulations may be called the Indian Medical Council (Professional conduct, Etiquette and Ethics) Regulations, 2002.
They shall come into force on the date of their publication in the Official Gazette.
HAPTER 6
6. UNETHICAL ACTS :
A physician shall not aid or abet or commit any of the following acts which shall be construed as unethical -
6.1 Advertising:
6.1.1 Soliciting of patients directly or indirectly, by a physician, by a group of physicians or by institutions or organisations is unethical. A physician shall not make use of him / her (or his / her name) as subject of any form or manner of advertising or publicity through any mode either alone or in conjunction with others which is of such a character as to invite attention to him or to his professional position, skill, qualification, achievements, attainments, specialities, appointments, associations, affiliations or honours and/or of such character as would ordinarily result in his self aggrandizement. A physician shall not give to any person, whether for compensation or otherwise, any approval, recommendation, endorsement, certificate, report or statement with respect of any drug, medicine, nostrum remedy, surgical, or therapeutic article, apparatus or appliance or any commercial product or article with respect of any property, quality or use thereof or any test, demonstration or trial thereof, for use in connection with his name, signature, or photograph in any form or manner of advertising through any mode nor shall he boast of cases, operations, cures or remedies or permit the publication of report thereof through any mode. A medical practitioner is however permitted to make a formal announcement in press regarding the following:
On starting practice.
On change of type of practice.
On changing address.
On temporary absence from duty.
On resumption of another practice.
On succeeding to another practice.
Public declaration of charges.
6.1.2 Printing of self photograph, or any such material of publicity in the letter head or on sign board of the consulting room or any such clinical establishment shall be regarded as acts of self advertisement and unethical conduct on the part of the physician. However, printing of sketches, diagrams, picture of human system shall not be treated as unethical.
रामा शिवा गोविंदा काय
रामा शिवा गोविंदा
काय अपेक्षेने आले या धाग्यावर आणि काय काय प्रतिसाद वाचावे लागले सकाळी सकाळी.
तरी बरं, त्या डॉक्टर्सच्या नजरेला हे पडणार नाही असं वाटतं. बिचा-यांना मायबोली, फेसबुक वाचायला तरी वेळ असेल का ?
++++++बेफिकीर, तुमचे attitude
++++++बेफिकीर, तुमचे attitude पुन्हा आवडले ++++
१००००००००००००००००००००००००% अनुमोदन
>>>तरी बरं, त्या डॉक्टर्सच्या
>>>तरी बरं, त्या डॉक्टर्सच्या नजरेला हे पडणार नाही असं वाटतं. बिचा-यांना मायबोली, फेसबुक वाचायला तरी वेळ असेल का ?<<<
त्यांना हे स्थळ माहीत आहे की नाही ह्याची कल्पना नाही, पण माहीत झाले तरी हा धागा दिसेलच असेही नाही. तसाही त्यांना तेवढा वेळ नसावा. चुकून त्यांनी पाहिले तर एक त्रयस्थ म्हणून ह्या संकेतस्थळाबद्दल जे व्हायचे ते मत होईलच.
असो!
उत्तररंग विभागात वेगवेगळ्या आरोग्यकेंद्रांची माहिती देणे अपेक्षित आहे व त्यासाठीच हा विभाग सुरू करण्यात आला होता हे मला आठवत आहे कारण त्यावेळी झालेल्या चर्चेत मीही सहभागी होतो. बँका व हॉस्पीटले ह्यांच्यावर मी त्यावेळी काढलेले धागेही ह्या विभागात अजून असतील बहुधा!
विणा सुरु, +++++++++तरी बरं,
विणा सुरु,
+++++++++तरी बरं, त्या डॉक्टर्सच्या नजरेला हे पडणार नाही असं वाटतं. बिचा-यांना मायबोली, फेसबुक वाचायला तरी वेळ असेल का ? +++++++
हे मात्र बरोबर बोललात !!
जे डॉक्टर खरोखर सेवाभावाने अश्या वैद्यकीय सेवेत लीन असतात त्यांना मायबोलीवर पडिक रहायला कुठुन वेळ असणार ?
खरय, शांतारामजी.
खरय, शांतारामजी.
अच्छाछा! म्हणजे इथे फक्त
अच्छाछा!

म्हणजे इथे फक्त रिकामचोट लोक अन त्यांच्या डूआयड्यांनी धिंगाणा घालावा असे म्हणणे आहे तर?
>>> इब्लिस | 19 January, 2015
>>> इब्लिस | 19 January, 2015 - 20:04 नवीन
अच्छाछा!
म्हणजे इथे फक्त रिकामचोट लोक अन त्यांच्या डूआयड्यांनी धिंगाणा घालावा असे म्हणणे आहे तर?<<<
रिकामचोट ही एक शिवी आहे. उत्तररंग विभागातील रुग्णालयाच्या माहितीच्या धाग्यावर शिवीगाळ होऊ नये अशी विनंती आहे.
इब्लिस | 19 January, 2015 -
इब्लिस | 19 January, 2015 - 20:04 नवीन
अच्छाछा!
म्हणजे इथे फक्त रिकामचोट लोक अन त्यांच्या डूआयड्यांनी धिंगाणा घालावा असे म्हणणे आहे तम?
《
《
मस्त!
बेफि, तुम्ही तुमच्या लेखांतून
बेफि,
तुम्ही तुमच्या लेखांतून वापरलेले शब्द शिव्या नसतात, पण मी वापरलेले शब्द म्हणजे शिव्या असतात, अशी तुमची गोड समजूत आहे काय?
वर तुमची स्तुती केली आहे, तर तिला "गरळ ओकणे" म्हणताहेत तुमचे "मित्र"
त्यांना उद्देशून तो शब्द वापरलेला आहे.
पहा बुवा.
लेखात शिव्या वापरल्या गेल्या
लेखात शिव्या वापरल्या गेल्या असतीलच तर त्या शिव्या त्या लेखातील पात्राची भाषा म्हणून असतील. त्याला मायबोली प्रशासनाने हरकत घेतल्याचा माझा अनुभव नाही वा तसा नियम वाचनात नाही.
प्रतिसादात शिवी (कोणालाही उद्देशून) वापरणे हे प्रतिसाददात्याचे थेट वर्तन दर्शवते.
रिकामचोट ही शिवी कधी पासुन
रिकामचोट ही शिवी कधी पासुन झाली ? ही तर मराठी बोली भाषेतिल एक शब्द आहे.
प्रतिसादात शिवी (कोणालाही
प्रतिसादात शिवी (कोणालाही उद्देशून) वापरणे हे प्रतिसाददात्याचे थेट वर्तन दर्शवते.
<<
बेफि,
तुमच्या मला उद्देशून केलेल्या प्रेमळ लिखाणांपैकी हे एक:
>>
बेफ़िकीर | 12 December, 2014 - 22:23
इब्लिस उर्फ उत्सर्ग अभिनिवेष काटकर,
पुणेकरांनी काय करावे हे नंदुरबारसारख्या अतीप्रगत भागातून कृपया बकू नयेत.
(आणि उंदरांनी कसेबसे स्वतःसाठी शोधलेल्या बिळातून प्रश्न विचारू नयेत)
<<
बाकी प्रतिसादातच 'बाप' काढला होता, ते विस्मरणात गेलं असेलच, नाही?
दुपारी त्या 'स्पार्टाकस'
दुपारी त्या 'स्पार्टाकस' यांना विचारलं होतं, तेच तुम्हाला विचारतो.
आरसा आहे का? आरसा?
विस्मरणाच्या आजारावर पुण्यात
विस्मरणाच्या आजारावर पुण्यात कुठे चांगले उपचार होतात?
ये क्या हो रहा है?
ये क्या हो रहा है?
इब्लिस, वरील प्रतिसादात शिवी
इब्लिस,
वरील प्रतिसादात शिवी कोणती आहे ते कृपया विशद करावेत.
तुमचा बाप काढला होता हे आठवते. तो प्रतिसाद प्रशासकांनी नष्ट केलेला होता हेही तुम्हाला आठवत असेल. माझ्या त्या प्रतिसादावर येथील कोण जोरजोरात हासले होते तेही आठवत असेल. ते अलाहिदा!
>>>इब्लिस उर्फ उत्सर्ग अभिनिवेष काटकर<<<
ह्या शब्दसमुहात शिवी कोणती आहे?
उत्सर्ग अभिनिवेष काटकर हे असं
उत्सर्ग अभिनिवेष काटकर
हे असं असं अस्सं नाव आहे का ?
रिकामचोट ही शिवी कधी पासुन
रिकामचोट ही शिवी कधी पासुन झाली ?
क्षणभर पश्चात्ताप झालाही
क्षणभर पश्चात्ताप झालाही होता. पण आजवर चालू असलेली शिवीगाळ, जातीय ताशेरे, वगैरे गोष्टी लक्षात घेऊन प्रतिसाद संपादीत करत आहे.
-'बेफिकीर'!
Pages