नमस्कार! फॉर अ चेंज आज मी कलर्ड पेन्सिल स्केच अपलोड करत नाहीये.
मांजरं माझा वीक पॉईंट. जुन्या मायबोलीवर मांजरांवर थोडंफार लिहिलंही होतं. लहानपणी आसपास मांजरं असण्याची कायम सवय. आता मांजरं नाहीत माझ्याकडे गेली अनेक वर्ष, पण तात्पुरत्या संपर्कात येणार्या मांजरांशी तरीही सूर जुळतात अद्यापही. नुकत्याच पाहिलेल्या काही देखण्या मांजरांना माझ्या नवीन कॅमेर्यात कैद करायचा मोह आवरला नाही.
उदाहरणार्थ हे पहा: ब्राऊन डोळ्याचे हे मांजर.
हे एकच मांजर आहे की! अॅन ऑड आइड कॅट!! ही जेनेटीक कंडीशन आहे म्हणे. पण दुर्मिळ.
लायब्ररीत जात असताना ओझरतंच एक देखणं पांढरं-सोनेरी मांजर दिसलं. काही सेकंदांच्या त्या दृष्टीभेटीतच मांजराचे दोन्ही डोळे वेगवेगळ्या रंगांचे असल्याचं जाणवलं. पटकन मागे वळून पाहिलं तर तेवढ्यात बेटं गायबही झालं. नंतर येताजाता तिथल्या एका दुकानात बर्याच गबदुल मांजरांचा मुक्काम असल्याचं पाहिलं. तेव्हा ठरवलं एकदा प्रत्यक्ष भेट देऊन शोधून काढू त्याला. त्यानुसार त्या मांजराचा पत्ता लागलाच. मग काय मी कॅमेरा घेऊन लगेच हजर झाले तिथे.
दुकानदाराची परवानगी घेऊन फोटोसेशन चालू तर केलं. पण हे बोकोबा भलतेच लाजाळू निघाले. बघावं तेव्हा मान फिरवणे, डोळेच मिटून घेणे वगैरे प्रकार चालू झाले. मग शेवटी मालकांनी थोडा खाऊ दिला:
तेवढ्यात काहीतरी चाहूल लागली म्हणून मान वर झाली आणि त्या निळ्या आणि ब्राऊन डोळ्यात मी हरवून गेले लिट्रली.
मध्येमध्ये वर उडणार्या कावळे चिमण्यांवर आम्ही लक्ष ठेवून होतो बरं!
पण तिकडची बाकीची मांजर पण काय कमी नव्हती. काय एकेकाचे रंग आणि आरस्पानी डोळे!
त्या दुकानदाराकडे अशी जवळपास दहा मांजरं आहेत. सर्व देखणी, सुदृढ आणि स्वच्छ. त्या सर्व मांजरांची ऑपरेशन्स करुन घेतली आहेत त्यांनी. (त्याची खूण म्हणून कानाच्या टोकाचा तुकडा पाडला आहे. फोटोतही दिसतोय.)
ऑड आइड बोकाबांना दुकानदार 'वैटी' 'वैटी' असं हाक मारत होते. ते व्हाइटी (व्हाईट रंंगामुळे) असावं असं मला वाटलं. व्हाइटीबुवांनी नंतर मस्त पोजेस दिल्या. त्यांना या क्लिकक्लिकाटाची सवय असणार. बरेच मांजर फॅन्स फोटो काढून गेलेत.
मला फोटोग्राफीचा जराही गंध नाही पण माझ्या सध्याच्या नवीन कॅमेर्यातून फोटो काढणे हा सध्या जणू छंदच झाला आहे. त्यामुळे या फोटोंमध्ये प्रकाश चित्रणाच्या चुका असल्यास पदरात घ्या. आय होप तुम्हालाही आवडली असतील ही मांजरं.
मस्त लिहिलेय. आमच्या घरचे
मस्त लिहिलेय.
आमच्या घरचे मार्जारप्रेम मायबोलीजाहीर आहे त्यामुळे जास्त काही बोलत नाही.
वरचा तो दोन वेगवेगळे डोळेवाला बोका मला नेरुळ बसडेपोत दिसलेला. अगदी हाच रंग, हेच डोळे आणि चेहरा........ काय सांगावे???? मला तो ओझरता दिसला आणि त्याचे डोळे वेगवेगळे आहेत हे लक्षात आले. नीट पाहावे म्हणुन त्याला शुक शुक मन्या केले. त्याने प्रचंड रागावुन, माझ्याकडे चेहरा वळवला. "काय बाई आहे, चक्क रस्त्यावर उभी राहुन माझ्यासारख्या रॉयल मांजराला शुक शुक मन्या करते" हे भाव त्याच्या त्या संतप्त चेह-यावर ठळकपणे उमटले होते.
मस्तच..
मस्तच..
मस्त
मस्त
28 Weeks Later ची आठवण झाली.
28 Weeks Later ची आठवण झाली.
मस्त आहेत फोटो. पण त्यातल्या
मस्त आहेत फोटो. पण त्यातल्या एकाचे डोळे वेगवेगळ्या रंगाचे कसे ?
कसली क्यूट मांजरे आहेत!!! आणि
कसली क्यूट मांजरे आहेत!!! आणि फोटो पण छानच!!
ए मस्त!!!
ए मस्त!!!
मस्त हे असं मांजर माझ्या
मस्त
हे असं मांजर माझ्या मामाच्या घरी ही होतं.
सहीच हम भी कुछ कम है क्या! >>
सहीच
हम भी कुछ कम है क्या! >> कडक आलाय
प्रचि मस्तच राजस्थानमध्ये
प्रचि मस्तच
राजस्थानमध्ये बेडा गावात निळ्या डोळ्यांचा बिबळ्या बघितला होता, त्याची आठवण झाली.
मस्त!
मस्त!
अत्यंत आवडता विषय! त्यात
अत्यंत आवडता विषय! त्यात वर्षाने काढलेले फोटो!
छान आहेत फ़ोटो व मांजरं.
छान आहेत फ़ोटो व मांजरं.
साधने,
साधना, @मनीमोहोरः ही एक
साधना,
@मनीमोहोरः ही एक जेनेटीक कंडीशन आहे. वर ऑड आइड कॅटची लिंक दिली आहे त्यात माहिती आहे.
मानुषीताई तुम्ही पण मनिमाऊ फॅन का?
आशुतोषः निळ्या डोळ्यांचा बिबळ्या? भारी दिसत असेल ना.
बाकी सर्वांना धन्यवाद.
मी माऊ पंखी नाही पण फोटो खरच
मी माऊ पंखी नाही पण फोटो खरच खुप मस्त आहेत! एका मित्राकडे बेंगाल टाइगर कैट आहे. त्या बोकोबाची आठवण झाली!
(लेकीच्या शाळेत एका शिक्षिकेचे डोळे त्या मांजरासारखे वेगवेगळ्या रंगाचे आहेत)
मस्तय मार्जारपुराण मी माऊ
मस्तय मार्जारपुराण
मी माऊ पंखी नाही पण फोटो खरच खुप मस्त आहेत!>>>>>वत्सला, +१
(No subject)
भारी! हँडसम फारच हँडसम आहे.
भारी! हँडसम फारच हँडसम आहे. सगळ्याच मनीमाऊ आवडल्या. म्हणजे न आवडण्याचा प्रश्नच नव्हता पण तरी. यु मेड माय डे
मांजराविषयी प्रेम नाही, पण
मांजराविषयी प्रेम नाही, पण फोटो सही आलेत (दुरून बघायला).
मांजराविषयी प्रेम नाही, पण
मांजराविषयी प्रेम नाही, पण फोटो सही आलेत (दुरून बघायला).>>>> +११११
सगळ्यात, सोनेरी मांजर जास्त
सगळ्यात, सोनेरी मांजर जास्त आवडलं
गोड आहेत फोटो..मांजर माझा वीक
गोड आहेत फोटो..मांजर माझा वीक पॉइंट आहे
उग्गाच लोक माऊजना लबाड वगैरे म्हणत असतात..किती निरागस, निर्व्याज भाव आहेत बघा वरच्या फोटोंमध्ये...लगेच उचलून घ्यावसं वाटतंय किंवा दुधाची बशी समोर ठेवाविशी वाटतेय...
>>>>मांजराविषयी प्रेम नाही,
>>>>मांजराविषयी प्रेम नाही, पण फोटो सही आलेत (दुरून बघायल>>>><<< +११११
मांजरं अगदीच आवडत नाहीत. पण फोटो चांगलेत.
खूप क्युट आहेत. नवऱ्याला
खूप क्युट आहेत. नवऱ्याला दाखवते फोटो उद्या तो जास्त खुश होईल. तो जाम fan आहे. मी नाहीये.
कोकणात माझ्या सासरी आहेत माऊ, बऱ्याच आहेत. माझे दीर त्यांच्याशी गप्पा मारतात, जेवतात त्यांच्याबरोबर. छान वाटतं, मी कौतुकाने बघत राहते.
वर्षा, दुजाडोळ्या मावड्या लई
वर्षा, दुजाडोळ्या मावड्या लई टेचात वावरत असणार! फटू झ्याक आलेत. माऊ माझी आवडती!
आ.न.,
-गा.पै.
मी अजून एक प्रचंड प्रचंड
मी अजून एक प्रचंड प्रचंड मांजरप्रेमी. सध्या आमच्या पुण्याच्या घरी २ पहिल्या बॅचची, २ दुसर्या बॅचची आणि ४ नवीन ३ आठवड्यांची पिल्लं आहेत. गंमत म्हणजे घरात वावरण्याच्या जागा, येण्याजाण्याचे मार्ग , दूध पिण्याच्या वेळा ह्या मांजरांनी वाटून घेतले आहेत. (जनरली घरात पिल्लं असली की मांजरी दुसर्या मांजरांना येऊ देत नाही, भले ती तिचीच आधीच्या बॅचची पिल्लं असली तरी) पण मस्त मॅनेज करतात त्यांचं तेच
आपल्या कॉमन मैत्रीणीचा सकाळीच मेसेज आला. वर्षाने मायबोलीवर मांजराचे फोटो टाकले आहेत, तुला नक्की आवडतील. पहा म्हणून...
मस्त फोटोज्स... मजा आली पाहून ... मिसिंग माय मांजर्स बॅक होम इव्हन मोअर (तरी स्काईपवरून बोलते/पाहते त्यांना!)
आमच्या मांजराच्या स्टोरीज, फोटोज दाखवायला नक्की आवडेल
मस्त मस्त मस्त...
मस्त मस्त मस्त...
सिंडरेला, रार तू पण
सिंडरेला,
रार तू पण माऊप्रेमी का माहिती नव्हतं सही मॅनेज केलंय मांजरांनी तुमच्याकडे.स्टोरीज विथ फोटोज नक्की शेअर कर.
मांजरप्रेमी असलेल्या नसलेल्या सर्वांना थँक्स
मांजर प्रेमी नाही. परंतू फोटो
मांजर प्रेमी नाही. परंतू फोटो पाहायला आवडतात! दोन वेगवेगळ्या रंगाच्या डोळ्यांचं मांजर भारीच देखणं आहे!
(लेकीच्या शाळेत एका शिक्षिकेचे डोळे त्या मांजरासारखे वेगवेगळ्या रंगाचे आहेत)>>> ही वत्सला पण ना! असली खिक करून हसले मी ह्या कमेंटला!
मस्त मस्त मस्त गोड
मस्त मस्त मस्त गोड
Pages