ढाक आणि गिरीविराज हाईकर्सचा याराना तसा पुराना !
२५ मे १९८३ ला संजय लोकरे, किरण अडफडकर आणि सारंग अडफडकर यांनी रोपशिवायचं कळकराय सुळका सर केला होता.
२४ फेब्रुवारी ते ०२ मार्च १९८९ या कालावधीत कळकराय सुळक्याची मागील जवळपास ९०० फुटी प्रस्तरभिंत प्रथमच सर केली होती.
डिसेंबर १९९२ मध्ये ढाकची गुहा ज्या कड्यामध्ये आहे त्या कड्याच्या प्रस्तरभिंतीवर प्रथमच चढाई केली होती.
१९९२ ते २०१३, तब्बल २१ वर्षांच्या कालावधीनंतर यावेळेस पुन्हा एकदा ढाकची गुहा असलेल्या कड्यावरच चढाईचा बेत आखण्यात आला.
रात्री होळी पेटवून लोक उद्याच्या धुळवडीची तयारी करीत असताना आम्ही २७ मार्च २०१३ च्या पहिल्या प्रहरी पावणे दोनची लोकल पकडून कर्जत स्टेशन गाठल आणि तिथल्याच एसटी डेपोमध्ये पाठ टेकवली. इतरही काही वेगवेगळ्या ठिकाणी जाणारे ट्रेकर्स डेपोमध्ये आपापला बिस्तरा घेऊन आडवे झाले होते. त्यांच्या बरोबर गप्पा मारता-मारताच पहाटे पावणेसहाच्या बसने तासाभरात सांडशी गावात पायउतार झालो. प्रवीणच्या ओळखीचे पाटेकर यांच्याकडे चहा घेऊन सात वाजता सकाळच्या कोवळ्या उन्हात (जे नंतर भाजून काढणार होत) सॅक पाठीवर मारून दूरवर दिसणाऱ्या ढाकच्या दिशेने निघालो. ढाक कड्याच्या खाली असलेलं पठार ज्या डोंगरावर पसरलेलं आहे त्या डोंगराची एक धार मांजरसुंभा डोंगराच्या दिशेने खाली उतरते. मांजरसुंभा डोंगराला उजव्या हाताला ठेवत त्या धारेच्या दिशेने निघालो. उन्हाळ्याच्या दिवसात सांडशी गाव ते ढाक या संपूर्ण ट्रेकमध्ये वाटेत पाणी कुठेच सापडत नाही म्हणून गावातच पाणी भरून घेतले होते. पाठीवर वजन असूनसुद्धा वाट सपाटीची असल्याने त्या धारेपर्यंत आरामात पोहोचलो. आता खरा कस लागणार होता, वाट खड्या चढणीची होती आणि सूर्य आमच्या शरीरातील पाण्याच्या प्रत्येक थेंबाच अर्ध्य मागत होता.
प्रचि १
From DhaK Bhairi 27Mar2013
प्रचि २
From DhaK Bhairi 27Mar2013
मार्चचा महिना असल्याने डोंगरधारेवरची सगळी हिरवळ नाहीशी होऊन रखरखीत आसमंत तेव्हढा उरला होता त्यामुळे पाठीवर ओझ घेऊन डोंगरधारेवरून चढताना सगळ्यांचीच बोलती बंद झाली होती. प्रत्येक शंभरेक पावलांवर ढुंगण टेकवून पायांना विश्रांती देत साधारण १२ वाजता ढाकच्या पठारावर पोहोचलो. ढाकचं पठार संपूर्णपणे जंगलाने बहरलेलं आहे.
प्रचि ३
From DhaK Bhairi 27Mar2013
ट्रेकर कितीही पट्टीचा असो, पण चार-पाच वर्षांच्या कालावधीनंतर त्याने जर ढाकभैरीचा ट्रेक सांडशी (कर्जत) मार्गे आखला, तर तो चुकलाच म्हणून समजा. आमच्याही बाबतीत अगदी असच घडलं. या पठारावर पोहोचताच क्षणी समोर जंगलात लुप्त होणाऱ्या अनेक ढोरवाटा फुटलेल्या दिसल्या. या रानात जंगली म्हशींचा अधिवास आहे. जवळील पाणी संपत आले होते म्हणून मागे घडलेला प्रसंग आठवला. गेल्या वेळेस असेच आलेलो असताना या पठारावर पोहोचायला रात्र झाली आणि जवळच पाणी संपल होत. एव्हढ्या रात्री गुहेत पोहोचणे अशक्य असल्याने या पठारावरच रात्र काढण्याचं ठरलं आणि पाण्याचा शोध घेत असताना एका डबक्यात साचून राहिलेल्या चिखलात जंगली म्हशी आरामात पहुडलेल्या दिसल्या. त्या बिचाऱ्यांना उठवून तेच पाणी पिण्याची वेळ आली होती. तर असो!
त्या ढोरवाटेमधली एक वाट पकडली आणि कळकराय सुळका आणि शेजारील डोंगर यांच्यामधील घळीच्या दिशेने अंदाजाने निघालो कारण एकदा जंगलात घुसल्यावर डोक्यावर फक्त झाडांची गर्दी असणार होती आणि त्याच्यापलीकडे काहीच दिसणार नव्हते. अगदी तसेच घडले, जंगलात शिरल्यावर एक तास झाला तरी वाट वर चढताना दिसतच नव्हती.
प्रचि ४ - वाट चुकलेलो माहित असून सुद्धा थोडासा खेळ सुद्धा हवाच.
From DhaK Bhairi 27Mar2013
आम्ही जिथे वळण घ्यायचे होते ते सोडून ढाकच्या विरुद्ध दिशेला मांजरसुम्भ्याच्या वाटेला जाउन पोहोचलो होतो. परत तासाभराच्या परतीच्या प्रवासाने होत नव्हत ते सगळी पाणी संपल होत. शेवटी एकदाची ती चढणीची वाट सापडली आणि आम्ही आता एका जंक्शनवर पोहोचलो. एक वाट पलीकडे कोंडेश्वरला जाते, तिथून पुढे राजमाचीला. ढाकच्या गुहेत पोहोचायला सव्वा दोन वाजले होते. आमचा पाच दिवसांचा बाड-बिस्तरा खालच्या अरुंद गुहेत टाकला, या गुहेत सपाटी नाहीच आणि कंबरेत वाकून नाही तर बसूनच वावरावं लागत.
प्रचि ५- थकलेले जीव
From DhaK Bhairi 27Mar2013
प्रचि ६
From DhaK Bhairi 27Mar2013
लोडफेरीसाठी आलेले प्रवीण, सतीश, मोरेश्वर, वासुदेव, दर्शन आणि अनिकेत संध्याकाळी चार वाजता परत जाण्यासाठी ढाकच्या कड्याच्या पायऱ्या उतरून खाली जंगलात निघून गेले. पण आम्हाला कुठे उसंत होती, उद्याचं काम थोड हलक होईल या विचाराने आजच या कातळभिंतीवर चढाईसाठी सज्ज झालो. सुरुवातीस संपूर्ण भिंत घासूनपुसून गुळगुळीत केल्यासारखी दिसत होती, त्यामुळे बोल्टिंग करण्याशिवाय पर्याय नव्हताच. हितेशने सुरुवातीस बोल्ट ठोकून किशोरला पुढची सूत्र दिली. किशोरने ठोकलेल्या बोल्टमध्ये शिडी अडकवून त्यावर उभा राहून वरची उंची गाठली आणि वर असलेल्या कपारीत एक पेग (अणूकुचीदार सळई) ठोकला. सुरक्षिततेसाठी त्यातून रोप पास केल्यावर त्याला १९९२ मध्ये ठोकलेले बोल्टस दिसू लागले. बोल्ट्सच्या रिंग्स खराब होऊन तुटल्या होत्या पण बोल्ट्स मात्र अजूनही तग धरून होते. किशोरने anchor साठी ४ mm च्या स्लिंगचा (दोर) वापर करून त्या बोल्ट्सच्या साहाय्याने जवळपास ४० फुट उंची गाठली आणि रात्रीच्या मुक्कामाला परत खाली गुहेत आला.
प्रचि ७ चढाई मार्ग
From DhaK Bhairi 27Mar2013
प्रचि ८
From DhaK Bhairi 27Mar2013
दुसरा दिवसाची सकाळ माकडांनी गाजवली. गुहेत मुक्कामाला नवीन पाहुणे आल्याची वार्ता त्यांना कळताच पाच-पन्नास माकडे खाण्या-पिण्याच्या जीन्नसांवर हात मारण्यासाठी संधीच्या शोधात होती. त्यांच्या बंदोबस्तासाठी एक माणूस कायमचा गुहेमध्येच ठेवण जरुरी झाल होत. त्यांचा बंदोबस्त केल्यावर किशोरनेच आज परत चढाईचा प्रारंभ केला.
सुरुवातीला जुने बोल्टस दिसत होते, कालच्याप्रमाणेच anchor साठी ४ mm च्या स्लिंगचा (दोर) वापर करून त्या बोल्ट्सच्या साहाय्याने पुढची चढाई आरंभली आणि पहिल्या लेजवर पोहोचला. सेकंड मेन हितेश खाली बोल्ट्सवर लटकलेले सामान काढत-काढत (Wind Up) किशोरला जाऊन मिळाला. तिथून पुढे फ्री मूव्ह करत आणखी उंची गाठत किशोरने दुसरी लेज गाठली आणि रात्रीच्या मुक्कामासाठी परत खाली गुहेत आला.
प्रचि ९
From DhaK Bhairi 27Mar2013
प्रचि ९अ
From DhaK Bhairi 27Mar2013
दुसऱ्या दिवशी प्रदीपने आशिषला सोबतीला घेऊन चढाईला सुरुवात केली. सावधपणे हालचाल करीत असताना अचानक तोल जाऊन प्रदीप सात-आठ फुट खाली कोसळला, पण सेकंड मेन आशिष सावध असल्याने त्याने प्रदीपचा जीवनरक्षक दोर खेचून धरला आणि संभाव्य दुर्घटनेपासून त्याला वाचवलं, पण खाली घसरताना कड्याला घासून प्रदीपची करंगळी फाटली. त्यामुळे त्याला परत लेजवर खाली येउन पुढची चढाई आशिषकडे सोपवावी लागली. पहिल्या लेजवर असलेल्या हितेशने सेकंड मेनची भूमिका घेतली तर हितेशची जागा वासुदेवने भरून काढली. प्रदीपला दुखापत झाल्याने आज लवकरच pack-up करून मंडळी परत खाली आली.
प्रचि १०
From DhaK Bhairi 27Mar2013
प्रचि ११- कळकराय सुळक्यावरून छायाचित्रण
From DhaK Bhairi 27Mar2013
काल झालेल्या दुखापतीने जराही विचलित न होता प्रदीप आज परत एकदा चढाईसाठी तयार झाला व किरणने सेकंड मेनची भूमिका घेतली. गेल्या सव्वा दोन दिवसात जवळपास २५०-३०० फुट उंची गाठलेली असल्याने तळापासून परत काल चढाई थांबवलेल्या ठिकाणापर्यंत जुमारिंग करीत पोहोचण्यास बराच वेळ वाया गेला. सुरुवातीला प्रदीपने फ्री मूव्ह करीत ससाण्याची केव्ह गाठली आणि इथेच आपला तोल सांभाळत अर्ध्या तासांच्या प्रयत्नानंतर anchor साठी एक बोल्ट ठोकण्यात यश मिळवलं. पुढे फ्री मूव्हची संधी दिसत असल्याने त्याने किरणला वर बोलावलं आणि पुढची सूत्र किरणकडे सोपवली. किरणने संधी मिळताच फ्री मूव्ह केली खरी पण वरचा होल्ड काही हातात येत नव्हता म्हणून मग प्रदीपच्या खांद्यावर उभे राहून वरच्या होल्डला हात घातला आणि दुसरी मूव्ह केली पण इथे परत मागचीच पुनरावृत्ती झाली, इथे बोल्ट ठोकण्यासाठी दोन्ही हात सोडून उभासुद्धा राहू शकत नव्हता. आजूबाजूला नजर फिरवल्यावर दोन्ही बाजूला कपार दिसली, डाव्या बाजूच्या कपारीत पिटॉन (काही इंची धातूची पट्टी) ठोकून पाहिला पण तो झटक्याने परत बाहेर आला म्हणून उजव्या बाजूच्या कपारीत पिटॉन ठोकला जो एकदम घट्ट बसला, अशारितीने पिटॉनची अधांतरी सुरक्षितता लाभताच किरण सुसाट वर निघाला तो तीसेक फुट चढाई करून एका मोठ्या गुहेमध्ये पोहोचला. इथेच acnhor साठी बोल्ट ठोकून दिवसभराची चढाई थांबवली.
प्रचि १२
From DhaK Bhairi 27Mar2013
प्रचि १३
From DhaK Bhairi 27Mar2013
प्रचि १४
From DhaK Bhairi 27Mar2013
प्रचि १५
From DhaK Bhairi 27Mar2013
प्रचि १६
From DhaK Bhairi 27Mar2013
माणसाची कमतरता या मोहिमेत सुद्धा होतीच, त्यातच संजय आणि हितेश सुट्टी संपली असल्यामुळे परत आपल्या घरट्याकडे निघुन गेले. ढाकच्या या कड्याला बारमाही सूर्यप्रकाश लाभला आहे, थंडीत तो खूपच हवाहवासा वाटतो पण आम्ही निवडलेल्या ऋतूत मुळीच नाही. मार्चच्या या कडक ऊन्हाळ्यात गेल्या तीन दिवसातच एव्हढे रापलो होतो कि घरचे तरी ओळखतील तरी कि नाही याचीच चिंता लागली होती. घरातून जरी रंगांची धुळवड न खेळताच निघालो असलो तरी इथे मात्र उन्हाने आपली छाप आमच्या सर्वांगावर सोडली होती.
सकाळी साखरझोपेत असताना माकडांनी हल्ला करून पोहे आणि फरसाणाची पाकीट लांबवली, आजचा शेवटचाच दिवस असल्याने आम्हीही त्यांच्यामागे धावण्याचा निरर्थक प्रयत्न सोडून दिला. माणसेच कमी असल्यामुळे आजही चढाईसाठी प्रदीप आणि किरणचाच नंबर लागला होता. उंची वाढल्यामुळे ३५०-४०० फुट झुमारिंग करून वेळ आणि ताकद व्यर्थ घालवण्यापेक्षा कळकराय सुळकाच्या बाजूला असलेल्या घळीतून वर येत डाव्याहाताची ढाक गावाकडे जाणारी पायवाट पकडली व विसेक मिनिटांच्या चालीनंतर पायवाट सोडून धबधब्याच्या वाटेने खडा कातळ चढून ढाकचा सर्वोत्तम माथा गाठला. माथ्यावरूनच रॅपलिंग करत खाली उतरून काल चढाई थांबवलेल्या गुहेत पोहोचलो.
प्रचि १७
From DhaK Bhairi 27Mar2013
प्रचि १८
From DhaK Bhairi 27Mar2013
प्रचि १९
From DhaK Bhairi 27Mar2013
ससाण्याच्या केव्हपासून डावीकडील बराचमोठा रॉकपॅच गेल्या वीस वर्षात केव्हांतरी पडून गेल्यामुळे आमचा जुना मार्ग दृष्टीस पडत नव्हता. त्यामुळे जुना डावीकडे वळत गेलेला मार्ग न शोधता अगदी सरळ रेषेत आम्ही नवीन मार्गाने चढाई सुरु केली. प्रदीपने बिले घेताच किरणने चढाईला सुरुवात केली. गुहेच्या उजव्या बाजूने बाहेर येत वरचे एकेक होल्ड पकडत पुन्हा एकदा तीसेक फुटांची सुरेख फ्री मूव्ह करीत किरण वरच्या टप्प्यावर पोहोचला व प्रदीपला वर बोलावून घेत पुढची सूत्रे प्रदीपला दिली. प्रदीपने दुखऱ्या करंगळीकडे दुर्लक्ष करीत सावधपणे हालचाल करीत पन्नासेक फुटांची उंची गाठत Anchor साठी लागोपाठ तीन बोल्ट्स ठोकले आणि पुढचा कारभार किरणला सोपवला. माथा आवाक्यात आलेला असल्याने किरणने उजवीकडे सरकत एक छोटीसी आडवी लेज पकडली व पूर्ण शरीर वर खेचून हातांचा दाब देऊन लटकू लागला, परंत्य पायाना काही केल्या एकही होल्ड सापडेना. एकेक हात बदलून किरण तसाच त्या लेज वर धडपडत होता, तब्बल दहा मिनिटे धडपड केल्यावर त्या अरुंद लेजवर उभे राहण्यात किरण यशस्वी झाला,
प्रचि २०
From DhaK Bhairi 27Mar2013
प्रचि २१
From DhaK Bhairi 27Mar2013
पण इथेही दुर्दैवाने पाठ सोडली नव्हती. पाचेक मिनिटे प्रयत्न केल्यावर शेवटी एकदाचा वर पोहोचला आणि उजव्या पंजात आधारासाठी धरलेला मोठा दगड उचकटून खाली दरीत कोसळला. क्षणभरासाठी छातीत धस्स झाल पण तेव्ह्ढ्यापुरतच. नशिबाने सेकंडमेन प्रदीप कड्याच्या थोडासा आतल्या बाजूला असल्याने दगड त्याच्या डोक्यावरून खाली दरीत जाऊन विसावला. हे विसरून किरणने माथ्यावर पाय ठेवलाच आणि ढाकच्या कड्याला आपल्या रंगात रंगवून टाकलं.
प्रचि २२
From DhaK Bhairi 27Mar2013
प्रचि २३
From DhaK Bhairi 27Mar2013
प्रचि २४
From DhaK Bhairi 27Mar2013
प्रचि २५
From DhaK Bhairi 27Mar2013
प्रचि २६- अभी तो में जवान हुं!
From DhaK Bhairi 27Mar2013
प्रचि २७
From DhaK Bhairi 27Mar2013
नेहमीप्रमाणेच.. थरारक !
नेहमीप्रमाणेच.. थरारक !
मला पाहुन गरगरल. जबरी!
मला पाहुन गरगरल. जबरी!
सूनटून्या मागच्या जन्मी
सूनटून्या मागच्या जन्मी नक्किचशिवरायांचे मावळा असणार.. .
किरण अडफळकर म्हणजे थोर आहेतच.
किरण अडफळकर म्हणजे थोर आहेतच.
ते पायात काहीही न घालता चढाई करायची म्हणजे..... _/\_
थरारक!!! सगळेच प्रचि पाहताना
थरारक!!! सगळेच प्रचि पाहताना धस्स झालं.
__/\__
__/\__
थरारक..
थरारक..
थरारक ! ढाकच्या पठारावर हरवलो
थरारक !
ढाकच्या पठारावर हरवलो आहे. डीहाइड्रेशन कशाला म्हणतात ते तिथेच कळले. आनंद पाळंदे यांच्या डोंगरयात्रातली पहिली पन्नास पाने वाचलेली आठवली. कपभर उरलेले पाणी वापरून तगायचे होते. तहान प्रचंड लागलेली. रुमाल ओला करून चेहरा आणि मान झाकली पाचोळ्यात झाडाखाली तासभर पडून राहिलो. ग्लानी उतरल्यावर परतीची वाट धरली. मानेचा ओला रूमाल काढला नाही. कमी उंचीवर आल्यावर हुशारी वाढली. खाली शाळेजवळच्या बोअरवेल पाशी आलो तेव्हा तीन वाजले होते. विहिरीतून पाणी काढायचा अडीच लिटरचा डबा भरला. घटाघट प्यालो तरी तहान होतीच. तीन डबे पाणी प्यायलो. साडेसात लिटर! इतके शरीरातले पाणी आटले होते. साडेतीनची बस मिळाली. पुढच्या वेळेस मात्र पठारावर लगोऱ्या रचत गेलो आणि नाल्याची वाट सापडली. खिँडीत चारवाटा मिळतात तिथे उजवीकडे कोंडेश्वराची गार सावलीची वाट धरून ओढा पार केला आणि आसरा मिळाला.
ढाक आणि राजमाचीच्या घळी शेजारीच परंतू किती फरक आहे !
मी मागे लिहिले होते.
मी मागे लिहिले होते.
वाह! क्या बात है! Srd
वाह!
क्या बात है!
Srd +१
ढाकवरुन परत येताना रस्ता चुकलो होतो आणि पाणी संपल्याने जी काही हालत झाली होती ती अवर्णनीय आहे. त्यात आम्ही ऐन एप्रिलमध्ये गेलेलो (आगाऊपणा!). दगडावर ग्रिप घेताना बोटं पोळून निघाली होती!
थरारक.. ढाक बहिरी तसाही थरारक
थरारक.. ढाक बहिरी तसाही थरारक ट्रेकिंग स्पॉट आहे..
बूटाशिवाय अशी (जीवघेणीच
बूटाशिवाय अशी (जीवघेणीच म्हणायला हवी....) थरारक चढाई यशस्वी करणा-या किरण अडफडकर यांचा त्यानंतरचा "अभी तो मै जवाँ हूं..." फोटो पाहिल्यावर अरे किती सहजगत्या यानी हे सारे केले पूर्ण.... प्रत्यक्षात ते किती कठीण होते त्याचे फोटो साक्षीदार आहेतच.
वारंवार फोटो पाहात आहे मी सारे.... सहभागी झालेल्या सार्या युवावर्गाला नमस्कार.
थरारक..
थरारक..
सर्वांचे धन्यवाद! अशोकमामा
सर्वांचे धन्यवाद!
अशोकमामा / सेना
बूट न वापरण्याच एक कारण आहे किरण सरांचं! त्यांच म्हणण अस आहे कि, रॉकचा पृष्ठभाग कडक आणि कठीण खडकाचा असल्याने त्याच्यावर पकड मिळविण्यासाठी त्याच्या विरुद्ध गुणधर्म असलेली वस्तू वापरावी. मग त्यासाठी कोणी बूट वापरत आणि त्याहीपेक्षा उघड्या पायांनी पकड जास्त चांगली मिळते. आता राहतो प्रश्न सुरक्षितेतचा. तसही बूट घालून एव्हढ्या उंचीवर सुरक्षितता काय लाभणार. बुटांचा आणखी एक दोष म्हणजे 'घाम'. घाम आला कि पायातून सारखे काढ-घाल करू शकत नाहीत.
बुटांचा वापर तिथे उपयोगी पडतो जिथे चढाई मार्ग आधीच वरपासून खालपर्यंत व्यवस्थितरित्या पाहून मग आखला जातो. अशा रीतीने मार्ग आधीच पाहिलेला असल्याने तुम्हाला वाटेत कुठे पकडायला जागा आहेत, उभे रहायला जागा आहेत हे आधीच माहित झालेल असते.
आम्ही चढाई मार्ग पायथ्यापासूनच आखतो, त्यामुळे वर काय सापडणार आहे याची अजिबात कल्पना नसते. अशावेळेस बूट उपयोगी येत नाहीत उलट त्यांचा त्रासच होतो.
srd
त्याच वेळेस दोन मुल वाट हरवल्यामुळे रात्रभर त्या जंगलात पाण्याशिवाय भटकत होती अशी गोष्ट खाली गावात ऐकली होती.
सुनटुण्या... पुन्हा एकदा
सुनटुण्या... पुन्हा एकदा सोल्लीड फोटो नि वृत्तांत.. किरण सरांना तर साष्टांग _/\_ इथे जाउंन आलोय सो अगदी तुमच्या बरोबर असल्याचा फिल आला.. अर्थात गुहेपर्यंत हा... पुढच अपने बस की बात नही..मस्त !
चिरतरुण अहात तुम्ही! फोटो असे
चिरतरुण अहात तुम्ही! फोटो असे टिपलेत की सगळे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.
डीहायड्रेट वर बेअर ग्रिल्स
डीहायड्रेट वर बेअर ग्रिल्स उपाय सुचवत असतो, ( त्यात अगदी निकराच्या परिस्थितीमधे स्वतःची लघवी पिण्यासही सांगतो ) ते उपाय एकदा बघून घ्या सगळ्या साहसवीरांनी... आपल्याकडच्या हवामानात तसेही शरीरातले पाणी झपाट्याने कमी होत असते. जिथे मिळेल तिथे पाणी घ्यावे. डिहायड्रेशन फार धोकादायक ठरू शकते.
उपलब्ध पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन ड्रॉप्स / चुनखडी / नागरमोथा...असे घटक अवश्य वापरावेत.
नेहमीप्रमाणेच एकदम झक्कास
नेहमीप्रमाणेच एकदम झक्कास
सगळ्या साहसवीरांना --
सगळ्या साहसवीरांना --
_____/\______
आपल्याकडला हवामानातला दमटपणा
आपल्याकडला हवामानातला दमटपणा आणी ऊन यामूळे घाम अधिक येतो. मी दिर्घ चढाया कधी केलेल्या नाहीत पण पीए शूजने घाम कमी येतो असा अनूभव आहे.
यावेळेस अगदी बुटांबद्दल
यावेळेस अगदी बुटांबद्दल प्रश्न विचारणारच होते आणि स्पष्टीकरण मिळालं.
सेनापती, पीए शूजबद्दल फार ऐकून होते पूर्वी.
दुसर्या फोटोतले उजवीकडचे लोकरे वाटतायत.
व्वा मस्तच .. भले शाब्बास...
व्वा मस्तच .. भले शाब्बास... अन मुजरा ...
आडो, अजूनही आपल्याकडे खास
आडो, अजूनही आपल्याकडे खास क्लाईंबिंग शू़ज वापरले जात नाहीत. ह्यात आर्थिक कारणही आहेच म्हणा पण हवेतला दमटपणा ही देखील कारण असावे.
अबाबाबा ! फोटो पाहुनच घाम
अबाबाबा ! फोटो पाहुनच घाम फुटला , कसलं खतरनाक क्लाईंबिंग आहे.
संजय लोकरे, किरण अडफडकर आणि सारंग अडफडकर यांना सॅल्युट.
तसही बूट घालून एव्हढ्या
तसही बूट घालून एव्हढ्या उंचीवर सुरक्षितता काय लाभणार.
>>> सूनटुन्या.. इथे कसली सूरक्षा अपेक्षीत आहे बूटांकडून? बोटांना, विशेषकरुन अंगठ्याल, ईजा होउ नये म्हणुन, काही चावू नये म्हणून बूट हवेत.
फ्री क्लाईंबिंग करणे म्हणजे
फ्री क्लाईंबिंग करणे म्हणजे एक दिव्य आहे. प्रस्तरचढाईमध्ये सर्वोच्च प्रशिक्षित प्रसतरारोहकच ह्यात हात घालू शकतात. हॅट्स ऑफ.
मी २००१ साली कर्नाळा आणि मग २००३ मध्ये पांडवगडाच्या एका पॅचवर फ्री क्लाईंबिंग केलेले. (श्रेणी: सोपी)
फ्री सोलो हा प्रकार तर
फ्री सोलो हा प्रकार तर हृदयाचे ठोके चूकवू शकतो.
हे बघा अॅलेक्स होनॉल्ड साहेब
सेना , अशा प्रकारचं फ्री
सेना , अशा प्रकारचं फ्री क्लाईंबिंग हल्ली करतात का ?
उत्तर मिळालं , तो व्हिडीयो
उत्तर मिळालं , तो व्हिडीयो पाहुनचं माझी तंतरली.
माकडापासुन माणुस बनला ह्यात शंकाच नाही.
भारतात माहीत नाही पण परदेशात
भारतात माहीत नाही पण परदेशात भरपूर. मी वर एक लिंक दिली आहेच.
तसेही भारतातले बहूतेक प्रस्तरारोहण सह्याद्रीतच होते त्यामूळे सध्या ह्यात कार्यरत असणारे अधिक माहिती देउ शकतील.
Pages