१. या विषयाची आवड असेल तरच आपला प्रतिसाद द्यावा.
२. क्रुपया दुखावणारे प्रतिसाद टाळा.
३. अवांतर प्रतिसाद नकोत.
४. उथळ प्रश्नांना प्रतिसाद मिळणार नाही.
सोशल मीडीयावर स्वत:ला आधुनिक म्हणवणारा एक (किंवा अनेक) गट खूप आक्रस्ताळे पद्धतीने आपले म्हणणे मांडत असतो. त्यांची दहशत एव्हढी आहे की पारंपारीक गोष्टींमधल सायन्स समजून न घेता मोडीत निघत असताना हताशपणे पाहत रहावं लागतं. (याचा अर्थ जुनं तेच सोनं असा नाही).
आंम्ही मैत्रिणींनी नंतर अशा लोकांच्या नादाला लागणे सोडून दिले. जुनं ते सर्वच खोटं असंच आधुनिक शास्त्र म्हणतं की काय असा प्रचार चालू आहे त्याला आळा बसला पाहिजे असंही वाटत. चांगला योग जुळून आल्याने देशात सर्वत्र या पारंपारीक ज्ञानाचा सन्मान करणारे सरकार सिंहासनावर आरुढ झाले आहे. या सरकारचे वैशिष्ट्य म्हणजे जर या सरकारला एखादा निर्णय पटला की ते कुणाचीही पत्रास ठेवत नाही. त्यामुळेच परमपूज्य शंकराचार्यजींना आपली मतं व्यक्त करता येऊ लागली आहेत. या देशात बहुसंख्य लोक ज्या धर्माला मानतात त्या धर्माच्या सर्वोच्च धर्मगुरूला आपली मतं मांडता येऊ नयेत ही लोकशाही आहे का ? खरं तर कुणाला देव मानायचं कुणाला नाही हा अधिकार त्यांच्य़ाशिवाय कुणाकडे असणार तरी देखील सहिष्णू वृत्तीने त्यांच्या या अधिकाराकडे कानाडोळा केल्यास त्यांचं विधान बेसिकली चूक होतं का याबद्दल कुणीच बोलत नाही. फक्त तुटून पडने हेच दिसून आलं. सोशल मीडीयाचा हा एक मोठा अवगुण आहे.
जर आपलं पारंपारीक ज्ञान-विज्ञान मोडीत निघावं असं असतं तर मग आस्था चॅनेल का पाहतात लोक ? गेली कित्येक वर्ष लोक पूज्य रामदेवजी महाराजांबरोबर श्वास घेत आहेत. ते कशासाठी ? त्यांच्या पतंजली योगपीठाच्या औषधांवरचा लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, ते कशासाठी ? बाबांनी कॅन्सरचे पेशंट बरे केल्याचं ते पेशंट्स स्वत:च टीव्हीवरून सांगताना देशाने, जगाने ऐकलं. फक्त या कामासाठी त्यांना नोबेल मिळू शकतं ( पण ते मिळणार नाही). पण दुर्दैवाने आधीच्या सरकारने त्यांना साधं भारतरत्न सुद्धा दिलेलं नाही ( त्या सरकारने पुरस्कार सोडाच, रामदेव महाराजांवर पोलीस सोडून अर्ध्या रात्री जे काही केलं ते सुद्धा देशानं पाहीलं आहे). अशा परिस्थितीत परंपराघत ज्ञानाला प्रतिष्ठा कशी मिळणार ? राजकीय द्धामधुमीत जे नमोभक्त सोशल मीडीयावर होत त्यांच्यामुळे अनेक गैरसमजांना हातभार लागला हे मला मान्य आहे. खरं म्हणजे यांच्यामुळे सरकारच्या इमेजचं नुकसानच झालेलं आहे. पण याचा अर्थ या सरकारचे समर्थन करणारे सर्वच असे आहेत असा समज करून घेऊ नये. ते असो.
आज सर्वत्र व्यभिचार वाढला आहे. सोशल मीडीयावर म्हणे तो वैयक्तिक प्रश्न आहे, व्यक्तीस्वातंत्र्य आहे. अरे, पण हे सर्व कुठे चाललं आहे ? त्यातूअ गुन्हेगारी वाढती आहे. महिलांवर हल्ले होतात. नवरा बायकोच्या जिवावर उठतो आहे, कारण काय तर दुसरी कुणी भवानी आवडलेली असते. या जोडीला अभिनेत्री नको त्या धंद्यात पोलिसांच्या जाळ्यात सापडत आहेत. हे काय समाज जिवंत असल्याचे लक्षण आहे की काय ?
हेच ओळखून पूर्वीच्या साधू संतांनी मनुश्याला अध:पतनापासून वाचवण्य़ासाठी सोप्या सोप्या वचनांची निर्मिती केलेली आहे. साध्या सरळ मराठीत सांगायचं तर परस्त्री मातेसमान हा सुविचार मनावर बिंबवला गेल्याने पूर्वीच्या काळी स्त्री ला आदर मिळत असे. तसच स्त्रियांसाठी वटसावित्रीचे व्रत तर आहेच आहे, शिवाय परपुरूष पित्यासमान हे वचन सुद्धा प्रचलित होते. यामुळे स्त्रीपुरूषांमधे एकमेकांविषयी वेडेवाकडे विचार येत नसत,. आजच मानसशास्त्र हे पूर्वीच्या लोकांनी कुठल्याही विद्यापीठात न जाता कोळून पिलेलं होतं हे यातून कळतं. .या सर्व जीवनविद्या साधू संतांनी सांभाळून ठेवल्या, समाजहितासाठी त्या पुढच्या पिढीला शिकवल्या.
थोरांचा आदर करण्य़ाची आपली परंपरा ही चेष्टेचा विषय नाही. या मागे काय विचार आहे हे आपण जेव्हां ज्येष्ठ होऊ तेव्हां कळतं. ज्येष्ठांकडे अनुभव असतो पण दुस-यावर अवलंबून असल्यानं पुढच्या पिढीने त्यांना आधार दिला तर त्यांचं म्हातारपण सुखाचं जाऊ शकतं आणि तरूण पिढीला अनुभवाचा फायदा होत असतो. अशाच पद्धतीने कित्तीतरी चांगल्या गोष्टी समाजात चालत आलेल्या आहेत. पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त निगेटीव्ह गोष्टींकडे लक्ष वेधून सगळंच मोडीत काढण्याला आधुनिकता समजल जातं. समाज अनुकरणप्रिय असल्याने हे लोण खाली खाली झिरपत जातं. अशा पद्धतीनं आपण एका अपरिचित संस्कृतीला कवटाळून बसत आहोत. या संस्कृतीला इतिहास नसताना विज्ञानाच्या नावाखाली नव्या अंधश्रद्धा जोपासत आहोत. जुन्याला कुठलाही विचार न करता विरोध हा या अंधश्रद्धेचाच भाग आहे. या लोकांना सांगा की वीज असते तर तत्काळ विश्वास ठेवतील. हे बटन दाबल्यावर वीज वाहते म्हटलं की विश्वास ठेवतील. पण वीज दाखवा असं आवाहन केलं की यांची बोबडी वळते .
या ठिकाणी आपण अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या अशा अंधश्रद्धांमुळे काळाच्या उदरात गडप होण्य़ाची शक्यता आहे त्यांची चर्चा करूयात.
निंबोणीचं झाड सुद्धा गाण्यात
निंबोणीचं झाड सुद्धा गाण्यात खूपदा येतं.
काळा कापूस शोधणार्यांना
काळा कापूस शोधणार्यांना शाळेमध्ये उपमा अलंकार शिकवला नाही का?
सुदर्शन वर सुब्रमणियम
सुदर्शन वर सुब्रमणियम स्वामींनी पीके बद्दल गौप्यस्फोट केलाय. पीकेचं प्रमोशन ज्या ARY चॅनेल वर झालं त्या चॅनेलचा मालक याकूब म्हणून कुणी आहे तो दाउद इब्राहीमचा साथीदार होता. त्याने अतिरेक्यांसाठी काम केलं आहे. त्याला ब्रिटन, फ्रान्समधून हाकलून देण्यात आलेलं आहे. वॉशिंग्टन पोस्टमधे त्याच्याबद्दल पूर्वी एक आर्टिकल पण आलं होतं. या याकूब ने भारतात दोन चॅनेल्स खरेदी करण्याचा किंवा न जमल्यास त्यावर विशिष्ट टाईमस्लॉट खरेदी करण्याचा प्रयत्न चालवला होता. पण RAW ने त्याला आडकाठी केली. RAW वर सरकारी नियंत्रण नसतं. हा याकूब दाऊद बरोबर सुरुवातीला खंडणीच्या गुन्ह्यात होता. नंतर अवैध शस्त्रं आणि इतर सर्व काळे धंदे यातून जे पैसे मिळाले त्यातून त्याने इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रवेश केला. या वाहीनीवर पीकेच्या संपूर्ण टीमने चित्रपटाचं प्रमोशन करणं हे खटकण्यासारखंच आहे. यात खरंच षडयंत्र तर नाही ना याची खात्री व्हायला हवी.
. RAW वर सरकारी नियंत्रण
. RAW वर सरकारी नियंत्रण नसतं. >> मग काय ओबामाचे असते? कैच्याकै उथळपणा
(No subject)
स्वामी असं म्हणाले की रॉ ही
स्वामी असं म्हणाले की रॉ ही सरकारी हस्तक्षेपाच्या पलिकडची संस्था आहे. जर आयबी असती तर चिदंबरम साहेबांनी ताबडतोब परवानगी द्यायलालावली असती.
मी राजकीय विचारसरणीच्या बाबतीत तटस्थ आहे. पण स्वामींचे आरोप गंभीर आहेत असं मला वाटतं.
या आधी टिंगला झाली म्हणून
या आधी टिंगला झाली म्हणून बाजूला झाले होते. सर्वांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या श्लोकात मिळतील असा आशावाद वाटतो.
आपल्या पूर्वजांना विमानविद्या अवगत होती यावर काही शंकेखोर जंतु वितंडवाद घालत आहेत. पण लब्धपुराणातील खालील श्लोकावरून त्यांना अणू, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, या सर्व गोष्टींचं ज्ञान तर होतंच पण विश्वउत्पत्तीचा सिद्धांतही त्यांना ठाऊक होता हे दिसून येईल. श्लोक असा आहे:
“कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती
करमूले तु गोविंदं, प्रभाते करदर्शनं”
कणाद ऋषीने अणूचा शोध लावल्यानंतर त्याचा शिष्य कराद याने अणूचे गुणधर्म शोधून काढले. त्यामुळे अणूंना ‘कर’ असं नाव मिळालं. ‘कराग्रे’ म्हणजे कराच्या अग्रभागी. अणूंच्या टोकाला. अणूंच्या सर्वात बाहेर इलेक्ट्रॉन्स असतात. ते चंचल असतात. एका जागी स्थिर असत नाहीत. एकाच वेळी त्यांची स्थिती आणि वेग अचूक मोजता येत नाही हे हायझेनबर्ग यानं दाखवून दिलेलंच आहे. लक्ष्मी चंचल असते. म्हणून ती इलेक्ट्रॉन्सचं प्रतीक आहे. ‘कराग्रे वसते लक्ष्मी’चा अर्थ अणूंच्या टोकाला इलेक्ट्रॉन्स वसत असतात.
अणूगर्भात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. त्यांना एकत्र ठेवण्याचं काम ग्लूऑन्स करतात. ग्लू म्हणजे सरस. ते सरसाप्रमाणे त्यांना चिकटवून ठेवतात. म्हणून सरस्वती (सरस-वती) म्हणजेच ग्लूऑन्स. तेव्हा ‘करमध्ये सरस्वती’चा अर्थ अणुकेंद्रात ग्लूऑन्स असतात.
गोविंद म्हणजे कृष्ण. कृष्ण हा बहुरूपी आहे. सर्वसंचारी आहे. ऊर्ध्व दिशेला(up) – अधर दिशेला किंवा खाली(down), तळाशी(bottom) – वर(top) सर्वत्र असतो. तो विलक्षण(strange) आहे. मोहन आहे. सर्वांना मोहवणारा(charm करणारा) आहे. आता up, down, bottom, top, strange, charm हे कशाचे वर्णन आहे ते सर्व जाणतात. ते क्वार्क्सचं वर्णन आहे. तेव्हा गोविंद म्हणजे क्वार्क्स हे कुणालाही मान्य व्हावे. सर्व एलिमेंटरी पार्टिकल्स क्वार्क्सची बनली आहेत असं आजचं विज्ञान सांगतं. म्हणून ‘करमूलेतु गोविंदम’. सर्व अणूंच्या मुळाशी क्वार्क्स आहेत.
प्रभाते म्हणजे पहाटे असा संकुचित अर्थ घेण्याचं कारण नाही. पहाटे म्हणजे विश्वाची पहाट होताना. Big bangच्या वेळी. त्या वेळी सर्व अणूंचा जन्म झाला. म्हणजेच अणूंचे दर्शन झाले. अर्थात ‘प्रभाते करदर्शनं’
या वरून आपल्या पूर्वजांना अणू, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, ग्लूऑन्स, क्वार्क्स या सर्व गोष्टींचं ज्ञान तर होतंच पण विश्वउत्पत्तीच्या सिद्धांताचं ज्ञानही होतं हे सिद्ध होतं.
केतकीच्या बनी .. सुमन
केतकीच्या बनी .. सुमन कल्याणपुर
सरस वती !
सरस वती !
इथ इथ बस बस मोरा चार खा पाणी
इथ इथ बस बस मोरा
चार खा पाणी पी
अन भूर उडून जा ……..”
लब्धपुराण??? तुम्हाला सापडलय
लब्धपुराण??? तुम्हाला सापडलय का? खालच्या लिस्ट मध्ये तर नाहीये:
http://en.wikipedia.org/wiki/Puranas#Texts
जळालका नालंदामध्ये?
सुरेखाबाई, कसलं दूरदर्शी गाणं
सुरेखाबाई,
कसलं दूरदर्शी गाणं लिहिलंत.
हे गाणं म्हणजे हिंदुस्तान मार्स मिशन करणार याची आपल्या पूर्वजांना असलेली दूरदृष्टी आहे.
जी पिढ्यानपिढ्या या गाण्यातर्फे हिंदवी जनमानसावर ठसवण्यात आली आहे.
इ- इस्रो
थे- थेरुवनंतपूरम
इथे इथे म्हणजे इस्रो थेरुवनंतपूरममध्ये
बस रे मोरा - मार्स मिशनचे रॉकेट
बाळ घालतो चारा- हिंदुस्तानच्या जनतेचा लाडका सुपुत्र फंडींग करेल (अर्थात या शतकातला सुपुत्र कोण ओळखायला कष्ट पडू नयेत. तोच जो मिशन सक्सेसफुल होताच सगळ्या चित्रांत रॉकेटपेक्षा जास्त झळकला)
चारा खा पाणी पी आणि भूर्र उडून जा- फंडींग घे, लिक्विड फ्यूएल वापर आणि मंगळावर उडून जा.
(No subject)
बाळ बुध्दी
बाळ बुध्दी
जरुर
जरुर वाचा....
http://www.lokmat.com/storypage.php?catid=29&newsid=1298
पुन्हा काळा कापूसच. दृष्टी
पुन्हा काळा कापूसच. दृष्टी साफ असेल तर शुभ्र कापूस पांढराच दिसेल.
दृष्टी साफ असेल तर शुभ्र
दृष्टी साफ असेल तर शुभ्र कापूस पांढराच दिसेल. >> पहिल्या प्रतिसादा पासुन सगळे मायबोलीकर तुम्हाला तेच सांगत आहेत. तुम्हाला कळल तर ना
चक्रम एकदम चाबुक पोस्ट
चक्रम एकदम चाबुक पोस्ट
तं तै good night
तं तै good night
श्रद्धा आणि अंधश्रद्धांचा
श्रद्धा आणि अंधश्रद्धांचा लेखाजोखा येथे वाचता येईल.
http://suryakant-palaskar.blogspot.in/2013/09/blog-post_1283.html
छे बुवा! हल्ली लोकांना
छे बुवा! हल्ली लोकांना अध्यात्माची आवड च राहीली नाही
धागा झोपला वाटत!
धागा झोपला वाटत!
उषःकाल होता होता काळरात्र
उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा लेखणीच्या पेटवा मशाली.
प्राचीन भारतातील
प्राचीन भारतातील विमानोड्डाणासंबधी -
http://epaper.loksatta.com/c/4253082
http://epaper.loksatta.com/c/4252754
झाकण लागलं बॉ एकदाचं
झाकण लागलं बॉ एकदाचं
चालू आहे की
चालू आहे की
माफ करा जमलं नाही यायला इकडे.
माफ करा जमलं नाही यायला इकडे. प्रवासात होते.
काही हरकत नाही. ही चळवळ पुढे
काही हरकत नाही.
ही चळवळ पुढे नेण्यास आता हजारो वीर तयार झालेले आहेत.
इथे हाताच्या एका पंजाच्या
इथे हाताच्या एका पंजाच्या बोटांच्या संख्येच्या निम्म्याने असणा-या सदस्यांच्या आणि त्यांच्या भासमान प्रतिमांच्या पोस्टींनी काय फरक पडणार आहे ? देशाने काय निकाल दिला आणि वारंवार देतो आहे ते पुरेसं आहे असं मला वाटतं.
बेफिकीर
बेफिकीर
Pages