- एक जुडी मेथी
- शिजवलेली तूरडाळ / घट्ट वरण; पाउण ते एक वाटी
- तेल
- मोहोरी
- हळद
- हिंग
- ७/८ लसणीच्या पाकळ्या
- २/३ सुक्या लाल मिरच्या
> मेथी नीट निवडून, धूवून, चिरून घ्यावी
> थेंबभर तेल तापवावं, त्यात २ मोहोरिचे दाणे, हळद घालावी. मग मेथी घालून परतावं. झाकण घालून वाफ आणावी.
> मीठ घालावं. पाणी जरा आळू द्यावं.
> मग शिजलेलं वरण घालावं. तिखट हवं असेल तर आता थोडसं लाल तिखट घालावं (तिखट मसाला नको) नीट मिक्स करावं.
> ही भाजी तयार आहे.
> लहान कढल्यात तेल तापवावं, एक ते दीड पळी. मोहोरे घालावी. मग त्यात लसूण पाकळ्या ठेचून घालाव्यात. लालसर होऊ द्याव्यात. लाल मिरच्यांचे तुकडे घालावेत, हिंग घालावा अन ही चरचरीत फोडणी भाजीवर घालावी.
> गरम भाजी, फुलके, भाकरी बरोबर खावी
> सकाळी केलेली भाजी उरली तर संध्याकाळी पाणी घालून पातळसर वरण करावं, गरम, वाफाळत्या भातबरोबर मस्त लागतं.
#####
या प्रमाणातली भाजी २/३ लोकांना एकावेळेसच्या जेवणाकरता, बाकी मेन्यू असेल तर भरपूर होईल.
फार काही खास कृती नाही; बेसन लावण्या ऐवजी वरण लावलं इतकाच काय तो फरक. भाजी दिसायला मात्र छान हिरवी-पिवळी दिसते. लसूण मात्र नीट लाल तळला गेला पाहीजे. काही लोक यात तांदूळाच्या कण्याही घालतात. का ते माहीती नाही; बहुधा क्वांटीटी वाढवायला करत असावेत.
हा फोटू -
मंजु दाण्याची पेंड म्हणजे काय
मंजु दाण्याची पेंड म्हणजे काय ग? ती कुठे मिळते? याचे लाडू कसे करतात?
पेंड म्हणजे काय ? जनावरांच्या
पेंड म्हणजे काय ? जनावरांच्या खाउ ला पेंड म्हणतात असे ऐकुन आहे.
बहुदा तेल काढल्यावर राहिलेला
बहुदा तेल काढल्यावर राहिलेला भ्सा ( ) म्हणजे पेंड.
योकु, फोटोत तर पातळभाजी
योकु, फोटोत तर पातळभाजी दिसतेय.. गोळाभाजी कुठेय?
पेंड म्हणजे जुडी... पालेभाजीच्या जुडीला पेंडही म्हणतात.
दाण्यची पेंड म्हणजे नक्की काय ते मंजूच सांगतील.
मंजू, तुझं निरिक्षण बारीक हो!
मंजू, तुझं निरिक्षण बारीक हो!
अगं काही नाही, जरा भाताबरोबरही खाता यावी म्हणून जरासं पाणी घालून सरसरीत ठेवलेली मी...
तेल काढल्यावर दाण्याचे जे ऑइल
तेल काढल्यावर दाण्याचे जे ऑइल केक उरते त्याला पेंड म्हणतात.
पेंड जनावएआना घालतात.
पेंडेच्या पोत्यात एकदा एकजण गांजा लपवुन ठेवतो. ती पेंड काही मुले , मास्तर व इतर लोक खातात अशी दमा मिरासदारांची एक विनोदी गोष्ट आहे ना ?
http://en.m.wikipedia.org/wiki/Press_cake
पालेभाजीच्या जुडीला पेंडी
पालेभाजीच्या जुडीला पेंडी म्हणतात
योकू, येअन्याय है. गोळाभाजी
योकू, येअन्याय है. गोळाभाजी म्हणून इतकं मस्त वाटून तू पातळभाजीचा फोटो डकवून जमिनीवर आणलस. त्यात पण टप्पोरी मोहोरी घातल्येस :(. नो. परत कर-हादड आणि टाक फोटो. वर घातलेली लसणाची फोडणी नीट दिसली पाहिजे असा फोटो काढ.
मेथी आणि ही भाजी एकदम आवडते ते सांगायला नकोच.
पुढल्यावेळी लसूण पण थोडा आणखी
पुढल्यावेळी लसूण पण थोडा आणखी तळला तर चालेल
(योकु, हे असे सल्ले देणार्यांना काय म्हणायचं माहिती आहे ना? :फिदी:)
योकु, मस्तं रेस्पी! >>जरा
योकु, मस्तं रेस्पी!
>>जरा भाताबरोबरही खाता यावी म्हणून जरासं पाणी घालून सरसरीत ठेवलेली मी...
हे सकाळाच्या गोळ्याचं डिनर व्हर्जन आहे का? नसेल तर हा फाउल धरण्यात यावा. 'आमच्यात असंच करतात. यालाच (वाटीत) गोळा केलेली भाजी म्हणून गोळाभाजी म्हणायचं' असं बाणेदार्पणे सांगण्याऐवजी हे असं काय?
मे करते हे मेथी आणि पालक
मे करते हे मेथी आणि पालक मंडळींच.
बाकी माझं माहेर पण सीमंतिनी आणि बस्के च्या माहेराला ममं म्हणतं पालेभाजी आणि डाळी/वरणं बाबत...
(No subject)
अमितव, हादडल्यावर फोटो कशाचा
अमितव, हादडल्यावर फोटो कशाचा काढणार?
योकु, मॄण + १०० बरं का
आधी फोटो काढ रे, भलते फोटो
आधी फोटो काढ रे, भलते फोटो डकवशील.
(No subject)
Pages