मेथीची गोळाभाजी

Submitted by योकु on 8 January, 2015 - 13:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- एक जुडी मेथी
- शिजवलेली तूरडाळ / घट्ट वरण; पाउण ते एक वाटी
- तेल
- मोहोरी
- हळद
- हिंग
- ७/८ लसणीच्या पाकळ्या
- २/३ सुक्या लाल मिरच्या

क्रमवार पाककृती: 

> मेथी नीट निवडून, धूवून, चिरून घ्यावी
> थेंबभर तेल तापवावं, त्यात २ मोहोरिचे दाणे, हळद घालावी. मग मेथी घालून परतावं. झाकण घालून वाफ आणावी.
> मीठ घालावं. पाणी जरा आळू द्यावं.
> मग शिजलेलं वरण घालावं. तिखट हवं असेल तर आता थोडसं लाल तिखट घालावं (तिखट मसाला नको) नीट मिक्स करावं.
> ही भाजी तयार आहे.
> लहान कढल्यात तेल तापवावं, एक ते दीड पळी. मोहोरे घालावी. मग त्यात लसूण पाकळ्या ठेचून घालाव्यात. लालसर होऊ द्याव्यात. लाल मिरच्यांचे तुकडे घालावेत, हिंग घालावा अन ही चरचरीत फोडणी भाजीवर घालावी.
> गरम भाजी, फुलके, भाकरी बरोबर खावी Happy
> सकाळी केलेली भाजी उरली तर संध्याकाळी पाणी घालून पातळसर वरण करावं, गरम, वाफाळत्या भातबरोबर मस्त लागतं.

#####
या प्रमाणातली भाजी २/३ लोकांना एकावेळेसच्या जेवणाकरता, बाकी मेन्यू असेल तर भरपूर होईल.

फार काही खास कृती नाही; बेसन लावण्या ऐवजी वरण लावलं इतकाच काय तो फरक. भाजी दिसायला मात्र छान हिरवी-पिवळी दिसते. लसूण मात्र नीट लाल तळला गेला पाहीजे. काही लोक यात तांदूळाच्या कण्याही घालतात. का ते माहीती नाही; बहुधा क्वांटीटी वाढवायला करत असावेत.

हा फोटू -

IMG_0041.jpg

वाढणी/प्रमाण: 
लागेल तसं
माहितीचा स्रोत: 
आजी
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योकु, फोटोत तर पातळभाजी दिसतेय.. गोळाभाजी कुठेय?

पेंड म्हणजे जुडी... पालेभाजीच्या जुडीला पेंडही म्हणतात.
दाण्यची पेंड म्हणजे नक्की काय ते मंजूच सांगतील.

मंजू, तुझं निरिक्षण बारीक हो! Wink
अगं काही नाही, जरा भाताबरोबरही खाता यावी म्हणून जरासं पाणी घालून सरसरीत ठेवलेली मी...

तेल काढल्यावर दाण्याचे जे ऑइल केक उरते त्याला पेंड म्हणतात.

पेंड जनावएआना घालतात.

पेंडेच्या पोत्यात एकदा एकजण गांजा लपवुन ठेवतो. ती पेंड काही मुले , मास्तर व इतर लोक खातात अशी दमा मिरासदारांची एक विनोदी गोष्ट आहे ना ?

http://en.m.wikipedia.org/wiki/Press_cake

योकू, येअन्याय है. गोळाभाजी म्हणून इतकं मस्त वाटून तू पातळभाजीचा फोटो डकवून जमिनीवर आणलस. त्यात पण टप्पोरी मोहोरी घातल्येस :(. नो. परत कर-हादड आणि टाक फोटो. वर घातलेली लसणाची फोडणी नीट दिसली पाहिजे असा फोटो काढ. Happy
मेथी आणि ही भाजी एकदम आवडते ते सांगायला नकोच. Happy

पुढल्यावेळी लसूण पण थोडा आणखी तळला तर चालेल Happy

(योकु, हे असे सल्ले देणार्‍यांना काय म्हणायचं माहिती आहे ना? :फिदी:)

योकु, मस्तं रेस्पी!

>>जरा भाताबरोबरही खाता यावी म्हणून जरासं पाणी घालून सरसरीत ठेवलेली मी...
हे सकाळाच्या गोळ्याचं डिनर व्हर्जन आहे का? Proud नसेल तर हा फाउल धरण्यात यावा. 'आमच्यात असंच करतात. यालाच (वाटीत) गोळा केलेली भाजी म्हणून गोळाभाजी म्हणायचं' असं बाणेदार्पणे सांगण्याऐवजी हे असं काय? Proud

मे करते हे मेथी आणि पालक मंडळींच.
बाकी माझं माहेर पण सीमंतिनी आणि बस्के च्या माहेराला ममं म्हणतं पालेभाजी आणि डाळी/वरणं बाबत...

Pages