- एक जुडी मेथी
- शिजवलेली तूरडाळ / घट्ट वरण; पाउण ते एक वाटी
- तेल
- मोहोरी
- हळद
- हिंग
- ७/८ लसणीच्या पाकळ्या
- २/३ सुक्या लाल मिरच्या
> मेथी नीट निवडून, धूवून, चिरून घ्यावी
> थेंबभर तेल तापवावं, त्यात २ मोहोरिचे दाणे, हळद घालावी. मग मेथी घालून परतावं. झाकण घालून वाफ आणावी.
> मीठ घालावं. पाणी जरा आळू द्यावं.
> मग शिजलेलं वरण घालावं. तिखट हवं असेल तर आता थोडसं लाल तिखट घालावं (तिखट मसाला नको) नीट मिक्स करावं.
> ही भाजी तयार आहे.
> लहान कढल्यात तेल तापवावं, एक ते दीड पळी. मोहोरे घालावी. मग त्यात लसूण पाकळ्या ठेचून घालाव्यात. लालसर होऊ द्याव्यात. लाल मिरच्यांचे तुकडे घालावेत, हिंग घालावा अन ही चरचरीत फोडणी भाजीवर घालावी.
> गरम भाजी, फुलके, भाकरी बरोबर खावी
> सकाळी केलेली भाजी उरली तर संध्याकाळी पाणी घालून पातळसर वरण करावं, गरम, वाफाळत्या भातबरोबर मस्त लागतं.
#####
या प्रमाणातली भाजी २/३ लोकांना एकावेळेसच्या जेवणाकरता, बाकी मेन्यू असेल तर भरपूर होईल.
फार काही खास कृती नाही; बेसन लावण्या ऐवजी वरण लावलं इतकाच काय तो फरक. भाजी दिसायला मात्र छान हिरवी-पिवळी दिसते. लसूण मात्र नीट लाल तळला गेला पाहीजे. काही लोक यात तांदूळाच्या कण्याही घालतात. का ते माहीती नाही; बहुधा क्वांटीटी वाढवायला करत असावेत.
हा फोटू -
अख्खे तांदूळ घातले तरी चालते.
अख्खे तांदूळ घातले तरी चालते. पण खूप शिजवावे लागते. म्हणजे एकजीव होऊन भाजी मिळुन येते.. डाळ तांदूळ फुगुन भाजीही प्रचंड प्रमाणात होते. चपाती कमी आणि भाजी जास्त करुन संपते
मी जनरली मेथी धुवून, चिरून
मी जनरली मेथी धुवून, चिरून कुकरला लावते. त्याचवेळी तूरडाळ, तांदूळ आणि मेथीदाणेही घालते. शिट्टी पडल्यावर गरम असतानाच थोडं डाळीचं पीठ लागून मग फोडणी बिडणी सोपस्कार.
सायो, मी तुझ्यापद्धतीनी
सायो, मी तुझ्यापद्धतीनी पालकाची भाजी करतो. आता मेथीची करून पाहीन. जरा सोपी पडेल
लसणाच्या फोडणीचं वर्णन
लसणाच्या फोडणीचं वर्णन तोंपासु आहे. डाळमेथी हा प्रकार अत्यंत आवडता असल्याने या पद्धतीने करून बघेन नक्की.
सायो, आम्ही पण डाळ आणि मेथी एकत्र कूकरला शिजवून घेतो मात्र मेथीदाणे किंवा तांदळाची कणी घालत नाही.
आम्ही पण!
आम्ही पण!
सिंडी, मेथीदाणे आणि तांदळाची
सिंडी, मेथीदाणे आणि तांदळाची कणी डाळ आणि मेथीबरोबर एकत्र न शिजवण्यामागे काही कारण आहे की सहजच?
अगं म्हणजे कण्या न घालता करते
अगं म्हणजे कण्या न घालता करते ती भाजी.
मीही नाही घालत कण्या. अंबाडीतही नाही.
बाकी डाळ घालायची तर अशीच करते. अशीच पालकाचीही किंवा पालकमेथी मिक्सही.
हो, बाई म्हणतात तसं मी फक्त
हो, बाई म्हणतात तसं मी फक्त डाळ आणि मेथी एवढंच शिजवून घेते. डाळीचं पीठ पण नाही लावत.
रच्याकने, डाळ-मेथी तुरीऐवजी मसुराच्या डाळीत केली तर लवकर शिजते आणि अॅसिडिटीचा त्रास होत नाही.
ओके, माझा गोंधळ झाला वाचताना
ओके, माझा गोंधळ झाला वाचताना किंवा तू मेथी+ कण्या वेगळ्या शिजवतेस असा समज करून घेतला.
माझी आई मेथीच्या भाजीत फक्त
माझी आई मेथीच्या भाजीत फक्त बेसन लावून गोळाभाजी करते. वरून फोडणी वगैरे तसंच. पण बाकी काही घालत नाही, लागतही नाही. मी तिच्यासारखीच करते अर्थात. मी तर मेथी आधी शिजवूनही घेत नाही. इतकं काही कडू लागत नाही, शिवाय गूळ असतो त्यामुळे छान चव येते. खाताना वरून घातलेल्या फोडणीतला कुरकुरीत लसूण आला की कसलं भारी वाटतं!
ती पीठ पेरून भाजी ना?
ती पीठ पेरून भाजी ना? मिनोतीचं मेथीचं पिठलं नावाने फेमस झालेली.
कोरडी नाही. म्हणजे कोरडी पण
कोरडी नाही. म्हणजे कोरडी पण करता येते. पण ही वर लिहीली त्याची कन्सिस्टन्सी वेगळी. आईतरी त्यालाच गोळाभाजी म्हणते. आमच्याकडे माहेरी फॉर सम रिझन पालेभाज्यांत वरण घालून नाही करत. पालेभाज्यांच्या वेगळ्या रेसीप्या, वरण आमट्या वेगळ्या.
मूळ रेसीपीवर सगळं अवांतरच टाईप करतेय मी तर. योकु, अशीही करून बघेन. चांगलीच लागेल.
ओके ओके.
ओके ओके.
आमच्याकडे माहेरी फॉर सम रिझन
आमच्याकडे माहेरी फॉर सम रिझन पालेभाज्यांत वरण घालून नाही करत. >> +१०० सासर माहेर सर्व जागी पालेभाजी वेगळी, आमटी वेगळी. आमच्याकडे फक्त टीव्हीत संजीव कपूर असा वागतो. तो असल काही करायला लागला की आजी चॅनेल बदलून टाकायची
योकू करून बघेन. (एकटी असेन तेव्हा.)
वा मस्त! मी यात भिजवलेले
वा मस्त!
मी यात भिजवलेले शेंगदाणे शिजवून घालते. फारच मस्त लागतात.
धन्यवाद लोक्स! बर्याच
धन्यवाद लोक्स!
बर्याच वेरीएशन्स मिळाल्यात की वर! आता पाहीन करून
मंजूडी, मी ताकातल्या पालकात
मंजूडी, मी ताकातल्या पालकात घालते शेंगदाणे. मस्त लागतात.
हो! ताकातल्या भाजीला ह.डाळ
हो! ताकातल्या भाजीला ह.डाळ शेंगदाणे हवेच.
हो वरील सर्व प्रकार छान
हो वरील सर्व प्रकार छान होतात, पण तुरीच्या डाळीशी मेथीचे एक क्लासिक नाते आहे... फारच मस्त होते ही गोळाभाजी...याकू--धन्स
मी पुन्हा ते 'हडळ' वाचलं...
मी पुन्हा ते 'हडळ' वाचलं...
सिमंतीनी नक्की काय कारण आहे
सिमंतीनी नक्की काय कारण आहे भाजी वरण एकत्र न करण्याचे?
मला ही गोळाभाजी ऐवजी डाळभाजी वाटते आहे.
छान. मी पण करते अशीच. मला
छान. मी पण करते अशीच. मला दाण्याची पेंड/ढेप मिळाली, ती घालून केली. अप्रतीम लागते.
फारच तोंपासु भाजी
फारच तोंपासु भाजी
दाण्याची पेंड ? ती म्हशीला
दाण्याची पेंड ? ती म्हशीला घालतात ना ?
हो, काउ. त्याचे लाडूही मस्त
हो, काउ. त्याचे लाडूही मस्त लागतात.
मस्त प्रकार.. आमच्या घरीपण
मस्त प्रकार.. आमच्या घरीपण थोडे तांदूळ घालून करतात. मिळून येते भाजी.
वा योकु! छान दिसतेय भाजी.
वा योकु! छान दिसतेय भाजी. माझी सेम रेसिपी आहे
आमच्याकडे सुद्धा ढेप मिळते पण
आमच्याकडे सुद्धा ढेप मिळते पण ती माणसेही खातात हे माहिती नव्हते.
मी तुर डाळे च्या ऐवजी मुग
मी तुर डाळे च्या ऐवजी मुग डाळ (साल असलेली) वापरते..
तांदुळ कधी टाकुन पाहिले नाहित आता करते..
फोडणी करतांना लसुण , मिरची सोबत शेंगादाणे ( आधी शेंगादाणे, मग मिरची आणि मग लसुण) पण टाकावे .. मस्त खरपुस लागतात
मस्तच....मी पण अशीच करते डाळ
मस्तच....मी पण अशीच करते डाळ मेथी....
कधी कधी मूग डाळ वापरते.... पीत्ताचा त्रास होत नाही....फ़ोटो कमाल...बघुनच तोंपासु
Pages