डिसेंबर महीना असल्यामुळे आणि ब-याच रजा शिल्लक असल्यामुळे वर्षाच्या शेवटी सुट्टी काढायच निश्चित केला होत... त्यातच नेमकी गावची यात्रा पण 28-29डिसेंबरला असल्यामुळे मग लगेच प्लॅन निश्चित केला शनिवारी सकाळी लवकर निघालो...मजल दर मजल करत आखेर रात्री सात पर्यंत गावी पोहचलो.
दुस-या दिवशीच गावच्या खंडोबा देवाची यात्रा होती, या वेळी गावच्या यात्रेला खास महत्व होत कारण मंदीराचा जिर्णोध्दार करण्यात आला असून जवळ-जवळ एक कोटी रूपये खर्च करून नवीन मंदीर बांधण्यात आले आहे,तसेच मंदीर परिसराच्या विकासाचे काम प्रगतिपथावर आहे.
प्रचि 01:- गावचे मंदीर.....
खंडोबा देवाच्या यात्रेला पहिल्या दिवस पुरण-पोळीचा नैवद्य असतो. दुपार नंतर संपूर्ण गावातील लोक तसेच पै-पाहूणे मंदीर परीसरात जमायला सुरवात होते.
प्रचि 02:---
गावच्या पुजारकीचा मान ज्या घरी असतो त्याच्या घरी एक मोठी काठी घटस्थापने पासून उभी केलेली असते तिच्या टोकाला मोराची पिसे बांधून कापड गुंडाळून, नारळाची तोरणे बांधून सजविण्यात आलेली असते तिला "सासणकाठी" म्हणतात.
प्रचि 03:- पुजा-याच्या घरी उभा केलेली सासणकाठी.....
चार वाजल्यानंतर सासणकाठी तसेच पालखित देवाची स्थापना करून पुजा-याच्या घरातून मंदीराकडे ढोलताशाच्या गजरात देवळाकडे आणली जाते.प्रथम ती आडवीच आणली जाते,पण मंदीर परिसरात आली की ती उभी करून ती उचलण्याचा मान असणा-यांन किंवा ज्यांची इच्छा असेल त्यांनी ती खांद्यावर उचलून मंदीराची प्रक्षिणा पुर्ण करावयाची असते.
प्रचि 04:----
प्रचि 05:----
प्रचि 06:----
प्रचि 07:----
मंदीराच्या समोर सासणकाठी आली कि देवाची आणि तिची भेट घडवून आणली जाते.
प्रचि 08:----
प्रचि 09:----
सासणकाठीची मंदीराला प्रदक्षिणा पुर्ण झाली का काठी गावच्या चावडीच्या मैदानात रोवली जाते दुस-या दिवशी रात्री "लंगर"(प्रचि 07 मध्ये काठी समोर दिसतोय तो साखळदंड) तोडण्याचा कार्यक्रम असतो. संध्याकाळपासून पारपारिक गजीनृत्य, धनगरी ओव्या व नंतर वाघ्या-मुरळीचा कार्यक्रम असतो व रात्री बारा नंतर लंगर तोडण्याचा कार्यक्रम असतो, वाघ्या प्रचि07 मध्ये दिसतोय तो साखळदंड हाताने आडटून हिसका देऊन तोडतो..... तो किती क्रमांकाच्या कडीवर तुटतो त्यानुसार पुढील वर्ष कसे जाणार या बाबत अंदाज वर्तविण्यात येतात.
प्रचि 10:--पारंपारीक गजी नृत्य.....
वरचे सगळे देवाचे कार्यक्रम होण्यापुर्वी सकाळच्या सत्रात लोकांचच्या मनोरंजनासाठी सर्व यात्रांप्रमाणे तमाशा, धावण्याच्या स्पर्धा वगैरे कार्यक्रम असतात...पण या सर्वात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे बैलगाडी शर्यत............
प्रचि 11:--- धावाधाव चालू ---
प्रचि 12:- चुरस.......
प्रचि 13:- मिच जिंकणार.........
प्रचि 14:-.........
प्रचि 15:- जय मल्हार....
छान आलेत फोटो..
छान आलेत फोटो..
सगळेच फोटो मस्तच!! कुठल्या
सगळेच फोटो मस्तच!!
कुठल्या गावची यात्रा?
कुठल्या गावची यात्रा? यात्रा
कुठल्या गावची यात्रा?
यात्रा मस्त.
फोटो मस्तच.....
फोटो मस्तच.....
छान!
छान!
मस्त आहे यात्रा तुमची अशीच
मस्त आहे यात्रा तुमची अशीच यात्रा माझ्या गावी पण भरते महाशिवरात्रीला .
मस्त फोटो.. मला पण तेच
मस्त फोटो.. मला पण तेच विचारयचे आहे, गाव कुठलं ? ते मुख्य लेखातच लिहा.
मस्त आहे यात्रा आणि
मस्त आहे यात्रा आणि फोटोही.
गाव कुठलं ते तर लिहाच पण साखळदंड तोडतानाचा फोटो असल्यास तो पण टाका