सत्तेत आल्यावर आम्ही टोल बंद करू , खारघर टोल नाका कदापि चालू होऊ देणार नाही इ . आश्वासने देऊन निवडून आलेल्या भाजपा ( सेना ) सरकारने आज अखेर खारघर टोल नाका चालू केला . टोलनाक्याच्या पलीकडील ५ गावाना ( पनवेल, कळंबोली, कामोठे, कोपरा , खारघर ) सूट मिळणार असे कळते . मग अलीकडील गावाना ( सीबीडी, नेरूळ , उलवे) सूट का नाही दिली जाणार हा अनुत्तरीत प्रश्ण . असो आम्ही स्वत: सीबीडी बेलापूरला रहात असल्याने , आमच्या दृष्टीने हा टोल कसा बायपास करता येईल याचा विचार करता काही नवीन मार्ग सुचला तो असा .
खारघरटोल नाका बायपास करण्याचा मार्ग …….
१) पुणे / पनवेल कडे जाणा-यांसाठी ……
या मार्गाने गेल्यास पैशाची बचत होणार नाही ( जेवढे टोलचे पैसे वाचवाल तेवढेच डिझेल / पेट्रोलसाठी खर्च होतील ) मात्र टोल नाक्यावरची लांबच लांब रांग रांग वाचून वेळेची बचत होण्याची शक्यता . मुख्य करून विकेंडला / लागून आलेल्या सुट्ट्यांच्या वेळी जेंव्हा पुण्या कडे जाण्यासाठी वाहनांचा ओघ वाढलेला असतो त्यावेळी अवश्य या मार्गाचा उपयोग करता येऊ शकेल . तसेच सुट्ट्यासंपून मुंबईला परताना रविवारी रात्री हा बायपास रोड वापरता येईल . परत एकदा हा बाय पास मार्ग पैसे वाचवण्यासाठॆ नसून वेळ वाचवण्यासाठी आहे याची नोंद घ्यावी
खारघर उड्डाणपुलावर न जाता खालच्या बाजूने जाऊन खारघर सर्कलला डावीकडे वळावे. तसेच सरळ प्रसिध्द उत्सव चौका पर्यंत जाऊन त्या चौकाला वळसा मारून उजवीकडे जाणे. हा रस्ता सेंट्रल पार्क / पांडवकडा येथून जातो . तेथून तसेच सरळ जाणे जो रोड तुम्हाला तळोजा ( पनवेल - कल्याण रोडला ) इथे आणून सोडेल . त्या ठिकाणी ( जिथे पनवेल - कल्याण रोड, या रोडला मिळतो ) उजवीकडे वळल्यास तुम्ही कळंबोली कडे येता आणि तिथून परत एक्स्प्रेस हायवेवर जाण्यासाठी डाव्या बाजूने रस्ता दिला आहे. या बायापासमुळे साधारण ७ ते ८ किमी अधिक प्रवास होऊ शकतो मात्र सुट्टीत टोलनाकयावर लागणा-या रांगेचा विचार करता वेळेत बचत मात्र होऊ शकते
२) पेण/ अलिबाग/ कोकणात जाण्यासाठी …।
सायन - पनवेल महामार्गावर नेरुळ गेल्यानंतर उरण फाट्याचा उड्डाणपूल न वापरात खालच्या बाजून जाऊन उजवीकडे उरणला जाण्यासाठी वळावे किंवा वाशीहून येत असाल तर पाम बीच रोड ने येऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या नवीन इमारतीपासून उजवीकडे वळावे. उरणला जाणारा हा रोड पनवेल - उरण रोडला मिळतो. तिथे उजव्या बाजूस वळावे आणि लगेचच काही मिटर अंतरावर चिरनेर गणपती कडे असा फलक दिसेल तिथे डावीकडे वळावे . हा रस्ता मोठी जुई , चिरनेर मार्ग तुम्हाला सरळ पनवेल - पेण रस्त्यावर कर्नाळा पाशी आणून सोडेल
हा रस्ता मात्र नक्कीच पैसे आणि वेळ यांची बचत करणारा आहे.
अधिक माहितीसाठी गुगल नकाशाचा वापर करता येईल
धन्यवाद
अमोल केळकर
ये तो सिर्फ झाकी
ये तो सिर्फ झाकी है...
असो.
नेहमीच्या टोलरहित प्रवासाला शुभेच्छा!
हा रस्ता मोठी जुई , चिरनेर
हा रस्ता मोठी जुई , चिरनेर मार्ग तुम्हाला सरळ पनवेल - पेण रस्त्यावर कर्नाळा पाशी आणून सोडेल >>> हा रस्ता पार साईगावा पर्यंत सुसाट केला आहे. फक्त हेवीलोड पासुन जपून रहावे लागते. साईगावला डावी कडे वळल्या वर खारपाडा टोळ पर्यंतच्या रस्तातील गतिरोधक वात आणतात.
पुणे मुंबई प्रवास करणार्या
पुणे मुंबई प्रवास करणार्या समस्त मोटारमालकांचे अभिनंदन!
टोल माफ करण्याकरीता मत दिलेच
टोल माफ करण्याकरीता मत दिलेच नव्हते
अशी कविता आलीच पाहिजे
विसरून गेले सगळे करायची टोल
विसरून गेले सगळे
करायची टोल मुक्ती
निवडणूक जिंकण्यापुरती
होती ती एक युक्ती
टोल परिसरात ६ किमी परिसरात
टोल परिसरात ६ किमी परिसरात राहणा-या लोकांना टोल भरावा लागणार नाही असा काही नविन नियम आहे का?
माझ्या ऑफिसातले लोक जे मुलुंड परिसरात राहतात ते ऐरोली टोल भरत नाहीत. ड्रायविंग लायसेन्सवरचा मुलुंडचा पत्ता दाखवला की विनाटोल गाडी नव्या मुंबईत आणता येते.
चिरनेर रोड मला माहित आहे, खुप निसर्गरम्य असा रस्ता आहे तो.
पण खारघर बायपास रोड माहित नव्हता. या रोडचा उप्योग टोल वाचवण्यापेक्षा वेळ वाचवण्यासाठी जास्त होईल.
व्हेईकल रजिस्ट्रेशन अॅड्रेस
व्हेईकल रजिस्ट्रेशन अॅड्रेस फ्री झोन मधला असेल तर व्हेईकल रजिस्ट्रेशन बुकची झेरॉक्स देउन व्हाईट पास बनतो.
कोणतेही कागदपत्र न दाखवता गाडी सोडली जाते.
जर व्हाईटपास नसेल तर व्हेईकल रजिस्ट्रेशन बुक दाखवाव लागत.
यात पास गाडीला मिळतो माणसाला नाही.
ok. pan he address free zone
ok. pan he address free zone chi list vagaire kuthe aahe kaa? aapla address free zone madhye aahe ke kase kalanaar? mihi belapupr laa raahate, khargharla nehmi jane aahe.
असा मेसेज व्हॉट्सअॅप वर
असा मेसेज व्हॉट्सअॅप वर फिरतोय खरा..
अरे हे मी मेसेजवरुन सांगत
अरे हे मी मेसेजवरुन सांगत नाहीय तर आजच मला मुलुंडच्या दोघा तिघांनी सांगितले की ते लायसेन्स दाखवुन टोल वाचवतात म्हणुन.
व्हॉटसअपच्या मेसेजवर कधी
व्हॉटसअपच्या मेसेजवर कधी विश्वास ठेवण्यात अर्थ नाही.
ते लायसेन्स दाखवुन टोल वाचवतात म्हणुन. >> हे मी पण खुप आधी ट्राय केले आहे. मात्र दरवेळी चालत नाही. त्यावेळी टोलनाक्यावर जो असेल त्याच्या मर्जीनुसार चालते. माझे घर टोलनाक्यापासुन एक किमी वर आहे. पण दोन तीन वेळाच फ्री जाता आले. एकदा कोणीतरी होता त्याने सांगितले की असा काही नियम नाही. रोज लायसन्स दाखवुन ही ' चालतं / नाही चालत' अशी झिगझिग करायची म्हणजे त्रासच. त्यामुळे सध्या टोल भरते राग जास्त अशासाठी की मुंबईत जातानाही टोल आणि मुंबईतुन परत बाहेर येतानाही टोल. जुलमाचा रामराम नुसता. ( अजुन एक माहिती अशी की नंबर प्लेट मराठीत असेल, नंबर प्लेटवर कुठलाही झेंडा असेल तर मग गाडी टोल न देता गेली तरी अडवत नाहीत )
महिन्याभरापूर्वी अशी बातमी आली होती की टोलनाक्यापासुन ५ किमीच्या आत घर असणार्यांना महिन्याला ३५० रु भरुन पास मिळेल असा नियम करणार आहेत. अजुन नियम झाला नाही.
व्हेईकल रजिस्ट्रेशन अॅड्रेस फ्री झोन मधला असेल तर व्हेईकल रजिस्ट्रेशन बुकची झेरॉक्स देउन व्हाईट पास बनतो. >> हा नियम कुठे आहे का? हा पास कुठे मिळतो?
फ्री झोनची माहीती टोल ऑफीसमधे
फ्री झोनची माहीती टोल ऑफीसमधे मिळते. टोल बुथवरच्या लोकांना पण माहीती असते पण ते कलेक्शनमधे बिझी असतात आणि तुम्हाला माहीती देईपर्यंत माघचे खोळंबतात त्यामुळ ते सांगत नाहीत. टोल ऑफीस बहुदा टोल बुथच्या शेजारीच असते.
मला तरी हार्ड कॉपी व्हाईट पास असा मिळालेला नाहीये. मी ३ वर्षापुर्वी कागदपत्र दिलेली आहेत. आणि टोलबुथवर व्हाईट पास सांगितल्यावर ते चेक करुन फक्त नाव विचारतात आणि गाडी सोडतात. त्या आधी व्हेईकल रजिस्ट्रेशन बुक दाखवायचो. मला नगर औरंगाबाद रोडवरच्या नगर नंतरच्या पहिल्या टोलवर ही सुविधा मिळालेली आहे. टोलनंतर लगेच माझे गाव आहे म्हनुन.
उळवे चिरनेर मार्ग
उळवे चिरनेर मार्ग .....
तीसर्या मुम्बैत स्वागत.
http://www.maayboli.com/node/51665
हा मार्गही आता आठ किंवा दहा पदरी होणार आहे.. त्यानंतर बहुतेक त्यावरही टोल बसेल.
http://m.youtube.com/watch?v=LzWtB1yxDcw
हा तोच खारघरचा टोलनाका आहे
हा तोच खारघरचा टोलनाका आहे ना? आता तर हे सत्तेवर आहेत मग आजवर वसुल केलेली रक्कम का बर जाहीर करत नाहीत ?
(No subject)