तिने पुन्हा एकदा टेबलवरच्या डायरीमधला तो कागदाचा चिटोरा उचलला. परत त्यावरच्या नंबरवरून नजर फिरवली. पुन्हा टेबलवर ठेवलेल्या मोबाइलवर नजर खिळली, पुन्हा मन do or do not मध्ये अडकले. मनातल्या मनात पुन्हा येऊ शकणारे सगळे reactions तपासून पाहिले. नजर शून्यात लागलेली … आज सकाळ पासून हे असंच चाललंय तिचं …… घरातल्या कुठल्याही कामात मनंच लागत नव्हतं.
नाही ! मानेला हलकासा झटका देत तंद्रीतून बाहेर पडत ती पुटपुटली
पुन्हा चिटोरा डायरीच्याआत ढकलला आणि उठली जागेवरून. चिटोरा ठेवला तरी त्यावरचा नंबर मनात उचंबळ्या खात होता. मनात विचारांचा घोळ चालूच होता. ती किचनच्या ओट्याजवळ आली, हंड्यातून पाणी काढून प्याल्यात ओतले आणि प्याला ओठांना लावत घटाघटा प्यायली, ग्लास ओट्यावर ठेवत वळली अन ओट्याला टेकून तशीच उभी राहिली…. विचारांची तंद्री पुन्हा … किती वेळ तिलाही कळालंच नाही.
सात वर्ष निघून गेलीत, कॉलेजचा तो दिवस अजूनही तसाच डोळ्यासमोर उभा राहायचा तिच्या,
ती नौकरी करायची, गरजच तशी होती. वडील नसलेल्या तिला घर चालवण्यासाठी, लहान भावाच्या शिक्षणासाठी आईची मदत करणं गरजेचं होतं. पण शिक्षण सोडायचं नव्हतं. खूप शिकावं हा ध्यासच होता तिचा.
त्या दिवशी अशीच डोळ्यात पाणी घेऊन मुसमुसत कॉलेजच्या ऑफिस मधून बाहेर पडली आणि अक्षयशी नजरानजर झाली. …पहिल्यांदाच …
क्लासमेट म्हणून एकमेकांना ओळखत होते पण यापूर्वी कधीही ते एकमेकांशी बोलले नव्हते. आणि आत्ता तो पुढ्यात उभा राहून तिला न्याहाळत होता. तिच्या पडलेल्या चेहेऱ्यावर काहीतरी शोधू पाहत होता. ती नजर चोरून वळून जाऊ पाहत होती पण तो आणखीच तिच्या पुढे आला त्याच्या नजरेने तिचे अश्रू हेरले होते …
तो "थांब, काय झालं ??"
तिनं 'काही नाही' असा मानेनेच नकार दिला
तो " hello, tell me what happen ? कोणी काही बोललं का तुला ?"
त्याच्या या शब्दांनी तिचे डोळे अधिकच वाहू लागले….
" एग्झामचा फॉर्म भरायला नाही म्हणताहेत सर, माझी प्रेझेंटी कमी पडतेय"
तो " असं कसं म्हणताहेत ? तू चल माझ्यासोबत " असं बोलून त्यानं हात धरला तिचा आणि घेऊन गेला परत ऑफिसमध्ये
अक्षयच्या बोलण्यात जादू होती कि सांगण्याची पद्धत तशी वेगळी कळालं नाही पण एग्झाम दिली तिने
त्यानंतरही त्यानं अनेकदा तिच्याशी असलेली मैत्री प्रत्येकवेळी निभावली तिच्या प्रत्येक अडचणीत तिला साथ दिली.
ती मात्र शेवटच्या क्षणापर्यंत कधीच त्याला बोलू शकली नाही मनात असूनही "माझा धरलेला हात सोडू नकोस रे, मला हवायेस तू "
आज सात वर्षांनी ती शोधतेय त्याला परत, त्याच्या आठवणीने व्याकूळ होतेय …. तो दिवस डोळ्यासमोर तरळतोय सारखा. आजही डोळ्यात अश्रू आहे तिच्या तीन वर्षाच्या बाळाला घेऊन व्यसनी नवऱ्याचा अत्याचार सहन करतेय ती …
पण तिचा हात धरून आणून नवऱ्या समोर उभे करून त्याला ठसक्यात जाब विचारणारा कोणीच नाहीये हि जाणीव प्रखर झाली होती गेल्या काही दिवसात ….
गुगल वरून त्याचा नंबर शोधून काढला होता तिनं काल रात्री …. आणि आज सकाळ पासून तिचा तिच्या मनावर ताबाच उरलेला नाही.
तंद्री तुटली तिनं पुन्हा इकडे तिकडे पाहीलं चेहेऱ्यावरून हात फिरवला …. घड्याळ १ वाजल्याचं दाखवत होतं . दीड वाजता मिलिंद जेवायला येईल त्या आधी एकदा बोलून घेऊया का अक्षयशी ?… तिचं मन पुन्हा आगतिक झालं
तिनं मोबाइल उचलला नंबर फिरवला ….
समोरून आवाज आला त्याचा "हेलो…येस्स ?"
ती सकपकली जरा, काहीवेळ स्तब्ध …निरव शांतता इकडेही अन तिकडेही …
ती 'अं सॉरी… च च चूकून लागला हो फोन ……' रीसिवर ठेवून दिला तिनं
तिच्या हृदयाचे ठोके प्रचंड गतीने वाजत होते 'हेलो…येस्स.' त्याचा आवाज कानात सारखा वाजत होता.
आपला आवाज ओळखला असेल का त्यानं ? छे छे !!
दोनंच मिनिट
दोनंच मिनिटात तिचा फोन पुन्हा वाजू लागला …वाजत राहिला अखंड
भरल्या डोळ्यानं तिनं पाचवा फोन उचलला … तोच ओळखीचा आवाज
" थांब! फोन ठेवू नकोस, काय झालं …. tell me what happen ? कोणी काही बोललं का तुला ?"
त्याच्या या शब्दांनी तिचे डोळे अधिकच वाहू लागले….
ती नुसतीच मुसमुसत राहिली मग काहीही न बोलता … !!
(No subject)
धन्यवाद सर्वांचे
धन्यवाद सर्वांचे
खूप सुंदर लिहील आहात... ''
खूप सुंदर लिहील आहात... '' बहुतेक " स्त्रियांच्या मनातल... खूपच आवडलं.. मोजक्याच शब्दात सार काही सांगून टाकलत.
भावविभोर लेखन. छान !
भावविभोर लेखन. छान !
Thnx Mayuri... Snehankit
Thnx Mayuri... Snehankit
मस्तच! भावना पोचल्या!! मलाही
मस्तच! भावना पोचल्या!!
मलाही आहे असं कुणीतरी "go to".
हे gender specific नसतं!
त्रास होत असला की अपण बरोबर त्या त्या व्यक्ती कडे मोकळे होतो!
फक्तं असं कुणी तरी असणं हे सगळ्यांचं नशीब नसतं! मग त्रास वाढतो! आणि मग सुसाईड!
फक्तं असं कुणी तरी असणं हे
फक्तं असं कुणी तरी असणं हे सगळ्यांचं नशीब नसतं! मग त्रास वाढतो! आणि मग सुसाईड!>>>>>>>>>>>>>. बापरे
मी असा विचारही केला नाही
मी असा विचारही केला नाही
छान आहे, आवडलं.
छान आहे, आवडलं.
डीविनिता .. धन्यवाद
डीविनिता .. धन्यवाद
रडु आले वाचुन... !
रडु आले वाचुन... !
आज परत वाचली आनी न कळत त्याच
आज परत वाचली आनी न कळत त्याच आठवनीत गुन्तले.
मयी छान आहे.
kirankasbe१५२९ .. awww
kirankasbe१५२९ .. awww
VAISHALI KARE thnks
VAISHALI KARE thnks
मस्तच...
मस्तच... आवडली.....
<<<<सगळ्यांच पाहता पाहता स्त्री स्वतःच्याच घरात कधी कधी एकटेपण फील करते. बरेचदा सगळ्यांसाठी ती असते पण तिच्यासाठी अस स्पेशल कुणी नसतं…. तिची काळजी करणारं, तिच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणारं. कधीतरी हि उणीव प्रकर्षाने डोकं वर काढते आणि मग एक पोकळी निर्माण होते ……>>> १०० टक्के अनुमोदन
गन्धं मो.. धन्यवाद
गन्धं मो.. धन्यवाद
मस्त...
मस्त...
अगदी निवडक शब्दात योग्य
अगदी निवडक शब्दात योग्य मांडणी... एकदम सही लिहिली आहे.
अशी मैत्री मी आजपर्यंत बर्याच वेळा निभावली आहे तेही सहजच, पण त्याचा इतका मोठा अर्थ होत असेल हे आज लक्षात आले. धन्यवाद मयी...
छान आहे.
छान आहे.
मोजक्या शब्दांत सुंदर मांडणी,
मोजक्या शब्दांत सुंदर मांडणी, आवडलीच !!
बऱ्यापैकी आटोपशीर, भावना
बऱ्यापैकी आटोपशीर, भावना योग्य रीतीनं मांडणारी कथा... फक्त त्यात क्वचित अशुद्धलेखनाची कचकच!
धन्यवाद सर्वांचे
धन्यवाद सर्वांचे
https://www.facebook.com/vais
https://www.facebook.com/vaishnavi.lokhande.3975/posts/496219573913194
मस्त...
मस्त...
सुंदर! मोजक्या शब्दांत ,इतके
सुंदर! मोजक्या शब्दांत ,इतके प्रभावी !!! Totally relatable!!!
Pages