कनफुजन है ससुरा ई पिचरवा दैख के.. कभी ये राँग कॉल लगत है तो कभी राईट कॉल... इ तो हमैपे दिपेंन्द करत है के हम कोनसावाला भगवान को कॉल लगावत है... इ गोलामा इतने गॉड लोगोंका इतना मैनेजर है...पर ससुरा कौनो राईटवाला रास्ता नाई बतावत. सभै अपनी अपनी जेबन मा ऊ जो गांधीवाला कागद भरना चाहत रही.. ऊ फोटो ऊही कागज पर रही तो ही किमत रही. बाकी कागद उपर फोटो की कौनो वाईल्यु नाई.. भगवान ने हमे बनाया है या हमने ऊंके बनावे है.. इ बहुत बडा सवाल है...
आमिर खानचा चित्रपट "पी.के." अश्याच सगळ्या प्रश्नांना घेउन पृथ्वीतळावर येतो. राजु हिराणी आणि विधु चोप्रा यांनी ३ इडीअट्स नंतर एका वेगळ्या (ते म्हणतात) विषयावर चित्रपट घेउन आले. विषय चांगला आहे. परंतु आधी या विषयावर एक सकस, पौष्टीक, दणदणीत चित्रपट येउन गेल्यामुळे हा चित्रपट त्याच्या तुलनेत एकदम फिका वाटतो अर्थात जेवनाची सजावट उत्कृष्ट आहे. कपडे काढलेला टर्मिनेटर अॅर्नॉल्ड ( कोणता काय विचारत आहेत आताचा अॅर्नॉल्ड जरी गृहित धरला तरी तिन्ही खानची बॉडी एका बाजुला आणि त्याची एकट्याची एका बाजुला होईल.) आणि कपडे काढलेला आमिर यांच्यात फिजिकल फरक काय आहे. तोच त्या दोन चित्रपटांमधला फरक आहे. थोडेफार प्रश्न उचलतो थोडेफार मनोरंजन करतो तर थोडेफार विवाद वाढवतो ज्याची काहीच गरज नव्हती. (अर्थात हे माझ्या नजरेने)
तर चित्रपटाची कथा बर्याच वर्तमानपत्रांमधुन बाहेर आली आहे त्यामुळे स्पॉईलर अलर्ट वगैरे द्यायची काहीच गरज नाही आहे. ज्यांना वाटत असेल त्यांनी अलर्ट दिलेलाच आहे असे मानुन पुढचे वाचा.
परग्रहावरुन पृथ्वीवर अभ्यास संशोधन करण्याकरीता आमिर खानचे यान राजस्थानाच्या एका ओसाड प्रदेशात उतरते. (ही गोष्ट वेगळी आहे कि पुर्ण चित्रपटभर आपल्याला त्याच्या संशोधनाचा विषय काय आहे हे सापडत नाही)
आता याना बाहेर साहेब उतरतात तर बिना कपड्यांचे कारण त्यांच्या इथे कपडे घालत नाही. उतरल्यावर त्या ना-गड्या आमिरला नेमका चोर भेटतो. चोर नेमका आमिरच्या गळ्यात असलेला रिमोट ( गळ्यात अडवलेले गॅजेट) हिसकावुन घेतो आणि पळुन जातो. (आमिरच्या अवतारावरुन दुसरी कोणतेही चोरण्यालायकीचे काहीच नसल्याने नाईलाजाने त्याला गळ्यातले गॅजेट चोरुन तो चोरच आहे हे दाखवावे लागते.) गॅजेट शिवाय आमिरला त्याच्या ग्रहावर परत जाता येत नसल्याने तो त्या चोराचा आणि गॅजेटचा शोध घ्यायला सुरुवात करतो. त्यात त्याला संजय दत्त आणि अनुष्का शर्मा भेटतात. या शोधामधे आमिरला बर्याच नवनविन कल्पना गोष्टी कळत जातात. त्याला या सगळ्या नविन असल्याने तो आपापल्या परिने अर्थ लावत जातो. तिकडे बाई अनुष्काला सुशांत बरोबर प्रेम होते परंतु तो पाकिस्तानी असल्यामुळे तिच्या घरातले नकार देतात या नकारामागे घरगुरु तपस्वी (सौरभ शुक्ला) असतात. त्यांच्यामते तो पाकिस्तानी असल्यामुळे तो तिला वापरेल आणि नंतर सोडुन जाईल. धोका देईल. मग दोघांचे ऐनवेळेला फाटते आणि ती बिचारी दिल्लीला येउन एका न्युजचॅनल मधे काम करायला सुरुवात करते. आमिर त्याचे गॅझेट शोधत शोधत दिल्लीला पोहचतो. आणि त्याची अॅस्युज्वल उज्ज्वल जगतजननी उर्फ जग्गुशी पडते. जी आपल्या नविन बातमीचा शोध घेत असते. आमिरच्या उटपटांग हरकतीमुळे तिचे ध्यान आकर्षित होते आणि ती त्याचा मागोवा घेते. पीके ला आधी बोलता येत नसते. पण पृथ्वीवर आल्यावर त्याला बोलण्यासाठी भाषेची आवश्यकता भासते. त्याला भाषा शिकण्यासाठी एखाद्या व्यक्तिचा हात पकडण्याची गरज आहे परंतु त्याच्या हरकतीमुळे त्याला कोणी हात देत नाही. त्या हात पकडण्याचा उलटा अर्थ काढुन भैरोसिंग (संजय दत्त) आमिरला "जन्नत" मधे घेउन जातो. (वास्तम मधे नार्वेकर संजयला घेउन जातो. इथे संजय आमिरला हिशोब फिट्टमफाट) जन्नत मधे गेल्यावर आमिरला खरतर सगळच हातात मिळते परंतु तो एलिअन असल्यामुळे असला काही प्रकार करण्याऐवजी गरजे पुरते त्याबाईचा हात हातात घेउन तिची भाषा डाउनलोड करुन घेतो. नेमकी ती भोजपुरी निघते म्हणुन सगळ्याचित्रपटात आमिर भोजपुरी बोलत असतो. दिल्लीत सगळा चोरीचा माल विकला जातो कळल्याने आमिर दिल्लीला जातो. तिथे जन्नत मधे मिळालेल्या थोड्याफार ज्ञानामुळे तो आधी पोलिसांना त्याच्या वस्तु बद्दल विचारतो. लोकांना विचारतो. सगळे त्याला वेड्यात काढतात आणि देवच तुझ्या प्रश्नांना उत्तर देतील आणि तुझी वस्तु देखील तेच देतील. सांगतात. मग पीके लागतो देवाच्या मागे त्याला वाटते या पृथ्वीवर सगळ्यांच्या समस्याचे निवारण देव नावाची शक्ती करते माझ्या देखील समस्याचे निवारण देवच करेल. त्याला काहीच माहीत नसल्याने तो सगळ्या धर्माच्या देवांना साकडे घालतो. पुजाअर्चा करतो. कोणत्याच धर्माचे नियम माहित नसल्याने याचे त्याला त्याचे याला जोड्तोड करुन घेतो. चर्च मधे पुजेची थाळी घेउन जातो गडबड होते. तिथे बघतो की देवाला वाईन देतात मग तो वाईन घेतो पण पोहचतो मशिदीमधे परत गडबड करतो. हिंदु स्त्रीला पांढर्या साडीत बघतो तेव्हा कळते ती विधवा आहे. मग तो ख्रिश्चन बाईला पांढर्या कपड्यात बघतो तर सांत्वन करायला जातो. तिथे कळते ती लग्नाला जात आहे. दुखात काळे कपडे घालतात. मुस्लिम बायकांना काळ्याकपड्यात बघितल्यावर परत तिथे जातो पण तिथे ही गडबड करतो. नंतर देवावरुन विश्वास उडायला लागतो तेव्हा त्याला त्याचे गॅझेट एका स्वामी कडे सापडते जो त्या गॅझेटला देवाचा हिरा म्हणुन लोकांना दाखवत असतो तो स्वामी आपला देवाशी बोलणे होत असते असा दावा करतो. अनुष्का या स्वामीचा फोलपणा आमिरच्या मदतीने उघडकिस आणते आणि त्याला त्याचे गॅझेट मिळवुन देते मग आमिर घरी रवाना होतो.
आता या कथेचे सार आपल्याला "ओह माय गॉड" चित्रपटात दिसलेला होता. तोच सार, तत्वज्ञान तीच रेसिपी हिराणीसाहेब आपल्या चितपरिचित चिमटे कोपरखळी यांचा मसाला वापरुन कढईला धर्मथोतांडाची आग लावुन गरम करुन त्यात चित्रपट नावाच्या थाळीत देतात आणि ते खायला काटाचमचे यांच्या जागी आमिर आणि अनुष्काला ठेवतात. त्यामुळे चव थोडी वेगळी लागते. बाकी सगळे सारखेच. दुर्दैवाने दोन्ही चित्रपटांची तुलना होउ लागते आणि पीके त्यात बराच मागे पडतो. मध्यंतरापर्यंत दोन्ही वेगवेग्ळ्या रस्त्यांवरुन समान धावत असताना मध्यंतरानंतर पीके अनुष्काच्या गुंत्यात अडकतो. ट्रॅक चुकतो आणि......... सुरुवात जितकी खुशखुशीत झाली होती त्याहुन अधिक रडका शेवट झालेला आहे. "ओह माय गॉड" मधे कांजीभाईचा कोर्टसीन हा चित्रपटाचा माईलास्टोनवाली जान होती. पीके मधे कोर्टसीन बदल्यात टिव्हीवरचा डिबेटसीन आणलेला आहे जो प्रचंड फसवा आणि लॉजिक नसलेला आहे. निव्वळ एका घडामोडीमधुन आमिरखानच बरोबर आहे आणि तो स्वामी खोटा आहे. वगैरे जे भासवले ते न पटणारे आहे. तो सीन खरतर धक्कादायक आहे पण नेमका तो लिहित असताना कोणत्या गोष्टीवर केंद्रीत करायचे आहे तेच उठुन दिसत नाही. तो धक्का गाजरमुली सारखा मामुली वाटुन जातो. असे चित्रपटात बरेच धक्के मिळतात पण ते जाणवेपर्यंत नविन उपद्व्याप चालु होतो.
चित्रपटात एक गाणे सोडुन बाकीची गाणी का आहेत ? याचे संशोधन करण्याकरीता मलाच कोणत्यातरी ग्रहावर जावे लागेल. खरतर असे बर्याच चित्रपटांमधे देखील हाच प्रश्न उद्भवतो. पण बाकीची गाणी अनावश्यक आहे. एलिअन नाचु शकतो गाऊ देखील शकतो हे दाखवायची गरज काय आहे? वर भरीतभर तो प्रेम देखील करतो ? नशिब "तडप तडप के इस दिलको" सारखे गाणे गात नाही.
कान मोठे करुन आणि डोळे वटारुन फिरणे या दोन गोष्टी आमिरने सहजरित्या केलेल्या आहे. (सतत डोळे वटारुन ठेवुन बघा कळेल) भोजपुरी भाषेच्या गमतीजमती अचुक आमिरने पकडल्या आहेत. बोलण्याची ढब परफेक्ट वाटते. प्रत्येक दृष्यात त्याने प्रचंड निरागसता दाखवुन काम केले आहे. एखाद दुसरा सीन ठिगळ लावल्यासारखा आहे पण फक्त त्यात आमिर असल्याने जाणवत नाही.त्याच्या अभिनयामुळे तो चित्रपटाशी एकरुप होउन जातो.
अनुष्का शर्मा फारच विचित्र दिसली आहे. तिच्या ओठांमुळे तिचा क्लोजप बघावासा वाटत नाही. नर्गिस फक्री अँजिलिना जॉली यांचे ओठ नुसते बघत राहावेसे वाटतात. पण अनुष्काचे ओठ तिच्या चेहर्यावरचे एलिअन वाटतात. मिसमॅच. त्यामुळे तिच्या अभिनयाकडे लक्ष जातच नाही सतत डोनाल्ड डकच नजरेसमोर नाचत आहे वाटते. तरी जितका बघितला त्यात ती ठिकठाक वाटली आहे.संजय दत्त, बोमण इराणी आणि सुशांत सिंग हे चवी पुरते आणि गरजे पुरते आहे.( त्यांना तितकेच ठेवले हे बरे केले) सुधीर शुक्लांनी स्वामी फक्त उचलला आहे असे म्हणावे लागेल. मिथुनदा , गोविंद नामदेव यांनी कॅरेक्टर लिलया उचलुन पर्वतावर नेउन ठेवला होता. त्यामुळे अभिनय बघावा तर फक्त आमिर खानलाच बघा.
चित्रपटात चांगले नाविन्यपुर्ण दृश्य आहेत. उदा. जो तो मारत असतो म्हणुन आमिर गालावर देवदेवतांचे फोटो लावतो. कपडे "डांसिंग कार" मधुन उचलेले वापरतो. इत्यादी नविन कल्पना घेतल्या आहेत. शंकराचे सोंग घेतलेल्या सोंगाड्याच्या मागे देव आहे म्हणुन लागणे हा हाईट सीन आहे. तसेच वेगवेगळ्या धर्माच्या स्थानांवर जाताना होत असलेला गोंधळ हा देखील वेगळाच अनुभव देतो. संवाद चुरचुरीत आणि खोल अर्थाचे आहेत. "भगवान ने तुम्हे बनाया है या तुमने भगवान को" "धर्म का स्टँम्प लोग लगाते है. भगवान तो सबको एकजैसे मानते है" या संवादांना भोजपुरी तडका दिल्याने फ्रेश वाटतात.
चित्रपटात फसलेले देखील आहे. थोडे टर्मिनेटर, थोडा कोई मिल गया, थोडा ओह माय गॉड मिक्स करुन बनवलेला वाटले. पिंडीवर टाकलेले दुध गरिबांना वाटा सारखे मुद्दे देखील उचलगिरीसारखे वाटले. आमिर हात पकडुन भाषा शिकु शकतो तर अनुष्काचा हात पकडुन हिंदी का शिकावीशी वाटली नाही. जेव्हा त्याच्या भोवतालचे सगळेच हिंदी बोलत होते. राजस्थानी भैरोसिंगला एका झटक्यात भोजपुरी कळते? जर पीके एलिअन असतो तर तो त्याचा धर्म काय आहे हे कशाला शोधत बसतो? तो तर बाहेरुन आलेला आहे. सुरुवातीला तटस्थ दृष्टीकोन असणारा नंतरनंतर हिंदु धर्मावर जास्त वेळ थांबतो. हे टाळायला हवे होते. जर टाळता येत नव्हते तर सगळ्या धर्मावर थोडा थोडा वेळ घेतला असता तर अधिक संयुक्तिक वाटले असते. उदा. जेव्हा आमिर लोटांगण केल्यावर बोलतो त्याच वेळेला मोहरमला त्याने जे मातम केले असते त्यावर काही बोलत नाही. ? जिथे लोटांगण केल्यावर जो त्रास झाला तो मातमच्या वेळेला कितीतरी अधिक झाला असेल. पण त्यावर एकही कटाक्ष नाही. ??
अनेक धर्मांच्या विसंगती दाखवताना योग्य मर्मावर बोट ठेवले आहे. पण उगाच त्यात "लव जिहाद" वगैरे मांडुन मुस्लिम मुलगा हिंदु मुलगीच्या लग्नाला समर्थन देणे, मुस्लिम मुल धोका देत नाही, वगैरे वाक्य अनावश्यक घुसवली आहे. सगळ्याच मुद्द्यांना हात लागलाच पाहिजे याचा अट्टाहास नको करायला पाहिजे होता. तुम्ही अंधश्रध्देविरुध्द दाखवत आहात चांगले आहे. पण त्यातुन एकाला झुकते माप नको द्यायला. ही गोष्ट "ओह माय गॉड" मधे अत्यंत योग्यरित्या हाताळली होती. ती उणीव प्रकर्षाने जाणवली.
अंधश्रध्देच्या नावाखाली देवाचा बाजार सग़ळ्याच धर्माने मांडलेला आहे. खरतर आजच्या काळात धर्मच या बाजारामुळे टिकुन राहिलेला आहे असे वाटत आहे.. लोक धर्म वाचवण्याकरीता युध्द करतात जिहाद करतात फतवे काढतात. पण देव वाचवण्याकरीता कोणी काही करत नाही. तसे देवाला वाचवण्याकरीता या अश्या लोकांच्या कुबड्यांची काहीच आवश्यकता नाही. ज्याने हे ब्रह्मांड बनवले. त्याला कसली भीती? त्याचे कोण काय नष्ट करेल? ही धर्मांध लोक तर त्याच्या खजगिणतीत देखील नसतील. मग आपण कुणाची भीती दाखवतोय? कुणाला प्रसन्न करतोय ? लोकांना धर्माची गरज काय.? याचे उत्तर ज्या दिवशी सापडेल तेव्हा देव सुध्दा पृथ्वीवर अवतरेल. या धर्मामुळे त्यावरुन होणार्या आपापसातल्या भांडणामुळे तो देखील कंटाळुन दुसरीकडे निघुन गेला असेल. "बसा भांडत तुम्ही. चुक केली मी बनवुन तुम्हाला." आपल्या आचरणाने पृथ्वीवरुन आपणच देवाला घालवुन लावले आहे. मग त्याला कुठे शोधत बसले आहात? तुम्ही स्वतःमधे सुधार करा. देव स्वतःहुन परत येईल.
धर्माला जीवनात कितपत महत्व द्यायचे आहे हे तुमचे तुम्ही ठरवा
ओह माय गॉड मधे एक वाक्य परेश रावल तोंडी आहे "धर्म एकतर माणसाला दयनिय करतो नाहीतर अतिरेकी बनवतो"
त टी. :- चित्रपटाला स्टार देउ नयेच. कोणी काहीतरी पोटतिकडीने सांगत आहे शिकवण देत आहे त्याकडे लक्ष द्यायचे सोडुन तुला ३ स्टार ४ स्टार कसे म्हणायचे? हे तर असे झाले प्राध्यापकांनी लेक्चर दिल्यावर "सरांनी काय ५स्टार वाले लेक्चर दिले ना" "नाही नाही मला तर २स्टार वालेच वाटले" असे विद्यार्थी बोलत आहेत.
लोकहो, श्री इब्लिस यांची काही
लोकहो,
श्री इब्लिस यांची काही रोचक विधाने सापडली :
१.
>> गुन्हेगाराचा उल्लेख गुन्हेगारासारखा नाहीतर कसा करायचा असतो?
शिक्षा भोगून झालेल्या गुन्हेगाराचा उल्लेख गुन्हेगार म्हणून होत नसतो.
२.
>> खून करतो तो नेहेमीच खुनी असतो. अगदी फासावर लटकला तरी. तेव्हा, गोडसे हा खुनी होता.
>> अन गांधी "वध" वगैरे भंपकपणा लिहीत जाऊ नका. त्या गोडसेनी सगळ्यांसमोर त्या निशःस्त्र म्हातार्यावर
>> गोळ्या झाडून त्यांचा खून केला होता
श्री इब्लिस यांचा श्री नथुराम आणि श्री गोपाळ या गोडसेद्वयींत गोंधळ उडालेला दिसतोय. प्रस्तुत उदाहरण श्री गोपाळ यांच्यासंबंधी आहे.
३.
>> मोकळे सोडणारे न्यायालय असते. अमित शहांना नाही का मोकळं सोडलंय न्यायालयाने?
>> त्यावेळी या देशाचे कायदे अजब होत नाहीत का?
न्यायालय समोर आलेल्या माहितीनुसार खटला चालवते. अमित शहांच्या बाबतीत सर्व पुरावे छाननी करून झाले आहेत. गांधीवधाच्या बाबतीत भारत शासनाने केलेला हलगर्जीपणा न्यायासनासमोर आलाच नाही किंवा येऊ दिला नाही. मग शासकीय बेपर्वाईवर कोण कशी कारवाई करेल?
४.
>> अर्थात खुन्यांना आदरणीय म्हणणार्या तुमच्यासारख्या लोकांकडून दुसरी काय अपेक्षा करणार?
खुनी? कोण खुनी? चर्चेचा विषय श्री गोपाळ गोडसे आहे.
आ.न.,
-गा.पै.
१५ नोव्हेंबर ला भारतीय
१५ नोव्हेंबर ला भारतीय न्यायालयाने वध केला.
ही तारीख वधदिवस म्हणून साजरी केली जावी
गामा आम्ही राक्षसांच्या
गामा आम्ही राक्षसांच्या कुळातल्यांना संत्संग सांगत नाही. पालथ्या घड्यावर पाणी ओतण्यासारखे आहे.
गामा, कसाबची शिक्षा भोगून
गामा,
कसाबची शिक्षा भोगून झाली आहे. आदरणीय म्हणायचं का त्याला?
डोक्यावर कोणीतरी आपटले
डोक्यावर कोणीतरी आपटले आहे
नविन वर्षात सुधरतील असे वाटत नाही
लोकहो, इब्लीस यांनी एक समर्पक
लोकहो,
इब्लीस यांनी एक समर्पक प्रश्न केला आहे :
>> कसाबची शिक्षा भोगून झाली आहे. आदरणीय म्हणायचं का त्याला?
मी निरपराध लोकांचा खून करणाऱ्या माणसाला आदरणीय म्हणत नसतो. इतर कोणाला तसं म्हणायचं असेल तर ते माझ्या हातात नाही. विदर्भातले एक प्रख्यात वकील भेकडकसाबचं वकीलपत्र घ्यायला धावले होते. त्यांनाच खरंतर हा प्रश्न केला पाहिजे.
शिवाय आपण गोपाळ गोडशांबद्दल बोलत आहोत. नथुराम गोडशांबद्दल नाही. गोपाळ गोडसे यांचा सहभाग नथुराम, आपटे, करकरे यांच्याइतका गंभीर नसून तुलनेने किरकोळ होता.
असो.
कसाबने कशासाठी हत्या केल्या ते इथे पाहायला मिळतं :
>> "If you give me regular meals and money I will do the same for you that I did for them,"
>> he said.
मात्र गांधीवधामागची कारणं कुणालाही जाणून घ्यायची इच्छा नाही, हे पाहून नवल वाटतं.
आ.न.,
-गा.पै.
टनाटन मुर्खपत्रांचे कारणे
टनाटन मुर्खपत्रांचे कारणे बेअक्कल लोकांनाच पटतात हलकटपणा किती दाखवत राहणार
घरातले कोणी गेले की त्यांना वध म्हणा ते जास्त शोभेल आणि योग्य वाटेल
जसे 15 नोव्हेंबरला तुमचा
जसे 15 नोव्हेंबरला तुमचा प्रेरणास्त्रोतला फाशी देऊन वध केलेला इतिहासाचा सुर्वणदिवस होता हाच साजरा झाला पाहीजे

घरातले कोणी गेले की त्यांना
घरातले कोणी गेले की त्यांना वध म्हणा ते जास्त शोभेल आणि योग्य वाटेल
>>>
म्हणजे? मला आत्ता पर्यंत 'वारले' हा शब्द माहिती होता. ही नवीन सुधारणा का ????
कसाबची शिक्षा भोगून झाली आहे. आदरणीय म्हणायचं का त्याला?
>>> कदाचित तिकडे पाकिस्तानात म्हणतही असतिल. तो, आदरणीय व्यक्तीमत्व आपल्याला वाटत असेल तर जरूर माना.
बाकी, कोणी कोणास आदरणीय मानावे हा ज्याचा-त्याचा व्यक्तिगत मामला. त्याला मी तरी आदरणीय नाही मानू शकत अन गांधीहत्येशी संबंधित व्यक्त्नींनाही.
त्यांच्यासाठी सुधारणा केली
त्यांच्यासाठी सुधारणा केली त्यांना तो शब्द प्रिय आहे तर घरातल्यांना पण लावा तिथे शोभून जास्त दिसेल
दिवाकर देशमुख | 1 January,
दिवाकर देशमुख | 1 January, 2015 - 15:25 नवीन
त्यांच्यासाठी सुधारणा केली त्यांना तो शब्द प्रिय आहे तर घरातल्यांना पण लावा तिथे शोभून जास्त दिसेल
>>
अंमळ जास्तच होतंय हे. घरच्यांपर्यंत जायची गरज नाहीये.
मी समोरच्याची लायकी बघूनच
मी समोरच्याची लायकी बघूनच बोलतो
काळजी नसावी अश्या विषवल्ली लोकांना हीच भाषा योग्य
इंग्रजांची धुणार्यांना आमच्या
इंग्रजांची धुणार्यांना आमच्या राष्ट्रपित्याचा अपमान करण्याची परवाणगी नाही.
म्हणायचं काय? पुसणार्यांना
म्हणायचं काय? पुसणार्यांना आहे का? फाटे फुटून राहिलेत हो.
जे करतील त्यांना अशीच उत्तरं
जे करतील त्यांना अशीच उत्तरं
दिवाकर देशमुख घरच्यांपर्यंत
दिवाकर देशमुख घरच्यांपर्यंत जाऊ नका ही नम्र विनंती
माफी मागावी तरच अन्यथा नाहीच
माफी मागावी तरच
अन्यथा नाहीच
नवीन वर्षाच्या सर्वांना
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
दि.दे.
तुम्ही आणि तुमचे समविचारी आक्रमक भाषेत लिहून (पक्षी सतत समोरच्यांना अपमानित करून) जे चालवले आहे, ते पाहून जर तुम्हाला असे वाटत असेल की लोकांना तुमची बाजुच काय ती खरी योग्य आणि न्याय्य आहे, तर तो आपला गैरसमज आहे. तुम्ही जेवढे हल्ले कराल तेवढे दुसर्या विचारांचे लोकही आक्रमक होत राहतील. हे विधान माबोवरील सर्वसामान्यपणे अनेक वेळा अनेक ठिकाणी चालणार्या वादांबद्दल आहे.
गा.पै. आणि समविचारी लोकांनी देखील लिहिताना विचार आणि भाषा याबाबत संयम बाळगावा असे आवाहन.
गांधींना मानायचे आणि अहिंसक चर्चा करायची नाही असे कोणी करू नका.
केवळ आम्ही म्हणतो तीच बाजू खरी हा अट्टाहास दोन्ही वैचारिक गटांनी सोडून दिला तरच मैत्रीपुर्ण आणि निकोप चर्चा होऊ शकेल. शुभेच्छा
समोरच्यांचा माज
समोरच्यांचा माज ठेचणारच
वेळोवेळी सांगून सुध्दा कळत नसेल तर ठेचणारच.
अतिरेक्यांचे गोडवे गाणार्यांना सम्मान नाही देणार
अहो तुम्ही ज्यांच्या
अहो तुम्ही ज्यांच्या सम्मानासाठी एवढी ठेचाठेची करताय निदान त्यांचेतरी अनुकरण कराल? तो एक महात्मा अहिंसेचे अनुकरण करत गेला अन तुम्ही त्याच्यासाठी ठेचताय?
काहीतरी सॉलिड तात्विक घोळ झालाय वाटत.
पु.लं.च्या चाळीत बर्वेबाबा
पु.लं.च्या चाळीत बर्वेबाबा होते, त्यांनी मौन या विषयावर एक तास लेक्चर दिले होते, ते आठवते अनेकदा
चित्रपटावर चर्चा म्हणुन
चित्रपटावर चर्चा म्हणुन वाचायला आले तर इथेही तीच लठठालठ्ठी. कंटाळा आलाय या सगळ्याचा.
या विषयांवर लिहिणारे आयडी वेगवेगळे आहेत की एकाच व्यक्तीच्या या सगळ्या आयडीज असुन तो केवळ वेळ जात नाही म्हणुन हे उद्योग करतोय? व्यक्तीगत ओळख अजिबात नसावी अशा लोकांबरोबर बोलताना इतकी खालच्या दर्जाची भाषा इथे वापरताना बघुन आश्चर्य वाटत राहते. असेही लोक असतात? आणि वर ते स्वतःला जाहीरपणे पुरोगामीही म्हणवतात? आश्चर्य आहे.
साधना +१ कितीही दुर्लक्ष
साधना +१ कितीही दुर्लक्ष करायचं म्हटलं तरी हल्ली असली भाषा ऐकून कंटाळा येत चाललाय. ज्या बीबीवर बघावं तिथं हेच चालू.
साधना +१. अतिशय उबग आणणारे
साधना +१.
अतिशय उबग आणणारे प्रकार आहेत हे.
Adminच्या विपूत बघा ती भाषा
Adminच्या विपूत बघा ती भाषा चालते का? की तुमचा कंपू असल्याने त्यावर चकार शब्द नाही निघत?
असले ढालकी वाल्यांचीच किव येते.
स्वत: च्या कंपूवाल्यांना सुधारा मग इतरांना बोला
कुणाचा कंपू? कसला कंपू? कसली
कुणाचा कंपू? कसला कंपू? कसली ढोलकी? उगाचच लिहाय्चं म्हणून काहीही लिहायचं?
अॅडमिनच्या विपुचा इथं काय संबंध? अॅडमिन काय ते बघून घेतील. आम्ही या बीबी वर आणि अशाच प्रकारे इतर बीबीवर चाललेल्या भाषेबद्दल बोलत आहोत.
मी देखील जनरलीच बोलत आहे आणि
मी देखील जनरलीच बोलत आहे आणि इतरत्र धाग्यांबद्दलच बोलत आहे.
कम्पु??? हे राम.......
कम्पु??? हे राम.......
मी देखील जनरलीच बोलत आहे आणि
मी देखील जनरलीच बोलत आहे आणि इतरत्र धाग्यांबद्दलच बोलत आहे. << मग वरच्या पोस्टमध्ये अॅडामिनची विपु, कंपू आणि ढोलकी वगैरे कुणी लिहिलंय???
मीच ज्यांना वाचायचे होते
मीच
ज्यांना वाचायचे होते त्यांनी वाचले आणि कळले त्यांना
Pages