कनफुजन है ससुरा ई पिचरवा दैख के.. कभी ये राँग कॉल लगत है तो कभी राईट कॉल... इ तो हमैपे दिपेंन्द करत है के हम कोनसावाला भगवान को कॉल लगावत है... इ गोलामा इतने गॉड लोगोंका इतना मैनेजर है...पर ससुरा कौनो राईटवाला रास्ता नाई बतावत. सभै अपनी अपनी जेबन मा ऊ जो गांधीवाला कागद भरना चाहत रही.. ऊ फोटो ऊही कागज पर रही तो ही किमत रही. बाकी कागद उपर फोटो की कौनो वाईल्यु नाई.. भगवान ने हमे बनाया है या हमने ऊंके बनावे है.. इ बहुत बडा सवाल है...
आमिर खानचा चित्रपट "पी.के." अश्याच सगळ्या प्रश्नांना घेउन पृथ्वीतळावर येतो. राजु हिराणी आणि विधु चोप्रा यांनी ३ इडीअट्स नंतर एका वेगळ्या (ते म्हणतात) विषयावर चित्रपट घेउन आले. विषय चांगला आहे. परंतु आधी या विषयावर एक सकस, पौष्टीक, दणदणीत चित्रपट येउन गेल्यामुळे हा चित्रपट त्याच्या तुलनेत एकदम फिका वाटतो अर्थात जेवनाची सजावट उत्कृष्ट आहे. कपडे काढलेला टर्मिनेटर अॅर्नॉल्ड ( कोणता काय विचारत आहेत आताचा अॅर्नॉल्ड जरी गृहित धरला तरी तिन्ही खानची बॉडी एका बाजुला आणि त्याची एकट्याची एका बाजुला होईल.) आणि कपडे काढलेला आमिर यांच्यात फिजिकल फरक काय आहे. तोच त्या दोन चित्रपटांमधला फरक आहे. थोडेफार प्रश्न उचलतो थोडेफार मनोरंजन करतो तर थोडेफार विवाद वाढवतो ज्याची काहीच गरज नव्हती. (अर्थात हे माझ्या नजरेने)
तर चित्रपटाची कथा बर्याच वर्तमानपत्रांमधुन बाहेर आली आहे त्यामुळे स्पॉईलर अलर्ट वगैरे द्यायची काहीच गरज नाही आहे. ज्यांना वाटत असेल त्यांनी अलर्ट दिलेलाच आहे असे मानुन पुढचे वाचा.
परग्रहावरुन पृथ्वीवर अभ्यास संशोधन करण्याकरीता आमिर खानचे यान राजस्थानाच्या एका ओसाड प्रदेशात उतरते. (ही गोष्ट वेगळी आहे कि पुर्ण चित्रपटभर आपल्याला त्याच्या संशोधनाचा विषय काय आहे हे सापडत नाही)
आता याना बाहेर साहेब उतरतात तर बिना कपड्यांचे कारण त्यांच्या इथे कपडे घालत नाही. उतरल्यावर त्या ना-गड्या आमिरला नेमका चोर भेटतो. चोर नेमका आमिरच्या गळ्यात असलेला रिमोट ( गळ्यात अडवलेले गॅजेट) हिसकावुन घेतो आणि पळुन जातो. (आमिरच्या अवतारावरुन दुसरी कोणतेही चोरण्यालायकीचे काहीच नसल्याने नाईलाजाने त्याला गळ्यातले गॅजेट चोरुन तो चोरच आहे हे दाखवावे लागते.) गॅजेट शिवाय आमिरला त्याच्या ग्रहावर परत जाता येत नसल्याने तो त्या चोराचा आणि गॅजेटचा शोध घ्यायला सुरुवात करतो. त्यात त्याला संजय दत्त आणि अनुष्का शर्मा भेटतात. या शोधामधे आमिरला बर्याच नवनविन कल्पना गोष्टी कळत जातात. त्याला या सगळ्या नविन असल्याने तो आपापल्या परिने अर्थ लावत जातो. तिकडे बाई अनुष्काला सुशांत बरोबर प्रेम होते परंतु तो पाकिस्तानी असल्यामुळे तिच्या घरातले नकार देतात या नकारामागे घरगुरु तपस्वी (सौरभ शुक्ला) असतात. त्यांच्यामते तो पाकिस्तानी असल्यामुळे तो तिला वापरेल आणि नंतर सोडुन जाईल. धोका देईल. मग दोघांचे ऐनवेळेला फाटते आणि ती बिचारी दिल्लीला येउन एका न्युजचॅनल मधे काम करायला सुरुवात करते. आमिर त्याचे गॅझेट शोधत शोधत दिल्लीला पोहचतो. आणि त्याची अॅस्युज्वल उज्ज्वल जगतजननी उर्फ जग्गुशी पडते. जी आपल्या नविन बातमीचा शोध घेत असते. आमिरच्या उटपटांग हरकतीमुळे तिचे ध्यान आकर्षित होते आणि ती त्याचा मागोवा घेते. पीके ला आधी बोलता येत नसते. पण पृथ्वीवर आल्यावर त्याला बोलण्यासाठी भाषेची आवश्यकता भासते. त्याला भाषा शिकण्यासाठी एखाद्या व्यक्तिचा हात पकडण्याची गरज आहे परंतु त्याच्या हरकतीमुळे त्याला कोणी हात देत नाही. त्या हात पकडण्याचा उलटा अर्थ काढुन भैरोसिंग (संजय दत्त) आमिरला "जन्नत" मधे घेउन जातो. (वास्तम मधे नार्वेकर संजयला घेउन जातो. इथे संजय आमिरला हिशोब फिट्टमफाट) जन्नत मधे गेल्यावर आमिरला खरतर सगळच हातात मिळते परंतु तो एलिअन असल्यामुळे असला काही प्रकार करण्याऐवजी गरजे पुरते त्याबाईचा हात हातात घेउन तिची भाषा डाउनलोड करुन घेतो. नेमकी ती भोजपुरी निघते म्हणुन सगळ्याचित्रपटात आमिर भोजपुरी बोलत असतो. दिल्लीत सगळा चोरीचा माल विकला जातो कळल्याने आमिर दिल्लीला जातो. तिथे जन्नत मधे मिळालेल्या थोड्याफार ज्ञानामुळे तो आधी पोलिसांना त्याच्या वस्तु बद्दल विचारतो. लोकांना विचारतो. सगळे त्याला वेड्यात काढतात आणि देवच तुझ्या प्रश्नांना उत्तर देतील आणि तुझी वस्तु देखील तेच देतील. सांगतात. मग पीके लागतो देवाच्या मागे त्याला वाटते या पृथ्वीवर सगळ्यांच्या समस्याचे निवारण देव नावाची शक्ती करते माझ्या देखील समस्याचे निवारण देवच करेल. त्याला काहीच माहीत नसल्याने तो सगळ्या धर्माच्या देवांना साकडे घालतो. पुजाअर्चा करतो. कोणत्याच धर्माचे नियम माहित नसल्याने याचे त्याला त्याचे याला जोड्तोड करुन घेतो. चर्च मधे पुजेची थाळी घेउन जातो गडबड होते. तिथे बघतो की देवाला वाईन देतात मग तो वाईन घेतो पण पोहचतो मशिदीमधे परत गडबड करतो. हिंदु स्त्रीला पांढर्या साडीत बघतो तेव्हा कळते ती विधवा आहे. मग तो ख्रिश्चन बाईला पांढर्या कपड्यात बघतो तर सांत्वन करायला जातो. तिथे कळते ती लग्नाला जात आहे. दुखात काळे कपडे घालतात. मुस्लिम बायकांना काळ्याकपड्यात बघितल्यावर परत तिथे जातो पण तिथे ही गडबड करतो. नंतर देवावरुन विश्वास उडायला लागतो तेव्हा त्याला त्याचे गॅझेट एका स्वामी कडे सापडते जो त्या गॅझेटला देवाचा हिरा म्हणुन लोकांना दाखवत असतो तो स्वामी आपला देवाशी बोलणे होत असते असा दावा करतो. अनुष्का या स्वामीचा फोलपणा आमिरच्या मदतीने उघडकिस आणते आणि त्याला त्याचे गॅझेट मिळवुन देते मग आमिर घरी रवाना होतो.
आता या कथेचे सार आपल्याला "ओह माय गॉड" चित्रपटात दिसलेला होता. तोच सार, तत्वज्ञान तीच रेसिपी हिराणीसाहेब आपल्या चितपरिचित चिमटे कोपरखळी यांचा मसाला वापरुन कढईला धर्मथोतांडाची आग लावुन गरम करुन त्यात चित्रपट नावाच्या थाळीत देतात आणि ते खायला काटाचमचे यांच्या जागी आमिर आणि अनुष्काला ठेवतात. त्यामुळे चव थोडी वेगळी लागते. बाकी सगळे सारखेच. दुर्दैवाने दोन्ही चित्रपटांची तुलना होउ लागते आणि पीके त्यात बराच मागे पडतो. मध्यंतरापर्यंत दोन्ही वेगवेग्ळ्या रस्त्यांवरुन समान धावत असताना मध्यंतरानंतर पीके अनुष्काच्या गुंत्यात अडकतो. ट्रॅक चुकतो आणि......... सुरुवात जितकी खुशखुशीत झाली होती त्याहुन अधिक रडका शेवट झालेला आहे. "ओह माय गॉड" मधे कांजीभाईचा कोर्टसीन हा चित्रपटाचा माईलास्टोनवाली जान होती. पीके मधे कोर्टसीन बदल्यात टिव्हीवरचा डिबेटसीन आणलेला आहे जो प्रचंड फसवा आणि लॉजिक नसलेला आहे. निव्वळ एका घडामोडीमधुन आमिरखानच बरोबर आहे आणि तो स्वामी खोटा आहे. वगैरे जे भासवले ते न पटणारे आहे. तो सीन खरतर धक्कादायक आहे पण नेमका तो लिहित असताना कोणत्या गोष्टीवर केंद्रीत करायचे आहे तेच उठुन दिसत नाही. तो धक्का गाजरमुली सारखा मामुली वाटुन जातो. असे चित्रपटात बरेच धक्के मिळतात पण ते जाणवेपर्यंत नविन उपद्व्याप चालु होतो.
चित्रपटात एक गाणे सोडुन बाकीची गाणी का आहेत ? याचे संशोधन करण्याकरीता मलाच कोणत्यातरी ग्रहावर जावे लागेल. खरतर असे बर्याच चित्रपटांमधे देखील हाच प्रश्न उद्भवतो. पण बाकीची गाणी अनावश्यक आहे. एलिअन नाचु शकतो गाऊ देखील शकतो हे दाखवायची गरज काय आहे? वर भरीतभर तो प्रेम देखील करतो ? नशिब "तडप तडप के इस दिलको" सारखे गाणे गात नाही.
कान मोठे करुन आणि डोळे वटारुन फिरणे या दोन गोष्टी आमिरने सहजरित्या केलेल्या आहे. (सतत डोळे वटारुन ठेवुन बघा कळेल) भोजपुरी भाषेच्या गमतीजमती अचुक आमिरने पकडल्या आहेत. बोलण्याची ढब परफेक्ट वाटते. प्रत्येक दृष्यात त्याने प्रचंड निरागसता दाखवुन काम केले आहे. एखाद दुसरा सीन ठिगळ लावल्यासारखा आहे पण फक्त त्यात आमिर असल्याने जाणवत नाही.त्याच्या अभिनयामुळे तो चित्रपटाशी एकरुप होउन जातो.
अनुष्का शर्मा फारच विचित्र दिसली आहे. तिच्या ओठांमुळे तिचा क्लोजप बघावासा वाटत नाही. नर्गिस फक्री अँजिलिना जॉली यांचे ओठ नुसते बघत राहावेसे वाटतात. पण अनुष्काचे ओठ तिच्या चेहर्यावरचे एलिअन वाटतात. मिसमॅच. त्यामुळे तिच्या अभिनयाकडे लक्ष जातच नाही सतत डोनाल्ड डकच नजरेसमोर नाचत आहे वाटते. तरी जितका बघितला त्यात ती ठिकठाक वाटली आहे.संजय दत्त, बोमण इराणी आणि सुशांत सिंग हे चवी पुरते आणि गरजे पुरते आहे.( त्यांना तितकेच ठेवले हे बरे केले) सुधीर शुक्लांनी स्वामी फक्त उचलला आहे असे म्हणावे लागेल. मिथुनदा , गोविंद नामदेव यांनी कॅरेक्टर लिलया उचलुन पर्वतावर नेउन ठेवला होता. त्यामुळे अभिनय बघावा तर फक्त आमिर खानलाच बघा.
चित्रपटात चांगले नाविन्यपुर्ण दृश्य आहेत. उदा. जो तो मारत असतो म्हणुन आमिर गालावर देवदेवतांचे फोटो लावतो. कपडे "डांसिंग कार" मधुन उचलेले वापरतो. इत्यादी नविन कल्पना घेतल्या आहेत. शंकराचे सोंग घेतलेल्या सोंगाड्याच्या मागे देव आहे म्हणुन लागणे हा हाईट सीन आहे. तसेच वेगवेगळ्या धर्माच्या स्थानांवर जाताना होत असलेला गोंधळ हा देखील वेगळाच अनुभव देतो. संवाद चुरचुरीत आणि खोल अर्थाचे आहेत. "भगवान ने तुम्हे बनाया है या तुमने भगवान को" "धर्म का स्टँम्प लोग लगाते है. भगवान तो सबको एकजैसे मानते है" या संवादांना भोजपुरी तडका दिल्याने फ्रेश वाटतात.
चित्रपटात फसलेले देखील आहे. थोडे टर्मिनेटर, थोडा कोई मिल गया, थोडा ओह माय गॉड मिक्स करुन बनवलेला वाटले. पिंडीवर टाकलेले दुध गरिबांना वाटा सारखे मुद्दे देखील उचलगिरीसारखे वाटले. आमिर हात पकडुन भाषा शिकु शकतो तर अनुष्काचा हात पकडुन हिंदी का शिकावीशी वाटली नाही. जेव्हा त्याच्या भोवतालचे सगळेच हिंदी बोलत होते. राजस्थानी भैरोसिंगला एका झटक्यात भोजपुरी कळते? जर पीके एलिअन असतो तर तो त्याचा धर्म काय आहे हे कशाला शोधत बसतो? तो तर बाहेरुन आलेला आहे. सुरुवातीला तटस्थ दृष्टीकोन असणारा नंतरनंतर हिंदु धर्मावर जास्त वेळ थांबतो. हे टाळायला हवे होते. जर टाळता येत नव्हते तर सगळ्या धर्मावर थोडा थोडा वेळ घेतला असता तर अधिक संयुक्तिक वाटले असते. उदा. जेव्हा आमिर लोटांगण केल्यावर बोलतो त्याच वेळेला मोहरमला त्याने जे मातम केले असते त्यावर काही बोलत नाही. ? जिथे लोटांगण केल्यावर जो त्रास झाला तो मातमच्या वेळेला कितीतरी अधिक झाला असेल. पण त्यावर एकही कटाक्ष नाही. ??
अनेक धर्मांच्या विसंगती दाखवताना योग्य मर्मावर बोट ठेवले आहे. पण उगाच त्यात "लव जिहाद" वगैरे मांडुन मुस्लिम मुलगा हिंदु मुलगीच्या लग्नाला समर्थन देणे, मुस्लिम मुल धोका देत नाही, वगैरे वाक्य अनावश्यक घुसवली आहे. सगळ्याच मुद्द्यांना हात लागलाच पाहिजे याचा अट्टाहास नको करायला पाहिजे होता. तुम्ही अंधश्रध्देविरुध्द दाखवत आहात चांगले आहे. पण त्यातुन एकाला झुकते माप नको द्यायला. ही गोष्ट "ओह माय गॉड" मधे अत्यंत योग्यरित्या हाताळली होती. ती उणीव प्रकर्षाने जाणवली.
अंधश्रध्देच्या नावाखाली देवाचा बाजार सग़ळ्याच धर्माने मांडलेला आहे. खरतर आजच्या काळात धर्मच या बाजारामुळे टिकुन राहिलेला आहे असे वाटत आहे.. लोक धर्म वाचवण्याकरीता युध्द करतात जिहाद करतात फतवे काढतात. पण देव वाचवण्याकरीता कोणी काही करत नाही. तसे देवाला वाचवण्याकरीता या अश्या लोकांच्या कुबड्यांची काहीच आवश्यकता नाही. ज्याने हे ब्रह्मांड बनवले. त्याला कसली भीती? त्याचे कोण काय नष्ट करेल? ही धर्मांध लोक तर त्याच्या खजगिणतीत देखील नसतील. मग आपण कुणाची भीती दाखवतोय? कुणाला प्रसन्न करतोय ? लोकांना धर्माची गरज काय.? याचे उत्तर ज्या दिवशी सापडेल तेव्हा देव सुध्दा पृथ्वीवर अवतरेल. या धर्मामुळे त्यावरुन होणार्या आपापसातल्या भांडणामुळे तो देखील कंटाळुन दुसरीकडे निघुन गेला असेल. "बसा भांडत तुम्ही. चुक केली मी बनवुन तुम्हाला." आपल्या आचरणाने पृथ्वीवरुन आपणच देवाला घालवुन लावले आहे. मग त्याला कुठे शोधत बसले आहात? तुम्ही स्वतःमधे सुधार करा. देव स्वतःहुन परत येईल.
धर्माला जीवनात कितपत महत्व द्यायचे आहे हे तुमचे तुम्ही ठरवा
ओह माय गॉड मधे एक वाक्य परेश रावल तोंडी आहे "धर्म एकतर माणसाला दयनिय करतो नाहीतर अतिरेकी बनवतो"
त टी. :- चित्रपटाला स्टार देउ नयेच. कोणी काहीतरी पोटतिकडीने सांगत आहे शिकवण देत आहे त्याकडे लक्ष द्यायचे सोडुन तुला ३ स्टार ४ स्टार कसे म्हणायचे? हे तर असे झाले प्राध्यापकांनी लेक्चर दिल्यावर "सरांनी काय ५स्टार वाले लेक्चर दिले ना" "नाही नाही मला तर २स्टार वालेच वाटले" असे विद्यार्थी बोलत आहेत.
फारएण्डच्या १८:५३ पोस्टला +१
फारएण्डच्या १८:५३ पोस्टला +१
आमीर खान मुस्लिम आहे व
आमीर खान मुस्लिम आहे व त्याकरता ह्या सिनेमाकडे जास्त काळजीपूर्वक बघावे असे मला आजिबात वाटत नाही.
निकाहमधेही सलमा आगा होती की. पण त्यामुळे सिनेमातील काटछाटीत कुठलीही सूट दिली गेली नाही.
एकंदरीत हिंदी सिनेसृष्टीचा दुटप्पीपणा भयंकर खटकतो.
हिंदूंच्या मूर्खपणावर टीका, चेष्टा केली तर ती त्यांच्या भल्यासाठीच असते आणि त्यांनी विरोध करायचा असेलच तर फक्त संवैधानिक मार्गच चोखाळावेत. मात्र मुस्लिमांची गोष्टच वेगळी. त्यांच्या धर्मातील प्रथा, कालबाह्य परंपरा ह्यांच्याविरुद्ध बोलण्याचा कुणालाही हक्क नाही कारण तो थेट देवाच्या तोंडून आलेला धर्म आहे. असा काही संदेश आजवरच्या घटना देत आहेत असे वाटते. अशा प्रकारचा पक्षपातीपणा हा घातक आहे. बहुसंख्य व अल्पसंख्य सगळ्याच गटांकरता. मोकळिक द्यायची तर सर्वांना. बंधने घालायची तर सर्वांना असे धोरण असणे जास्त तर्कसंगत आहे.
असले उथळ पिक्चर शारुख किंवा
असले उथळ पिक्चर शारुख किंवा अक्षयकुमारने करावेत. आमीरने केलेले मला तरी झेपत नाहीत.>>>>>> ऑ???
<<<<धूम ३??? गझनी??? मंगल पांडे??? मेला??? मन्न???? (तरी यात ९० च्या दशकांतले लव्ह लव लव्ह, अव्वल नंबर टाईप डझनभर पिक्चर धरले नाहीत.)>>> नंदिनी +१
मला तर तो कधी पर्फेक्शनिस्ट वै वाटत नाही. कारण चित्रपट एकट्य हीरोचा नसतो.
वरचे प्रश्नचिन्हवाले पिक्चर
वरचे प्रश्नचिन्हवाले पिक्चर मी पाहिलेले नाहीत त्यामुळे त्यातला आचरटपणा माहित नाही. तरी पुन्हा असला आचरटपणा आमीरकडून अपेक्षित नाही.>>> मग मेला बघाच वेळ काढुन.
हिंदूंच्या मूर्खपणावर टीका,
हिंदूंच्या मूर्खपणावर टीका, चेष्टा केली तर ती त्यांच्या भल्यासाठीच असते आणि त्यांनी विरोध करायचा असेलच तर फक्त संवैधानिक मार्गच चोखाळावेत. मात्र मुस्लिमांची गोष्टच वेगळी. त्यांच्या धर्मातील प्रथा, कालबाह्य परंपरा ह्यांच्याविरुद्ध बोलण्याचा कुणालाही हक्क नाही कारण तो थेट देवाच्या तोंडून आलेला धर्म आहे.
हे फक्त चित्रपटातच नाही तर सगळीकडेच असे आहे, त्यामुळे यावर बोलण्यात काहीच मतलब नाही.. असेही मुस्लीम ज्यांना सत्यासत्यतेची चाड आहे तेही स्वधर्मातील कालबाह्य गोष्टींवर बोलायचे टाळतात. जीवाशीच गाठ आहे म्हटल्यावर कोणीही घाबरेल.
असे असले तरी मला ह्या चित्रपटात खुप काही आक्षेपार्ह असे वाटत नाही. धर्म आणि अंधपणे पाळण्यात येणा-या परंपरा यात खुप फरक आहे. या परंपरांवर कोणी हसत हसत टीका केली आणि त्यामुळे कुठेतरी कोणीतरी एकजण जरी "मी जे आजवर करत आलोय ते काय आहे, त्यामागे काही तर्कसंगत विचार आहे की उगीच आंध़ळेपणे मी ते करतोय" हा विचार करायला लागला तरी ती टीका सत्कारणी लागली असे मी समजेन.
<<<<धूम ३??? गझनी??? मंगल
<<<<धूम ३??? गझनी??? मंगल पांडे??? मेला??? मन्न???? (तरी यात ९० च्या दशकांतले लव्ह लव लव्ह, अव्वल नंबर टाईप डझनभर पिक्चर धरले नाहीत.)>>> त्याची perfectionist image सरफरोश, लगान , दिल चाहता है ह्या चित्रपटानंतरच उदयास आलेली आहे. साधारणपणे २००० साल असावे
अवांतर - हि नाव वाचताना मला तुम मेरे हो आठवला. सपेरा होता अमीर त्याच्यात. आत्ता पिढीला दाखवला तर डोक्यावर हात मारून घेतील
तुम मेरे हो>>>>>> खरंच. आठवला
तुम मेरे हो>>>>>> खरंच. आठवला मलाही
shendenaxatra>> मोकळिक
shendenaxatra>> मोकळिक द्यायची तर सर्वांना. बंधने घालायची तर सर्वांना असे धोरण असणे जास्त तर्कसंगत आहे.>>
अगदी बरोब्बर बोट ठेवलंय तुम्ही नेमकं मर्मावर.
ची perfectionist image
ची perfectionist image सरफरोश, लगान , दिल चाहता है ह्या चित्रपटानंतरच उदयास आलेली आहे. साधारणपणे २००० साल असावे>> मी म्हणूनच पोस्ट २००० सिनेमाच लिहिले आहेत. मेला २००० सालीच रीलीज झालाय (देखो २००० जमाना आ गया असं एक चित्रपटाशी शेंडाबुडखा नसलेलं गाणं पण होतं त्यात. हा आमिरचा आजवरचा सर्वात हिडीस पिक्चर आहे) पिक्चर रीलीज होइपर्यंत आमिर त्यामध्ये "क्रीएटीव्हली इन्वॉल्व्ड होता" फ्लॉप झाल्यावर त्याचा काहीच संबंध नाही राहिला.
देखो २००० जमाना आ गया >>>>>>>
देखो २००० जमाना आ गया >>>>>>> काय काय आठवतंय आज.
काय हा योगायोग.. आजच्या
काय हा योगायोग.. आजच्या तारखेलाच ते गाणे आठवावे..
कमरीया लचके रे, बाबू जरा बचके रे पण भारी..
मेलाचे टायटल साँग मात्र खरेच चांगले होते.. चित्रपटातील एकमेव जमेची बाजू, मात्र ऐकण्यापुरतेच.. चित्रपटात मुळीच बघू नका.. तिथेही घाण केलेली.
ह्या बातमी खालच्या
ह्या बातमी खालच्या प्रतिक्रिया खुपच भारी आहेत..
बहूमत आले तरी कळवळणे चालूच
बहूमत आले तरी कळवळणे चालूच आहे
p k च्या निमित्ताने आमिर खान
p k च्या निमित्ताने आमिर खान चे कुठले कुठले चित्रपट आठवतायत. ( ह्याला P K चा effect म्हणावा काय ) मला आत्ता तो त्याचा & माधुरीचा दिवाना असा काहीतरी नाव असलेला आठवला
दिवाना मुझसा नहीं.
दिवाना मुझसा नहीं.
दिवाना मुझसा नहीचे टायटल सोंग
दिवाना मुझसा नहीचे टायटल सोंग मला खूप आवडायचे तेव्हा.. ओ जाने जाना जरा रूक जाना के तुने मुझे जाना नही सब कुछ कहना मगर ये ना कहना के मेरे पीछे आना नही तेरे पीछे आउंगा मै अपना बनाऊंगा मे जायेगी बचके कहा के दिवाना मुझसा नही ओ ओ ओ दिवाना मुझसा नही ..
ऋन्मेऽऽष - अरे तुझे वय काय
ऋन्मेऽऽष - अरे तुझे वय काय आहे? खूप जुना मूवी आहे हा
ऋन्मेष, तुझं वय काय आहे?
ऋन्मेष, तुझं वय काय आहे? दिवाना मुझ सा नही ९० किंवा ९१ चा असेल.
दिवाना मुझसा नही बराच बरा होता. अव्वल नंबर, लव लव लव. जवानी जिंदाबाद, प्यार का अफसाना, आत़ंक ही आतंक हे त्याचे भयाण पिक्चर. इश्क हा पण असलाच भंगार पिक्चर. (कॉमेडी असला तरी पिक्चर भंगारच होता)
मृणाल, अहो मुलींना आणि
मृणाल,
अहो मुलींना आणि स्मार्ट मुलांना वयं विचारायची नसतात हो.
चित्रपट ९०-९१ चा असेल तर माझ्या कानावर नंतर आले असेल. तसेही तेव्हा ट्रेलरचा जमाना नव्हता, कधी गाणी गाजली तर पुढे मागे कानावर पडायची. चित्रपटालाही हेच लागू.
इश्क हा पण असलाच भंगार पिक्चर. (कॉमेडी असला तरी पिक्चर भंगारच होता) >> भंगार नाही बोलता येणार त्याला, कदाचित त्या टाईपचा चित्रपट हि आपली आवड नसावे, पण चित्रपटाच्या जातकुळीनुसार छान जमला होता. आजही ते रामरामराम मरामरामरा बघून आठवून हसायला येते
कधी गाणी गाजली तर पुढे मागे
कधी गाणी गाजली तर पुढे मागे कानावर पडायची. चित्रपटालाही हेच लागू. - हे गाणे गाजले होते ??????
इश्क मी नंतर टीव्ही वर पाहिला
इश्क मी नंतर टीव्ही वर पाहिला होता. बकवास वाटला. विशेष म्हणजे एकदाही हसु आलं नव्हतं.
हे गाणे गाजले होते
हे गाणे गाजले होते ??????
>>>>
हो, असेल नसेल पण मला अशी बडबड टाईप गाणी आवडतात..
उदा. १
जाने मन जाने मन तेरे दो नयन चोरी चोरी ले के गये देखो मेरा मन जाने मन जाने मन जाने मन...
उदा. २
तू यार तूही दिलदार तुही मेरा प्यार तेरा मेरे दिल मे है दरबार कर दे एक बार बेडा पार लगे घरबार मुझे बेकार फिरू मै बनके तेरा जोगी
यु आर इरीटेटींग.
यु आर इरीटेटींग.
(No subject)
सस्मित +१
सस्मित +१
आज धर्मांध लोकांना अखिलेश
आज धर्मांध लोकांना अखिलेश यादव सणसणीतच वाजवली
पीके युपीत tax free झाला
जियो अखिलेश जियो
असेच तोंडच फोडा
व्वा मजा आया
टॅक्स फ्री मागचे गणित काय
टॅक्स फ्री मागचे गणित काय असते नक्की?
हा व्यावसायिक चित्रपट आहे, आधीच छापतोय, ते देखील तिकिट किंमती डबल करून, याला टॅक्स फ्री करण्यात काय पॉईंट आहे?
बराच राजकिय पोळी
बराच
राजकिय पोळी भाजणार्यांसाठी मोठाच आहे
सस्मित | 31 December, 2014 -
सस्मित | 31 December, 2014 - 05:56 नवीन
इश्क मी नंतर टीव्ही वर पाहिला होता. बकवास वाटला. विशेष म्हणजे एकदाही हसु आलं नव्हतं.
--->
ऐकावे ते navalach ... छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घ्यायला शिका ...
मी पण एके काळी असाच होतो ... नंतर मला कळले ki sagale hastaat मला का हसू येत नाही.. कारण मी हसण्यापेक्षा फालतू विचार करायचो.. हे काय कॉमेडी आहे का... logic आहे का या सीन मध्ये ...
so ... परत एकदा बघा... जास्त डोके लावू नका... नक्की हसाल ...
दिवाकर देशमुख, >> गाम्या
दिवाकर देशमुख,
>> गाम्या गांधीहत्या म्हण जिथेतिथे स्वत:ची लायकी आणि घरातल्यांचे संस्कार दाखवू नकोस
अहो, तुमची लायकी माझ्यापेक्षा जास्त आहे हे तर कबूल कराल ना? खरंतर म्हणूनच तुमच्या आश्रयाने राहतोय इथे मायबोलीवर. तुमचा सत्संग लाभल्याने एकतर माझी लायकी वाढेल किंवा तुमची तरी कमी होईल. दोन्ही पर्याय मला लाभदायक आहेत. पण जर मी माझी लायकी दाखवलीच नाही तर ती तुमच्याहून कमी आहे की जास्त ते कसं कळणार?
आ.न.,
-गा.पै.
Pages