लोकसत्तामधील लेख, जागुचे अभिनंदन!!!

Submitted by नितीन बाबा शेडगे on 31 December, 2014 - 04:57

आपल्या पाककृतीच्या रसभरीत वर्णनाने वेगळ्याच दुनियाची सफर घडवून आणणारी सर्वांच्या आवडीची जागु (प्राजक्ता म्हात्रे) यांचा दि. २८ डिसेंबर २०१४ च्या लोकसत्ता च्या लोकरंग या पुरवणी मध्ये (शेवटचे पान ) पोपटी वरती लेख आलेला आहे. लेख वाचून पुन्हा जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. मुरुड, अलिबाग परिसरात केलेल्या पोपटी पार्टीच्या आठवणी जाग्या झाल्या. लेख आल्याबद्दल जागुचे अभिनंदन!!!

लिंक साठी येथे क्लिक करा http://epaper.loksatta.com/405216/indian-express/28-12-2015#page/30/2

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नितीन शेगडे धन्यवाद. हा धागा वाचल्यावर आधी मला धक्काच बसला.

पूर्वी मी मायबोलीवर पोपटीची रेसीपी दिली होती. तो धागा गाजून पोपटीच्या पार्ट्याही झाल्या माबोकरांच्या. मलाच जाता आले नाही पण मायबोलिकरांनी फोन करून मात्र मला त्यात सामिल करून घेतले.

लोकसत्तामध्ये रेसिपीसकट माहीती व वेगळ्या स्वरूपात पार्टीचे वर्णन दिले आहे.

सर्व मायबोलिकरांचे धन्यवाद. मायबोलीकरांच्या प्रोत्साहनामुळेच लेखन करण्याला उत्साह येतो.

पार्टी ती पण पोपटीची. जागु हार्दिक अभिनन्दन!:स्मित: लिहीत रहा, आणी मुख्य म्हणजे तुमच्या ( उरण, पनवेल वगैरे) परीसरातले फोटो पण टाकत रहा. आम्ही देशावर असलो तरी मग मन मात्र कोकणात रेन्गाळत रहाते.:स्मित:

अभिनंदन जागू! लेख मस्त लिहिला आहे.

नितीन बाबा शेडगे ,
खरंच , कौतुकाची छान कल्पना सुचली.

हार्दीक अभिनंदन , जागू
तुमच्या सर्वच रेसीपी'ज छान आहेत

जागू, अभिनंदन! नविन वर्षाची सुरुवात छान बातमीने झाली. तुझे लेख पेपरमधे छापले की मायबोलीवर सांगत जा म्हणजे आम्हांला समजेल.
नितीन शेडगे, तुम्ही ही बातमी आम्हाला दिल्याबद्दल तुम्हांला धन्यवाद!

अभिनंदन जागू ! पोपटी पार्टी, मेंदळ नि भांबुर्ड्याचा पाला एकदम सगळे आठवले नि उघडल्यावर ओव्याचा घमघमता वास आठवला.

Pages