डिसेंबर महिना सुरु झाला की वेध लगतात ते नव्या वर्षाचे पण ज्यांची संक्रांत पहिली आहे त्यांना नवीन वर्षाबरोबरच वेध लागतात ते काळी साडी, हलव्याचे दागिने यांचे.
माझ्या नणंद बाई हलव्याचे दगिने करण्यात एक्सपर्ट आहेत आणि त्यांना करायची खूप हौस पण आहे . माझ्या मुलीच्या बोरनहाणाच्या वेळी त्यांनी सुंदर कृष्णाची हलव्याची वाडी केली होती आणि आता त्याच मुलीचे लग्न होऊन तिची पहिली संकांत आली तेव्हाही त्या तिच्यासाठी हलव्याचे दागिने करायला तयार, आता जवळ जवळ ऐंशीच्या घरात असूनही. हलव्याचे दागिने बनवणे कौशल्याचे, कष्टाचे आणि चिकाटीचे काम आहे. पण परमेश्वर कृपेने त्यांच्याकडे अजूनही ती क्षमता अहे. पूर्वी त्या हलवा ही घरीच करीत असत. पण आता हलवा विकत आणतात. हलव्याचे सर करण्यासाठी खाली बसावे लागते आणि पाय लांब करुन पायाच्या अंगठ्यात दुपदरी दोरा धरुन त्यात हलवा जिग च्या सहायाने फिक्स करावा लागतो. त्यांनी केलेल्या दागिन्यांचा फोटो खाली देत आहे .
From mayboli
हातात बांगड्या पाटल्या तोडे, गळ्यात मंगळसूत्र, तन्मणी आणि हार, दंडात वाकी , नाकात नथ, कपाळावर बिंदी, कानात झुमके आणि कुड्या (काय हव ते घाला ), बोटात अंगठी असे सगळे दागिने त्यांनी स्वतः तयार केले होते आणि जावयांसाठी दोन पदरी हार आणि पुष्पगुच्छ (ऑरगंडीची फुलं मी नेट वर बघुन केली आणि त्यावर हलव्याचे सर सोडले त्यामुळे नंतर ही तो पुष्प्गुच्छ म्हणून वापरता आला. )
जावयांसाठी हत्ती वर हलव्याच्या गोणी ( पोती) टाकुन तो हत्ती ही जावयांना देण्याची प्रथा आहे. तो ही फोटोत दिसतो आहे. हत्तीच्या पाठीवर सजवलेली झूल घालुन त्यावर हलव्याच्या गोणी लादल्या आहेत. विविध आकाराच्या पिशव्या करुन त्यात हलवा भरुन देण्याची पद्धत आहे. त्या पिशव्या ही मी स्वतः केल्या आहेत. या सगळ्यात माझा ही वेळ छान गेला.
From mayboli
From mayboli
जावयांसाठी हलव्याने भरलेली वाटी आणि लेकीसाठी काळी साडी घ्यायलाच हवी. अशी सगळी तयारी झाली संक्रांतीच्या सणाची. लेक आणि जावई यायचे तेवढेच बाकी होते. पण कहाणीमध्ये ट्विस्ट आली. ती होती सिंगापूरला आणि ऑफिसमध्ये आयत्या वेळेस अर्जंट काम निघाल्याने तिला यायला जमणार नाही असे कळले. इकडे आम्ही सगळेच हिरमुसलो. नणंदबाईनी किती हौसेने दगिने केले होते. पण इच्छा असली की मार्ग निघतोच. ते सगळ वाण आणि दगिने घेऊन आम्हीच तिकडे जाण्याचा बेत केला पण इतके नाजुक दगिने नेणार कसे ? त्यावर ही तोडगा निघाला. पेठे सराफांकडे जाऊन मी रिकामे ज्वेलरी बॉक्स देण्याची त्यांना विनंती केली आणि नवल म्हणजे काहीही कुरकुर न करता त्यानी ते देण्याचे लगेचच मान्य केले . मग काय त्या ज्वेलरी बॉक्स मधुन ही ज्वेलरी अगदी अल्गद एक ही हलवा न पडता सिंगापूरला पोचले खरी पण एक खंत लागुन रहिली ती म्हणजे नणंद बाई काही येऊ शकल्या नाहीत तिकडे वयोमानामुळे. त्यांना फोटो वरच समाधान मानावे लागले. तो हा फोटो.From mayboli
संक्रांतीच्या आधीच फोटो टाकला आहे कारण दागिने करण्यात जर कोणाला रस असेल तर फोटोचा उपयोग होऊ शकेल. तसेच कोणाला हलवा करायचा असेल तरी आता त्याची कृती ही दिनेश दानी दिली आहे.
सुमेधा यानी हलवा कसा तयार करतात ते दिनेशदा यांना विचारले होते. नेहमीप्रमाणे दिनेशदा यांना ते माहित होतेच त्यांनी प्रतिसादात हलव्याची अगदी परफेक्ट कृती दिली आहे. तीच खाली देत आहे. म्हणजे ती सगळ्यानाच पहिल्या पानावर दिसेल.
दिनेशदा यांनी दिलेली हलव्याची कृती :
इथे सर्वांच्या सोयीसाठी हलव्याची कृती देतोय.
एक वाटीभर साखर घेऊन त्यात वाटीभर दूध घालायचे. साखर विरघळली कि ते गरम करत ठेवायचे. उकळी आली कि मग त्यात अर्धी वाटी ताक टाकायचे. थोड्या वेळाने मळी वर येते. ती काढून टाकायची. पाक थोडा उकळून चौपदरी फडक्याने गाळून घ्यायचा. पाक शुभ्र होणे महत्वाचे आहे. हा पाक सतत गरम ठेवावा लागतो.
मग एका परातीत किंवा कढईत तीळ ( अर्धी मूठ ) भाजायला घ्यायचे. ते सतत हलवत रहायचे. त्यावर अर्धा अर्धा चमचा पाक टाकत रहायचा. तो सुकला कि परत टाकायचा. थोड्या वेळाने त्याला काटा येऊ लागतो. हे काम पहाटेच्या थंडीतच करायचे असते तर चांगला काटा येतो. परातीला पाक चिकटला तर तीळ काढून परात स्वच्छ धुवायची, पुसायची आणि परत हे काम सुरु करायचे.
तीळासोबत खसखस, वेलची दाणे, काकडीच्या बिया वगैरे पण वापरतात. रंगीत करायचा असेल तर बेसिक काटा आल्यानंतर पाकातच रंग टाकायचा. तयार हलवा थोडा वेळ उनात ठेवायचा.
बाजारी हलव्यात परात स्वच्छ करत नाहीत म्हणून त्यावर पांढरट थर दिसतो, घरचा हलवा चमकदार होतो. ( माझी आई घरी करत असे पुर्वी. )
मस्त झाले आहेत दागिने आणि
मस्त झाले आहेत दागिने आणि एकंदरच तिळवण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अश्विनी , धन्यवाद पहिल्या
अश्विनी , धन्यवाद पहिल्या प्रतिसादासाठी.
सुरेख झालेय सारं !
सुरेख झालेय सारं !
अप्रतिम आहेत सगळेच हलव्याचे
अप्रतिम आहेत सगळेच हलव्याचे दागिने. ताटात ठेवलेल्या पिशव्या पण सुंदर आहेत आणि सगळे फोटो पण छान .पहिल्या फोटोतला पहीला वरचा चिंचपेटीसारखा दिसणारा दागिना कीती नाजुक आणि मस्तच आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अप्रतिम आहेत सगळेच दागिने!
अप्रतिम आहेत सगळेच दागिने! फुलांचा गुच्छ आणि पिशव्याही छान!
मस्तच आहेत सगळे दागिने
मस्तच आहेत सगळे दागिने![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद. सांगते नणंदबाईना
धन्यवाद. सांगते नणंदबाईना दागिने आवडले म्हणून.
खुप सुरेख हेमाताई, सांगा
खुप सुरेख हेमाताई, सांगा तुमच्या नणंदबाईना.
दागिन्यांची मांडणीही मोहक.
लिखाणही खुप सुंदर. मग सध्या मु.पो. सिंगापुर का. एन्जॉय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सर्वच दागिने सुंदर. सगळंच
सर्वच दागिने सुंदर. सगळंच करणं किती नाजुकसाजुक आहे.
.
.
.
.
खूप छान झालेत दागिने ....
खूप छान झालेत दागिने ....
सुरेख आहेत सगळे दागिने.
सुरेख आहेत सगळे दागिने. आवडलेच !
सुरेख !
सुरेख !
खुपच छान, माझ्या पहिल्या
खुपच छान, माझ्या पहिल्या संक्रांतीची आठवण झाली. मज्जा येते. मी छल्ला ही केला होता हलव्याचा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर.
सुंदर.
अप्रतिम .......
अप्रतिम .......
खुप सुबक झाले आहेत दागिने..
खुप सुबक झाले आहेत दागिने.. हलवा घरी करणे अत्यंत कौशल्याचे काम असते आणि दागिने करणे तर त्याहून कौशल्याचे !
धन्यवाद सगळ्यांना. नणंद बाई
धन्यवाद सगळ्यांना. नणंद बाई खुश होतील तुमचे प्रतिसाद बघुन
दिनेशदा स्टेप बाय स्टेप कृती
दिनेशदा स्टेप बाय स्टेप कृती सांगाल का हलव्याची? आता तुम्हाला तरी नक्की माहीत असेल असे आपले गृहीत धरते आहे.
किती सुंदर आहे हे सगळं मला
किती सुंदर आहे हे सगळं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला नॉर्मली प्रथा म्हणून सण साजरे करायला किंवा त्यातल्या काही गोष्टी करायला आवडत नाहीत. त्यातला एक प्रकार म्हणजे हलव्याचे दागिने घालणे. कारण एकतर बाजारात त्या दागिन्यांसाठी पळापळ करा. पैसे खर्च करा. पुन्हा मनासारखे मिळतील आची खात्री नाही. परत ते एकदा घालून झाले की पडून रहाणार.
पण असे इतके सुंदर आणि सुबक, मन लावून निगुतीने, प्रेमाने घरी केलेले दागिने कोणाला घालायला नाही आवडणार? एकुण एक दागिना सुबक सुंदर. मला तर हे दागिने बघुनच त्यातलं प्रेम जाणवतंय
मी पुन्हा पुन्हा येऊन पाहतेय हे दागिने
रीया, बरोबर आहे तुझं. बाजारात
रीया, बरोबर आहे तुझं. बाजारात मिळणारे दगिने आणि हे दागिने ह्यांच्या क्वालिटी मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. कौशल्य, कष्ट आहेत त्या मागे पण मिळणारे फळ ही मोठेच आहे ह्यात शंका नाही.
असे घरी प्रेमाने केलेले दागिने घालताना दागिने घालणार्याला तर आनंद मिळतोच पण करणार्याला ही तेवढाच आनंद मिळतो
मनीमोहोर काय सुरेख दागिने
मनीमोहोर काय सुरेख दागिने आहेत! तुमची लेक अतिशय लकी आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद!!
काय सुंदर केलेत सगळे दागिने!!
काय सुंदर केलेत सगळे दागिने!! अगदी सुबक! तुमच्या नणंदबाई खरंच खूप मोठ्या कलाकार आहेत. आणि शिवाय हौशी पण किती! ग्रेट!!
तुम्ही हे सगळं इथे शेयर केल्याबद्दल धन्स! त्यांना हे सगळे दागिने खूप आवडल्याचं जरूर सांगा...:स्मित:
तुमची लेक अतिशय लकी आहे.>>>>अगदी अगदी...
काय सुंदर केलेत सगळे दागिने!!
काय सुंदर केलेत सगळे दागिने!! अगदी सुबक! तुमच्या नणंदबाई खरंच खूप मोठ्या कलाकार आहेत. आणि शिवाय हौशी पण किती! ग्रेट!!
तुम्ही हे सगळं इथे शेयर केल्याबद्दल धन्स! त्यांना हे सगळे दागिने खूप आवडल्याचं जरूर सांगा...स्मित
तुमची लेक अतिशय लकी आहे.>>>>अगदी अगदी... +११११११
सुरेख आहेत सगळे दागिने
सुरेख आहेत सगळे दागिने![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हेमा ताई खूप सुंदर दागिने.
हेमा ताई खूप सुंदर दागिने. तुमच्या नणंदबाई कसल्या ग्रेट आहेत. तुमची लेक ही भाग्यवान आहे.
इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
हे सगळे प्रतिसाद नणंदबाईं ना नक्की दाखवा.
सुमेधा, इथे सर्वांच्या
सुमेधा,
इथे सर्वांच्या सोयीसाठी हलव्याची कृती देतोय.
एक वाटीभर साखर घेऊन त्यात वाटीभर दूध घालायचे. साखर विरघळली कि ते गरम करत ठेवायचे. उकळी आली कि मग त्यात अर्धी वाटी ताक टाकायचे. थोड्या वेळाने मळी वर येते. ती काढून टाकायची. पाक थोडा उकळून चौपदरी फडक्याने गाळून घ्यायचा. पाक शुभ्र होणे महत्वाचे आहे. हा पाक सतत गरम ठेवावा लागतो.
मग एका परातीत किंवा कढईत तीळ ( अर्धी मूठ ) भाजायला घ्यायचे. ते सतत हलवत रहायचे. त्यावर अर्धा अर्धा चमचा पाक टाकत रहायचा. तो सुकला कि परत टाकायचा. थोड्या वेळाने त्याला काटा येऊ लागतो. हे काम पहाटेच्या थंडीतच करायचे असते तर चांगला काटा येतो. परातीला पाक चिकटला तर तीळ काढून परात स्वच्छ धुवायची, पुसायची आणि परत हे काम सुरु करायचे.
तीळासोबत खसखस, वेलची दाणे, काकडीच्या बिया वगैरे पण वापरतात. रंगीत करायचा असेल तर बेसिक काटा आल्यानंतर पाकातच रंग टाकायचा. तयार हलवा थोडा वेळ उनात ठेवायचा.
बाजारी हलव्यात परात स्वच्छ करत नाहीत म्हणून त्यावर पांढरट थर दिसतो, घरचा हलवा चमकदार होतो. ( माझी आई घरी करत असे पुर्वी. )
मनीमोहोर, त्यांना ही कृती
मनीमोहोर, त्यांना ही कृती दाखवून, सुधारून हेडर मधेच देणार का ?
हेमाताई कित्ती सुरेख आहेत
हेमाताई कित्ती सुरेख आहेत सगळे दागिने.
तुमच्या नणंदबाईंना खरच दंडवत. ह्या वयात इतक्या उत्साहाने सारे करतात.
तुम्ही बनवलेल्या पिशव्याही खुप सुंदर आहेत.
Pages