जम्मू-काश्मीर व झारखन्ड निवडणू़क निकाल

Submitted by Mandar Katre on 22 December, 2014 - 14:17

जम्मू-काश्मीर व झारखंड मधील निवडणू़क नुकतीच पार पडली . या निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी ७.०० वाजल्यापासून सुरू होत असून निकाल साधारण १०.०० वाजेपर्यंत येण्यास सुरुवात होइल. पंतप्रधान नरेन्द्र मोदी जी यांच्या सभांना काश्मीरात मिळालेला उदंड प्रतिसाद आणि काही एक्झिट पोल्स चे रिझल्ट्स बघता भाजपला काश्मीर मध्ये नक्कीच लक्षणीय यश मिळेल असा कयास असून झारखंडमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता आहे. कलम ३७० , दहशतवादी फुटीर कारवाया , तसेच अन्य अनेक समस्यानी जखडलेल्या काश्मिर मध्ये हिन्दुबहुल भाजप ला निर्णायक जागा मिळाल्यास त्याचे काश्मिर प्रश्न कायमचा निकालात काढण्याच्या दॄष्टीने दूरगामी परिणाम होतील ,असा अन्दाज आहे.

या निवडणूक निकालासंबन्धी चर्चा करण्यासाठी हा धागा ..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झारखंडा मधे भाजपला निर्णायक बहुमत मिळेल याबाबतचा अंदाज एक्झीट पोल मधे आलेला आहे.

रहाता राहिला प्रश्न जम्मु काश्मिर मधला. जिथे जम्मू आणि लढाख भागात भाजपला जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे. एकुण ८७ जागापैकी अनुक्रमे कश्मिर मध्ये ४६ तर जम्मू मधे ३७ आणि लढाक मध्ये ४ अशी विभागणी आहे.

भाजपला ३७+४ अश्या सर्वच जागांवर विजय मिळालातरी जम्मू काश्मिर मध्ये सरकार स्थापनेसाठी ३-४ जागा कमी पडतात. जम्मू आणि लढाक मधुन ४१ जागा येणे शक्य नाही म्हणजे काश्मिरमधुन भाजपला किमान ४६ पैकी १० जागा मिळाल्या तर काही शक्यता आहे.

भाजपची इथे स्वःबळावर सरकार स्थापनेची शक्यता मर्यादीत आहे

In both states their will be no party with clear majority. BJP is very close in Jharkhand and grabbed good seats in J & K. But overall below expectations. Modi magic is fading now. For Modi Govt it is time to stop talking & do concrete work.

PDP + INC मिळून सरकार स्थापन करतील असे वाटतय. भाजप कुठल्याही प्रकारे सत्तेत येईल असे दिसत नाही. पण मारलेली मुसंडी देखील काही कमी नाहिये.