P K..!! राँग नंबर कि राईट नंबर?

Submitted by ऋग्वेद on 22 December, 2014 - 07:55

कनफुजन है ससुरा ई पिचरवा दैख के.. कभी ये राँग कॉल लगत है तो कभी राईट कॉल... इ तो हमैपे दिपेंन्द करत है के हम कोनसावाला भगवान को कॉल लगावत है... इ गोलामा इतने गॉड लोगोंका इतना मैनेजर है...पर ससुरा कौनो राईटवाला रास्ता नाई बतावत. सभै अपनी अपनी जेबन मा ऊ जो गांधीवाला कागद भरना चाहत रही.. ऊ फोटो ऊही कागज पर रही तो ही किमत रही. बाकी कागद उपर फोटो की कौनो वाईल्यु नाई.. भगवान ने हमे बनाया है या हमने ऊंके बनावे है.. इ बहुत बडा सवाल है...

आमिर खानचा चित्रपट "पी.के." अश्याच सगळ्या प्रश्नांना घेउन पृथ्वीतळावर येतो. राजु हिराणी आणि विधु चोप्रा यांनी ३ इडीअट्स नंतर एका वेगळ्या (ते म्हणतात) विषयावर चित्रपट घेउन आले. विषय चांगला आहे. परंतु आधी या विषयावर एक सकस, पौष्टीक, दणदणीत चित्रपट येउन गेल्यामुळे हा चित्रपट त्याच्या तुलनेत एकदम फिका वाटतो अर्थात जेवनाची सजावट उत्कृष्ट आहे. कपडे काढलेला टर्मिनेटर अ‍ॅर्नॉल्ड ( कोणता काय विचारत आहेत आताचा अ‍ॅर्नॉल्ड जरी गृहित धरला तरी तिन्ही खानची बॉडी एका बाजुला आणि त्याची एकट्याची एका बाजुला होईल.) आणि कपडे काढलेला आमिर यांच्यात फिजिकल फरक काय आहे. तोच त्या दोन चित्रपटांमधला फरक आहे. थोडेफार प्रश्न उचलतो थोडेफार मनोरंजन करतो तर थोडेफार विवाद वाढवतो ज्याची काहीच गरज नव्हती. (अर्थात हे माझ्या नजरेने)

तर चित्रपटाची कथा बर्‍याच वर्तमानपत्रांमधुन बाहेर आली आहे त्यामुळे स्पॉईलर अलर्ट वगैरे द्यायची काहीच गरज नाही आहे. Wink ज्यांना वाटत असेल त्यांनी अलर्ट दिलेलाच आहे असे मानुन पुढचे वाचा.
परग्रहावरुन पृथ्वीवर अभ्यास संशोधन करण्याकरीता आमिर खानचे यान राजस्थानाच्या एका ओसाड प्रदेशात उतरते. (ही गोष्ट वेगळी आहे कि पुर्ण चित्रपटभर आपल्याला त्याच्या संशोधनाचा विषय काय आहे हे सापडत नाही)
आता याना बाहेर साहेब उतरतात तर बिना कपड्यांचे कारण त्यांच्या इथे कपडे घालत नाही. उतरल्यावर त्या ना-गड्या आमिरला नेमका चोर भेटतो. चोर नेमका आमिरच्या गळ्यात असलेला रिमोट ( गळ्यात अडवलेले गॅजेट) हिसकावुन घेतो आणि पळुन जातो. (आमिरच्या अवतारावरुन दुसरी कोणतेही चोरण्यालायकीचे काहीच नसल्याने नाईलाजाने त्याला गळ्यातले गॅजेट चोरुन तो चोरच आहे हे दाखवावे लागते.) गॅजेट शिवाय आमिरला त्याच्या ग्रहावर परत जाता येत नसल्याने तो त्या चोराचा आणि गॅजेटचा शोध घ्यायला सुरुवात करतो. त्यात त्याला संजय दत्त आणि अनुष्का शर्मा भेटतात. या शोधामधे आमिरला बर्‍याच नवनविन कल्पना गोष्टी कळत जातात. त्याला या सगळ्या नविन असल्याने तो आपापल्या परिने अर्थ लावत जातो. तिकडे बाई अनुष्काला सुशांत बरोबर प्रेम होते परंतु तो पाकिस्तानी असल्यामुळे तिच्या घरातले नकार देतात या नकारामागे घरगुरु तपस्वी (सौरभ शुक्ला) असतात. त्यांच्यामते तो पाकिस्तानी असल्यामुळे तो तिला वापरेल आणि नंतर सोडुन जाईल. धोका देईल. मग दोघांचे ऐनवेळेला फाटते आणि ती बिचारी दिल्लीला येउन एका न्युजचॅनल मधे काम करायला सुरुवात करते. आमिर त्याचे गॅझेट शोधत शोधत दिल्लीला पोहचतो. आणि त्याची अ‍ॅस्युज्वल उज्ज्वल जगतजननी उर्फ जग्गुशी पडते. जी आपल्या नविन बातमीचा शोध घेत असते. आमिरच्या उटपटांग हरकतीमुळे तिचे ध्यान आकर्षित होते आणि ती त्याचा मागोवा घेते. पीके ला आधी बोलता येत नसते. पण पृथ्वीवर आल्यावर त्याला बोलण्यासाठी भाषेची आवश्यकता भासते. त्याला भाषा शिकण्यासाठी एखाद्या व्यक्तिचा हात पकडण्याची गरज आहे परंतु त्याच्या हरकतीमुळे त्याला कोणी हात देत नाही. त्या हात पकडण्याचा उलटा अर्थ काढुन भैरोसिंग (संजय दत्त) आमिरला "जन्नत" मधे घेउन जातो. (वास्तम मधे नार्वेकर संजयला घेउन जातो. इथे संजय आमिरला हिशोब फिट्टमफाट) जन्नत मधे गेल्यावर आमिरला खरतर सगळच हातात मिळते परंतु तो एलिअन असल्यामुळे असला काही प्रकार करण्याऐवजी गरजे पुरते त्याबाईचा हात हातात घेउन तिची भाषा डाउनलोड करुन घेतो. नेमकी ती भोजपुरी निघते म्हणुन सगळ्याचित्रपटात आमिर भोजपुरी बोलत असतो. दिल्लीत सगळा चोरीचा माल विकला जातो कळल्याने आमिर दिल्लीला जातो. तिथे जन्नत मधे मिळालेल्या थोड्याफार ज्ञानामुळे तो आधी पोलिसांना त्याच्या वस्तु बद्दल विचारतो. लोकांना विचारतो. सगळे त्याला वेड्यात काढतात आणि देवच तुझ्या प्रश्नांना उत्तर देतील आणि तुझी वस्तु देखील तेच देतील. सांगतात. मग पीके लागतो देवाच्या मागे त्याला वाटते या पृथ्वीवर सगळ्यांच्या समस्याचे निवारण देव नावाची शक्ती करते माझ्या देखील समस्याचे निवारण देवच करेल. त्याला काहीच माहीत नसल्याने तो सगळ्या धर्माच्या देवांना साकडे घालतो. पुजाअर्चा करतो. कोणत्याच धर्माचे नियम माहित नसल्याने याचे त्याला त्याचे याला जोड्तोड करुन घेतो. चर्च मधे पुजेची थाळी घेउन जातो गडबड होते. तिथे बघतो की देवाला वाईन देतात मग तो वाईन घेतो पण पोहचतो मशिदीमधे परत गडबड करतो. हिंदु स्त्रीला पांढर्या साडीत बघतो तेव्हा कळते ती विधवा आहे. मग तो ख्रिश्चन बाईला पांढर्या कपड्यात बघतो तर सांत्वन करायला जातो. तिथे कळते ती लग्नाला जात आहे. दुखात काळे कपडे घालतात. मुस्लिम बायकांना काळ्याकपड्यात बघितल्यावर परत तिथे जातो पण तिथे ही गडबड करतो. नंतर देवावरुन विश्वास उडायला लागतो तेव्हा त्याला त्याचे गॅझेट एका स्वामी कडे सापडते जो त्या गॅझेटला देवाचा हिरा म्हणुन लोकांना दाखवत असतो तो स्वामी आपला देवाशी बोलणे होत असते असा दावा करतो. अनुष्का या स्वामीचा फोलपणा आमिरच्या मदतीने उघडकिस आणते आणि त्याला त्याचे गॅझेट मिळवुन देते मग आमिर घरी रवाना होतो.

आता या कथेचे सार आपल्याला "ओह माय गॉड" चित्रपटात दिसलेला होता. तोच सार, तत्वज्ञान तीच रेसिपी हिराणीसाहेब आपल्या चितपरिचित चिमटे कोपरखळी यांचा मसाला वापरुन कढईला धर्मथोतांडाची आग लावुन गरम करुन त्यात चित्रपट नावाच्या थाळीत देतात आणि ते खायला काटाचमचे यांच्या जागी आमिर आणि अनुष्काला ठेवतात. त्यामुळे चव थोडी वेगळी लागते. बाकी सगळे सारखेच. दुर्दैवाने दोन्ही चित्रपटांची तुलना होउ लागते आणि पीके त्यात बराच मागे पडतो. मध्यंतरापर्यंत दोन्ही वेगवेग्ळ्या रस्त्यांवरुन समान धावत असताना मध्यंतरानंतर पीके अनुष्काच्या गुंत्यात अडकतो. ट्रॅक चुकतो आणि......... सुरुवात जितकी खुशखुशीत झाली होती त्याहुन अधिक रडका शेवट झालेला आहे. "ओह माय गॉड" मधे कांजीभाईचा कोर्टसीन हा चित्रपटाचा माईलास्टोनवाली जान होती. पीके मधे कोर्टसीन बदल्यात टिव्हीवरचा डिबेटसीन आणलेला आहे जो प्रचंड फसवा आणि लॉजिक नसलेला आहे. निव्वळ एका घडामोडीमधुन आमिरखानच बरोबर आहे आणि तो स्वामी खोटा आहे. वगैरे जे भासवले ते न पटणारे आहे. तो सीन खरतर धक्कादायक आहे पण नेमका तो लिहित असताना कोणत्या गोष्टीवर केंद्रीत करायचे आहे तेच उठुन दिसत नाही. तो धक्का गाजरमुली सारखा मामुली वाटुन जातो. असे चित्रपटात बरेच धक्के मिळतात पण ते जाणवेपर्यंत नविन उपद्व्याप चालु होतो.

चित्रपटात एक गाणे सोडुन बाकीची गाणी का आहेत ? याचे संशोधन करण्याकरीता मलाच कोणत्यातरी ग्रहावर जावे लागेल. खरतर असे बर्‍याच चित्रपटांमधे देखील हाच प्रश्न उद्भवतो. पण बाकीची गाणी अनावश्यक आहे. एलिअन नाचु शकतो गाऊ देखील शकतो हे दाखवायची गरज काय आहे? वर भरीतभर तो प्रेम देखील करतो ? नशिब "तडप तडप के इस दिलको" सारखे गाणे गात नाही.

कान मोठे करुन आणि डोळे वटारुन फिरणे या दोन गोष्टी आमिरने सहजरित्या केलेल्या आहे. (सतत डोळे वटारुन ठेवुन बघा कळेल) भोजपुरी भाषेच्या गमतीजमती अचुक आमिरने पकडल्या आहेत. बोलण्याची ढब परफेक्ट वाटते. प्रत्येक दृष्यात त्याने प्रचंड निरागसता दाखवुन काम केले आहे. एखाद दुसरा सीन ठिगळ लावल्यासारखा आहे पण फक्त त्यात आमिर असल्याने जाणवत नाही.त्याच्या अभिनयामुळे तो चित्रपटाशी एकरुप होउन जातो.
अनुष्का शर्मा फारच विचित्र दिसली आहे. तिच्या ओठांमुळे तिचा क्लोजप बघावासा वाटत नाही. नर्गिस फक्री अँजिलिना जॉली यांचे ओठ नुसते बघत राहावेसे वाटतात. पण अनुष्काचे ओठ तिच्या चेहर्‍यावरचे एलिअन वाटतात. मिसमॅच. त्यामुळे तिच्या अभिनयाकडे लक्ष जातच नाही सतत डोनाल्ड डकच नजरेसमोर नाचत आहे वाटते. तरी जितका बघितला त्यात ती ठिकठाक वाटली आहे.संजय दत्त, बोमण इराणी आणि सुशांत सिंग हे चवी पुरते आणि गरजे पुरते आहे.( त्यांना तितकेच ठेवले हे बरे केले) सुधीर शुक्लांनी स्वामी फक्त उचलला आहे असे म्हणावे लागेल. मिथुनदा , गोविंद नामदेव यांनी कॅरेक्टर लिलया उचलुन पर्वतावर नेउन ठेवला होता. त्यामुळे अभिनय बघावा तर फक्त आमिर खानलाच बघा.

चित्रपटात चांगले नाविन्यपुर्ण दृश्य आहेत. उदा. जो तो मारत असतो म्हणुन आमिर गालावर देवदेवतांचे फोटो लावतो. कपडे "डांसिंग कार" मधुन उचलेले वापरतो. इत्यादी नविन कल्पना घेतल्या आहेत. शंकराचे सोंग घेतलेल्या सोंगाड्याच्या मागे देव आहे म्हणुन लागणे हा हाईट सीन आहे. तसेच वेगवेगळ्या धर्माच्या स्थानांवर जाताना होत असलेला गोंधळ हा देखील वेगळाच अनुभव देतो. संवाद चुरचुरीत आणि खोल अर्थाचे आहेत. "भगवान ने तुम्हे बनाया है या तुमने भगवान को" "धर्म का स्टँम्प लोग लगाते है. भगवान तो सबको एकजैसे मानते है" या संवादांना भोजपुरी तडका दिल्याने फ्रेश वाटतात.

चित्रपटात फसलेले देखील आहे. थोडे टर्मिनेटर, थोडा कोई मिल गया, थोडा ओह माय गॉड मिक्स करुन बनवलेला वाटले. पिंडीवर टाकलेले दुध गरिबांना वाटा सारखे मुद्दे देखील उचलगिरीसारखे वाटले. आमिर हात पकडुन भाषा शिकु शकतो तर अनुष्काचा हात पकडुन हिंदी का शिकावीशी वाटली नाही. जेव्हा त्याच्या भोवतालचे सगळेच हिंदी बोलत होते. राजस्थानी भैरोसिंगला एका झटक्यात भोजपुरी कळते? जर पीके एलिअन असतो तर तो त्याचा धर्म काय आहे हे कशाला शोधत बसतो? तो तर बाहेरुन आलेला आहे. सुरुवातीला तटस्थ दृष्टीकोन असणारा नंतरनंतर हिंदु धर्मावर जास्त वेळ थांबतो. हे टाळायला हवे होते. जर टाळता येत नव्हते तर सगळ्या धर्मावर थोडा थोडा वेळ घेतला असता तर अधिक संयुक्तिक वाटले असते. उदा. जेव्हा आमिर लोटांगण केल्यावर बोलतो त्याच वेळेला मोहरमला त्याने जे मातम केले असते त्यावर काही बोलत नाही. ? जिथे लोटांगण केल्यावर जो त्रास झाला तो मातमच्या वेळेला कितीतरी अधिक झाला असेल. पण त्यावर एकही कटाक्ष नाही. ??
अनेक धर्मांच्या विसंगती दाखवताना योग्य मर्मावर बोट ठेवले आहे. पण उगाच त्यात "लव जिहाद" वगैरे मांडुन मुस्लिम मुलगा हिंदु मुलगीच्या लग्नाला समर्थन देणे, मुस्लिम मुल धोका देत नाही, वगैरे वाक्य अनावश्यक घुसवली आहे. सगळ्याच मुद्द्यांना हात लागलाच पाहिजे याचा अट्टाहास नको करायला पाहिजे होता. तुम्ही अंधश्रध्देविरुध्द दाखवत आहात चांगले आहे. पण त्यातुन एकाला झुकते माप नको द्यायला. ही गोष्ट "ओह माय गॉड" मधे अत्यंत योग्यरित्या हाताळली होती. ती उणीव प्रकर्षाने जाणवली.

अंधश्रध्देच्या नावाखाली देवाचा बाजार सग़ळ्याच धर्माने मांडलेला आहे. खरतर आजच्या काळात धर्मच या बाजारामुळे टिकुन राहिलेला आहे असे वाटत आहे.. लोक धर्म वाचवण्याकरीता युध्द करतात जिहाद करतात फतवे काढतात. पण देव वाचवण्याकरीता कोणी काही करत नाही. तसे देवाला वाचवण्याकरीता या अश्या लोकांच्या कुबड्यांची काहीच आवश्यकता नाही. ज्याने हे ब्रह्मांड बनवले. त्याला कसली भीती? त्याचे कोण काय नष्ट करेल? ही धर्मांध लोक तर त्याच्या खजगिणतीत देखील नसतील. मग आपण कुणाची भीती दाखवतोय? कुणाला प्रसन्न करतोय ? लोकांना धर्माची गरज काय.? याचे उत्तर ज्या दिवशी सापडेल तेव्हा देव सुध्दा पृथ्वीवर अवतरेल. या धर्मामुळे त्यावरुन होणार्‍या आपापसातल्या भांडणामुळे तो देखील कंटाळुन दुसरीकडे निघुन गेला असेल. "बसा भांडत तुम्ही. चुक केली मी बनवुन तुम्हाला." आपल्या आचरणाने पृथ्वीवरुन आपणच देवाला घालवुन लावले आहे. मग त्याला कुठे शोधत बसले आहात? तुम्ही स्वतःमधे सुधार करा. देव स्वतःहुन परत येईल.

धर्माला जीवनात कितपत महत्व द्यायचे आहे हे तुमचे तुम्ही ठरवा

ओह माय गॉड मधे एक वाक्य परेश रावल तोंडी आहे "धर्म एकतर माणसाला दयनिय करतो नाहीतर अतिरेकी बनवतो"

त टी. :- चित्रपटाला स्टार देउ नयेच. कोणी काहीतरी पोटतिकडीने सांगत आहे शिकवण देत आहे त्याकडे लक्ष द्यायचे सोडुन तुला ३ स्टार ४ स्टार कसे म्हणायचे? हे तर असे झाले प्राध्यापकांनी लेक्चर दिल्यावर "सरांनी काय ५स्टार वाले लेक्चर दिले ना" "नाही नाही मला तर २स्टार वालेच वाटले" असे विद्यार्थी बोलत आहेत.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपटाला स्टार देउ नयेच. कोणी काहीतरी पोटतिकडीने सांगत आहे शिकवण देत आहे त्याकडे लक्ष द्यायचे सोडुन तुला ३ स्टार ४ स्टार कसे म्हणायचे? हे तर असे झाले प्राध्यापकांनी लेक्चर दिल्यावर "सरांनी काय ५स्टार वाले लेक्चर दिले ना" "नाही नाही मला तर २स्टार वालेच वाटले" असे विद्यार्थी बोलत आहेत.

>>>>>> उद्या बघणार आहे. म्हणुन एवढंच वाचलं आणि आवडलं. बाकी नंतर वाचेन.

माझा आक्षेप फक्त झुकते माप देण्याबद्दलच आहे ( किमान मलातरी वाटले ) हेच जर दुसर्या कोणत्याही धर्माबद्दल झाले असते तरी माझा आक्षेप तोच राहिला असता. आणि हे केवळ २-३ दृष्यासाठीच आहे.

तटस्थ दृष्टीकोनातुन बघत असताना तुम्हाला एक चांगला एक वाईट म्हणता येत नाही. १:१ असावे लागते.

एलिअन तटस्थ असुन देखील जे दाखवता आले नाही ते कांजीभाईने तटस्थ नसुनही करुन दाखवले.
हा मुख्य फरक या दोन चित्रपटांमधे जाणवला. खरतर कांजीभाईपेक्षाही पुढे जाता आले असते तेव्हढी कल्पकता हिराणीसाहेबांकडे आणि आमिरखान मधे नक्कीच आहे यात दुमत कुणाचेही नसावे. परंतु सगळ्या दगडांवर हात ठेवायचा अट्टाहास नडला.

छान लिहिलेय. मी नाही पाहीला .टर्मिनेटरवरचा भाग घेतलाय याची आयडीया होती . अगदी वाईट नसेल पण राजकुमार हिरानीने विषय धाडसी निवडला आहे .ओ माय गॉड खुप आवडला होता त्याचाशी थोडाफार रीलेटेड असेल तरी पहायला हवा .

नेमकी ती भोजपुरी निघते म्हणुन सगळ्याचित्रपटात आमिर भोजपुरी बोलत असतो.
>>>>
अरे देवा, मला जाम त्रास होतो त्या भाषेचा, आणि ते नेमके आमीरच्या तोंडी, मला हा चित्रपट सहन करणे कठीण आहे मग...

मिथुनदा , गोविंद नामदेव यांनी कॅरेक्टर लिलया उचलुन पर्वतावर नेउन ठेवला होता.
>>>>>
अरे मिथुनदा तर जब्बरदस्त होता त्या कॅरेक्टरमध्ये..!!

पण उगाच त्यात "लव जिहाद" वगैरे मांडुन मुस्लिम मुलगा हिंदु मुलगीच्या लग्नाला समर्थन देणे, मुस्लिम मुल धोका देत नाही, वगैरे वाक्य अनावश्यक घुसवली आहे.
>>>>>>
यावरून वातावरण बरेच ठिकाणी (सोशलसाईटसवर पेटलेय खरे) पण चित्रपट आमीरबरोबर राजकुमार हिराणीचा सुद्धा आहे हे ही लक्षात घ्यायला हवे, आमीरचा धर्म मुसलमान म्हणून त्यालाच टारगेट केले जातेय. हे ही चूकच आहे. इथेही तटस्थपणा टिकाकारांनी दाखवायला हवा. Happy

@ परीक्षण लिहिलेय मात्र छान.

paresh रावल चा मोविए हा सुमार होता ... मुळात त्याचे नुकसान jhale म्हणून तो देव नाही हे सिद्ध करायला jato ...

ani biggest flaw म्हणजे अक्षय कुमार as कृष्ण ...

Peekay बाझी मारून जातो ...

ani ऋग्वेद - तो तेवढा तुमचा ID change करा ho ...

हा आयडी कोणाचा आहे ते माहीत नाही पण उदयची भाषा वाटतेय Happy
छान लिहिलंय. मला हा सिनेमा पहायची इच्छा नव्हतीच आणि आता तर अजिबात्च नाहीये

आमिरचा अभिनय सोडला तर बाकी सिनेम्यात दम नाही. वर म्हटल्याप्रमाणे तीन-चार सिनेम्यांतून काहि तुकडे सावटले व ते एकत्रईत करुन त्याला पीके असे नाव दिले. आमिरच्या जबरदस्त अभिनयामुळे माणूस सिनेमा सहन करुन घेतो तरी सुद्धा तुकडे ते तुकडेच.
ज्यानी ओएम्जी, कोई मिल गया व टर्मिनेटर पाहिले नाही त्यासाठि मात्र एक सुपर मेजवानी ठरावी असा आहे.

ऑ माय गॉड हजारपटीने चांगला आहे.

नेटवरुन घेउन फुकट पाहिला.. १००० रु घालुन थेट्रात पाहण्यासारखा नक्कीच नाही

काउ, बरोबर आहे तुमचं. जालावर क्यामेरा प्रिंटची टॉरेंट मिळताहेत पुष्कळ. हल्ली फोनचे क्यामेरे पावरबाज झाल्याने प्रिंट देखील बघणीय असते.
आ.न.,
-गा.पै.

चित्रपट पाहिला. करमणूक आणि त्यातला संदेश चांगला वाटला. काही सीन वर बंदी येऊ शकेल पण चित्रपटाच्या कथेच्या ओघात ते चुकीचे वाटले नाहीत.

अमेरिकन ह्युमर हा एक भन्नाट प्रकार आहे . मुख्य म्हणजे ते त्यात कुणाचीच पत्रास ठेवत नाहीत . the Simpsons हि माझी आवडती मालिका आहे . स्टार World या वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रोज रात्री आठ वाजता असतॆ . त्यात ते जिझस , कथोलिक चर्च आणि एकूण धर्माची जी रेवडी उडवतात ती बघून आपल्याकडच्या धर्मप्रेमी लोकाना फेफरे येऊ शकतात . म्हणूनच ते आपल्या चित्रपटातून जॉर्ज बुश शी ची हत्या झाल्याच दाखवू शकतात (पाहा डेथ ऑफ प्रेसिडेण्ट चित्रपट ) मग The Interview या चित्रपटात मारला जातो असे दाखवला गेलेला किम किस चिडीया का नाम है . हॉट शोटस या चित्रपटातून त्यांनी सद्दाम हुसेन ची अशीच खिल्ली उडवली होती . अतिरेकी धर्मांध लोक तिथे पण आहेत पण जनमानस प्रगल्भ असल्याने त्याना एका सीमेबाहेर आपला चड्फ़डाट व्यक्त करता येत नाही . दा विन्सी कोड चित्रपटात तर त्यांच्या धर्मावर मुलभूत प्रश्न उपस्थित केले होते आणि तिथल्या अतिरेकी धर्मान्धानी त्यावर बंदी आणण्यासाठी खूप प्रयत्न पण केले पण सर्वसामान्य वाचकाने ते पुस्तक पण भरपूर विकत घेतले आणि त्यावर बनलेला चित्रपट पण खूप चालला . मला स्वतःला या बाबतीत अमेरिकेच्या तुलनेत आर्थिक दृष्ट्या खूप मागे असलेल्या , जाती धर्मात विभागलेल्या भारतीय समाजमनाचे अमेरिकन समाजमना शी धक्कादायक साधर्म्य आढळते . म्हणजे धर्माचे ठेके घेतलेल्या लोकांनी कितीही आरडा ओरडा केला तरी पीके तिकीट खिडकीवर खच्चून चालतो , लज्जा या पुस्तकाच्या शेकडोंनी प्रती खपतात आणि वारकरी संप्रदायाने आक्षेप घेऊन पण एलिझाबेथ एकादशी चित्रपट houseful गर्दी खेचतो . बाकी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हि दुधारी तलवार आहे . एकूणच पीके च्या समर्थनात उतरलेली मंडळी 'मी नथुराम बोलतोय' नाटकाचा विषय निघताच काखा वर करू लागतात . असे का ? let people choose . लोक ठरवतील ना काय पाहायचं आणि काय नाही ते . आणि आता पर्यंत चा अनुभव असा आहे कि भारतीय जनता अतिरेकी वादाला स्वीकारत नाही . अतिरेकी पणा त्याना पचत नाही . बाकी पीके वरच्या अनाठायी आरोपांना हिंदू लोकांनीच या वर्षातला सगळ्यात मोठा हिट चित्रपट बनवून उत्तर दिले आहे .

अवांतर - एक कलाकृती म्हणून पीके मला मुळीच आवडला नाही . त्यापेक्षा याच विषयावरचा Oh My God कितीतरी सरस होता .

बावरा मन,

>> बाकी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हि दुधारी तलवार आहे . एकूणच पीके च्या समर्थनात उतरलेली मंडळी 'मी नथुराम
>> बोलतोय' नाटकाचा विषय निघताच काखा वर करू लागतात . असे का ?

या प्रश्नाशी सहमत. जर रेवडीच उडवायची होती तर पीके मध्ये एका विशिष्ट पंथाचं चित्रण का आलं नाही? त्यात भरपूर विरोधाभास आहेत. अगदी नुकतीच एका विशिष्ट ठिकाणी एक विशिष्ट घटना घडलीये. तीत निष्पाप कोवळ्या जिवांना एका विशिष्ट ठिकाणी धाडण्यात आलंय. आहे का कोणाची हिम्मत यावर पीकेछाप चित्रपट काढायची? विशिष्ट पंथाचं नाव घेतलं की पीकेसमर्थकांच्या विशिष्ट कपड्यांचा रंग विशिष्ट होतो.

आ.न.,
-गा.पै.

चित्रपटाविरुध्द जे रान माजवण्यात आले आहे त्यावरुन चित्रपटाचाच जास्त फायदा होत आहे हे सत्य आहे

चित्रपटाविरुध्द जे रान माजवण्यात आले आहे त्यावरुन चित्रपटाचाच जास्त फायदा होत आहे हे सत्य आहे>>

सहमत. अनुल्लेखाने मारणे ही गोष्ट अजून आपल्याला शिकायची आहे. इथे अनुल्लेख म्हणजे विरोध न करणे हे अभिप्रेत नाही. इथे तो शब्द म्हणजे चित्रपटगृहात जाऊन तो चित्रपट न बघणे.

ऋग्वेद, परिक्षण हाडाच्या चित्रपटसमीक्षकाने लिहील्यासारखे वाटते आहे (भाषा अधिक पॉलिश करावी हा आग्रह).

छान लिहीले आहे. आवडले परीक्षण.

पाक चे अवास्तव कौतुक वगैरे भंकस सोडली तर धमाल चित्रपट आहे. पाक बद्दलचा सगळा भागच बळंच घातलेला दिसतो- कदाचित पाक हे पोटेन्शियल मार्केट असावे. तो भाग मात्र जाम डोक्यात गेला.

तेवढे सोडले तर चित्रपट आवडला. हिंदू धर्माविरूद्ध काहीतरी अजेंडा आहे असे अजिबात वाटत नाही. धर्माचा बाजार मांडलेल्यांबद्दल बर्‍याचश्या जनरल कॉमेण्ट्स आहेत. अनेक उदाहरणे हिंदू धर्मातली आहेत, पण प्रेक्षकवर्गही प्रामुख्याने हिंदूच आहे तर ते तसेच असणार.

बावरा मन,
आपली अमेरीकेची पोस्ट आवडली,
आणि या समाजमनाबाबत आपल्याकडे साधर्म्य आढळते तर येस्स, या चित्रपटांचा जो टारगेट ऑडियन्स आहे तो तरी नक्कीच असे विचार आकांडतांडव न करता स्विकारतो.

With more than 80.5% population of Hindus in India, Hinduism has the largest number of followers in India. People connect more to movie if they use Hindu examples...

Pages