अंड्या राईस थालीपीठ (लसूण फ्लेवर) -- "ख्रिस्तमस्त स्पेशल" लेख

Submitted by ऋन्मेऽऽष on 21 December, 2014 - 03:50

..

स्थळ - स्वत:चेच घर.!

काळ - आई घरी नसतानाचा ..

वेळ - भूक लागण्याच्या जराशी आधीची (कारण हा पदार्थ केल्याकेल्या थेट गरमागरम खाण्यातच मजा आहे)

साध्य - वेळ पडल्यास आपणही काही करू शकतो हे ग’फ्रेंडला दाखवून देणे.

साहित्य - चूल, लायटर, भांडीकुंडी... भात, कालवण, अर्धा डझन अंडी... आणि आईचा आशिर्वाद!

फोटो - शेवटी टाकलाय (अर्थात, तुमचा आधीच बघून झाला असेल)

.......

क्रमवार पाकृ :-

१) आपल्या नेहमीच्याच पद्धतीने पांढरा वाफाळलेला भात (प्लेन स्टीम राईस) करून घ्या. मी कूकरमध्ये आईने शिकवलेल्या फळफळीत भाताच्या मापानुसार केला.

२) अंड्याचे कालवण तुमचे तुम्हालाच करता येत असेल तर उत्तमच. मला नाही जमत, पण घरात आदल्या रात्रीचे कांद्याचे कालवण होते. (हे आईने केलेले होते, म्हणून वर साहित्यात उल्लेखलेला आईचा आशिर्वाद!) तर, त्यातलेच थोडेसे एका टोपात घेऊन गॅसवर गरम करायला ठेवले. जेव्हा त्याला उकळ्या, (आनंदाच्या नाही हं) फुटू लागल्या तेव्हा त्यात पटकन वरतून एक अंडे फोडून सोडले. एकसंधच सोडायचे म्हणजे एकसंधच राहते. थोड्याच वेळात ते मस्त रटरटून शिजते. अंड्याची चव कालवणात भिनते आणि कालवण अंड्यात मुरते.

३) एक आणखी टोप घेत त्यात तेल तापायला ठेवायचे. दोन अंडी त्यातही फोडत ती मस्त भुर्जीसारखी फ्राय करून घ्यायची. मात्र मीठ-मसाला किंवा कसलेही लाड त्यांचे करायचे नाहीत. अंड्याची प्लेन चव येणे गरजेचे. तसेच फ्राय सुद्धा जेमतेमच करावे. किंबहुना थोडाफार ओलसरपणा त्यात शिल्लक राहिलेला चांगलाच. जेणेकरून त्यात भात मिसळल्यावर अंड्याची चव भातभर पसरते.

४) आता त्याच फ्राय अंड्याच्या टोपात, भात घेऊन त्याला खरपूस परतून घ्यावे.

५) शिर्षकात लसूण फ्लेवर नमूद केले आहे, त्याला अनुसरून लसूण फ्लेवर शेव-फरसाण त्या भातात मिसळून घ्यावी. हि शेव खाण्याच्या वेळी कुरकुरीत न राहता तिचे नरम पीठ झालेले असते, तसेच त्यातील लसणाचा ठसका देखील भातात मुरला जातो आणि हेच यात अपेक्षित असते, अन्यथा कांदेपोह्यावर शेव भुरभुरतात तशी शेवटाला टाकण्यात काही अर्थ नाही.

६) आता हा भात तळता तळताच त्यात वरतून अंड्याचे कालवण सोडावे. त्यातील शिजलेल्या अंड्याचे काविलत्याने / चमच्याने तुकडे तुकडे करून ते भातात इत्र तित्र सर्वत्र मिसळले जातील हे पहावे.

७) कालवणाचे प्रमाण भात बरेपैकी ओला होईल असेच घ्यावे. अन्यथा सुकेसुके झाले की मजा गेली. त्यानंतर हे मिश्रण रटरटून वर यायला लागले की थांबावे. मिश्रणाला वरवर पाहता खिमाट लूक आलेला असतो पण भात पुरेसा फळफळीत बनवला असल्यास अ‍ॅक्चुअली ते तसे नसते. त्यातील शेव-फरसाणाच्या नरम झालेल्या पीठाने भाताला मस्तपैकी बांधून ठेवलेले असते.

८) आता त्याला सुटलेला वास पाहता हावरटासारखे त्यावर तुटून पडायची लाख इच्छा होईल, मात्र इथेच खरी संयमाची गरज असते. त्यातील थोडा थोडा भात एका पसरट ताटलीत घेऊन खालील फोटोत दाखवल्याप्रमाणे थालीपीठासारखे थापून घ्यावे. जाडसर थर केल्यास त्यातील वाफ लवकर बाहेर न पडता पदार्थ जास्त वेळ गरम राहतो.

सजावट (खाण्यासाठी किंवा फोटोसाठी) - सजावट म्हणून काकडी गाजर बीट टमाटर जे उपलब्ध असेल ते खाद्यपदार्थ उगाचच कॉंम्बिनेशनमध्ये बसत असो वा नसो, चकत्या करत आसपास पसरवावेत. कोबी असल्यास उभा चिरून पसरवू शकता. मी तसे केले नाही, कारण मला पाहुण्यांना न देता स्वत:लाच खायचे होते. (अर्थात, पाहुण्यांना द्यायचे असते तरी मी एवढी मेहनत घेतली असती का, हा वेगळा मुद्दा झाला.) याउपर एखादे खेळणे वा आकर्षक शोपीस ताटाभोवती ठेऊ शकता, जसे की मी केलेय. लहान मुलांना हि मांडणी लुभावू शकते. (ईथे लहान मूल मी स्वत:च होतो) याउपर पाटाभोवती जी काही रांगोळी काढायची असेल ती विविध प्रकारचे फोटो एडीटींग सॉफ्टवेअर वापरून थेट फोटोवर सजावट करू शकता. कारण या अतिसजावटीच्या नादात मूळ पदार्थ थंड होता कामा नये, अन्यथा मजा गेली हे आता मी तिसर्‍यांदा सांगतोय!..

फोटो - फोटोवर असलेले माझे नाव मोबाईलवरती टाकल्याने ते कॉम्प्युटरवर अंदाजापेक्षा मोठे दिसू लागलेय. तरी यामागे आपले नाव मोठे करायचा माझा कोणताही हेतू नव्हता याची नोंद घ्यावी.

anda rice 2_small size.jpgतोंडी लावायचे पदार्थ - कैरीचे लोणचे फोटोमध्ये दिसत असेलच. याउपर भाजलेला पापड यावर छान लागतो. मसाला पापड करता आल्यास उत्तमच. सोबतीला कोणतेही फसफसणारे पेय न घेता कैरीच्या पन्ह्याला पसंती द्यावी.

वाढायचे प्रमाण - समोरच्याच्या पोटाचा घेर पाहून ठरवावे. ठेंगा नियमानुसार किमान तेवढ्या क्षेत्रफळाचे थालीपीठ थापावे.

लागणारा वेळ - जेवढा मला हे लिहायला लागला, त्यापेक्षा कमीच! ..आणि माझा लिखाणाचा वेग अफाट आहे!..

अधिकच्या टेपा - जर तुम्ही खरेखुरे शाकाहारी असाल तर अंड्याचे (माबो आयडी नव्हे) नाव पाहताच हा धागा उघडलाच नसता, पण तसे झाले असल्यास या पदार्थाच्या निमित्ताने अंडे चाखून मनातली सुप्त इच्छा पुर्ण करायला हरकत नाही.

सामाजिक संदेश - यंदाच्या ख्रिस्तमस्तला आपली संस्कृती जपत केक ऐवजी हे थालीपीठ थापून कापा, कापून चाखा आणि ख्रिस्ती नववर्षाचा आनंद द्विगुणित करा.

माहीतीचा सोर्स -- ईश्श.! अर्थातच, माझी (शाकाहारी) ग’फ्रेंड Happy

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

ता.क. - पाकृती विभागात हि माझी पैलीच एंट्री. लोकांना आवडली तर मस्तच. पण न आवडल्यास, मी हार न मानता पुन्हा नवीन जोमाने प्रयत्न करेन, दॅटस द ऋन्मेऽऽष's स्पिरीट !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिषेकला झालीय 'विनाशकाले विपरित बुद्धी'! त्याच आधीचं लेखन, लेकीच्या जन्मानन्तर आलेला लेख किंवा व्यक्तिचित्रणात त्याला मिळालेले पारितोषिक हे पहाता त्यांच्याकडून कसदार लेखनाची अपेक्षा होती. मायबोलीला नवीन पिढीतील दमदार लेखक मिळाला असेही वाटत होते. पण तो अजूनही Orkut काळात वावरतोय असं दिसतय. असो त्याची इच्छा!

पण ते खेळणे बघुन ॠन्मेष आणि त्याची ग फ्रे ती रिंग एकमेकांकडे फेकून खेळत असतील का? Lol असा विचार मनात आला.

त्याच आधीचं लेखन, लेकीच्या जन्मानन्तर आलेला लेख किंवा व्यक्तिचित्रणात त्याला मिळालेले पारितोषिक हे पहाता त्यांच्याकडून कसदार लेखनाची अपेक्षा होती. मायबोलीला नवीन पिढीतील दमदार लेखक मिळाला असेही वाटत होते. पण तो अजूनही Orkut काळात वावरतोय असं दिसतय. असो त्याची इच्छा!>>> +१/

आपण अजून लहान आहोत हे दाखवण्याचा पिरपिरीत अट्टहास आहे हा. लव्कर सुधरा. अन्यथा मल्टीपल आयडेम्टीटी क्रायसिसि व्हायचा.

रीयाचा कयास खरा ठरला अखेरीस!!
रीयाला जाहीर पारीतोषिक द्यायला हवं सगळ्या ड्युआयडींची अंडी-पिल्ली बरोब्बर शोधून काढते!!

काला अर्थातच आवडला नाही...
एक टिप : कांद्याचे कालवण / रस्सा तयार होते त्याला एक उकळी आणून, मग गॅस बंद करून अंडी हळूच फोडायची त्यात. ढवळायची नाहीत! तसेच गोळे हलके शिजू द्यायचे... हे अंड्याचे कालवण!! छान लागतं हे ही... मग भातावर कालवायचं... कालाच करायचा तर वर वेफर्सचे तुकडे, लसूण शेव, पालक शेव, टोमॅटो शेव, दाणे-फुटाणे हाती लागेल तो चखणा भुरभुरायचा...

शब्द खुणात पण जी. एफ. आली आहे आता स्मित)>> शाब्बास! जोरदार मार्केटिंग फंडा आहे हा!!
>>

मार्केटींग बाबत माझे दोनच आदर्श आहेत.
चित्रपटसृष्टीत शाहरूख खान
आणि राजकारणात __/\__

Pages