खग ही जाने खग की भाषा - भाग ४

Submitted by कांदापोहे on 16 December, 2014 - 00:16

गेली काही वर्ष पक्षीनिरीक्षण करताना मिळालेले निवडक पक्षी मायबोलीवर प्रकाशचित्रणात डकवावेसे वाटत होते पण लिमीटेड नेट व इथे प्रकाशचित्र देणे हे सोप्पे काम नोहे हे कळुन चुकल्यामुळे केलेला कंटाळा यामुळे ते जमत नव्हते. इथे २० च्या वर प्रकाशचित्र टाकणार्‍या सर्व छायाचित्रकारांना हॅटस ऑफ. Happy

याआधीचे काही प्रयत्न खाली बघता येतील. Happy

उडान - भिगवण पक्षीनिरीक्षण इथे http://www.maayboli.com/node/22764 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग 1 इथे http://www.maayboli.com/node/26925 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग 2 इथे http://www.maayboli.com/node/32865 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ३ इथे http://www.maayboli.com/node/42131 बघता येईल.

असो जास्ती पाल्हाळ न लावता आता जमतंय तर हे काम फत्तेच करुन टाकतो.

हुमा घुबड Indian Eagle Owl (मयुरेश्वर पक्षी अभयारण्य) साधारण खडकाळ भागात दिसते. आकार खुपच मोठा असतो.

नेपाळी गरुड Steppe Eagle (सासवड) गवताळ प्र्देशात सापडतो. अग्नेय युरोप, दक्षिण रशिया, ईशान्य चीन, पूर्व मंगोलिया येथे वीण. हिवाळ्यात मध्यपूर्व भागात, पूर्व व दक्षिण आफ्रिकेत व दक्षिण आशियात स्थलांतर. भारतीय उपखंडात तो पाकिस्तान,नेपाळ व उत्तर भारतात येतो

देवससाणा Common Kestrel (ARAI टेकडी)

सुभग Common Iora पिल्लु (सिंहगड पायथा)

सुभग Common Iora सुभग व सुगरण हे वेगवेगळे पक्षी आहेत. Happy

चित्रबलाक Painted Stork (कुंभारगाव भिगवण)


कांडेसर Wooley Necked Stork (कुंभारगाव भिगवण) कांडेसर करकोचा आकाराने साधारण गिधाडा एवढा असतो. हा करकोचा तलावांचे काठ, नद्या, भातखाचरं आणि दलदलीच्या प्रदेशात आढळतो. या करकोच्याची मान पांढरी शुभ्र आणि डोकं व शरीर काळं असतं. मासे, बेडूक, पाणसाप हे त्याचं खाद्य

Scaly Brested Munia हे पक्षी साधारण ज्वारी बाजरीची शेते किंवा उसाची शेते इथे नक्की दिसतात.

Spotted Owlet (मगरपट्टा सिटी व ARAI)

पाणकोंबडी White Breasted Waterhen ही अतिशय लाजाळु असते. थोडा जरी जवळ जाण्याचा प्रयत्न केलात तर उडुन किंबा पळुन जाळुन लपुन बसते. शक्यतो पाणथळीच्या ठिकाणी सापडते.

Bar-Headed Geese पट्टकादंब हंस (वीर धरण) हे दर वर्षी मंगोलियातून उडतात आणि काही लहान मोठे थांबे घेऊन पुण्यातील खडकवासला, कवडीपाट अशा काही मोजक्या पाणवठ्यांवरही ते दिसतात.

White-throated fantail

Spot Billed Duck खुपच कॉमन व शक्यतो पाणथळीच्या ठिकाणी सापडते.

लाल मुनिया Red Adavat

साळुंकी Jungle Myna

सुगरण Baya Weaver (सिहगड पायथा)

अनेक जणांनी लिहीले आहे की सुररणीची हिरवे घरट पहिल्यांदाच बघीतले. घरटे हिरवे दिसत आहे कारण ते शिवणे चालु होते. तुम्ही बघीतलेले घरटे हे बांधुन राहुन पिल्ले झाल्यावर बघितले असेल. तेव्हा ते वाळते. या पक्षाच्या नर हे घरटे नारळाच्या झावळीची पाने तोडुन मस्तपेकी विणत जातो. पूर्ण घरटे बांधुन झाले की मॅडम सुररण ते आतमधे जाऊन तपासतात व घरटे पसंत झाले की वराला पसंत करतात. मादीला ते पसंत नाही पडले तर नर ते क्वचित उसवुन परत विणायला घेतो. माझ्याकडे असा उसवतानाचा फोटो पण आहे. जमले तर टाकतो. अनेकदा ही घरटी झाडाखाला पडलेली दिसतात ती उसवलेली असतात.

हुश्श!! जमले एकदाचे. Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy धन्यवाद. इथे एकतर लिंका कशा द्यायच्या तेच झेपत नाहीये. धागा सार्वजनिक न करताच कसा दिसला हे पण एक कोडे आहे.

.

वॉव मस्त फोटो. फॅनटेलच्या फोटोबद्दल विशेष अभिनंदन. इतक्या अतिचंचल पक्ष्याचा फोटो काढणं प्रचंड कठीण आहे.

अप्रतिम फोटोज... ते घुबडू आहे ना, त्याची एक गंमत म्हणजे, त्याच्या लक्षात आलं की माणसाने आपल्याला बघितलंय किंवा तो आपल्याकडे बघतोय; तर ते चक्क गमतीशीर उठाबशा काढतं....:स्मित:

सुरेख आलेत सगळे फोटो Happy

ते कपारीतलं पिल्लू घुबड क्युट दिसतंय.
लाल पक्षी पण मस्त.
सुगरणीचं हिरव्या चार्‍याचं घरटं पहिल्यांदाच बघितलं.
पाणकोंबडीच्या पायांना छोट्या पानवेली गुंडाळल्या गेल्या आहेत बहुतेक.

केप्या दोन नावानी एकच पक्षी अजिबातच खपवायचा नाही... सुगरण की सुभग ते नक्की ठरव...

बाकी सगळे फोटो कातील आले आहेत.. एखाद्या कॅलेंडरवर सुरेख दिसतील..

झकास! Happy
मी पण सुगरणीचं हिरवं घरटं प्रथमच पाहिलं. लाल पक्षी, हिरवा थर कापत जाणारं बदक, घुबड - हे खूप आवडले.

फार मस्त. काही फोटो फारच शार्प आलेत. या फोटोंचं कॅलेंडर वगैरे करतोस का? हे पक्षी कुठे दिसतात हे पण शक्य झाल्यास सांगशील का?

सुगरण आणि सुभग दोन्ही ठिकाणी एकच इमेज दिसते आहे.

Pages