डीडीएलजेचं गारूड

Submitted by टोच्या on 11 December, 2014 - 08:16

‘कम, फॉल इन लव्ह…’ अशी टॅगलाइन घेऊन आदित्य चोप्रानं निखळ करमणूक करणारी प्रेमकथा आणली आणि तिने अक्षरशः हिंदी चित्रपटांचे भविष्य बदलून टाकले. तो काळ अमिताभ नावाचे वादळ शांत होण्याचा होता. अमिताभने घालून दिलेल्या मार्गावरच चालण्याच्या उद्देशाने तेव्हा अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी यांसारख्या अॅक्शन हिरोंची नव्या दमाची फळी उभी राहिली. नव्वदच्या दशकानंतर हिंदी चित्रपट एकाच वळणाने जात होता. दणकट हिरो, त्याच्यावर झालेला अन्याय, त्यासाठी त्याचे पेटून उठणे, ड्र्ग्जचा व्यवसाय करणारा व्हिलन आणि झाडांभोवती फेर धरून नाचण्यापुरती हिरोईन. दहापैकी नऊ सिनेमांचे कथानक याच प्रकारचे असायचे. त्यामुळेच सुनील शेट्टीसारखा ठोकळाही भाव खाऊन गेला. त्याच दरम्यान शाहरूख, सलमान, आमीर या खान मंडळींचाही स्ट्रगल सुरू होता. चिकने-चोपडे चेहरे आणि सुमार शरीरयष्टी यामुळे तिन्ही खान अॅक्शन हिरो वाटत नव्हते. त्यामुळे सुरुवातीला ते या भाऊगर्दीतलेच एक होते. त्यावेळचे दिग्दर्शकही तसेच. अगदी यश चोप्रांपासून, यश जोहर, राकेश रोशन यांसारखे मोठे दिग्दर्शकही टिपीकल मारधाडीच्याच मार्गाने जात होते. अभिनयात जशी नव्या दमाची पिढी उतरली, तशी दिग्दर्शकांचीही एक नवी फळी तयार होऊ लागली होती. पण तरीही टिपीकल मारधाडीच्या चित्रपटांचा मार्ग सोडून वेगळी वाट चोखाळायची हिंमत कुणी करत नव्हते. ती हिंमत केली आदित्य चोप्राने. यश चोप्रांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्याने दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात प्रेमकथा हाताळली. तोपर्यंत अनेक प्रेमकथा येऊन गेल्या होत्या. मात्र, त्यात तोच तोपणा होता. आदित्यने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ अशा भल्या मोठ्या नावाने ही प्रेमकथा आणली. त्याच्या एक वर्ष आधी आलेला सूरज बडजात्याचा ‘लग्नाची कॅसेट’ म्हणून हिणवला गेलेला ‘हम आपके है कौन’ तुफान चालला होता. बाजीगर, करण-अर्जुन, दिवाना असे तीन-चार हिट सिनेमे नावावर जमा असलेला शाहरूख आणि तोपर्यंत फारसा प्रभाव न दाखवू शकलेली काजोल अशा जोडीला घेऊन आदित्यने आपला ड्रीम प्रोजेक्ट हातात घेतला. तोपर्यंत हिंदी चित्रपटांमधून फारशी न दिसलेली यूरोपातील सुंदर लोकेशन्स, पंजाबमधील सरसों की खेती यामुळे सिनेमाची फ्रेम अगदी फ्रेश झाली होती. जोडीला परदेशात राहणारा गुलछबू नायक आणि भारतीय संस्कारी घरात वाढलेली नायिका यांची तितकीच ताजीतवानी प्रेमकथा. त्यात त्यावेळी फेमस असलेल्या जतीन-ललीत या जोडगोळीचं संगीत आणि उदीत नारायण, कुमार सानू, लतादिदी आणि आशा भोसले यांच्या जादूई आवाजात अजरामर झालेली गाणी. हिंदी सिनेमांतील काही गाणी पहायला चांगली वाटतात, तर काही गाणी फक्त ऐकायलाच चांगली वाटतात. मात्र, डीडीएलजेची गाणी जितकी श्रवणीय होती, तितकीच ती प्रेक्षणीयही होती.
अशी ही प्रेमकथा पडद्यावर आली आणि लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतली. ‘मेहंदी लगा के रखना’ या गाण्यासाठी चार-चार वेळा हा सिनेमा पाहिलेले लोक मी पाहिलेत. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पहावी अशी निखळ प्रेमकथा असल्यामुळे सिनेमागृहातल्या खुर्च्यांच्या रांगाच्या रांगा कुटुंबे, मित्रमंडळींसाठी बुक असायच्या. ‘डीडीएलजे’ मिळाला आणि शाहरूख खान ‘राज’ झाला. या राजनेच त्याला आज ‘किंग खान’ बनवलंय. अन्यथा, शाहरूखही अजय देवगण, अक्षय कुमारच्या पंक्तीत मारधाडीचे सिनेमे करत बसला असता. डीडीएलजेने रोमॅण्टिक लव्ह स्टोरीचे एक युग सुरू केले, जे पुढे ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘हम दिल दे चुके सनम’ यांसारख्या सिनेमांनी पुढे नेले. नव्वदच्या दशकातल्या एका संपूर्ण पिढीवरच ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ने गारूड केलंय. आज सीडी, डीव्हीडी, इंटरनेट, केबल, डझनावारी हिंदी चित्रपट वाहिन्या यामुळे घरोघरी सिनेमे पहायची सोय झाली. हा सिनेमा इतक्या वेळा टीव्हीवर येऊनही प्रत्येक वेळी तो नवा वाटतो.
आज पस्तीशी-चाळीशीत असलेल्या पिढीला आजही या सिनेमामुळे आपले मोरपंखी दिवस आठवतात. सिनेमा येऊन वीस वर्ष उलटून गेलीत. मात्र, या सिनेमातला ताजेपणा कायम आहे. त्यानंतर सिनेमांतही अनेक ट्रेण्ड आले, स्थिरावले आणि पुन्हा बदलले. मात्र, डीडीएलजेच्या लोकप्रियतेत घट झाली नाही. ‘शोले’ न पाहिलेला माणूस भारतात दाखवा, असं म्हटलं जायचं. तसंच ‘डीडीएलजे’ न पाहिलेला माणूस दाखवा, असं म्हणावं लागेल. सुभाष घईंनाही डीडीएलजेची प्रेरणा घेऊन ‘परदेस’ बनवावासा वाटला. रोहित शेट्टीच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये राज-सिम्रनचा रेल्वे सीन, आणि करण जोहरने ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’तून ‘डीडीएलजे’ला दिलेली मानवंदना, ही या सिनेमाने चित्रपटसृष्टीवरही केलेल्या गारूडाची पावतीच. मुंबईतल्या मराठा मंदिर सिनेमागृहातून हा सिनेमा वीस वर्षांनंतर उतरणार आहे, अशा बातम्या माध्यमांमधून येत होत्या. मात्र, सिनेरसिकांच्या मागणीखातर तो न उतरविण्याचा निर्णय यशराज बॅनर्स आणि मराठा मंदिर थिएटरच्या प्रशासनाने घेतला. त्यामुळे रसिकांना याच थिएटरला डीडीएलजेचं आणखी काही वर्ष पहायला मिळणार आहे. तब्बल वीस वर्ष एकाच थिएटरला दररोज सुरू असणारा आणि दर रविवारी हाऊस फुल्लचा बोर्ड झळकणारा हा जगातील ‘न भूतो, न भविष्यति(?)’ असा सिनेमा ठरला आहे, असे मला तरी वाटते. आज १२ डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होऊन वीस वर्ष होत आहेत. हॅट्स ऑफ टू आदित्य चोप्रा अॅण्ड डीडीएलजे टीम.
--

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"हाँ मैने अभिनय किया है! जिला माझ्यात इंटरेस्ट नाही तिच्या मागे लागून तिचे बरेचसे व माझे सगळे आयुष्य वाया घालवणे हा अभिनय असेल, तर हाँ मैने अभिनय किया है! जिचे लग्न दुसर्‍याबरोबर ठरले आहे त्यांच्या आयुष्यत काड्या करून तिला तरीही पटवू पाहणे हा अभिनय असेल तर.., जिचे लग्न दुसर्‍याबरोबर झाले आहे तिच्याही मागे लागून शेवटी कड्यावरून जीव द्यायला लावणे म्हणजे अभिनय असेल तर...एकूणच जगात ज्या ज्या मुलींना दुसर्‍यात इंटरेस्ट आहे त्यांच्या मागे लागणे हा अभिनय असेल तर...हाँ मैने अभिनय किया है!" Happy

संबंधितांनी दिवे घ्या. मलाही जवळजवळ तुमच्याइतकाच शाहरूख आवडतो Happy

धाग्याचं नाव बदला -

डीडीएलजेचं गारूड

ऐवजी आता ते

शाहरुखचं भारूड (सादरकर्ते - ऋन्मेऽऽष मायबोलीकर)

असे ठेवल्यास जास्त समर्पक वाटेल.

** काही जण म्हणत आहेत की शाहरूख खान याने आपल्या अभिनयाला वाव दिला नाही तर काही जण म्हणत आहेत शाहरूख खानला अभिनय जमत नाही..
नक्की काय खरे आणि काय खोटे?

असो,
रजनीकांतबाबत म्हणायचे तर मी त्याचे ते चित्रपट पाहिलेत ज्यामुळे तो रजनीकांत म्हणून ओळखला जातो. अगदी रिसेंट सांगायचे तर रोबोट आणि शिवाजी द बॉस या सिनेमांना म्हणे तिकिटासाठी पहाटेपासून रांगा लागायच्या., पण त्यातही मला अभिनय नावाचा प्रकार फारसा दिसला नाही. आणि ते चित्रपटही फराह खान छाप मसालापटच होते. आणि हो, माझी अभिनयाची व्याख्या हवेत सिगारेट उडवून पेटवणे किंवा गॉगल चार-पाच वेळा फिरवत घालणे अशी तरी नक्की नाही.. वर कोणीतरी चालबाझ चित्रपटाचे नाव घेतले आहे, त्यात त्याने केले तो अभिनय होता का? जर तो अभिनय होता तर शाहरूख ते झोपेतही करू शकतो असे नाही वाटत का? बाकी शाहरूखने काय चित्रपट केलेत आणि त्याचा अभिनय कसा जाणावा यासाठी स्वतंत्र पोस्ट, नव्हे स्वतंत्र लेख बनेल, ते फुरसत मध्ये जमवेनच..

असो,
जर रजनीकांत या वयात असे चित्रपट करताना त्याला कोणी सांगत नाही की अरे बाबा काय हे मसालापट करत आहेस, जरा अभिनय वगैरे कर..
तर मग शाहरूखने चेन्नई एक्सप्रेस सारखे चित्रपट न करता त्याने अभिनय करावा अशी अपेक्षा का?

तमाम मायबोलीकरांसाठी महत्वाची बातमी -

शाहरुख खानचा नवीन चित्रपट येतो आहे. 'दिलवाले दुनियादारी दिखा जायेंगे!'
नायिका - सई ताम्हणकर
दिग्दर्शक - ओळखा पाहू :).

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्व. भक्ती बर्वे यांच्या पुलं, फुलराणी आणि मी या कार्यक्रमाच्या धर्तीवर शाहरुख, सई आणि मी असा एकपात्री कार्यक्रम दिग्दर्शक सादर करणार आहेत.

रजनीकांतबाबत म्हणायचे तर मी त्याचे ते चित्रपट पाहिलेत ज्यामुळे तो रजनीकांत म्हणून ओळखला जातो. >> तू लिहिलेल्या सिनेमांमूळे रजनीकांत रजनीकांत म्हणून ओळखला जात नसून ते चित्रपट त्याचे म्हणून ओळखले जातात. परत एकदा त्याचा अभिनय बघायचा असेल तर त्याचे २००० च्या आधीचे सिनेमे बघ नि मगच क्रुपया त्याच्या अभिनयाबद्दल शंका व्यक्त कर. (नंदिनीच्या ८०% वाल्या पोस्टलाही असाच reference होता).

परत एकदा त्याचा अभिनय बघायचा असेल तर त्याचे २००० च्या आधीचे सिनेमे बघ..
>>>>>>>
ओके, म्हणजे गेले चौदा वर्षे रजनीकांत यांनी अभिनय दाखवला नाही तर..
आणि हाच तर माझा मुद्दा आहे, त्यांना या वयात मसालापट करायचे सोडून तुम्ही अभिनय करायला सांगायच्या ऐवजी शाहरूखलाच तेवढे का सांगत आहात? हा वेगळा न्याय का?
बरे त्याला अभिनयच येत नाही असे काही जणांचे म्हणने असताना त्याने अभिनयाला वाव मिळेल असे चित्रपट केले नाहीत असे म्हणने विसंगत नाही का? नक्की काय खरे समजायचे यावर प्रत्येकाने कृपया आपापले मत द्या.

म्हणजे गेले चौदा वर्षे रजनीकांत यांनी अभिनय दाखवला नाही तर.. >> तुला तसा अर्थ काढायचाय तर तसा काढ. कोणी अडवत नाही. पण त्यावरून त्याच्या अभिनयाबद्दल शंका घ्यायची असेल तर ती चौदाच वर्षे कशी बघतोस ?

तमाम मायबोलीकरांसाठी महत्वाची बातमी -

शाहरुख खानचा नवीन चित्रपट येतो आहे. 'दिलवाले दुनियादारी दिखा जायेंगे!'
नायिका - सई ताम्हणकर
दिग्दर्शक - ओळखा पाहू स्मित.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्व. भक्ती बर्वे यांच्या पुलं, फुलराणी आणि मी या कार्यक्रमाच्या धर्तीवर शाहरुख, सई आणि मी असा एकपात्री कार्यक्रम दिग्दर्शक सादर करणार आहेत.

>>>>>

Rofl Rofl Rofl

ओके, म्हणजे गेले चौदा वर्षे रजनीकांत यांनी अभिनय दाखवला नाही तर..>>>>.पहा हा बाबाजी, काय पण बोलतो.:फिदी:

प्रितीका असे बोलताना तुला काहीच वाटत नाही?:अओ::फिदी: सई आणी शाहरुखची हिरॉईन? जरा त्याच्या तब्येतीचा विचार कर. तिला उचलुन घेताना त्याचे काय हाल होतील!:फिदी:

शाहरुखने डोक्यावरचे केस उलटे अजीबात वळवु नयेत, फार विचीत्र दिसतो तो.:अरेरे: त्यापेक्षा स्वदेस मध्ये तो खरच छान दिसलाय त्या हॅपी न्यु पेक्षा.

मृणाल,
जिथे शाहरूख तिथे मी.. Wink

असामी,
मुळात एखाद्या चित्रपटात अभिनयाला वाव असेल तरच कलाकार तो करतो अन्यथा पाट्या टाकतो हे कन्सेप्टच चुकीचे वाटत नाही का? व्यावसायिक चित्रपटात तुम्हाला अभिनय करायला कोणी बंदी केली असते का? आफताब शिवदासानीला अभिनय येत नाही हे त्याचे व्यावसायिक चित्रपट बघूनच आपण ठरवून मोकळे होतो ना, कारण त्यातही त्याची मर्यादा समजून जातेच.

याउपर जरी रजनीकांत यांनी २००० सालापूर्वी अभिनय दाखवला असेल तर ते आता का तसे चित्रपट करत नाहीत, वा त्यांना त्यांचे चाहते का असे म्हणत नाही जसे इथे शाहरूखला त्यावरून धारेवर धरले जातेय, हा मुद्दा राहणारच!

ऋन्मेष, मी तुम्हाला मनापासून रिक्वेस्ट करते. प्लिज शाहरुखचा तिरस्कार करा ना प्लिज Sad
फक्त तुम्ही एकट्याने शाहरुखचा फॅनक्लब सोडून शाहरुख विरोधी बोला प्लिज प्लिज प्लिज! _____/\_______
यांच्यामुळे मला शाहरुख आवडेनासा होईल की काय याची भिती वाटू लागलीये Uhoh

आपण डीडीएलजे वरच बोलु >>>>> नशीब ! नाहीतर इथेही कपालबडवती मोड़ ऑन करावा लागला असता .
तिथे त्या देवेन वर्माच्या बाफलाही हायजैक केलेच आहे . इथेही तेच Sad

ऋन्मेष, मी तुम्हाला मनापासून रिक्वेस्ट करते. प्लिज शाहरुखचा तिरस्कार करा ना प्लिज
फक्त तुम्ही एकट्याने शाहरुखचा फॅनक्लब सोडून शाहरुख विरोधी बोला प्लिज प्लिज प्लिज!
>>>>>>

ठिक आहे, आज माझ्या ग'फ्रेंडशी बोलून काय ते कळवतो..

यांच्यामुळे मला शाहरुख आवडेनासा होईल की काय याची भिती वाटू लागलीये >>> मागेच म्हटलं न, ऐसे फॅन्स होतो तो दुष्मनोंकी जरूरत ही क्या.

मला सरप्रायझिंगली डीडीलजेचा ट्रीब्युट म्हणून काढलेला हम्टी शर्मा की दुल्हनिया जास्त भावला. डीडीईल्जपेचाक्षा त्याचा प्लॉट जास्त चांगला वाटला, अर्थात डीडीलेजेची ट्रीटमेंट आणि स्टार कास्ट जास्त चांगली होती.

मला बिल्कुल आवडला नाही तो हम्टीशर्मा. अर्थात अभिनय चांगला केला. पण सो सो होता गाणी छान आहेत

"किर्तनात कथा कमी आणि हारी विठलचा गजर जास्त" अशी कथा झाली आहे धाग्याची. Lol

मी डिडीएलजे नाय पाहिलेला. गोडगोड चित्रपट झेपत नसल्याने.
असो.

दिवाकर...
>>परमितसिंग च्या ऐवजी "अरमान कोहली" ला घेतले होते. जस्ट इमॅजिन "अरमान कोहली" इन डीडीएलजे<<

अगदी अगदी....मायबाप प्रेक्षकांचा विचार यशजींनी केला, उपकार केले अखिल मानवजाती वर, अन्यथा डीडीएलजे ची ही चर्चा अचाट आणि अतर्क्य.. च्या बाफ वर करावी लागली असती.
रच्याकने त्या परमितसिंग ला पाहिल्यावर मला पहिला प्रश्न हा पडला होता की ह्या गबरु पंजाब्याला त्या अर्चना पुरनसिंग मध्ये असे काय आवडले असावे राव.... Uhoh

अर्चनाची एक सिरिअल होती जुनी, डीडी मेट्रोवर. ती बघितलीत तर असे अ.अ.प्रश्न पडणार नाहीत. बाँब दिसायची ती, अजूनही दिसते. लाफ्टर शो मधे हसते त्यावर जाऊ नका.

अर्चनाची एक सिरिअल होती जुनी, डीडी मेट्रोवर.
>>>>>
श्रीमान श्रीमतीजी का? केकु वगैरे, रीमा लागू होत्या त्यात..

अर्चना पूरनसिंग अशी काय वाईट दिसते? जलवा मध्ये तर खूप सही दिसलेली>> अनुमोदन. शराब में भीगता हुवा एक नीला गुलाब का फूल. त्या नाचाला तोड नाही. छानच होती ती. - तेव्हा.

श्रीमान श्रीमतीजी का? केकु वगैरे, रीमा लागू होत्या त्यात.>>

चिरंजीव ऋन्मेष, मी जी सिरिअल म्हणतो आहे ती सिरिअल आली तेव्हा तुमचा जन्म झाला नसावा. त्यात अनु कपूर होता आणि बरेच लोक होते.

अरे लोकांनो
जलवा अग्निपथ हे चित्रपट केव्हा आले होते आणि डिडिएलजे केव्हा आलेला ? जरा हिशोब लावा
डिडिएलजे नंतर त्यांचे लग्न झाले.

Pages