‘कम, फॉल इन लव्ह…’ अशी टॅगलाइन घेऊन आदित्य चोप्रानं निखळ करमणूक करणारी प्रेमकथा आणली आणि तिने अक्षरशः हिंदी चित्रपटांचे भविष्य बदलून टाकले. तो काळ अमिताभ नावाचे वादळ शांत होण्याचा होता. अमिताभने घालून दिलेल्या मार्गावरच चालण्याच्या उद्देशाने तेव्हा अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी यांसारख्या अॅक्शन हिरोंची नव्या दमाची फळी उभी राहिली. नव्वदच्या दशकानंतर हिंदी चित्रपट एकाच वळणाने जात होता. दणकट हिरो, त्याच्यावर झालेला अन्याय, त्यासाठी त्याचे पेटून उठणे, ड्र्ग्जचा व्यवसाय करणारा व्हिलन आणि झाडांभोवती फेर धरून नाचण्यापुरती हिरोईन. दहापैकी नऊ सिनेमांचे कथानक याच प्रकारचे असायचे. त्यामुळेच सुनील शेट्टीसारखा ठोकळाही भाव खाऊन गेला. त्याच दरम्यान शाहरूख, सलमान, आमीर या खान मंडळींचाही स्ट्रगल सुरू होता. चिकने-चोपडे चेहरे आणि सुमार शरीरयष्टी यामुळे तिन्ही खान अॅक्शन हिरो वाटत नव्हते. त्यामुळे सुरुवातीला ते या भाऊगर्दीतलेच एक होते. त्यावेळचे दिग्दर्शकही तसेच. अगदी यश चोप्रांपासून, यश जोहर, राकेश रोशन यांसारखे मोठे दिग्दर्शकही टिपीकल मारधाडीच्याच मार्गाने जात होते. अभिनयात जशी नव्या दमाची पिढी उतरली, तशी दिग्दर्शकांचीही एक नवी फळी तयार होऊ लागली होती. पण तरीही टिपीकल मारधाडीच्या चित्रपटांचा मार्ग सोडून वेगळी वाट चोखाळायची हिंमत कुणी करत नव्हते. ती हिंमत केली आदित्य चोप्राने. यश चोप्रांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्याने दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात प्रेमकथा हाताळली. तोपर्यंत अनेक प्रेमकथा येऊन गेल्या होत्या. मात्र, त्यात तोच तोपणा होता. आदित्यने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ अशा भल्या मोठ्या नावाने ही प्रेमकथा आणली. त्याच्या एक वर्ष आधी आलेला सूरज बडजात्याचा ‘लग्नाची कॅसेट’ म्हणून हिणवला गेलेला ‘हम आपके है कौन’ तुफान चालला होता. बाजीगर, करण-अर्जुन, दिवाना असे तीन-चार हिट सिनेमे नावावर जमा असलेला शाहरूख आणि तोपर्यंत फारसा प्रभाव न दाखवू शकलेली काजोल अशा जोडीला घेऊन आदित्यने आपला ड्रीम प्रोजेक्ट हातात घेतला. तोपर्यंत हिंदी चित्रपटांमधून फारशी न दिसलेली यूरोपातील सुंदर लोकेशन्स, पंजाबमधील सरसों की खेती यामुळे सिनेमाची फ्रेम अगदी फ्रेश झाली होती. जोडीला परदेशात राहणारा गुलछबू नायक आणि भारतीय संस्कारी घरात वाढलेली नायिका यांची तितकीच ताजीतवानी प्रेमकथा. त्यात त्यावेळी फेमस असलेल्या जतीन-ललीत या जोडगोळीचं संगीत आणि उदीत नारायण, कुमार सानू, लतादिदी आणि आशा भोसले यांच्या जादूई आवाजात अजरामर झालेली गाणी. हिंदी सिनेमांतील काही गाणी पहायला चांगली वाटतात, तर काही गाणी फक्त ऐकायलाच चांगली वाटतात. मात्र, डीडीएलजेची गाणी जितकी श्रवणीय होती, तितकीच ती प्रेक्षणीयही होती.
अशी ही प्रेमकथा पडद्यावर आली आणि लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतली. ‘मेहंदी लगा के रखना’ या गाण्यासाठी चार-चार वेळा हा सिनेमा पाहिलेले लोक मी पाहिलेत. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पहावी अशी निखळ प्रेमकथा असल्यामुळे सिनेमागृहातल्या खुर्च्यांच्या रांगाच्या रांगा कुटुंबे, मित्रमंडळींसाठी बुक असायच्या. ‘डीडीएलजे’ मिळाला आणि शाहरूख खान ‘राज’ झाला. या राजनेच त्याला आज ‘किंग खान’ बनवलंय. अन्यथा, शाहरूखही अजय देवगण, अक्षय कुमारच्या पंक्तीत मारधाडीचे सिनेमे करत बसला असता. डीडीएलजेने रोमॅण्टिक लव्ह स्टोरीचे एक युग सुरू केले, जे पुढे ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘हम दिल दे चुके सनम’ यांसारख्या सिनेमांनी पुढे नेले. नव्वदच्या दशकातल्या एका संपूर्ण पिढीवरच ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ने गारूड केलंय. आज सीडी, डीव्हीडी, इंटरनेट, केबल, डझनावारी हिंदी चित्रपट वाहिन्या यामुळे घरोघरी सिनेमे पहायची सोय झाली. हा सिनेमा इतक्या वेळा टीव्हीवर येऊनही प्रत्येक वेळी तो नवा वाटतो.
आज पस्तीशी-चाळीशीत असलेल्या पिढीला आजही या सिनेमामुळे आपले मोरपंखी दिवस आठवतात. सिनेमा येऊन वीस वर्ष उलटून गेलीत. मात्र, या सिनेमातला ताजेपणा कायम आहे. त्यानंतर सिनेमांतही अनेक ट्रेण्ड आले, स्थिरावले आणि पुन्हा बदलले. मात्र, डीडीएलजेच्या लोकप्रियतेत घट झाली नाही. ‘शोले’ न पाहिलेला माणूस भारतात दाखवा, असं म्हटलं जायचं. तसंच ‘डीडीएलजे’ न पाहिलेला माणूस दाखवा, असं म्हणावं लागेल. सुभाष घईंनाही डीडीएलजेची प्रेरणा घेऊन ‘परदेस’ बनवावासा वाटला. रोहित शेट्टीच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये राज-सिम्रनचा रेल्वे सीन, आणि करण जोहरने ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’तून ‘डीडीएलजे’ला दिलेली मानवंदना, ही या सिनेमाने चित्रपटसृष्टीवरही केलेल्या गारूडाची पावतीच. मुंबईतल्या मराठा मंदिर सिनेमागृहातून हा सिनेमा वीस वर्षांनंतर उतरणार आहे, अशा बातम्या माध्यमांमधून येत होत्या. मात्र, सिनेरसिकांच्या मागणीखातर तो न उतरविण्याचा निर्णय यशराज बॅनर्स आणि मराठा मंदिर थिएटरच्या प्रशासनाने घेतला. त्यामुळे रसिकांना याच थिएटरला डीडीएलजेचं आणखी काही वर्ष पहायला मिळणार आहे. तब्बल वीस वर्ष एकाच थिएटरला दररोज सुरू असणारा आणि दर रविवारी हाऊस फुल्लचा बोर्ड झळकणारा हा जगातील ‘न भूतो, न भविष्यति(?)’ असा सिनेमा ठरला आहे, असे मला तरी वाटते. आज १२ डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होऊन वीस वर्ष होत आहेत. हॅट्स ऑफ टू आदित्य चोप्रा अॅण्ड डीडीएलजे टीम.
--
डीडीएलजेचं गारूड
Submitted by टोच्या on 11 December, 2014 - 08:16
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी नाही पाहिला शोले. मी लाईफ
मी नाही पाहिला शोले.
मी लाईफ टाईम शाहरुख खान क्लबची मेंबर आहे.
त्याचे टुक्कार सिनेमे केवळ शाहरुख आहे म्हणून अनेकदा पाहिलेत मी.
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे माझाही अतिशय आवडता मूव्ही!
जियो शाहरूख जोयो
:*
या चित्रपटाचे मार्केटींग फार
या चित्रपटाचे मार्केटींग फार प्रभावी होते. सरसो फुललेल्या शेतातून धावत येणारे नायक नायिका.. हा शॉट टिव्ही प्रोमो मधे वापरत असत. द मेकिंग ऑफ... या प्रकाराची सुरवात या चित्रपटापासून झाली.
मी साधारण १९९६ मधे जुहूला चंदन थिएटर मधे बघितला. त्यावेळी लग्नाच्या प्रसंगात स्क्रीनच्या भोवतीने खास दिव्यांचे तोरण लावत असत.
शीर्षकाच्या ओळी, फकिरा चित्रपटातल्या ( शशी कपूर, शबाना ) एका गाण्यातून घेतल्या होत्या.
या चित्रपटात काही ढोबळ चुका पण होत्या. ( काजोल धावताना तिच्या जवळच दरवाजा असतो. स्विसमधल्या घरातील शेकोटी ती विमको च्या माचिसने पेटवते वगैरे )
http://www.lokmat.com/storypa
http://www.lokmat.com/storypage.php?catid=31&newsid=1145
अप्रतिम लेख
ऋण्मेष, >>>आपण काय या
ऋण्मेष,
>>>आपण काय या सिनेमाला मोठे करणार... या सिनेमाने आपल्याला मोठे केलेय!!<<<
माझ्या बाबतीत हे अगदी तंतोतंत लागू पडतंय.
बेफिकीरजी,
>>लेख आवडला. (पॅरा पाडले असते तर जरा वाचायला थोडे सोपे गेले असते, पण तो स्ट्रक्चरल भाग).>>
हा लेख गेल्या महिन्यात जेव्हा ‘डीडीएलजे उतरणार’ अशा बातम्या आल्या तेव्हा ‘मटा’साठी लिहिला होता. पण ज्यावेळी लेख पाठवायचा, त्याच दिवशी बातमी आली की सिनेमा सुरूच राहणार. काल सिनेमाला वीस वर्ष झाली त्याबद्दल प्रासंगिक म्हणून तो येथे डकवला. त्यामुळे फारसे संपादकीय संस्कार न करताच तो गडबडीने पेस्ट झालाय. त्यामुळे स्ट्रक्चरल मिस्टेक्स आहेतच.
प्रसन्न हरणखेडकर,
<<सुंदर कलाकृती विषयी लिहिलेला तुमचा ही तितकाच सुंदर लेख.>>
धन्यवाद.. आपण म्हणता त्याप्रमाणे या सिनेमात सर्व घटक योग्य प्रमाणात होते. त्यामुळेच कदाचित तो माइलस्टोन ठरला.
डीडीएलजे ते देवदासपर्यंत मी शाखाचा फॅन होतो. पण आता तो डोक्यात जातो. हां, काजोलचा मी डाय हार्ड फॅन आहे, आणि राहिल. तिची कुठल्याही सिनेमातील अॅक्टिंग लाजवाबच. अगदी शाखापेक्षा काकणभर सरसच. शाहरूख खान कलाकार होता तेव्हा तो मला आवडायचा. पण जेव्हापासून तो सिनेमांमध्येही ‘शाहरूख खान’ म्हणूनच वावरायला लागला, तेव्हापासून त्याच्याविषयीचं प्रेम कमी झालं. याउलट पूर्वी अजिबातच आवडत नसलेला आमीर खान आता जास्त आवडायला लागलाय. बाकी वर प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे धन्यवाद.
या चित्रपटातला हायपॉईंट काय
या चित्रपटातला हायपॉईंट काय असेल तर तो अमरिश पुरी....
शाखा कितीही आचरटपणा करू दे किंवा काजोली कितीही गोड दिसू दे...पण केवळ अमरिश पुरीच्या स्टँडवरती आख्खा चित्रपट फिरतो. आणि त्यालाही अचानक कुठून आणलेला नाही. किंबहुना आजा पंछी तुझे देस बुलाये रे करत त्याची मानसिकता स्पष्ट केली आहे. परदेशात राहूनही अस्सल देशी राहीलेला आणि त्याच मातीशी प्रामाणिक राहीलेला कणखर बाप सहीसही उभा केलाय.
अमरिश पुरी नसता तर क्लायमॅक्स उभाच राहू शकला नसता. त्याच्यात शाखा बद्दल होणारा हळूवार बदल आणि शेवटच्या क्षणी मनात होणारी चलबिचल..काय घेतलीये लाजबाब.
मी फक्त आणि फक्त अमरिश पुरी साठी हा चित्रपट पाहीन...
असेही शाखाचे माकडचाळे तेव्हाही डोक्यात गेले होते आणि नंतर त्याने अजिर्ण होईपर्यंत तेच केले...
>>>आणि नंतर त्याने अजिर्ण
>>>आणि नंतर त्याने अजिर्ण होईपर्यंत तेच केले...<<< अनुमोदन! कदाचित त्याच्याकडून तेच करवूनही घेतले गेले असेल. जसे बच्चन म्हंटले की लहानपणीचा अन्याय, पुढचे सूडनाट्य वगैरे हवेच!
अन्डरयुटिलाईझ्ड पोटेन्शिअल हा एक महान प्रकार आहे आपल्या चित्रपटसृष्टीत!
आशुचँप, <<या चित्रपटातला
आशुचँप,
<<या चित्रपटातला हायपॉईंट काय असेल तर तो अमरिश पुरी....>>
अगदी शंभर टक्के सहमत. अमरीश पुरीच्या ऐवजी दुसरा कुठलाच अभिनेता तिथे फिट होऊ शकला नसता, असे मला वाटते. अमरीश पुरींच्या सर्वच चरित्र भूमिका मला प्रचंड आवडतात. एक मुस्कुराहटे नावाचा सिनेमाही मी केवळ अमरीश पुरी त्यात होते म्हणून पाहिलाय. अमिताभ सोडला तर अमरीश पुरीच्या नजरेला नजर भिडवणारा अभिनेताही दूर्मिळच.
असेही शाखाचे माकडचाळे
असेही शाखाचे माकडचाळे तेव्हाही डोक्यात गेले होते आणि नंतर त्याने अजिर्ण होईपर्यंत तेच केले... >
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक मिनिट, अमरीश पुरी फार महान
एक मिनिट, अमरीश पुरी फार महान अभिनेता होता असे म्हणायचे आहे का?
त्या मताला आपला तरी विरोध!
अवांतराबद्दल क्षमस्व!
बेफिकिर, अमरीश पुरी फार महान
बेफिकिर,
अमरीश पुरी फार महान अभिनेता होता असे म्हणायचे आहे का? >>
मी महान म्हटलेलं नाही. पण ताकदीचा अभिनेता होता. आणि मला अमरीश पुरींनी केलेल्या चरित्र भूमिका आवडतात. व्हिलनच्या भूमिकेत मला अमरीश पुरी कधीच आवडला नाही. अमरीश पुरीचे डोळे खूपच भयानक होते. त्यामुळे त्याच्या नजरेपुढे हिरोची नजरही फिकी पडायची. अमरीश पुरीइतकेच मला ओम पुरी, नसीरूद्दीन शहा, परेश रावल, पंकज कपूर हे अभिनेतेही आवडतात.
हे माझ्या पोस्टला उद्देशून
हे माझ्या पोस्टला उद्देशून नसावे अशी आशा आहे
>>>अमरीश पुरीइतकेच मला ओम
>>>अमरीश पुरीइतकेच मला ओम पुरी, नसीरूद्दीन शहा, परेश रावल, पंकज कपूर हे अभिनेतेही आवडतात.<<<
हे विधान आणि
>>>अमिताभ सोडला तर अमरीश पुरीच्या नजरेला नजर भिडवणारा अभिनेताही दूर्मिळच.<<<
ह्या दोन्हीत विसंगती जाणवली.
असो!
हा सिनेमा आला त्यावेळी मी
हा सिनेमा आला त्यावेळी मी नववीत होते. तेव्हा भारीच बै वेड लागलेलं. सिनेमाचं. शाहरुखचं, गाण्यांचं. तेव्हा ५० पैशाला १ असे पोस्टकार्ड साइझ फोटो मिळायचे हीरो हीरोइन चे, शिनेमातल्या सीन्सचे. माझ्या कडे ह्या शिनेम्यातले शाहरुखचे ढीगाने होते. मी तर त्यातला काजोल सारखा फ्रॉकही घेतला होता.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थोडक्यात सिनेमा अतिच आवडलेला.
पण आता ह्या सिनेमाला बिग नो. वर कुणीतरी म्हणल्याप्रमाणे वयापरत्वे....
गाणी अजुनही आवडतात.
अमरीश पुरीचे डोळे खूपच भयानक
अमरीश पुरीचे डोळे खूपच भयानक होते. त्यामुळे त्याच्या नजरेपुढे हिरोची नजरही फिकी पडायची>>>.. घातक मधला अमरीश पुरी आठवला. एक असहाय्य पण प्रेमळ, समन्जस बाप. मुलाला क्रोधको पालना सीखो बेटे म्हणणारा बाप आठवला. जबरी!
तो छम्मा छम्मा वाला सिनेमा कोणता? त्यातही तुफान काम केलेय त्याने. अमरीश पुरी व्हीलन म्हणून कायम बेस्ट. लहानपणी ( जेव्हा सिनेमा म्हणजे काय हे कळायला लागले होते तेव्हा) आई-बाबा, प्राण चे कौतुक करायचे तेव्हा वाटायचे काय हा माणुस, उगाच सिगरेट पीत इकडे तिकडे शाईनिन्ग करत फिरतो. पण आता त्यान्ची उन्ची लक्षात येते. मला व्यक्तीश : व्हिलन म्हणून प्राण, प्रेम चोप्रा आणी अमरीश पुरी आवडतात.
सॉरी हिरोच्या धाग्यावर व्हिलनचे कौतुक जरा जास्त केले.
अमरीशपुरी चांगला अभिनेता होता
अमरीशपुरी चांगला अभिनेता होता पण महान वगैरे नाही.
त्याच चित्रपटातील अनुपम खेर त्यापेक्षा सरस अभिनेता आहे.
लो कर लो बात. मला दोघेही
लो कर लो बात. मला दोघेही आवडतात.
ऋन्मेष, तारुण्यात गम्भीर सुद्धा होता येते. जरा सिरीयसली जुन्या आर्ट फिल्म पहा म्हणजे समजेल अमरीश पुरी काय चीज आहे ते, उगाच भन्कस करु नक्कोस.:दिवा: भन्कस हे मजेने लिहीलेय, पण आर्ट फिल्म विषयी सिरीयसली लिहीलेय.
Which art films Amrish Puri
Which art films Amrish Puri has acted?
रश्मी, तुम्ही म्हणता त्या
रश्मी,
तुम्ही म्हणता त्या जुन्या आर्ट फिल्म्स मी पाहिलेल्या नाहीत त्यामुळे अमरीश पुरींचा अभिनय कसा होता ह्याबाबत लिहिताना फक्त घातक, मिस्टर इंडिया, दिलवाले, चायना गेट अश्या प्रकारचे चित्रपट पाहूनच लिहू शकतो. आर्ट फिल्म्समध्ये त्यांचा अभिनय जबरदस्त असल्यास माहीत नाही.
पण मला असे वाटते की माणसामधले टॅलेंट हे कोणत्याही प्रकारच्या कलाकृतीमार्गे दिसत राहतेच. (त्यामुळेच अतिशय सुमार चित्रपटातही अमिताभचा अभिनय चांगलाच वाटायच, उदाहरणार्थ).
अमरीश पुरींचे जे चित्रपट पाहून मी वरील विधाने केलेली आहेत तश्या प्रकारच्या चित्रपटांचा विचार करता अमरीश पुरींपेक्षाही सामर्थ्यवान असे कित्येक अभिनेते हिंदी चित्रपट सृष्टीत होऊन गेलेले आहेत.
(एक गंमत - राजेश खन्नाकडे कायम सुपरस्टार म्हणूनच पाहिले गेले पण तोही उत्तम अभिनेता होता.
)
आपल्याकडे लोक कमल हसन सारख्या
आपल्याकडे लोक कमल हसन सारख्या रंगरंगोटी करून कर्तब दाखवणार्यालाही महान अभिनेता समजतात, त्याचे आपण काही करू शकत नाही, प्रत्येकाचे निकष.
आक्रोश, अजून आठवल्या तर
आक्रोश, अजून आठवल्या तर लिहीन.
अरे दगडावर डोके आपटणार्या
अरे दगडावर डोके आपटणार्या बाहुलीची कोणती स्माईली आहे का रे? मला पाहीजे आत्ता च्या आत्ता.
ऋन्मेष बाळा तुला कुणीही मायबोलीवर सिरीयसली का घेत नाही हे आता जरा जास्तच लक्षात यायला लागलेय.:फिदी:
आपल्याकडे लोक कमल हसन सारख्या रंगरंगोटी करून कर्तब दाखवणार्यालाही महान अभिनेता समजतात, त्याचे आपण काही करू शकत नाही, प्रत्येकाचे निकष.>>>>>> अजून कोनी लाहिले का ले या यादीत? नुशताच कमल कशाला? बललाज शहानी, सन्जीवकूमाल याना पन ताक या यादीत ह.
सॉरी माझा वरचा प्रतीसाद फार कडवट आहे, पण ऋन्मेष भाऊ घसरगुन्डीवर बसल्याने मला असेच लिहावे लागले.
>>>घसरगुन्डीवर बसल्याने <<<
>>>घसरगुन्डीवर बसल्याने <<<![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
कमल हासन हा महान अभिनेता नाही असे म्हणत आहात का तुम्ही ऋन्मेष?
रश्मी, आपला प्रतिसाद कडवट
रश्मी, आपला प्रतिसाद कडवट नाही, पण कमल हासन याला महान अभिनेता नाही म्हणता येत. त्यापेक्षा आमीर खान खूप सरस आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असो,
पुढे तुम्ही संजीवकुमारला का त्यात जोडले स्वतःतर्फे?
संजीवकुमारसारखा अभिनेता होणे नाही
पण कमल हासन याला महान अभिनेता
पण कमल हासन याला महान अभिनेता नाही म्हणता येत.<< हे विधान लिहिण्याआधी कमल हासनचे नक्की किती सिनेमा पाहिले आहेत?
अरे, डीडीएलजे डीडीएलजे
अरे, डीडीएलजे डीडीएलजे
अरे, डीडीएलजे डीडीएलजे >
अरे, डीडीएलजे डीडीएलजे > +१०००
ऋन्मेऽऽष ना मात्र मानल पाहिजे . ते कुठलाही धागा कुठेही नेऊ शकतात .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे विधान लिहिण्याआधी कमल
हे विधान लिहिण्याआधी कमल हासनचे नक्की किती सिनेमा पाहिले आहेत?
>>>>>
किती सिनेमे बघितल्यावर एखाद्याचा अभिनय जोखता येतो?
तेच तेच डीडीएलजे. ते काय ना
तेच तेच डीडीएलजे. ते काय ना शाहरुख आला की सगळ्यांनाच यावे लागते त्याशिवाय चालत नाही![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>>कमल हासन याला महान अभिनेता
>>>कमल हासन याला महान अभिनेता नाही म्हणता येत. त्यापेक्षा आमीर खान खूप सरस आहे.<<<![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
किती सिनेमे बघितल्यावर
किती सिनेमे बघितल्यावर एखाद्याचा अभिनय जोखता येतो?>>> आयडीयली, सगळेच!!! पण किमान ८०% सिनेमा तरी पाहिल्याशिवाय असे मत ठोकण हे केवळ हास्यास्पद आहे.
Pages