हिरवी सालासकट मूगडाळ, पिवळी मूगडाळ, किन्वा, हवे असल्यास फ्रोजन वाल्/तूर लिल्वा/ हरभरे/ चणे इ., हिरव्या मिरच्या, कढिपत्ता, फोडणीचं साहित्य, गोडा मसाला, वरून घालायला तूप, कोथिंबीर, ओलं खोबरं इत्यादी.
किन्वा आणि दोन्ही डाळी एकत्र करून (दोन्ही डाळींच्या तुलनेत किन्वा थोडा जास्त चालेल) धुवून बाजूला ठेवाव्यात. तेलाची हिंग, हळद, जिरं, मोहरी, हिरव्या मिरच्या, कढिपत्ता वगैरे घालून फोडणी करून त्यात धुतलेल्या डाळी+किन्वा परतून दुपटीपेक्षाही जरा जास्तच पाणी घालून मऊ शिजवून घ्यावं. शिजताना तूप, गोडा मसाला, मीठ घालून घ्यावं. वरून नेहमीच्या डाळ तांदूळ खिचडीसारखं ओलं खोबरं, कोथिंबीर घालून खावं.
ह्यात ज्याला हवेत ते मसाले घालून चालेल. गोडा मसालाच हवा असं अजिबातच नाही.
टिपा अशा काही नाहीत. डाळ तांदुळ खिचडीऐवजी किन्वा घेतला आहे. एवढाच काय तो बदल.
सिंडरेलाची लसूण घालून खिचडी रेसिपी आहे त्या पद्धतीनेही छान लागेल. बरोबर कढी/सार, सांडगी मिरची, पापड, कोशिंबीर वगैरे हवंच.
आली पण रेसिपी मस्तच लागते ही
आली पण रेसिपी मस्तच लागते ही खिचडी. कॉस्टकोमधून आणलेलं पोतं आहे किन्वाचं. आज-उद्या करतेच.
मस्तं रेस्पी, सायो! सालाची
मस्तं रेस्पी, सायो! सालाची मूगडाळ आणावी लागेल.
>>कॉस्टकोमधून आणलेलं पोतं आहे किन्वाचं.
डिट्टो.
रेसिपीबद्दल धन्यवाद. एक
रेसिपीबद्दल धन्यवाद. एक प्रश्न.
किन्वा तसा १०-१२ मिनिटात पटकन शिजतो तशीच मूङडाळ पण शिजते का? म्हणजे एक जिन्नस जरा मौ शिजलेला आणी दुसरा गाळ असं होतं की दोन्ही परफेक्टली शिजतात सेम टायमात?
माझ्या माहितीप्रमाणे मूगडाळ
माझ्या माहितीप्रमाणे मूगडाळ पटकन शिजते. तुला शंका असेल तर भिजत घालून ठेव.
५-६ तास भिजवलेली पिवळी मूगडाळ
५-६ तास भिजवलेली पिवळी मूगडाळ आधी फोडणीत घालून, ती अर्धवट शिजली की किन्वा मिसळून शिजवलं आहे. दोन्ही मोकळे आणि व्यवस्थीत शिजतात. याला वरून भाजकं खोबरं-मिरं-लसूण वाटण लावून मी दलियासारखी खिचडी करते.
पिवळी मूगडाळ पटकन शिजते पण
पिवळी मूगडाळ पटकन शिजते पण माझं त्या डाळीचं प्रमाण कमी असतं बाकी दोनाच्या तुलनेत.
सायो, मस्त रेसिपी.. नक्की
सायो, मस्त रेसिपी.. नक्की करणार..
तु कुकर मध्ये करतेस का डायरेक्ट ? कारण मला ही शुम्पी सारखा प्रश्न पडला आहे...
मी डायरेक्ट गॅसवर करते. मी
मी डायरेक्ट गॅसवर करते. मी सगळं एकत्र भिजत घालून एकत्रच शिजवते. खिचडी शिजल्यावर पिवळी मूगडाळ आहे हे सांगूनही खरं वाटत नाही.
हवे असल्यास मसूरही घालू शकता ह्यात.
ओके डन!!! थॅक्स
ओके डन!!! थॅक्स
धन्यवाद!
धन्यवाद!
फोटो राहिला
फोटो राहिला
लिल्वा?? आणावे लागतील
लिल्वा??
आणावे लागतील किन्वा! करुन बघेन.. ह्याची साबुदणा खिचडी टाईप पण मस्त लागते म्हणे..
वाल लिलवा किंवा तूर लिलवाचे
वाल लिलवा किंवा तूर लिलवाचे फ्रोजन दाणे.
सही लागते ही खिचडी... ! माझा
सही लागते ही खिचडी... ! माझा जरा अंदाज चुकला अन जास्त प्रमाणात खिचडी झाली.
पण एकदा कढी आणि नंतर टो. साराबरोबर मस्तच लागली. रेसिपीबद्दल धन्यवाद !
येवड भारी रेश्पी क्येलाया!
येवड भारी रेश्पी क्येलाया!
पण मग फोटू का नै टाकत!?
.
.
.
.
.
खिन्न आत्मा!
मस्त रेसिपी ! धन्यवाद सायो
मस्त रेसिपी ! धन्यवाद सायो
किन्वा लागे .... मस्त लागे रे....
हे खास तुझ्यासाठी ...
खिचडी कढी