Submitted by सुशांत खुरसाले on 3 December, 2014 - 01:21
मनी बेबंद इच्छांचा पिसारा रोज फोफावे
वयाचे मोरपंखीपण कुठे डांबून ठेवावे
तिचा होणार आता मी,अता होणार ती माझी
नशा चढणार नसली यामुळे तर आणखी प्यावे
किनारा पाहिजे लागायला कवितेत एखादा
जगाच्या सर्व क्षितिजांना जिथुन न्याहाळता यावे
कसे तो व्दैत इतके सोसतो अन् शांतही असतो
कुणाची प्रार्थना साधी, कुणाचे पाशवी धावे
कपाळावर टिळ्यांचा एवढा भडिमार झाला की-
कुण्या पंथात आहे मी मला लागेल शोधावे
किती वाखाणला जातो तुझा संयतपणा देहा
अनावर मन किती असते, कसे समजून सांगावे
--सुशांत..
े
े
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किनारा पाहिजे लागायला कवितेत
किनारा पाहिजे लागायला कवितेत एखादा
>> व्व्वाह!
किती वाखाणला जातो तुझा संयतपणा देहा
अनावर मन किती असते, कसे समजून सांगावे
>> आवडला..
गझल अतिशय आवडली सुशांत.
गझल अतिशय आवडली सुशांत. किनारा आणि टिळ्याचा शेर खूप सुंदर.
मस्त मस्त मस्तः >>> मनी बेबंद
मस्त मस्त मस्तः
>>>
मनी बेबंद इच्छांचा पिसारा रोज फोफावे
वयाचे मोरपंखीपण कुठे डांबून ठेवावे
किनारा पाहिजे लागायला कवितेत एखादा
जगाच्या सर्व क्षितिजांना जिथुन न्याहाळता यावे
कसे तो व्दैत इतके सोसतो अन् शांतही असतो
कुणाची प्रार्थना साधी, कुणाचे पाशवी धावे
कपाळावर टिळ्यांचा एवढा भडिमार झाला की-
कुण्या पंथात आहे मी मला लागेल शोधावे
किती वाखाणला जातो तुझा संयतपणा देहा
अनावर मन किती असते, कसे समजून सांगावे
<<<
धन्यवाद आनंदयात्रीजी, वैभवजी
धन्यवाद आनंदयात्रीजी, वैभवजी , बेफिजी.
सर्व शेर उत्कृष्ट वाटले गझल
सर्व शेर उत्कृष्ट वाटले
गझल खूप आवडली
अप्रतिम सुशांत!!! धन्यवाद!!
अप्रतिम सुशांत!!!
धन्यवाद!!
वैवकु ,जयदीपजी मनःपूर्वक आभार
वैवकु ,जयदीपजी मनःपूर्वक आभार !
अजून एक शेर सुचलाय -
असावा फरक बहुधा एवढासा आपल्यामध्ये-
कुणी पस्तावुनी बोले,कुणी बोलून पस्तावे
सुंदर
सुंदर
कुणी पस्तावुनी बोले,कुणी
कुणी पस्तावुनी बोले,कुणी बोलून पस्तावे<<< अगदी खरे आहे
सुशांतजी. सगळेच शेर अप्रतिम,
सुशांतजी. सगळेच शेर अप्रतिम, खूप सुंदर!
सगळेच शेर छान! आवडली.
सगळेच शेर छान! आवडली.
सुंदर आवडली
सुंदर
आवडली
बहोत बढिया सुशांत....
बहोत बढिया सुशांत....
मस्तच.. किनारा आणि द्वैत
मस्तच..
किनारा आणि द्वैत आवडले.
क्या बात है ....
क्या बात है ....
खूप खूप आभार सर्वांचे !
खूप खूप आभार सर्वांचे !
संदर! आवडली. कुणी पस्तावुनी
संदर! आवडली. कुणी पस्तावुनी बोले, कुणी बोलून पस्तावे... क्या बात है
आवडली
आवडली
किनारा पाहिजे लागायला
किनारा पाहिजे लागायला कवितेत
एखादा
जगाच्या सर्व क्षितिजांना जिथुन
न्याहाळता यावे...>>> मस्तच..
१) मनी बेबंद इच्छांचा पिसारा
१) मनी बेबंद इच्छांचा पिसारा रोज फोफावे या ओळीत अनेकवचन आहे कि एकवचन
आणि
२) नशा चढणार नसली यामुळे तर आणखी प्यावे याऐवजी "नशा चढणार नाही यामुळे तर आणखी प्यावे" असे असायला हवे होते का या दोन शंका मनात आल्या...रचना बेहतरीन आहे यात शंकाच नाही....कृगैन ...माहिती मिळवणे हा एकंच हेतू आहे....
गझल आवडली.
गझल आवडली.
धन्यवाद मंडळी . संतोषजी, १)
धन्यवाद मंडळी .
संतोषजी,
१) मनी बेबंद इच्छांचा पिसारा रोज फोफावे<< इच्छा अनेक असल्या तरी त्यांचा मिळून पिसारा एकच .
म्हणून एकवचन.
२) नशा चढणार नसली यामुळे तर आणखी प्यावे << 'नाही' सुध्दा चालेल . मी यामुळे नशा चढणार नसेल(नसली) तर ....अशा अर्थाने लिहिलेलं .
मनमोकळ्या चर्चेबद्दल आभारी आहे.
धन्यवाद .
आवडलीच गझल.
आवडलीच गझल.
गझल आवडली. <<<१११११
गझल आवडली. <<<१११११
अत्यंत सुंदर!
अत्यंत सुंदर!
आभार सर्वांचे ! याच जमिनीत
आभार सर्वांचे !
याच जमिनीत सुचलेला आणखी एक शेर :
झळांवर प्रेम असल्याचे तुला सांगून बसलो मी
अता देशील का तलखी जिला वाटेल सोसावे ?
--सुशांत..
वा नवा शेरही एकदम
वा नवा शेरही एकदम फर्स्टक्लास्स !!
क्या बात है !!! एका पेक्षा एक
क्या बात है !!! एका पेक्षा एक सिक्सर लगावलेत …
<<कसे तो व्दैत इतके सोसतो अन्
<<कसे तो व्दैत इतके सोसतो अन् शांतही असतो
कुणाची प्रार्थना साधी, कुणाचे पाशवी धावे<<
क्या बात, फारच सुंदर.. आवडली!