नो चिकन नो मटण.. ओह्ह एण्ड येस्स... (संपूर्ण!)

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 November, 2014 - 10:33

"
मै जीना चाहता हू मॉं ...
"
रात्री सव्वातीन साडेतीनच्या सुमारास एक केविलवाणा आवाज माझा कानांत खणखणला. क्षणभर वाटले कोणीतरी माझ्या पोटातूनच बोलतेय.. पण "मॉं" .. मला कोणी कॉ बोलेल?
भास झाला असेल किंवा स्वप्नातले काहीतरी असेल म्हणत मी चादर अंगावर ओढत कुस बदलली.
डोळा लागतो न लागतो तोच पुन्हा,

"मै तुम्हारे अंदर से बोल रहा हू मॉं .."

मै मै तर एकदम बैं बैं स्टाईल होते जणू बकरीचे पिल्लूच. आणि अंदरसे म्हणजे पोटातूनच तर येत नसावा, कारण आवाजही थोडाफार तसाच घुमून येत होता.
मी स्वत:च्याच पोटावरून हात फिरवून आत काही जाणवतेय का बघू लागलो. आदल्या रात्रीचे जेवण आठवू लागलो. हाल्फ चिकन तंदूरी रिचवल्यावर अख्खी अंडा बिर्याणी आत टाकली होती. पण ते चिकन पोटातल्या फॅक्ट्रीत जाऊन मटण कसे बनले? बनले तर बनले, बोलू कसे लागले??

इतक्यात तेच कारुण्यस्वर पुन्हा उमटले. मी दचकून पाहिले तर व्हरांड्यात बांधलेल्या बकरीच्या पोटून हा आवाज येत होता. ती बकरी पोटूशी आहे हा शोधही अर्थात मला तेव्हाच लागला. कदाचित त्या पिल्लाला त्याचे भविष्य समजले असावे. तो जन्माला येणार होता ते कोणाच्या तरी पोटाची आग शांत करायला. मग तो नराधम मी असेल वा कदाचित आणखी कोणी. पण जन्माला येणारी शेळी, बोकड जे काही असेल, ते कधी ना कधी जीवानिशी जाणार होते एवढे मात्र खरे.

इतक्यात त्या पिल्लाने थेट माझ्याशीच संवाद साधायला सुरुवात केली..
"रुन्मेऽऽष.. रुन्मेषजी..."
बहुधा त्या कोकराला ‘ऋ’ बोलता येत नसावा. चालायचेच, इथे तरी कुठे सगळ्यांना जमतेय.

"मै जीना चाहता हू रुन्मेऽऽष.."

"हो रे बाळा, कोणीही तुझ्या आईचा गर्भपात नाही करणार, ते फक्त आम्हा माणसांमध्येच होते..", मी अर्धवट झोपेतच एक सेंटी चिपकवला.

"तसे नाही रे बाबा, पण ‘मै अपनी पुरी जिंदगी जीना चाहता हू.. मला कुर्बानीचा बकरा नाही बनायचेय. कोणाच्या हळदीच्या समारंभात नाही कटायचेय. कोण्या एका मनुष्याच्या पोटाची एकवेळची आग शमवण्यासाठी बलिदान देणे यातच माझ्या आयुष्याचे सार्थक नाही मानायचेय."

"हो रे, ते ही खरेय. यात आयुष्याचे सार्थक नसतेच. पण तरीही आता हेच तुझ्या आयुष्याचे प्राक्तन आहे.." , एक अवजड वाक्य मी देखील फेकले.

पण यावर प्रत्युत्तरादाखल एकच प्रश्न त्याने मला विचारला की मी निरुत्तर झालो. मला म्हणाला, "जर तू नवीन जीव जन्माला घालू शकत नाहीस, तर केवळ खाण्याच्या लालसेपोटी एक जीव घेण्याचा तुला काय अधिकार आहे??"
आणि खाडकन माझे डोळे उघडले. खरेच!.. एक ‘पुरुष’ म्हणून मला मांसाहार करत एक जीव घेण्याचा काही एक अधिकार नव्हता.

"अरे पण मी कुठे फुकट खातो, पैसे मोजतो ना त्याचे.." मी माझ्या मनुष्यस्वभावाला जागत त्याला व्यावहारीक द्रुष्टीकोन पटवून देऊ लागलो. जो मुळात मलाच पटत नव्हता.

पण एवढ्यात थांबेल तो बोकड कसला. एक गुगली मला अजून टाकला.
म्हणाला, "तू हिंदू आहेस की मुसलमान?"

मी काहीतरी सर्वधर्म समभावचा डायलॉग चिपकवणारच होतो... इतक्यात तोच म्हणाला, "काय फरक पडतो मित्रा, जर तू हिंदू असशील तर बड्याचे खात नसशील कारण ते तुम्हाला पवित्र आणि मुसलमान असशील तर डुकराला खात नसशील कारण मग ते तुम्हाला निषिद्ध. पण आम्हा बोकडांवर मात्र तुम्ही हिंदू-मुसलमान दोघेही एकत्र येऊन सारख्याच जोशात तुटून पडतात"
.... आणि अचानक मला त्या बोकडामध्ये हिंदू-मुसलमानांना एकत्र आणणारे ‘अमन की आशा’चे प्रतीक दिसायला लागले.

"कसे जमते रे मित्रा, (हे आता मी त्या बकरीच्या पिल्लाला मित्रा म्हणालो), कसे जमताहेत तुला जन्माला यायच्या आधीच हे एवढे उच्च विचार?"

बें बें .. बें बें ... यावेळी तो फक्त हसला.

.......आणि ते कोकरू सांगू लागले,

क्रमश:

------------------------------------------------------------------------------------------------
-- भाग दुसरा - चंदा की कहाणी, चंदा की जुबानी --
------------------------------------------------------------------------------------------------

.......आणि ते कोकरू सांगू लागले,

"तर मित्रा, हि आटपाट खाटमांडू चिरफाड नगरीतील गोष्ट आहे.. (एखाद्या नगरीचेही असे पुर्ण नाव असते हे मला नव्यानेच समजत होते)

तो माझा या आधीचा जन्म होता. जसे तुम्ही माणसे मागच्या जन्मात माणसेच असतात, तसेच मी मागच्या जन्मात बकरी होते. माझे नाव चंदा होते. नक्की साल-महिना तुम्हा माणसांनाच ठाऊक, पण मोबाईलचे कॉलयुग अवतरले होते. मी कासार गल्लीतल्या गणेश मंदिराच्या पुजार्‍याकडे सुखासमाधानाने नांदत होते. त्याच्या पोराबाळांना अगदी पोटभर नाही तरी किमान घोटभर दूध पाजत होते. त्याबदल्यात मिळणारा दोन वेळचा मुबलक चारा गिळून मस्त गुबगुबीत झाले होते. त्यामुळे शेजारपाजारच्या वाडीतील बकर्‍यांपेक्षा खाटिकांचाच डोळा माझ्यावर जास्त होता. पण पुजार्‍याची बकरी असल्याने कोणाची काय बिशाद जे माझ्या केसालाही धक्का लावण्याचा विचार मनात आणतील.

.... आणि मग एके दिवशी अचानक जागतिक मंदीचे वारे वाहू लागले. रिसेशन रिसेशन नावाचे काहीसे आले. चारचाकीवाले दुचाकीने प्रवास करू लागले, दुचाकीवाले बसने जाऊ लागले, बसने जाणारे पायी पायी करू लागले. एकंदरीत सारेच पाई पाई वाचवू लागले. या आर्थिक संकटातून वाचव रे बाबा म्हणत विश्व मॅनेजमेंट जगत् गुरूला साकडे घालायला लोक मोठ्या संख्येने मंदिरात येऊ लागले. एखाद्याला वाटेल की चांगलेच आहे की, याने मंदिर ट्रस्टींची आणि पुजार्‍यांची कमाई वाढलीच असेल. पण कसले काय. याने फक्त मंदिरांवर अतिरीक्त ताणच पडला, इन्कम नाही वाढले. येणारे रिसेशनग्रस्त भक्त दानपेटीत १० च्या नोटे ऐवजी १ रुपयाचे नाणे टाकू लागले. आधी जे देवाला मोठमोठाले हार वाहायचे, ते आता सुट्ट्या फुलांवर काम चालवू लागले. तर सुट्टी फुले वाले दुर्वांवर आले. नारळ देवाला वाहण्याऐवजी नुसता मंदिराच्या पायथ्याशी फोडून, करवंट्याचा कचरा करत खोबरे घरी नेऊ लागले. मंदिर ट्रस्टीने आयोजित केलेल्या महाप्रसादाला मात्र तेवढी गर्दी झाली. पण ती फक्त जेवायलाच! देणगी देण्याच्या नावाने खडखडाट! जोरजोरात घंटानाद करत देवाला (पर्यायाने पुजार्‍याला) फक्त आश्वासने देण्यात येऊ लागली. कहर तर तेव्हा झाला जेव्हा काही लोकांनी आरतीच्या ताटात पैसे टाकण्याऐवजी गपचूप पैसे उचलायला सुरुवात केली.

पण या अश्या परिस्थितीतही काही धार्मिक लोक मात्र एक गोष्ट न चुकता करत होते. ते म्हणजे देवाला खुश करायला बोकडाचे जेवण. अर्थात देवाच्या नावावर बोकड कापत स्वत:च रिचवणे. त्याचबरोबर रिसेशनमुळे दारूचे व्यसन लागलेल्यांनाही सोबतीला मांसाहाराची गरज भासू लागली. त्यामुळे एकीकडे पुजार्‍याच्या घरी ददात चालू असतानाच खाटीकांचा धंदा मात्र तेजीत आला. गल्ली मोहल्ल्यातील कित्येक बोकड खटाखट कापू जाऊ लागले. उरले सुरले भितीने चळचळ कापू लागले. आजवर मी निर्धास्त होते, पण पुजार्‍याच्या घरची हालाखीची परिस्थिती पाहता तो आज-ऊद्याला माझा सौदा तर नाही ना करणार हि चिंता मला सतावू लागली.

आणि अखेर तो दिवस आलाच. जेव्हा आमच्या दारात उभा राहिला, रहमतुल्लाह-उल-हबीब!..

नावाचा पुर्वार्ध धार्मिक आणि उत्तरार्ध रसिक वाटत असला तरी होता तो एक खाटीक!.. जाळीदार पांढरी बनियान आणि जवळपास त्याच कापडाने शिवलेली गोलाकार टोपी. नजरेत तळपत्या कोयत्यासारखे धारदार विखार ठेवत, माझ्याकडे बघत जेव्हा तो आमच्या अंगणात शिरला, तेव्हाच मी नखशिखांत भेदरून गेले. तब्बल साडेसात मिनिटे त्याने माझ्या मालकाशी चर्चा केली. त्या चर्चेचा निकाल त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. आजवर पुजार्‍याने मंदिरासाठी भाविकांकडून चंदा गोळा केला होता, पण आज त्यानेच खाटिकाला आपली चंदा देऊ केली होती.
त्या रात्री मग मला झोप लागलीच नाही, आणि त्यानंतर भल्या पहाटे कधीतरी डोळा लागला तो पुन्हा कधी न उघडायलाच!.."

"ओह्ह .. असे आहे तर!" एवढा वेळ शांतपणे तिची रामकहाणी ऐकत असलेलो मी म्हणालो, "पण हे सारे मला का सांगत आहेस?"

"कारण कटल्यानंतर माझे काळीज खाणारा पहिला मनुष्य ‘तू’ होतास रुन्मेऽऽष!.." त्या पिल्लाचे बोल जळजळत्या रश्श्यासारखे माझ्या कानात उतरले. कलेजी हा माझा आवडता प्रकार आहे हे कबूल होते मला, पण माझी हि आवड अशी सामोरी येईल याची कल्पना नव्हती.

तरीच...! सुरुवातीला मला त्या पिल्लाचा आवाज माझ्याच पोटातून आल्यासारखा का वाटत होते’ या रहस्याचा आता उलगडा झाला होता.

"पण आता माझ्याकडून तुला काय अपेक्षित आहे..?", किंचित भीतभीतच मी विचारले. खून का बदला खून, तसे काळीज का बदला काळीज तर नाही ना या भितीने माझे काळीज एव्हाना धडधडायला लागले होते.

"मला उत्तर हवेय रुनम्या.. या माझ्या खालील प्रश्नाचे.. आणि जर ते तुला देता नाही आले, तर आयुष्यभर तू "नो चिकन नो मटण.. ओह्ह एण्ड येस्स... मासे सुद्धा नाही खायचे", अन्यथा तुझ्या काळजाला शंभर खपल्या धरतील... असे म्हणत, मला प्रश्नात टाकून चंदा अंतर्धान पावली.

तर मित्रांनो, गतजन्मीच्या चंदाने विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर शोधायला मला मदत करा. जो बरोबर उत्तर देईल तोच मायबोलीचा विक्रमवेताळ!

प्रश्न : चंदाच्या मृत्युला जबाबदार कोण? त्या पशूवधाचे पाप नक्की कोणाच्या माथी?

१) स्वताचे पोट भरण्यासाठी तिला खाणारा मी?
२) उदरनिर्वाह चालवण्यासाठी तिला कापणारा खाटीक?
३) स्वत:चे आणि स्वताच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी तिचा सौदा करणारा पुजारी?

.
.
.
.

उत्तर :- चंदाच्या मृत्युला जबाबदार रिसेशन असे प्रतिसादात उत्तर आले आहे तेच. थोडक्यात परिस्थिती. जी पापपुण्याचे सारे निकष बदलून टाकते. म्हणून माणसाने कधीही प्राप्त परिस्थितीत आदर्शवादाचा अहंकार बाळगू नये. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रमश: आणि कमी बद्दल दिलगीर आहे.
सबब, ‘पुढील भाग वेगळ्या धाग्यात न काढता इथेच अपडेटेन’ याची मित्रांनी नोंद घ्यावी.
आवर्जून वाचा आणि सुरुवात कशी वाटली, अन कुठे जातेय ते नक्की सांगा.

क्रमश: आणि कमी बद्दल दिलगीर आहे.>>> हुश्श

सबब, ‘पुढील भाग वेगळ्या धाग्यात न
काढता इथेच अपडेटेन’ याची मित्रांनी नोंद
घ्यावी.>>> दुसरा बाफ न काढण्याच्या निर्णयाबद्दल शतश: धन्यवाद

आवर्जून वाचा आणि सुरुवात कशी वाटली, अन कुठे जातेय ते नक्की सांगा.>>> तुम्हाला दर दोन पाच दिवसाआड़ माबोवर बाफ काढल्याशिवाय चैन पडत नाही का?

ब्लॉग सुरू केलात का? आणखी काही माहिती हवी असल्यास विचारा. इथे लोकं तत्परतेनं मदत करतील.

Lol परत विनोदी पण मस्त. मलापण तुमचे नाव लिहिता येत नाही 'ऋन्मेऽऽष' कॉपी पेस्ट करावे लागते.

मार्गशीर्षात वाचलं नसतं हे लेखन पण रेसिपी नाही म्हणुन वाचले तर क्रमश: पण प्रिडिक्टबल वाट्तय पण वाट बघु पुर्ण होण्याची. Happy

हो Proud क्या कहना लिव्हताना मलाही आठवलेला पण त्यावरून सुचलेय नाही बरं का तर सत्यघटना आहे.

सिनी,
विनोदी Sad
सदर घटनेतील कारुण्याची झालर सोयीस्कर नजरेआड करत विनोद तेवढा टिपलात.
आणि प्रेडिक्टेबल वाटतेय तर ते कराच आता प्रेडीक्ट, ३६ तास दिले तुम्हाला..

ब्लॉग अडकण्याचे कारण याच लेखातील घटना आहे. या यक्षप्रश्नातून सुटल्यावरच आता इतर काही सुचेल, त्याबाबत आपली तत्पर मदत खरेच गरजेचे आहे.

अरे बापरे ! मी संवेदनशीलच आहे हो संपुर्ण लेखाशी.विनोदी मी केवळ <<बहुधा त्या कोकराला ‘ऋ’ बोलता येत नसावा. चालायचेच, इथे तरी कुठे सगळ्यांना जमतेय>> या वाक्यासाठी लिहिले होते वर . कारुण्याची झालर दिसते मलाही पण प्रत्येक गोष्टीतलं कारुण्य मी लिहित नाही.(अरे बापरे, वरच्या निळ्या स्माईली साठी आहे.)

अरेच्या श्रावणाच्या सुरुवातीला तर आपण मांसाहाराबद्दल तुमच्या धाग्यावर बोललो होतो, आता विषय रिपिट झालाय!

डिविनिता,
हे मार्गशीष स्पेशल आहे Wink

तो चर्चेचा धागा होता हो, आणि हा मला आलेला एक विलक्षण अनुभव आहे, तो पण क्रमश: .. आज किंवा उद्या त्या कोकराची कथा लिहितो.. बाकी मग तुम्हीच ठरवा, पण विषय रीपीटचा घिणौना आरोप नको .

@ऋन्मेऽऽष.... हा लेख ट्रान्सलेट करून PETA वाल्यानां पाठवा, तुम्हाला त्यांच्याकडून स्पॉन्सरशीप जरूर मिळेल Happy

<<<<आवर्जून वाचा आणि सुरुवात कशी वाटली, अन कुठे जातेय ते नक्की सांगा.>>भोवतेक शाकाहार की मांसाहार
वर जानार धागा.
कोकरु काय म्हननार आहे याची उत्सुकता लागली आहे.

मला उत्तर माहीत असते तर मी आता मायबोलीवर पडीक नसून, कुठल्यातरी चिकनमटणच्या गुत्त्यावर कबाब रिचवत असतो. Happy

आतातर कुणीतरी तीन आयडी घेउन वरच्या प्रश्नांची उत्तरे हो अशी देउन धाग्याला दिशा द्यावी व आणि ऋन्मेऽऽष यांना पण व धाग्याचा उद्देश स्पष्ट करावा. Happy Proud

ऋन्मेऽऽष चंदाच्या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता ही कहानी मिळाली यातुन काही बोध घेता येईल का?

उन दिनों गौतम बुद्ध के पास जो भी आता उसे भिक्षु बनने की दीक्षा मिल जाती थी। आने वालों में बहुत से लोग राजा थे या ऐसे समुदायों से आते थे, जहां मांस खाना सामान्य बात थी। क्योंकि वे शिकारी थे। भिक्षु हमेशा जंगल में रहते थे। जब आपको भूख लगती है तो यह स्वाभाविक है कि आप किसी को मार कर खाना चाहते हैं। इसलिए बुद्ध ने एक नियम बना दिया कि भिक्षु मांस नहीं खाएंगे।
एक दिन दो भिक्षु शहर में भिक्षा मांगने गए। उस दिन उन्हें खाने के लिए कुछ भी नहीं मिला। इससे कोई फर्क नहीं पड़ता था कि भिक्षुओं को अलग-अलग क्या मिलता है क्योंकि सभी भिक्षु आकर भोजन को बुद्ध के चरणों में रख देते थे। वह उस भोजन को बांट देते थे ताकि हर किसी को कुछ न कुछ मिल सके। उस दिन वे दोनों भिक्षु पूरे शहर में घूमे लेकिन उन्हें कुछ नहीं मिला। वे लौट रहे थे। उसी समय एक कौवा मांस के एक टुकड़े को अपने पंजों में दबाए आसमान में उड़ रहा था, अचानक उसकी पकड़ कमजोर पड़ी और वह मांस का टुकड़ा सीधा आकर भिक्षु के पात्र में गिरा। उन्होंने देखा- मांस का एक टुकड़ा ! आप जानते हैं कि मन हमेशा कोई न कोई बहाना ढूंढता रहता है। आप सुबह में देर से उठने के लिए नहीं ढूंढते? इसलिए भिक्षु गौतम के पास आए और कहा, ‘देखिए, आपने हमसे कहा था कि हमें मांस नहीं खाना चाहिए। हमें उससे कोई ऐतराज नहीं है। लेकिन आपने हमसे यह भी कहा था कि ‘हमारे पात्र में जो कुछ भी मिले, हमें उसे खा लेना चाहिए, चुनना नहीं चाहिए। एक भिक्षु को यह नहीं देखना चाहिए कि वह क्या खा रहा है। जो भी मिले, उसे खा लेना चाहिए’- आपने ऐसा कहा था। अब हमारे पात्र में मांस है। अगर हम उसे खाते हैं, तो हम एक नियम तोड़ेंगे। लेकिन अगर हम उसे नहीं खाते तो हम दूसरा नियम तोड़ेंगे। हमें क्या करना चाहिए?’

इंसानी दिमाग ऐसा ही है। गौतम ने इस पर विचार किया। वह किसी भी बात को दूरदर्शिता से सोचते थे। उनके लिए सिर्फ आज का समय महत्वपूर्ण नहीं था। इसलिए उन्होंने सोचा कि अगले दो-ढाई हजार सालों में किसी और कौवे का किसी दूसरे भिक्षु के पात्र में मांस का टुकड़ा गिराने की संभावना क्या है? करोड़ों में एक मौका ऐसा हो सकता है। इसलिए उन्होंने कहा, ‘तुम उसे खा लो।’ एक भिक्षु को चुनना नहीं चाहिए, यह ज्यादा महत्वपूर्ण है। आज मांस आपके पात्र में गिर गया, उसे खा लीजिए, चुनिए नहीं।

आपकी थाली में जो भी आए, बस उसे खा लीजिए, चुनने की जरूरत नहीं है। क्योंकि जैसे ही आपने चुनना शुरू किया, फिर उससे आपका जुड़ाव इतना अधिक होगा कि आप शांत नहीं बैठ सकते।

सुरेख, सुरेख बोधप्रद कथा. गौतम बुद्धांनी योग्यच निर्णय घेतला.
यातून मी घेतलेला बोध,
१) जेव्हा दोघांपैकी एक नियम मोडणारच असतो तेव्हा ज्या नियमाला मोडायची शक्यता वा संधी पुन्हा निर्माण होणे दुर्मिळ आहे त्या नियमाच्या मोडण्याला प्राधान्य द्या.
२) पण त्याचबरोबर हे सुद्धा यातून अधोरेखित झाले की मांस न खाणे हा असाही नियम नाही की जो काही झाले तरी तुटता कामा नये.

पण आता याची माझ्या कथेशी कशी सांगड घालणार वा यातून चंदाच्या प्रश्नाची उत्तरे कशी शोधणार हे नाही समजले.

सिनी,
या कथेचा वा लेखाचा उद्देश काय आहे याकडे मी येणारच आहे.. कधी ना कधी.. कारण हवेत असे मी काहीच लिहित नाही. तुर्तास शाकाहारी लोकांना याचे उत्तर देताना धर्मसंकटात टाकणे हाच उद्देश आहे असे समजा Happy

(माझ्या आकलनानुसार) बुद्धाने कधीही अतिरेकी अहिंसेचा प्रचार केला नाही. अहिंसक जैन धर्म ऑलरेडी 'इन प्लेस' असताना बौद्ध धर्म का व कसा प्रचलित झाला, तो भारतभर पसरून मग अतीपूर्वेला व मध्यपूर्वेकडेही का पसरत गेला, याचं कारण तिथे आहे. पौर्वात्य मार्शल आर्ट्सही बौद्धांच्याच आहेत. थर्टिसिक्थ चेंबर ऑफ शॅओलिन वगैरे आठवून पहा Wink गेला बाजार ब्रूस ली तरी Lol

'खारट व आंबट' वस्तू खाण्याची, भिक्षेत मिळवण्याची वगैरे परवानगी भिक्खूंना होती. स्वतः बुद्धाचे शेवटले भोजन सूकरमद्दव हे होते. वरची स्टोरी पौराणिक जास्त वाटते आहे.

ऋन्मेऽऽष,

तुम्ही वेड पांघरून पेडगावला गेलेले शहाणे आहात, असे म्हणतो. (एक्स्टेन्शन ऑफ प्रेपोझिशन = येडे बनून पेढे खाणे)

माझ्या या प्रतिपादनाबद्दल तुम्हास काय म्हणावयाचे आहे?

इब्लिस,
बौद्ध किंवा कुठल्याही धर्माबद्दल मला फारसे खोलात जाऊन माहीत नाही. तसेही मी प्रत्येक कथेकडे पौराणिक कथा म्हणूनच बघतो. मात्र त्यातून काही सकारात्मक बोध घेणे शक्य असेल तर तो मात्र घेतो. ईथेही विषयापुरताच त्यावर भाष्य केले आहे.

तसेच आपले पुढच्या पोस्टमधील प्रतिपादन सत्य आहे. मी बरेचदा वेड पांघरूनच वावरतो. आयुष्य जगायचा सोपा मार्ग आहे तो.

इब्लिस वरची स्टोरी पौराणिक असु शकते.

<<(माझ्या आकलनानुसार) बुद्धाने कधीही अतिरेकी अहिंसेचा प्रचार केला नाही.>>>बरोबर आहे.
त्यांनी नेहमी मध्यम मार्गच सांगितला आहे.

जपान मधे १००% लोक मांसाहारी आहेत ते स्वभावाने खुप शांत, सहनशिल व मेहनती असतात.विषेश म्हनजे दिर्घायुषी असतात.

तुम्ही दोन प्रश्न विचारले आहेत.
१) चंदाच्या मृत्युला जबाबदार कोण?
२) त्या पशूवधाचे पाप नक्की कोणाच्या माथी?

आधी दुसर्‍या प्रश्नाचं उत्तरः पोट भरण्यासाठी कशा ना कशाचा वध हा करावाच लागतो हा निसर्गाचा नियम आहे.
जीवो जीवस्य जीवनम् (Life Sustains Life)
प्राण्याचा नाही तर वनस्पतीचा. वनस्पती फक्त पळून जाऊ शकत नाही, ओरडत नाही इतकेच. प्राण्यांनी आपल्याला खाऊ नये म्हणून त्या सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात. (रंग, रसायनं, काटे, चव, विष वगैरे वापरून) याला evolutionary warfare असं म्हणतात. याची अधिक माहिती हवी असल्यास National Geographic, Animal Planet, Discovery वगैरे चॅनेल पहावेत. (इतका वेळ नसल्यास गूगल आहेच.)

ज्यांना मांसाहार आवडत नाही त्यांनी अजिबात करू नये. मात्र शाकाहारात वध होत नाही अशी गैरसमजूत करून घेणं हे अज्ञानाचं किंवा दांभिकपणाचं लक्षण आहे.

पहिला प्रश्नः अर्थात तुम्हीच. जर तुमच्यासारखे हजारो लोक नसते तर खाटकाला दुकान विकून टाकायला लागेल आणि कितीही जरूर असली तरी पुजारी तिचा सौदा करू शकणार नाही.

"जीवो जीवस्य जीवनम् " >>>> येस्स, याच्याशी मी सुद्धा सहमत आहेच. माणूस दगड-माती वा लाकडाचा भुसा खाऊन नाही जगू शकत. सजीव हा सजीवाला खाऊनच तरतो. त्यामुळे मांसाहाराला पाप असे मी देखील मानत नाहीच.

अर्थात तुम्हीच. >>>> हे मात्र काही अंशी पटले नाही. मांसाहार करायचा पर्याय मी निवडला म्हणून माझी गरज पुरवायला कोणीतरी मला मांसाहार पुरवला. पण ज्याने मला मांसाहार पुरवला त्याला या जगात उदरनिर्वाहासाठी इतर कोणताही व्यवसाय करायचा पर्याय होताच की. त्याने खाटीकाचाच धंदा का स्विकारला? तसेच हे पुजार्‍यालाही लागू. त्यालादेखील पैसे उभारण्यासाठी इतर वस्तू विकण्याचा पर्याय होता. पण त्याने बकरीच विकली आणि तिचा योग्य दाम देऊ शकणार्‍या खाटीकालाच विकली. म्हणजे विकताना त्यालाही आपण आपल्या बकरीच्या जीवाचाच सौदा करत आहोत हे माहीत होते आणि कबूल होते.

उलटपक्षी खाटीकाला रोजगार मिळवून द्यायचे पुण्य माझ्या (मांसाहार करणार्‍यांच्या) नावावर जमा होते असे म्हणायला वाव आहे Happy

ॠन्मेSSषजी,
उत्तर मागायला तें बकरीचं पिल्लू येईल तेंव्हा त्याला हें प्रश्नार्थक उत्तर द्या-
' अरे, प्रत्येक जन्मात तुझ्या नशीबीं जर हेंच असतं, तर उगीच कशाला नेमका याच जन्मात इथं येवून माझ्याच [ व, अर्थात समस्त माबोकरांच्या !] डोक्याला हा ताप देतोयस ? जरा पॉझिटीव्ह विचार केलास तर तुझ्याही लक्षांत येईल कीं केवळ पुजार्‍याकडे होतास म्हणून उलट तुझं आयुष्य अधिक वेळ व अधिक सुखात गेलं होतं गेल्या जन्मात !' Wink
[ता.क. - << 'ऋन्मेऽऽष' कॉपी पेस्ट करावे लागते. >> मींही तसंच करत असे; यावेळीं मात्र मीं स्वतः टाईप केलंय. जमलंय ना ? ]

दुसरा बाफ न काढण्याच्या निर्णयाबद्दल शतश: धन्यवाद Wink

तुम्हाला दर दोन पाच दिवसाआड़ माबोवर बाफ काढल्याशिवाय चैन पडत नाही का? >>> + १०००

ॠ.............भाउ ...जरा सिरियसली घ्या की , नाही म्हणजे ते ब्रेक घ्यायचे म्हनतोय मी ...

Pages

Back to top