Submitted by आशुचँप on 19 November, 2014 - 14:27
आज रामपाल बाबाचे दिव्य पराक्रम पाहून संताप संताप झालाय. अटक होऊ नये म्हणून या बाबाच्या कमांडोजनी पोलिस पथकावर गोळीबार केला. झालेल्या धुमश्चक्रीत चार बायका आणि एक दीड वर्षाचे बाळ ठार झाले.
अरे काय चाललयं काय....
कामचुकारपणा करायचा म्हणून कामावरून काढून टाकलेला हा इंजिनियर माणूस अचानक बाबा म्हणून काय अवतिर्ण होतो आणि आपला मूर्ख समाज त्याला डोक्यावर काय घेतो सगळेच अनाकलनीय...
या भोंदू बाबाविरुद्ध खूनाचा आरोप असतानाही हे शंख भक्तगण त्याचे समर्थन करतात हे पाहून मान लाजेनी खाली गेली. तसाच तो आसाराम...आणि अन्य अनेक...
इतर अत्यंत फालतू गोष्टींवरून धार्मिक भावना दुखावणारे कुठे आहेत आता. या लोकांमुळे तुमच्या भावना दुखावत नाहीत का. का तो केवळ हिंदु आहे म्हणून त्याने बलात्कार, खून, अपहरण केलेले क्षम्य आहे....
अरे कसले रे लोक...शी...लाज वाटते....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
limbutimbu, >> या शतकात
limbutimbu,
>> या शतकात मिडीया जे जे दाखविल सांगेल ते ते सत्य मानण्याची अंधश्रद्धा आहे.
अनुमोदन. जो वार्तांकनाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करतो तो झापडबंद ठरतो आणि जो टीव्हीवरच्या बातम्यांवर विश्वास ठेवतो तो मात्र पुरोगामी असतो (मुद्दा क्र. ९).
आ.न.,
-गा.पै.
खरोखर हे अनेक बाबालोक डोक्यात
खरोखर हे अनेक बाबालोक डोक्यात जातात
अगदी लांच्छन आहेत खर्या धर्माला, सद्विचारांना, सत्प्रवृत्तीला
त्यातल्या त्यात रामदेवबाबा (रामपाल नाही) बराच बरा आहे,
कारण त्याच्यामधे स्वतःचा उदोउदो वाढविण्यापेक्षा सुद्धा योगाचा प्रसार करण्याची कळकळ जास्त आहे.
ज्यांना जास्त उत्सुकता आहे त्यांनी माबोवर पुर्वी होऊन गेलेले काही धागे सविस्तर वाचावे
अनिरूद्ध बापू धागा, कल्टसची माहिती देणारा धागा, इ.
वाचाल तर वाचाल, नाहीतर वाचाळ
माझ्या प्रश्नाना भक्त उत्तर
माझ्या प्रश्नाना भक्त उत्तर का देत नाहियत ???? त्याच्याकडे उत्तर नसतिल तर तसे सांगावे...
म्हणजे ते जर सुटून आले तरी
म्हणजे ते जर सुटून आले तरी तुमच्या लेखी ते गुन्हेगारच? न्यायसंस्थेवर विश्वास नाही?
>>>>>
अदालत सबूत मांगती है. और कोर्ट के चार दिवारो के बाहर, दो तारखोंके बीच, सबूत कैसे तोडमरोडे जाते है ये सब जानते है.
मूळ प्रश्न हा आहे की
मूळ प्रश्न हा आहे की एखाद्याला संत महात्मा ठरवताना जे किमान गरजेचे आहे ते चारित्र्य आणि निस्वार्थी, निर्लोभी वृत्ती या निकषावर हे लोक कुठेतरी आहेत का?
माझ्या प्रश्नाना भक्त उत्तर
माझ्या प्रश्नाना भक्त उत्तर का देत नाहियत ???? त्याच्याकडे उत्तर नसतिल तर तसे सांगावे...
कोणाचे रामपालचे भक्त ??? ते इकडे आहेत माबोवर ??? बापरे, भलतेच काहीतरी ?
आसारामबद्दल म्हणत असाल तर जे त्यांच्या बाजूने लिहिल्यासारखे वाटत आहेत ते त्यांचे भक्त असण्याची शक्यता दूर दूर तक नजर नही आती हैं |
आता यावर मी फक्त एकाच पक्षाची बाजू घेतो म्हणुन येईलच कोणीतरी, तर त्यावर आधीच सांगून ठेवतो,
की माझा वरचा या आधीचा मेसेज पण वाचावा, अनिरूद्ध बापू धागा पण वाचावा आणि मगच बोलावे. _/\_
>>मूळ प्रश्न हा आहे की
>>मूळ प्रश्न हा आहे की एखाद्याला संत महात्मा ठरवताना जे किमान गरजेचे आहे ते चारित्र्य आणि निस्वार्थी, निर्लोभी वृत्ती या निकषावर हे लोक कुठेतरी आहेत का?
अज्जिबातच नाहीयेत. या निकषांप्रमाणे रामदेव, श्री-३, इ. कोणीच नाहीये.
पण आमटे, बंग, सिंधुताई, इ. लोक नक्की त्या निकषांच्या खुप जवळ आहेत.
"तर जे त्यांच्या बाजूने
"तर जे त्यांच्या बाजूने लिहिल्यासारखे वाटत आहेत ते"
आसारामबद्दल म्हणत असाल तर जे
आसारामबद्दल म्हणत असाल तर जे त्यांच्या बाजूने लिहिल्यासारखे वाटत आहेत ते त्यांचे भक्त असण्याची शक्यता दूर दूर तक नजर नही आती हैं | ? काय महेश साहेब सगळे ठिक ना ?
करी वृत्ति जो संत तो संत
करी वृत्ति जो संत तो संत जाणा।
दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणा।।
उपाधी देहेबुधिते वाढवीते।
परी सज्जना केवि बाधू शके ते
डॉ.शेवडे नामक सद्गृहस्थांनी "संत कोणाला म्हणावे" याचे छान वर्णन केले आहे.
http://navshakti.co.in/editorial/artha-parmartha/55059/
वेड घेउन पेडगावला कसे जायचे
वेड घेउन पेडगावला कसे जायचे याचे उत्तम उदाहरण दिले आहे
मला वाट्टे की .... "नविन
मला वाट्टे की ....
"नविन कायदा करून, त्यानुसार वरील बर्याच तज्ञ मायबोलीकरांची समिती नेमून, युनिव्हर्सिटीसारख्या पदवी परीक्षा ठेवून त्या परीक्षांद्वारे "संतान्ना" सर्टीफिकीटाची सक्ति करावी..... अन सर्टीफिकेट असेल तरच ह.भ.प., संत, वगैरे पदव्या वापरण्याची परवानगी हवी, नैतर डायरेक्ट अटक असा कायदा असावा"
अशा स्वरुपाची मागणि लौकरच तमाम सूज्ञ पुरोगामी वगैरे मायबोलीकर करतील...
काय म्हणता?
तो सुदिन लवकर यावा हीच
तो सुदिन लवकर यावा हीच इश्वरचरणी प्रार्थना
>>वेड घेउन पेडगावला कसे जायचे
>>वेड घेउन पेडगावला कसे जायचे याचे उत्तम उदाहरण दिले आहे
ओ काय म्हणण आहे तुमचं ? आसारामच्या बाजूने लिहिल्यासारखे दिसत असले तरी गामा आणि मंडळी त्याचे भक्त म्हणजे पार वाहून घेतलेले, रोजच्या रोज जाऊन बेलफुले वहात आहेत असे काही वाटत नाही हे माझे वैयक्तिक मत आहे.
तुमचा प्रॉब्लेम काय आहे नक्की आसाराम की गामा आणि मंडळी, पहले प्रॉब्लेम नक्की करना रे, नाम घर या नोकरी.
येथून पुढच्या कमेन्टस एकतर इग्नोर करण्यात येतील, जास्तच झाल्यास तक्रार करण्यात येईल. क.लो.अ.
असो, तर लोकहो, सद्ध्या जे काही अवास्तव स्तोम माजले आहे ते कमी होणे आवश्यकच आहे, बुवाबाजीचे बर का. त्यासाठी अगदी कठोरात कठोर उपाय योजावे लागले तरी हरकत नाही.
लिंबूदा, असा टोकाचा विचार का
लिंबूदा, असा टोकाचा विचार का ???
तुम्ही ते उपरोधाने लिहिलेले आहे हे कळत आहे, पण तरी
सर्वसाधारणपणे कोणाही सदसदविवेकबुद्धी असलेल्या माणसाला कळू शकत नाही का ?
कोण चांगले आणि कोण वाईट ते ? पदवी, इ. ची गरज का पडावी ?
मी अतिशय योग्य लिहिले आता खरच
मी अतिशय योग्य लिहिले आता खरच वाटु लागले आहे. बाकी चालु द्या.
मला तर कोणताही कल्ट, जेथे
मला तर कोणताही कल्ट, जेथे माणसाच्या सारासार विचार करण्याच्या शक्तीचे अपहरण करून त्याला मानसिक गुलाम बनविले जाते असा कोणताही कल्ट भयानक चुकीचा वाटतो, भले त्यांची कृत्ये कितीका चांगली असेनात.
लिंबुमहाराजांना मायबोलीपिठाचे
लिंबुमहाराजांना मायबोलीपिठाचे जगद्गुरु अशी पदवी देण्यात येत आहे.
लिंब्या रजिस्ट्रेशन चार्जेस १००० रु पाठव.. सर्टिफिकेट पोस्टाने दिले जाईल.
सर्टिफिकेट फक्त दोन वर्षे वॅलिड राहील. नंतत पुन्हा नुतनीकरण कराबे
लिंबूदा, कुठे आहात ? जागो
लिंबूदा, कुठे आहात ? जागो मोहन प्यारे !!!
<<आसारामबद्दल म्हणत असाल तर
<<आसारामबद्दल म्हणत असाल तर जे त्यांच्या बाजूने लिहिल्यासारखे वाटत आहेत ते त्यांचे भक्त असण्याची शक्यता दूर दूर तक नजर नही आती हैं |>> असे असेल तर आशुचँप यांच्या धाग्याची लांबी वाढविन्यासाठी पोस्ट लिहल्या जात असाव्यात. असुदेत धागा १००० नक्की गाठेल.
अन सर्टीफिकेट असेल तरच
अन सर्टीफिकेट असेल तरच ह.भ.प., संत, वगैरे पदव्या वापरण्याची परवानगी हवी, नैतर डायरेक्ट अटक असा कायदा असावा"
>>>>>>>
हे अॅक्चुअली चालेल.
अन्यथा उद्या मी स्वतःला "संत ऋन्मेष महाराज" म्हणून घोषित केले तरी ईथे सर्वांना ते मान्य करावेच लागेल. तसेच माझ्यावर होणारी टिका हिंदू धर्मावर होणारी टिका म्हणून ग्राह्य धरली जाईल.
>>असुदेत धागा १००० नक्की
>>असुदेत धागा १००० नक्की गाठेल.
ओह असे असेल तर या धाग्याचे भविष्य !
"संत ऋन्मेष महाराज" >> याला
"संत ऋन्मेष महाराज" >>
याला म्हणतात प्रगती ,वैराग्य की ...अरे पण तुमची ग-फ्रेंड आहे ना 
मग काय झाले आजकाल हे सगळ
मग काय झाले आजकाल हे सगळ चालते
संत ऋन्मेष महाराज चालेल का?
संत ऋन्मेष महाराज चालेल का? हो म्हणु नका नाहीतर परत 'कायदेशीर, बेकायदेशीर आणि नैतिकता!' यांचे डोस मिळतील

>>>> तो सुदिन लवकर यावा हीच
>>>> तो सुदिन लवकर यावा हीच इश्वरचरणी प्रार्थना <<<<
>>>> हे अॅक्चुअली चालेल. <<<<
धन्यवाद.
अन अशाच प्रकारे ज्योतिष्/हस्तसामुद्रिक यांचेकरताही युनिव्हर्सिट्यान्च्या पदव्या कम्पलसरी कराव्यात.
नैतर कोणही उठतो अन पोपट घेऊन बसतो असे व्हायला नको.......
सहमत ना?
असाल तर छानच....
फक्त असे कुणि करू गेले तर लग्गेच "हिन्दू धार्मिक" शिक्षणाची सक्ति केली म्हणून गळा काढणारे हिंदू/अहिंदू अवतीभोवती मुबलक आहेत त्यांचे काय करायचे ते ही हातोहात ठरवून टाका म्हणजे झाले. , कसे?
(No subject)
>>> >लिंबूदा, असा टोकाचा
>>> >लिंबूदा, असा टोकाचा विचार का ??? <<<
महेश, वरल्या पोस्टवरून कळलेच असेल की असा "टोकाचा विचार" करायला मी का सुचवित आहे ते...
"संत ऋन्मेष महाराज" >> हाहा
"संत ऋन्मेष महाराज" >> हाहा याला म्हणतात प्रगती ,वैराग्य की ...अरे पण तुमची ग-फ्रेंड आहे ना फिदीफिदी>>
ऋषीमुनी पूर्वी लग्न करायचे की. आणि हे त्यांच्या गर्लफ्रेन्डशीच लग्न करणार असल्याने चालत असावे
त्या परीक्षांद्वारे
त्या परीक्षांद्वारे "संतान्ना" सर्टीफिकीटाची सक्ति करावी..... अन सर्टीफिकेट असेल तरच ह.भ.प., संत
>>.लिम्ब्या या वाक्यात तीन अनुस्वार आलेले आहेत जे की तुला भेटलेल्या ज्योतीशाच्या सल्ल्याच्या विरोधात आहे. बघ बुवा आता तुझे काय होणार ते !
Pages