नैवेद्य १) मोदक

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 August, 2011 - 15:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

तांदळाचे पिठ
मिठ

१ ओला नारळ खरवडून
गुळ
खसखस
चारोळी/काजु/आक्रोड/मनुका
वेलची/केसर
तुप

क्रमवार पाककृती: 

तापलेल्या भांड्यात तुप टाकुन खसखस घाला. आता त्यावर गुळ घाला व मंद गॅसवर वितळू द्या.
गुळवितळला की लगेच खोबर व चारोळी/काजु/आक्रोड/मनुका/बदाम पैकी काही आवडत असेल ते घाला किंवा जे घरात असेल ते थोडे थोडे घाला.
थोडा वेळ परतुन गॅस बंद करा.

आता १ ते दिड ग्लास पाणी घेउन त्यात मिठ टाकुन गरम करण्यासाठी ठेवा. आता पाणी उकळायच्या आधी जे भांड्याच्या तळातुन बुडबुडे यायला लागतात तेंव्हा तांदळाचे पिठ अंदाजे टाकत ढवळा व लगेच गॅस बंद करा म्हणजे मोदक वातड होत नाहीत. जास्त पिठ टाकु नका. पिठ ओलसर राहील एवढेच टाका.

पिठ परातीत काढा व थोडे थंड झाले की पाण्याने मळायला घ्या. जास्त पाणी लावु नका. हलकेच हात भिजेल एवढेच घेत रहा व चांगले मळून घ्या.

आता मोदक करायला घेताना परत थोडे पिठ जरा मळा व लिंबाएवढा गोळा घेउन त्याची पातळ वाटी करा.

वाटीत तळाला नारळाचे सारण भरा. आता वाटीच्या बाहेरच्या बाजुला दुमडत कमी अंतरावर कळ्या करा. मग वाटीच्या वरच्या भागाच्या कळ्यांना हलके आतल्या बाजुला गोल गोल फिरवत वरच्या दिशेने जुळवा. टोकाची शेंडी टोकदार करा.

आता हे मोदक २० ते ३० मिनिटे मोदक पात्रात वाफवुन घ्या.

मोदकांबरोबर आमच्याकडे करंज्या (शिंगर्‍या) व खापट्या (पिठाची चपटे गोल) करण्याची पद्धत आहे.

वाढणी/प्रमाण: 
गणपती बाप्पालाच २१ लागतात :स्मित:
अधिक टिपा: 

प्रथम वंदनिय गणपती म्हणुन गणपतीच्या मोदकाने सुरुवात करत आहे. तसे आमच्याकडे नागपंचमी ह्या पहिल्या श्रावणातल्या सणालाच नागोबाच्या नैवेद्यासाठी मोदक करण्याची प्रथा आहे.

उकळवणी घेताना काही जणं पाण्याबरोबर दुध किंवा तेलही घालतात.

वाटी वळताना काही जणं ती पातळ होण्यासाठी हाताला तेल लावतात. मी नेहमी पाणीच वापरते.

मोदकाच्या सारणात आक्रोड जास्त चांगला लागतो हा माझा अनुभव आहे.

साखरचौतीच्या गणपतीला नारळाच्या सारणात गुळाऐवजी साखर घालतात.

(नागपंचमीच्या दिवशी ऑफिसला जायच्या घाईमुळे सगळे फोटो काढू शकले नाही त्याबद्दल क्षमस्व. पण परत केल्यावर सगळे फोटो इथे लोड करण्याचा प्रयत्न करेन.)

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु आप महाssन हो. बोले तो एकदम सुगरण नं. १ हो.:स्मित:

मला असे मोदक या जन्मी करता येणे शक्यच नाही.:फिदी:

असेच गट्टम करावेत.:स्मित:

जागू, साक्षी,
किती सुरेख कळ्या पडल्या आहेत. छानच.उकड करताना १ चमचा साजूक तूप घालून हळदीच्या पानावर वाफवावे.
खूप सुरेख स्वाद येतो.तुम्हाला तर माहित असेलच!

उकड चिकट व्हायचे नक्की कारण काय असतं?

(मी अजून केली नाहीये कधी पण आधीच विचारून ठेवते.. उद्या पहिल्यांदा करणार आहे.)

कृपया प्रकाश टाका.

केवळ अ प्र ति म .........!!!!! दंडवत तुला
शुभ्र फुलेच जणु !!!!

घरी पिठी बनवणारे जरा पिठी बनवायची कृती सांगाल का?>>> साधे किंवा बासमती तांदूळ धूऊन सावलीत खड्खडीत वाळवावे व दळून आणावे. तांदूळ-पीठ तयार!

जागू, अगं कसले सह्ही दिसताहेत मोदक!! चवीला चांगले अस्तील यात शंकाच नाही पण त्याबरोबर ते प्रेक्षणीय पण झालेत! Happy

असे मोदक मला करता यायला पाहिजेत हे माझं स्वप्न आहे.

देखणे मोदक. माझ्या मोदकाला ५-६ च कळ्या असतात.
असे मोदक मला करता यायला पाहिजेत हे माझं स्वप्न आहे. >> माझे पण असेच स्वप्न आहे. पण स्वप्नात सुद्धा मला असे मोदक जमणार नाहीत

मृणाल, शांकली जमेल जमेल बरीच स्वप्न खरी होतात Happy

झंपी क्रमवार पाककृतीच्या दुसर्‍या पॅरा मध्ये लिहीले आहे त्याप्रमाणे उकड काढ म्हणजे चिकट नाही होणार.

तांदुळ धुवून वाळवून ते दळून आणायचे फार सोपे आहे तांदळाची पिठी करणे मीन्वा.

रावण आमच्याकडे नाही करत भरडलेली डाळ. तुम्हाला रेसिपी समजली की मलाही सांगा.

धन्स माधुरी.

रावण, त्याला वाटली डाळ म्हणतात. पण त्याला कैरी लागते. कैरी, हिरवी मिरची, चन्याची भिजवलेली डाळ भरड वाटायची. थोडे मीठ थोडी साखर घालायचे.

आज पुन्हा एकदा दर्शन घेतलं ह्या मोदकांचं.... बाप्पाच्या दर्शनासोबत घ्यावं तस्सं Happy
केवळ अप्रतिम, जागू.

अप्रतिम!! निव्वळ अप्रतिम!! स्पीचलेस्स!!! फोटोतच मोदक कीती सुंदर दिसत आहेत . Happy

विनायक अंगारकी च्या शुभेच्छा.

Pages

Back to top