Submitted by sneha1 on 21 November, 2014 - 13:26
अमेरिकेत घर घेताना कोणत्या गोष्टी सहसा बघितल्या जातात? एजंट कसा निवडावा? कोणती घबरदारी घ्यावी? इथे लिहा प्लीज..
धन्यवाद!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकच गोष्ट जी वापरून वापरून
एकच गोष्ट जी वापरून वापरून cliche झालेली आहे ती म्हणजे location, location, location.
कुठे घर घेणार हे नक्की असेल
कुठे घर घेणार हे नक्की असेल तर Zillow.com, realtor.com , यावर किमती, नेबरहुड, प्राइस हिस्ट्री, त्या एरियातले रिसेन्ट सेल प्राइसेस वगैरे बरेच बघता येते . greatschools.net वर शाळांचे रेटिंग बघता येते.
maitreyee +१ redfin.com,
maitreyee +१
redfin.com, zillow.com वर बरीच माहिती मिळू शकेल.
चांगला Realtor शोधणे पण महत्वाचे आणि उपयोगी असते. त्याच्या शिवाय पण बरीच लोकं घरं बघतात आणि घेतात. पण प्रत्येकाचा निर्णय असतो तो.
realator.com किंवा कुठलीही
realator.com किंवा कुठलीही साईट ज्यावर MLS ची लिस्टिंग दिसतात त्यावर लक्ष ठेवून किमतीचा अंदाज घेता येईल. नवीन घर घायचं नसेल तर बिडिंगची प्रोसेस समजून घ्या, एजंट हा < strikeout > बायारच्याच <\strikeout> सेलरच्याच बाजूने असतो (म्हणजे किंमत वाढवायला मदत करतो, कारण त्याचा इंटरेस्ट त्यात असतो, पण बऱ्याचवेळा तो अपरिहार्यही असतो), तुमच्या शहरात विनाएजंट काही साईट असेल तर शोधा. आमच्या इकडे grapevine म्हणून एक साईट आहे. तुमच्या एरिया मध्ये प्राईस war जनरल होत असेल तर २४ तासात परत बिड करावं लागतं ते समजून घ्या. कधी कंडीशननल ऑफर द्यायची/ इन्स्पेक्शन तुम्ही स्वत: करणार/ कोणाची मदत घेणार/ त्याला खरचं काही कळतं का? मुद्दलात इन्स्पेक्शनमध्ये मेजर/ मायनर काय कळू शकतं याचा सर्च करा, आणि शनिवार पासून ओपन हाउस अटेंड करायला लागा. गुड लक.
चुकून बायर लिहीलं सेलर डोक्यात असूनही.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
http://www.trulia.com/ नावाची
http://www.trulia.com/ नावाची एक फार मस्त साइट आहे. तिथे पण छान माहिती मिळेल, सल्ले मिळतील. तिथे तुम्हाला हव्या त्या स्पेसिफिक एरियाबाबत प्रशन विचारलात तर रियलटर, होम इंस्पेक्टर लोकांकडून बरेच इनपुट्स येतात.
अमितव म्हणतात तसे ओपन हाउस बघाच पण आसपासच्या सर्व एरियातील मॉडेल होम्स पाहा. आपल्याला काय आवडतय काय नाही याचा स्वतःलाच नीट अंदाज येतो मग.
गुडलक
बरेचदा एजंट्स खूप पुश करतात
बरेचदा एजंट्स खूप पुश करतात एखादे घर घेण्यासाठी. अपवादानेच बायरच्या बाजूने असलेले भेटतात. म्हणून एजंट कुणाच्या ओळखीतून मिळाली/ला तर बघा. एजंट असलाच पाहिजे असे काही नाही.
Zillow.com, realtor.com इथे लिस्टिंग्स, आधी किती किमतीला घर विकले गेले होते इ. माहिती मिळेल.
मॉर्टगेजसाठी प्री-अप्रुव्हल असलेले चांगले. तुमच्या व्हिसा/सिटिझनशिपप्रमाणे इंटरेस्ट रेट कमी-जास्त असु शकतो. ती माहिती करून घ्या.
मुलं असतील तर अर्थातच जिथे घर घेणार तिथल्या डिस्ट्रिक्टमधल्या शाळेचे रेटिंग, जरा diverse पॉप्युलेशन असलेला एरिया हे बघालच. तुमच्या मनास असलेल्या नेबरहुडात दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरी २-३ वेळा ड्राइव्ह करून या.
कधी कंडीशननल ऑफर द्यायची/ इन्स्पेक्शन तुम्ही स्वत: करणार/ कोणाची मदत घेणार/ त्याला खरचं काही कळतं का? मुद्दलात इन्स्पेक्शनमध्ये मेजर/ मायनर काय कळू शकतं याचा सर्च करा >>>> तुमच्या ओळखीत स्वत:चे घर घेतलेल्या २-३ लोकांकडून तरी याबद्दल माहिती मिळवायचा प्रयत्न करा. गूगल करून स्वतः पण शोधाशोध करा.
ओपन हाउस +१. तिथे लोकं प्रश्न विचारतात ते कान देऊन ऐका. आपल्याकडून सुटून गेलेला एखादा पॉइंट तिथे कळतो किंवा क्लियर होतो.
मलाही हा प्रश्न पडला होत.
मलाही हा प्रश्न पडला होत. काही दिवसांपासून झिलो आणि ट्रुलिय पाहतो आहे. पण थोडे अजून प्रश्न आहेत. इकडेच टाकतो म्हणजे सगळे एकत्र राहतील.
१) मार्केट तसे सांगता येत नाही पण गुंतवणूक म्हणून घर घेणे किती चांगले ? - सध्या रेंट वर राहतो पण जर घर घेतले तर मोर्गेज तेवढेच पडेल अंदाजे. त्याशिवाय अजून काही फायदे मिळू शकतात का?
२)Tax मध्ये काही सवलत मिळते का? ती किती असू शकते?
३) कोणी फोरक्लोज झालेले घर विकत घेतले आहे का? असे घर स्वस्तात मिळते म्हणतात पण कशा स्वरुपात असेल ते सांगता येत नाही. थोडी डागडुजी स्वतःला करावी लागते.
अजून काही घर घेण्याचे अनुभव पण सांगा.
स्नेहा, बर्याच जणांनी
स्नेहा, बर्याच जणांनी तुम्हांला चांगले आणि योग्य सल्ले दिलेलेच आहेत. प्रत्येक स्टेटप्रमाणे घर घेण्याची प्रोसेस बदलते. आधी कोणती नेबरहूड्स्/टाऊन्स आवडतात ती शॉर्टलिस्ट करा म्हणजे सर्च नॅरो डाऊन करता येईल. कम्युटकरता किती वेळ लागेल, शाळा कोणत्या भागात चांगल्या हे सगळं ऑनलाईन बघता येईल. ग्रेट्स्कूल्स.नेट, स्कूलडिगर.कॉम वर रेटींग्ज मिळतील.
trulia, zillow, realtor, homes वगैरे अगणित वेबसाईट्स आहेत होमसर्चकरता. झेस्टिमेट ह्या प्रकरणाला फार सिरियसली घेऊ नका. रोज चेक करू शकता मार्केटवर काय नवीन आलं आहे ते. प्री अप्रूव्हल करून घ्या जेणेकरून तुमची प्राईस रेंज काय आहे त्यावर फोकस करता येईल. त्याशिवाय ऑफरही करता येत नाहीच तेव्हा एखादं घर आवडल्यावर हालचाल करण्यापेक्षा आधीच तयार असलेलं बरं. ओपन हाऊस अटेंड करत जाच म्हणजे आर्किटेक्चरची कोणती स्टाईल ( रँच, कलोनियल, स्प्लिट लेवल, कंटेंपररी इ) तुम्हांला कळेल, तसंच तुमच्या प्राईस रेंजमध्ये किती बेड्स्/बाथ्स, आणि बाकी फिनिशेस मिळू शकतात्/नाहीत ह्याचा अंदाज येऊन अपेक्षा क्लिअर होतील.
बर्याच जणांनी एजंटची गरज नाही असं म्हटलेलं आहे खरं ज्याच्याशी मी पूर्ण सहमत नाही. जर एखादा सेलर ब्रोकरेज थ्रू न जाता स्वतः घर विकत असेल तर तुम्ही एजंट शिवाय अप्रोच करू शकता. पण ब्रोकरेजने घर मार्केटवर लावलेलं असेल तर एजंट लागतोच लागतो. भले तुमचा बायर्स एजंट नसेल, तुम्ही लिस्टींग/सेलर्स एजंट बरोबर काम कराल पण टेबलाखालून पैसे देऊन सेलरबरोबर डील सिल करू शकत नाही.
२)Tax मध्ये काही सवलत मिळते
२)Tax मध्ये काही सवलत मिळते का? ती किती असू शकते? >> Primary Residence साठी mortgage असेल तर त्याच्यावर भरला जाणारा interest taxable income कमी करतो. closing cost चा काही भाग काही विशिष्ट conditions मधे include करता येतो (ह्याचे नियम बदलते आहेत तेंव्हा चेक करा). Rela estate tax पण वगळला जातो.
घर नविन बांधून घेणार नसाल तर
घर नविन बांधून घेणार नसाल तर बायर्स एजंट असावा. तुमचा होम इन्स्पेक्टरही असावा- नविन घर बांधतानाही.
>>३) कोणी फोरक्लोज झालेले घर विकत घेतले आहे का? असे घर स्वस्तात मिळते म्हणतात पण कशा स्वरुपात असेल ते सांगता येत नाही. थोडी डागडुजी स्वतःला करावी लागते.>>
त्यापेक्षा शॉर्ट सेलचा ऑप्शन चांगला ठरतो. आमच्या एका मित्राने शॉर्ट सेलमधले घर घेतले. घरात कुटुंब रहात असल्याने घर चांगल्या परीस्थितीत होते. काही डागडुजी करावी लागली नाही. फक्त लॉन जरा निग्लेक्टेड होते.
>>१) मार्केट तसे सांगता येत
>>१) मार्केट तसे सांगता येत नाही पण गुंतवणूक म्हणून घर घेणे किती चांगले ? - सध्या रेंट वर राहतो पण जर घर घेतले तर मोर्गेज तेवढेच पडेल अंदाजे. त्याशिवाय अजून काही फायदे मिळू शकतात का?>>
घर घेणार असाल तर रहाण्यासाठी घ्या. गुंतवणूक म्हणून नको. होमओनरशिप ही एक लाईफस्टाईल आहे. फायदेशीर आहे की नाही ते बर्याच फॅक्टर्स वरुन ठरते.
रेंट आणि मोर्गेज रक्कम जरी
रेंट आणि मोर्गेज रक्कम जरी सारखी वाटत असली तरी स्वतःच घर घेतल्यावर बरेच जास्त खर्च होतात.
युटीलीटी बऱ्याचवेळा रेंट मध्ये असतात (जसे हॉट water, हिटिंग असतं हायड्रो वेगळ इ.), property tax, इन्शुरन्स, appliances इ. जास्त भरावं लागतं. मोर्गेजचे व्याज घर विकलत तर अर्थात परत मिळत नाही हे सगळ धरून थंबरूल असा सांगतात की १० वर्ष राहिल्यावर स्वतःच घर स्वस्त पडायला लागतं रेंट पेक्षा.
सायो +१ जर घर एजंटतर्फे टाकलं असेल सेलर एजंट पैसे घेणारच, त्यालाच तुमचा प्रतिनिधी करायचा का नाही? डीपेडस..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप नवीन गोष्टी समजल्या.
खूप नवीन गोष्टी समजल्या. ..धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
घर कुठे घ्यायचे ते ठरले आहे.. शक्यतो नवीन हवे, खूप मोठे नको
शक्यतो एक मजली हवे आहे, अगदीच नाही तर मग गेमरूम वर चालेल.. मास्टर आणि एक तरी बेडरूम खालीच हवी..ह्याच्यामुळे अडचण येते आहे..
शिवाय ह्या भागात आम्ही नवीन आहोत, त्यामुळेही वाटले की एजंट ची मदत घेतलेली बरी!
कॅनडात टाऊन हाउस सोडाच पण
कॅनडात टाऊन हाउस सोडाच पण सिंगल family नवीन घरातपण बेडरूम खाली ही अट ठेवली तर बंगलो हाच पर्याय शिल्लक राहतो. जुनी घरं मिळतील. अमेरिकेत माहित नाही.
.
.
धन्यवाद सर्वांना. भरपूर विचार
धन्यवाद सर्वांना.
भरपूर विचार करावा लागणार आहे.
>>र मग गेमरूम वर चालेल..
>>र मग गेमरूम वर चालेल.. मास्टर आणि एक तरी बेडरूम खालीच हवी..ह्याच्यामुळे अडचण येते आहे>> बरोबर.. सगळंच हवं तसं मिळणं कठीण असतं. एखादी बेडरूम खाली मिळू शकेल फारतर.
मग गेमरूम वर चालेल.. मास्टर
मग गेमरूम वर चालेल.. मास्टर आणि एक तरी बेडरूम खालीच हवी >> तुम्ही नक्कीकुठे आहात माहित नाही पण वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या प्रकारचे layout common असतात. तुम्ही हे जे लिहिलय ते Dallas मधे सर्रास बघायला मिळते (सध्याच्या trends मधे तरी). ह्या उलट New England मधे असा प्रकार जुन्या घरांमधे क्वचितच सापडेल. नवीन घरे बहुतेक वेळा कलोनियल असल्यामूळे तिथेही असे खास बनवून घेतल्याशिवाय सापडत नाही.
असामी, मी Dallas जवळच आहे, पण
असामी, मी Dallas जवळच आहे, पण अजून हवं तसं सापडलं नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्नेहा, मला वाटतं तुम्ही
स्नेहा, मला वाटतं तुम्ही अर्विंग मध्ये आहात का? आणि तिथेच आसपास घर शोधताय का? १०-१२ वर्ष जुन्या घरांमध्ये मास्टर आणी अजून १ बेडरूम खाली असं फार क्वचित सापडायचं पण हल्ली नविन बांधकामाच्या घरांमध्ये तो ट्रेंड आहे. मी हल्ली १-२ वर्षात बांधलेली जितकी घरं पाहिली त्या सर्वात मास्टर आणि अजून एक बेडरूम खाली असलेलीच घरे पाहिली...
शूम्पी, मी प्लेनो मधे आहे
शूम्पी, मी प्लेनो मधे आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
, ह्या उलट New England मधे
, ह्या उलट New England मधे असा प्रकार जुन्या घरांमधे क्वचितच सापडेल. नवीन घरे बहुतेक वेळा कलोनियल असल्यामूळे तिथेही असे खास बनवून घेतल्याशिवाय सापडत नाही.>> +१
१) मार्केट तसे सांगता येत नाही पण गुंतवणूक म्हणून घर घेणे किती चांगले ? - सध्या रेंट वर राहतो पण जर घर घेतले तर मोर्गेज तेवढेच पडेल अंदाजे. त्याशिवाय अजून काही फायदे मिळू शकतात का? >> तुम्ही राहता त्या भागात रेन्ट वैगरे किती आहे ते माहित नाही पण, रेन्टीन्ग आणी घर घेणे हे अजिबात फायनाशियली सारख नाही.
घर घेतल्यावर, जास्त युटीलिटी बिल,मॉर्गेज, हाउस मेन्टेनेन्स, यार्ड क्लिनिप्,स्नो क्लिनिप ,ट्क्स असे अनेक अॅडिशनल खर्च येतात.
मास्टर बेडरुम खाली असन कॉमन
मास्टर बेडरुम खाली असन कॉमन आहे डॅलस मध्ये. त्यामुळ तुम्हाला घर मिळायला का अडचण येती आहे कळत नाही.खाली कदाचीत एक्स्ट्रा बेडरुम मिळणार नाही. पण स्टडी खालीच असते. तिला बेडरुम म्हणुन कन्व्हर्ट करता येईल. पर्टिक्युलर प्लेनो मध्ये रिजव्यु एरिया किंवा रिडल एलेमेंटरीच्या आसपास घरांना अतिशय डिमांड आहे. सो तिथे थोडे जास्त पैसे आणि टाईम द्यावा लागेल.
डॅलस मध्ये घर घेण पुर्वी इतक सोप राहिल नाही. किंमती फास्ट वाढताहेत. ऑनेस्टली फ्युचर मध्ये ह्या प्राईसेस कशा होल्ड होतील याविषयी शंका आहे. त्यामुळ घर विचार करून बरीच वर्ष तिथे घालवायचा प्लॅन असेल तरच घ्या. मार्केट सध्या ट्रिकी आहे आणि देसी लोक झुंडीने डॅलस, ह्युस्टन, ऑस्टीनला मुव्ह होताहेत. आणि मोस्टली तेच बायर्स आहेत.
छान माहिती एकत्र होत आहे.
छान माहिती एकत्र होत आहे.
माझा काही याच्याशी संबंध येणार नाही पण तरीही वाचायला मजा येत आहे.
आणि मॉर्टगेज बद्दल कोणी
आणि मॉर्टगेज बद्दल कोणी माहिती देऊ शकेल का? जसे,
-लोन मोठ्या बँकेचे घ्यावे, जसे बँक ऑफ अमेरिका वगैरे, की लोकल बँक्स बघाव्यात?
-किती वर्षाची टर्म असावी, १०,१५, ३०? कोणती फायदेशीर असते?
-फिक्स्ड रेट की मूव्हींग?
लोन: जी institute सगळ्यात
लोन: जी institute सगळ्यात स्वस्त देतेय तिच्याकडून approve करा आणि मग तुमच्या बँकेकडे रेट निगोशिएट करा. बँका match करतातच, बीटही करतील. (हे लहान कालावधीत करा, प्रत्येक institute क्रेडीट हिस्ट्री रन करते. छोट्या कालावधीत केलत तर मोर्गेज शॉपिंग म्हणून एकदाच स्कोर कमी होईल)
टर्म: मला वाटतं टर्म आणि amortization मध्ये गोंधळ झालाय. टर्म म्हणजे किती वर्षे रेट, बँक इतर टर्म्स कायम राहण्याचा कालावधी. तो जितका जास्त तितका व्याजदर जास्त पडेल. ५ वर्षाच्यावर घेऊ नका. ५ चा घेतलात तर, दर ५ वर्षांनी मोर्गेज रेन्यू करावं लागतं. amortization जास्त घेऊन (उदा.२५ वर्षे) पैसे जमले तर लवकर फेडणे माझ्या स्पेंडीग सवयींना सूट होतं. 'काही अचानक उदभवलं तर!' असा विचार करून.
महिन्यातून एकदा भरण्याऐवजी २ आठवड्यातून एकदा भरा, वर्षाला १ installment जास्त जातं आणि जनरली पगारही तसाच मिळतो. याने २-२.५ वर्षे कमी होऊ शकतात.
फिक्स्ड की मूव्हिंग : पास.
आम्ही आधीपासून रिलेशनशिप
आम्ही आधीपासून रिलेशनशिप असलेल्या एक क्रेडीट युनिअन आणि दोन बॅकांना विचारले. प्रत्येकांनी आम्हाला त्यांचे लोन पॅकेज पाठवले. त्यात सर्व टर्म आणि नंबर्स अतिशय सुटसुटित मांडल्या होत्या. तुलना करायला amortization table दिली होती. क्लोझिंग कॉस्ट वगैरे सविस्तर माहिती दिली होती. आम्हाला त्यातले पसंत पडलेले (पॅकेज + लोन ऑफिसर ) असे लक्षात घेवून निर्णय घेतला. नविन घर बांधून घेतले तेव्हा लोन ऑफिसरने वेळोवेळी अनेक सल्ले दिले. बिल्डरच्या प्रोजेक्ट मॅनेजरशी बोलणे केले. हे कदाचित लहान गाव म्हणून झाले असावे.
आम्ही फिक्स्ड रेट घेतला. टर्म किती वर्षाची ते इंटरेस्ट रेट मधला फरक, हप्ता कितीचा वगैरे लक्षात घेवून ठरवा. आम्ही वर्स्ट केस लक्षात घेवून ३० वर्षाची टर्म घेतली होती परंतू आमचा ७ वर्षांचा प्लॅन तयार होता. तो फॉलो केला.
घर घेताना आर्थिक जुळवाजुळव करताना अजून एक विचार केला होता. - घर घेतल्यानंतर जर का जॉब चेंज/बदली या कारणाने मुव झालो आणि घर लगेच विकले गेले नाही तर या घराचा हप्ता देवून कमित कमी २ बेडरुमच्या अपार्टमेंटचा रेंट २ वर्षांसाठी तरी देणे शक्य व्हावे.
तुम्ही जर स्वतःचा उद्योगधंदा
तुम्ही जर स्वतःचा उद्योगधंदा करत असाल आणि नविन घर बांधून घेत असाल तर बिल्डरच्या प्रिफर्ड लेंडर कडून लोन घेतलत तर क्लोजिंग वेळेवर होण्याची थोडीफार खात्री असते.
नुकतेच २ फॅमिली फ्रेंड्सनी नविन घरं घेतलीत आणि डायरेक्टली मोठ्या बँकांकडून आणि दोघांचीही क्लोजिंग खूप डिले झाल्याने जास्ती फ्रस्ट्रेटिंग अनुभव आला त्यांना.
पेपरवर्क/ब्युरॉक्रसी यांचा वैताग झाला जरा...
लोन कुठूनही घेण्यापूर्वी शॉप अरांड करणे मस्ट!
शूम्पी+१ स्वाती२
शूम्पी+१
स्वाती२ +१
बिल्डरच्या प्रिफर्ड लेंडर कडून लोन घेतलत, तर नक्की क्लोजिंगला प्रॉब्लेम येत नाही.
रेंट व्ह. बाय ऑनलाईन खुप कॅलक्युरेटर्स मिळतिल.
मी काही लोकांना पाहिलय, सेल बाय ओनर शोधतात आणि छान निगोशिएट करुन चांगल्या किंमतीत घरं घेतात. ह्या केस मधे ते एजंटला हायर नाही करत, स्वतः पेपरवर्क करतात. वकिल असतोच लिगल गोष्टी करायला. ह्यात बरेच रिस्क फॅकर्ट्स आणि ग्राऊंड स्ट्डी आवश्यक आहे.
या धाग्यावरच्या सर्वच
या धाग्यावरच्या सर्वच प्रतिसादकर्त्यांना मनापासून धन्यवाद. खूप नवी अन चांगली माहिती मिळत आहे.
Pages