अमेरिकेत घर घेताना

Submitted by sneha1 on 21 November, 2014 - 13:26

अमेरिकेत घर घेताना कोणत्या गोष्टी सहसा बघितल्या जातात? एजंट कसा निवडावा? कोणती घबरदारी घ्यावी? इथे लिहा प्लीज..
धन्यवाद!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर बरेच मुद्दे कवर झाले आहेत.

घर कोणते घ्यायचे नक्की होउन गेल्यावर होम इन्स्पेक्टर काळजीपुर्वक निवडा. Most experienced home inspectors are members of professional organizations in the state. एजंट ने सुचवलेला, ठरवणे काही वेळा रिस्की ठरु शकते.

घर घेताना (आपण आत्ता घेत असलो) तरी काही कारणाने लवकरच विकायची वेळ आलीच तर लगेच्/ इजिली विकले जाइल का हा विचार करा. लोकेशन, चांगल्या शाळा, सर्वसाधारण होम साइझ शी जवळ जाणारं फुटेज हे काही मुद्दे झाले. डॅलस भागात अजूनतरी ३०००+ स्के फूट घरे बनताहेत. ऑस्टीनमध्ये आता लॉट्/बिल्ट साइझ कमी होउ लागला आहे.

कोणी नवीन घर घेताना बांधून घेतले आहे का? म्हणजे कम्युनिटीतले बांधून तयार नसलेले, पण तिथला लॉट सिलेक्ट करून मग बिल्डर कडून बांधून घेतले आहे का? त्याच्याबद्दल काही अनुभव , काही टिप्स?

हो मी घेतले आहे.
ह्यात सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे घरात तुम्हाला हवे तसे बदल करुन (स्ट्र्क्चरल एका मर्यादेपुरतेच) घेता येउ शकतात. किमती वर परिणाम होतोच पण हवा तसा ले-आउट, फिक्शर्स, होम थिअटर चे वायरींग, काउंटर टॉप्स वगैरे निवडता येते. बिल्डर बरोबर वेळ द्यावा लागतो पण सगळ्या निवडीच्या वेळेस.

काही बरेवाईट अनुभव? गूगल करावे तर नुसता गोंधळ होतो. प्रत्येक बिल्डर बद्दल चांगले वाईट वाचायला मिळते. कोणी म्हणतात की वेळेवर झाले नाही, मटेरियल स्वस्त वापरले आणि एक ना दोन.. इथे घर घेण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे जरा जास्त विचार चालू आहेत Happy

हो. कस्टम घरांच्या बाबतीत बिल्डर कडे प्लॉटनुसार तयार प्लॅन (कलोनियल, हॅम्डन इ.) असतात, आपल्याला आवडेल तो निवडायचा. यात फ्लोअर्-प्लॅन, मेजर चेंजेस (२ ऐवजी ३ गराज, मेन दरवाजा दक्षिणेऐवजी इशान्य, जीन्याची पोझिशन इ.) बदलता येत नाहि. कॉस्मेटिक चेंजेस (कार्पेट ऐवजी हार्ड वुड, इंटिरियर कलर, एक्स्टिरियर [ब्रिक्स, स्टोन, स्टको), लॅडस्केपींग, इलेक्ट्रिकल फिक्चर्स, बाथरुम फिक्चर्स, अपग्रेडेड अ‍ॅप्लायन्स इ.) बजेट आणि अलावंस नुसार करता येतात.

तुम्हाला अगदिच मनासारखं घर बांधायचं असेल तर प्लॉट विकत घेउन, आर्किटेक्ट्/बिल्डरला हायर करुन हवं तसं घर बांधु शकता...

गुड लक!

आम्ही पण बांधून घेतलं नुकतच. काँट्रॅक्ट साइन मारच मध्ये झालं आणी बांधकामाला सुरवात जून्च्या शेवटाला आणि घराचं क्लोजिंग मूव्ह इन डिसेंबरच्या शेवटी.
ओवरऑल एंजॉएबल अनुभव होता.
फ्लोअरप्लॅन मध्ये बदल करवून घेता येतात
बरेच अ‍ॅडिशन करता येतात जसे की पॅटिओ एकस्टेंड करणे, बाथटबाइवजी शावर
काउंटरटॉप सिलेक्शन करता येतात
बरेच अपग्रेड करता येतात ज्यांचा मोह होतोच होतो.

डाउनसाइड म्हणजे वेळखाउ प्रकरण आहे. सगळे अप्ग्रेड करताना बजेट्ला चिकटून राहाणं अवघड जातं.
शेवटे असही होतं की आपल्या आवडीची एखादी गोष्ट आपल्याला वाटली तितकी चांगली दिसत नाही प्रत्यक्षाताअल्यावर

गुड लक

स्नेहा, लहान मुलं अस्तिल तर त्यांना सांभाळायला एक डेडिकेटेड माणुस अत्यावश्यक आहे. नोकर्‍या सांभाळुन खुप मोठा प्रोजेक्ट आहे. कस्ट्म होम मधे कॉन्ट्रॅक्ट साईन केलयावर, वरती पैसे बरेच लागतात. स्विचपासुन, ब्रिकपर्यंत सगळ्या गोष्टींमधे प्रचंड चॉईस असतो, sometimes its overwhelming. Allowance मधल्या गोष्टी कधीच पसंत पडत नाहीत Happy

राज नि शूम्पी ह्यांच्या वरच्या पोस्ट्स ना अनुमोदन. तुम्ही म्ह्टलय तशी कस्टम घरे ( कम्युनिटीमधला लॉट सिलेक्ट करून मग बिल्डर कडून बांधून) हि एका मर्यादेपर्यंतच कस्टम असू शकतात हे लक्षात ठेवा. बिल्डर्स चे रेटीम्ग तुम्ही real estate agent कडून चेक करू शकता. दुर्दैवाने जवळजवळ प्रत्येक बिल्डर locality प्रमाणे अधिक उणे करत असतो त्यामुळे तुम्ही ज्या भागात बघता आहात त्या भागातील बिल्डरचे काम कसे आहे हे तुम्हाला शोधावे लागेल.

सगळ्यांना धन्यवाद, आणि शूम्पीचे अभिनंदन नवीन घरासाठी Happy
प्रीती, संपूर्ण कस्टम होम नाही गं..ते परवडत नाही..असामीच्या म्हणण्यासारखे कम्युनिटीमधला लॉट सिलेक्ट करून मग बिल्डर कडून बांधून घेतलेले...
बिल्डर चांगला की वाईट हे ठरवणे कठीण! गेहान आणि स्टॅन्डर्ड पॅसिफिक ह्यांचा काही अनुभव कोणाला?

१. बिल्डर करून अपग्रेड घेताना बिल्डरच्या किंमती बऱ्याच ठिकाणी अव्वाच्यासव्वा असतात. साधी अपग्रेड नंतर स्वतः किंवा प्रोफेशनलची मदत घेऊन बरीच स्वस्त पडू शकतात. पण जे नंतर करणे शक्य नाही जसे हाय सिलिंग, स्लाईडस च्या ऐवजी ब्रिकस इ. आधीच करणे चांगले. पण स्टील हूड fan बिल्डर लावतो त्या रेटिंगचाच कॉस्कोमध्ये खूपच स्वस्त मिळतो अशी अपग्रेड स्वतः करू शकता.
२. थोडेफार handy असाल तर पॉट लाईट इ. स्वतः करणे फार कठीण नाही.
३. खूप महाग अपग्रेड बिल्डर कडून केली तर घराची किंमत वाढतेच बरोबर tax पण त्या प्रमाणात वाढतो. तीच अपग्रेड नंतर केली तर जरी तेवढीच किंमत द्यावी लागली तर tax वाढत नाही. (नंतर अपग्रेड करायचा उत्साह न राहून पैसे वाचतात ते वेगळं advantage Happy ) हे पण लक्षात ठेवा.

बिल्डर इलेक्ट्रिक/ इथरनेट/ टी व्ही चे बरेच ड्रोप देतोच. टी व्ही साठी आम्ही वर नजरेच्या उंचीला मारे पोइंट घेतला, नंतर टी व्ही भलतीकडे लावला.
आम्ही काउंटर, स्प्लाश टाईल्स, क्राऊन मोल्डिंग इ केली.
दिवाळी/ क्रिसमसला लाईट लावायला प्लग point वर्थ अपग्रेड वाटलं.
walkout basement मिळत असेल तर नक्की करा. आवडी प्रमाणे खाली/ वर हार्डवुड करू शकता. हार्डवुड स्टेअर्स भारी दिसतात.

Pages