लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मूंगरे - पाव किलो
बटाटा - 1 मध्यम - साले काढून फोडी केलेला
हिंग -चिमूटभर
हळद - पाव चमचा
लाल तिखट - पाव चमचा
मीठ - चवीनुसार
धन्याची पूड -एक चमचा
जीरे - १/२ चमचा
तेल - फोडणीपुरते
क्रमवार पाककृती:
1. तर असे दिसतात हे मूंगरे.
2. मूंगर्यांची टोके तोडून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत.
3. १ बटाटा सोलून फोडी करून घ्यावा
४. तेल गरम करून त्यात जीरे घालावेत.
५. बटाटा आणि मूंगरे घालून एकदा हलवून घ्यावे.
६. मीठ, मिरची, मसाला इत्यादि टाकून झाकण बंद करून अत्यंत कमी आचेवर बटाटा शिजेपर्यंत शिजवावे.
भाजी शिजल्यानंतरचा फोटो काढायचा राहून गेलाय. सुज्ञ वाचकांनी फरसबी बटाटा भाजीची कल्पना करावी..
वाढणी/प्रमाण:
२ जणांसाठी
अधिक टिपा:
1. मेथी प्रमाणेच हे मूंगरे देखील शिजल्यावर खूप आकसतात. त्यामुळे मीठ आणि मसाला बेताचाच घालावा.
2. मूंगर्यांचे देठ तोडणे हे अत्यंत कंटाळवाणे काम आहे. शक्य झाल्यास घरातील सगळ्यात रिकामटेकड्या व्यक्तीकडून ( उदा. नवरा) गोड बोलून करून घेणे. असे शक्य ( जे अवघडच आहे )झाल्यास आपणास भाजी अधिक गोड लागू शकेल फिदीफिदी
धोक्याचा इशारा : ह्या भाजीची चव थोडी थोडी मुळ्याच्या भाजी सारखी लागते.
>>याच शेंगा वाळवणाच्या
>>याच शेंगा वाळवणाच्या मिरच्यांसारख्या दही मसाला लावून वाळवतात तेव्हा दही भाताबरोबर तळून काय ऑस्सम लागतात!
कल्पनेनीच तोंडाला पाणी सुटलं.
वाळवलेल्या शेंगा कुठे विकत मिळतील का?
मी आज केली ही भाजी. खुपच
मी आज केली ही भाजी. खुपच आकसल्याने थोडी खारट झाली आणि कडसर लागत होती. पण तरीही ठिक आहे. पुढच्या वेळेस अजुन चांगली होईल.
कच्च्या शेंगा जास्त चांगल्या लागल्या चवीला
याच शेंगा वाळवणाच्या मिरच्यांसारख्या दही मसाला लावून वाळवतात तेव्हा दही भाताबरोबर तळून काय ऑस्सम लागतात!
याची रेस्पी टाका असेल तर्. मस्त लागेलच म्हणा..
टीप क्र.२ मस्त आहे.
टीप क्र.२ मस्त आहे.
तेलावर वाफवून काळा मसाला
तेलावर वाफवून काळा मसाला टाकून भाकरी बरोबर एकदम 1 नंबर
फोटोतल्या डिंगऱ्या लांब लांब
फोटोतल्या डिंगऱ्या लांब लांब आहेत, मला हिरव्या मुगाच्या शेंगा वाटत आहेत. डिंगऱ्या इतक्या लांब नसतात ना.
नुसत्या तेलावर मीठ घालून
नुसत्या तेलावर मीठ घालून प्रतायच्या व खायच्या
Pages