Submitted by आशुचँप on 19 November, 2014 - 14:27
आज रामपाल बाबाचे दिव्य पराक्रम पाहून संताप संताप झालाय. अटक होऊ नये म्हणून या बाबाच्या कमांडोजनी पोलिस पथकावर गोळीबार केला. झालेल्या धुमश्चक्रीत चार बायका आणि एक दीड वर्षाचे बाळ ठार झाले.
अरे काय चाललयं काय....
कामचुकारपणा करायचा म्हणून कामावरून काढून टाकलेला हा इंजिनियर माणूस अचानक बाबा म्हणून काय अवतिर्ण होतो आणि आपला मूर्ख समाज त्याला डोक्यावर काय घेतो सगळेच अनाकलनीय...
या भोंदू बाबाविरुद्ध खूनाचा आरोप असतानाही हे शंख भक्तगण त्याचे समर्थन करतात हे पाहून मान लाजेनी खाली गेली. तसाच तो आसाराम...आणि अन्य अनेक...
इतर अत्यंत फालतू गोष्टींवरून धार्मिक भावना दुखावणारे कुठे आहेत आता. या लोकांमुळे तुमच्या भावना दुखावत नाहीत का. का तो केवळ हिंदु आहे म्हणून त्याने बलात्कार, खून, अपहरण केलेले क्षम्य आहे....
अरे कसले रे लोक...शी...लाज वाटते....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाकीचे मरू दे..लष्करावर आणि
बाकीचे मरू दे..लष्करावर आणि पोलिसांवर त्याच्या माणसांनी गोळीबार केलाय. हा तर थेट देशद्रोहाचा गुन्हा झाला. अजूनही त्याची पाठराखण करणार का....
आणि देशमुख यांनी दिलेली लिंक पाहिल्यानंतर तर शिसारी आली या माणसाची...माणूस कसला नरपशू आहे....
याला फाशी हीच शिक्षा आहे...तरच जरब बसेल बाकीच्या भोंदू भक्ताना...
कहर म्हणजे नाशिकमधले ६० जण त्या आश्रमात अडकले आहेत. इथल्या बाबांची सद्दी संपल्यामुळे तिकडे गेले का हे मूर्खशिरोमणी....
काल चिन्मय मांडलेकरनी एका चॅनेलवर मस्त सांगितले...तो म्हणाला आपल्या लोकांना बाकी भुकेबरोबरच आध्यात्मिक भूकही असते, त्याला हे बाबा आणि त्यांचे पेरलेले चेले टॅप करतात. आणि असेही आपल्याकडे एक खुळावला की त्याच्या नादाने आणि दहा जण खुळे व्हायला वेळ लागत नाही.
हे बाबा, संत लोक नक्कीच नीच
हे बाबा, संत लोक नक्कीच नीच आहेत पण हे सत्य ही नाकारु नका की त्यांनी आश्रमात येण्यासाठी कोणावर जबरदस्ती केलेली नाहीये.
लोक मुर्ख आहेत हा काय त्या बाबा लोकांचा दोष आहे.
त्यांना विक्रीकला चांगली अवगत आहे आणी लोकांची मानसिकता ही बरोबर समजते असे मी म्हणीन.
जिथे जिथे हे बाबा कायदा तोडतील तिथे कारवाई करावीच पण त्या बाबा ला दोषी ठरवुन त्याच्या १५००० भक्तांना क्लीनचीट देणे योग्य नाही.
म्हणुन तर मी लिहिले ना अश्या
म्हणुन तर मी लिहिले ना अश्या लोकांना समर्थन करणार्यांना देखील फटके द्यावे
रॉबीनहूड ,गामा_पैलवान_५७४३२
रॉबीनहूड ,गामा_पैलवान_५७४३२ कशाला घेतील अशी कृत्य करणारया लोकांची बाजु ! पण का खरच बाजु घेत असतील तर मात्र कहर आहे.
गामा_पैलवान_५७४३२ तुमचं नाव हे एक ग्रेट माणसाचे आहे व त्यांच्या आयुश्यावर एक चित्रपट निघतोय .त्यामुळे त्यांच्या इमेज साठी तरी असं काही लिहु नका. http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5311786313448225097&Se...
धार्मिक हा केवळ शब्द वापरल्याने जर भावना दुखत असतील तर हा शब्द रामपाल बाबा यांसारख्याच लोकांनी बदनाम केलाय या धागा लिहिणार्यांनी नव्हे. काल यांच्या धार्मीक भावना एका चित्रपटाच्या एका शब्दाने दुखल्या आज अनेक निष्पाप लोकांचे बळी गेलेत आणि यांना धार्मिकतेचीच पडलीये. माणुसकी नावाचा काही धर्मच नसल्यासारखे.
कोणताही धर्म निष्पाप लोकांना मारण्याची शिकवण देत नाही.फाशीची शिक्षा सुनावण्याआधीही अगदी गुन्हेगारालाही त्याची बाजु मांडायची संधी देतात.त्याचाही जीव घेत नाहीत लगेच.
लोकांच्या भोळ्या श्रद्धेचा फायदा घेणारया व जीव घेणारया अश्या लोकांना कडक शिक्षा झाली पाहीजे.
सध्या शिक्षणाचे प्रमाण वाढले
सध्या शिक्षणाचे प्रमाण वाढले असले तरी लोक आपल्या आयुष्यातल्या समस्या स्वत:च्या बौद्धिक ताकदीवर सोडवू शकत नाहीत. त्यासाठी कोणा तरी बाबाच्या किंवा साधूच्या नादी लागतात आणि त्यामुळे अशा भोंदू साधूंचे समाजातले वर्चस्व वाढत राहते. एकदा लोकांमध्ये त्यांचे वजन वाढले की, राजकीय पक्षही त्यांच्यासमोर लोटांगण घालायला लागतात. हरियाणात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत डेरा सच्चा बाबा या साधूने भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात आपले वजन टाकले. त्यामुळे भाजपाला सत्ता मिळाली. या ऋणातून उतराई व्हायचे असेल तर अशा साधूच्या दुष्कृत्याकडे सरकारचे दुर्लक्ष होणे साहजिकच ठरते. जसा हरियाणामध्ये या साधूंचा प्रभाव आहे तसाच कर्नाटकात मठांच्या मठाधिशांचा प्रभाव आहे. या प्रभावामुळे मुळातले राजकारण धार्मिक अंगाने व्हायला लागते आणि बाबा आणि साधू कायदा जुमानेनासे होतात. हरियाणाच्या सतलोक आश्रमात बुवागिरी करीत बसलेल्या रामपाल बाबा नावाच्या स्वघोषित साधूला अटक करायला गेलेल्या पोलिसांना असाच अनुभव आला. आपल्यामागे खूप लोक उभे असल्यामुळे आपल्याला कायदा लागू होत नाही या भ्रमातल्या या साधूने कायद्याला आव्हान दिले आहे. पुर्ण बातमीwww.majhapaper.com/
त्याला राजकिय पाठिंबा आहे हे
त्याला राजकिय पाठिंबा आहे हे तर उघडच आहे. त्याशिवाय एवढी किल्ल्यासारखी गढी आणि त्यात काळे धंदे करण्याचा माज करता आला नसता...
इथे मला बेफिकीर यांनी लिहीलेली अन्या मालिका आठवली. राजकिय स्वार्थासाठी एखाद्या फाटक्या पोराला पाहता पाहता कसे मोठे प्रस्थ बनवले जाते हे परफेक्ट दाखवले आहे.
या भोंदू बाबाच्या बाबतीत हेच झाले असणार याची खात्री आहे.
त्याला राजकिय पाठिंबा आहे हे
त्याला राजकिय पाठिंबा आहे हे तर उघडच आहे. त्याशिवाय एवढी किल्ल्यासारखी गढी आणि त्यात काळे धंदे करण्याचा माज करता आला नसता...
<<
गेल्या काही एक वर्षे, कॉंग्रेसच राज्य होते हरियाणात. त्याच कॉग्रेजी सरकारने आपली व्होटबँक वाचविण्यासाठी, आपला वरदहस्त ठेवला असेल या बाबावर, म्हणुन तर २००६ पासुन मोकळा हिंडत होता हा सगळीकडे.
बाईबाई! अन मोदी सरकार
बाईबाई!
अन मोदी सरकार आल्याबरोब्बर खटला दाखल केला? कित्ती नं चान्चान!
अहो हिंदूबंधू विदुषक,
तुमच्यासारखेच लोक त्या बाबाचं समर्थन करीत होते, अन काँग्रेस यासारख्यांना पुराव्यासकट कोर्टात अन तिथून आसारामसारखं जेलीत घालत होती. कोणती व्होटबँक? गामा पैलवान सारख्यांची??
असे आहे का? मग निवडणुकीत
असे आहे का? मग निवडणुकीत भाजपाला कसा काय पाठिंबा दिला म्हणे
विदुषक वाचन वाढवा
असे आहे का? मग निवडणुकीत
असे आहे का? मग निवडणुकीत भाजपाला कसा काय पाठिंबा दिला म्हणे
<<
<<
म्हणुन तर त्याला जन्माची अद्दल घडविली पोलीसांनी आणि भाजप सरकारने.
काँग्रेस यासारख्यांना पुराव्यासकट कोर्टात अन तिथून आसारामसारखं जेलीत घालत होती.
<<
<<
आझाद मैदान दंग्याच्या वेळी असे काही दिसले नाही, की फक्त हिंदुनाच जेलात घालत होती कॉंग्रेस.
म्हणुन तर त्याला जन्माची
म्हणुन तर त्याला जन्माची अद्दल घडविली पोलीसांनी आणि भाजप सरकारने. > परत तुमचे वाचन कमी आहे. हे खेदपुर्वक बोलावे लागते. वाचन वाढवा
– विवाहबाह्य संबंध आणि
– विवाहबाह्य संबंध आणि ‘अश्लिल’ नाचगाण्यांना विरोध करतो
आता मात्र हद्द झाली. आता माझ्या भावना पण दुखावल्या.
हे मला माहित असते तर मी प. पू. बाबंना एक हजार डॉलर त्यांचे अमेरिकेचे तिकीट काढायचे वचन दिले नसते. मी देवळात जाणे, मूर्तिपूजा सोडून दिली होती, प. पू. बाबा मला द्र्व्यप्राप्तीचा सोपा मार्ग दाखवणार होते.
पण आता पुनः आसाराम किंवा दुसरा कुणि साधू शोधला पाहिजे.
कारण देव काही कुणाला सहज भेटत नाही, असे बाबाच पाहिजेत.
आता ते पैसे परत कसे मिळवावे यावर कुणि धागा काढून मला मार्गदर्शन कराल का?
आणि दुसरे कुठले बाबा मला इहलोकी सुख व परलोकी गति प्राप्त करून देतील? यावरहि एक धागा काढावा ही विनंति.
धन्यवाद.
(दात विचकणारी बाहुली:)
आझाद मैदान दंग्याच्या वेळी
आझाद मैदान दंग्याच्या वेळी असे काही दिसले नाही, की फक्त हिंदुनाच जेलात घालत होती कॉंग्रेस.
<<
उफारट्या थापा मारू नका.
माहितीच्या अधिकारात अर्ज करा अन कोण व किती आरोपींना अटक झाली ते बघा. सध्या काय फडणीस सरकार आहेच, पटकन मिळेल यादी. मग त्यातले हिंदू किती अन मुसलमान किती ते बघा?
कसें?
दुसरे कुठले बाबा मला इहलोकी
दुसरे कुठले बाबा मला इहलोकी सुख व परलोकी गति प्राप्त करून देतील?
<<
परलोकाचं ठाऊक नाही.
इहलोकाचं 'सामान' भरपूर सापडलं म्हणे आश्रमात? वाचलं ना तुम्ही?
रच्याकने.
) तेव्हा सिनियर भक्त म्हणून बुकिंग करायचे असेल तर अॅडमिशन्स आर ओपन.
मी लवकरच इब्लिसबापू म्हणून प्रसिद्ध होणार आहे. (गापै यांनी माझे भक्त व्हायची तयारी दाखवली आहे खासगीत
झक्की बोवा. तुम्ही
झक्की बोवा. तुम्ही गामाबाबालाच पकडा आता .
ते सत्यसाईबाबा होते
ते सत्यसाईबाबा होते साऊथमध्ये. ते हवेत हात फिरवून सोन्याच्या साखळया, उंची ब्रॅंडेड घडयाळं काय काय काढून दाखवायचे. शिवाय ते मागच्या जन्मी शिरडीचे साईबाबा होते असं त्यांनीच सांगितलेलं. त्यांच्यावर काही भक्तांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते पण त्याचं पुढे काही झालं नाही.
या बाबांच्या भक्तांत कॉंग्रेसचे शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, शिवराज पाटील असे सगळे बडे नेते होते. बाबांच्या फ्युनरलला मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी उपस्थित होते. सत्यसाईबाबा महाराष्ट्रात यायचे तेव्हा हे मंत्री सरकारी निवासस्थानी त्यांचं आदरातिथ्य करायचे.
भाजपचे लोक लागतात साधुबाबा आणि संतांच्या नादी आणि ते चूकच आहे. सत्यसाईबाबांच्या भक्तांतही भाजपगण नव्हता असं नाही पण भाजपचं सरकार आलं म्हणून हे चालू आहे असा सूर लावू नका कारण धर्मनिरपेक्ष, सेक्युलर कॉंग्रेसचे नेतेही याबाबतीत आघाडीवरच आहेत.
हवेत हात फिरवून वस्तू काढणं किंवा आपण पूर्वजन्मी अमुक अमुक होतो असा दावा करणं हे लोकांना मूर्ख बनवणं आहे की खरोखर चमत्कार हे माबोवरच्या कॉंग्रेस प्रवक्त्यांनीच सांगावं.
कॉंग्रेसच्या राज्यात सत्यसाईबाबांना सरकारी निवासस्थानी सत्कार आणि दाभोळकरांचा पुण्यात भरदिवसा खून करुन मारेकरी मोकाट.
निदान इथेतरी मान्य करायला काय हरकत आहे की सगळेच राजकीय पक्ष यात सामील आहेत आणि लोकांनीच प्रेशर आणायला हवं?
वेदिका२१, बहिर्यांशी बोलणे,
वेदिका२१,
बहिर्यांशी बोलणे, आंधळ्यांना पुरावे दाखवणे आणि मानसिक विकार असलेल्यांना नॉर्मल म्हणजे काय हे शिकवणे निरर्थक असते.
कॉंग्रेसच्या राज्यात
कॉंग्रेसच्या राज्यात सत्यसाईबाबांना सरकारी निवासस्थानी सत्कार आणि दाभोळकरांचा पुण्यात भरदिवसा खून करुन मारेकरी मोकाट.
निदान इथेतरी मान्य करायला काय हरकत आहे की सगळेच राजकीय पक्ष यात सामील आहेत आणि लोकांनीच प्रेशर आणायला हवं?
<<
हे शाब्बास!
पण हिंदूंच्या बाबांवरच का
पण हिंदूंच्या बाबांवरच का आक्षेप बुवा? तिकडे मुसलमानात देखील बुवाबाजी आहेच की. त्याना आधी शिकवा ना. तिथे आहे का हिम्मत? निदान रस्त्यातले दर्गे हलवण्याची? भाजप सरकार ती दाखवेल अशी आशा करू या.....
रामपालबाबा नावावरुन तरी
रामपालबाबा नावावरुन तरी हिंदूं वाटतोय.टिकापण हिंदूंवच करतोय नेमका हा हिंदूं की मुसलमाना कळतच नाहिय??
रामपाल बाबाची विचारसरणी
– रामपाल कबीर पंथाचा कडवा पाठीराखा
– हिंदू देवी-देवतांची आणि मूर्तिपूजा करायला विरोध, देवळात जायला विरोध करतो
– मी कबीराचा अवतार आहे, असा दावा करतो
– कबीर हाच सर्वोच्च ईश्वर आहे असं म्हणत वेद, गीता, कुराण, बायबलचे दाखले देतो
– ब्रह्मा-विष्णू-महेश ही त्रिमूर्ती थोतांड आहे आणि त्यांच्या भक्तीने मोक्ष मिळणार नाही, असा प्रचार करतो
– विवाहबाह्य संबंध आणि ‘अश्लिल’ नाचगाण्यांना विरोध करतो
हे वाचुन वरिल प्रश्न पडलाय...
बाबा रामपालला २००६ मध्ये अटक
बाबा रामपालला २००६ मध्ये अटक झाली होती . तो २२ महिने तुरुंगात होता. मग त्याला जामीन मंजूर केला. रोहटकमधला त्याचा आश्रम सरकारने बंद केला होता. सुप्रीम कोर्टातून आदेश मिळवून त्याने हा हिस्सारमधला आश्रम सुरू केला.
रॉबिनहूड, >> गामाजी आसुमलची
रॉबिनहूड,
>> गामाजी आसुमलची आणि नार्याची बाजू लावून धरण्याचे काय कारण?
>> की प्रत्येक वेळेला वाकड्यात घुसलेच पाहिजे?
अहो, मी कोणाचीही बाजू घेत नाहीये. त्यांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. न्यायालयाने जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य करायला हवा.
मी केवळ रामपाल आणि आसारामबापू यांच्यातील फरक दाखवून देतोय. आसारामबापूंनी पोलिसांना पूर्ण सहकार्य केलं होतं. नारायणसाई यांनी फरार होण्याइतपतच (त्यांच्या मते जीवाच्या भीतीने) पोलिसांशी असहकार्य केलं. या दोघांची तुलना रामपालसोबत होऊ शकत नाही, एव्हढंच माझं म्हणणं आहे.
बाकी, माझा रामपाल यांच्या कायदेभंगास कडाडून विरोध आहे. ४०+ वेळा न्यायालयाचा आदेश झुगारणं चुकीचंच आहे.
आ.न.,
-गा.पै.
४०+ वेळा न्यायालयाचा आदेश
४०+ वेळा न्यायालयाचा आदेश झुगारणं चुकीचंच आहे..
How many times u have denied orders of Admin Mr Gamma
निदान इथेतरी मान्य करायला काय
निदान इथेतरी मान्य करायला काय हरकत आहे की सगळेच राजकीय पक्ष यात सामील आहेत आणि लोकांनीच प्रेशर आणायला हवं?
------ वेदिका सम्पुर्ण पोस्ट आवडली....सत्यसाई बाबाचे मुम्बईत मुख्यमन्त्र्याच्या शासकिय निवासस्थानी पाद्यपुजा होणे यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही. पुजे दरम्यान्त पद स्पर्षासाठी मन्त्र्यानमधेच धक्का बुक्की.
हे सर्व बाबा/ स्वामी यान्च्यात समान धागा काय आहे ? सर्वान्कडे अमाप सम्पत्ती आहे आणि काळ्या पैशाची सुरक्षित गुन्तवणुक त्यान्च्या कडे करता येते. साईची ४०,००० कोटीची उलाढाल होती.
(राज्यात/ केन्द्रात) सरकार कुणाचे हे महत्वाचे नाही आहे. आर्थिक फायदा असल्यामुळे सत्तेवर असणारे सरकार काना डोळा करत असेल तर विरोधी पक्षाचा आवाज कुठल्या हिताने दबलेला असतो.
या विषया वरची एक चांगली
या विषया वरची एक चांगली चर्चा..... विशेषतः अविनाश धर्माधिकारी यांच सांगण ऐकण्या जोग आहे.
http://abpmajha.abplive.in/incoming/2014/11/19/article441430.ece/Majha-V...
स्वयंघोषीत देव असलेल्या बाबा
स्वयंघोषीत देव असलेल्या बाबा बुवा बापुंचं रान फोफावलेय! बाकी काही जमत नाही? घाल कफनी नी बन गुरू!!
राजकारण्यांचा आश्रय, त्यांना यांच्या फॉलोअर्सची मते... साटं-लोटं... तुम्ही आमचे धंदे लपवा, आम्ही तुमचे छपवतो! श्रद्धेच्या नावाखाली "सगळे शौक" पुरवून घेता येतात, पैसा बक्कळ, काळ्या पैशाची सुरक्षित गुंतवणूक, आश्रमाच्या नावाखाली जागांची गुंतवणून, इतर (नियमबाह्य) जोडधंदे, राजकीय आश्रय, पकडलं गेलंच तर भक्तांची संरक्षक ढाल पुढे करता येते.... पुन्हा आंतर्धर्मीय युद्ध असतातच... आमच्याच बाबाला का? त्या ढमक्याच्या धर्मगुरूला का नाही बोलत? हे म्हणजे याने गाय मारायची तर आम्हाला निदान वासरू मारायची परवानगी नको का???
पुन्हा श्रद्धा, धर्म म्हणजे साबणाचे फुगे... कधी कशाने दुखावले जातील नी टचाटचा फुटतील सांगता येत नाही.
परवाच यावर ट्विट केलेलं... भावनांचं/श्रद्धेचं मार्केटिंग हा बाबा-बुवांसाठी बिझनेस झालाय. त्यांचे फॉलोअर्स, भक्तगण हे प्रमोटर्स, आणि दुबळी मने-लाचार परीस्थिती ही टार्गेट्स! मार्केटिंग अजेंडा!!
https://www.facebook.com/swamipl यावर मस्त पोस्टस आहेत!!
ड्रिमे छान पोस्ट मला आवडली
ड्रिमे छान पोस्ट
मला आवडली
काल मी मराठी वर, या बाबांना
काल मी मराठी वर, या बाबांना राजकारण्यांचा पाठिंबा असतो म्हणत काल वागळे चढले मस्त.
भाजपाच्या शपथविधीला अशीच काही मंडळी आली असल्याचा मुद्दाही त्यांनी उचलला.
लगेच भाजपा प्रवक्त्याने ज्ञानेश्वरांचे नाव घेत ती आपली परंपरा असल्याचे म्हटले.
पुन्हा वागळे चिडले, त्या तथाकथित संताचे क्रिमिनल रेकॉर्डचा उल्लेख करत ज्ञानेश्वरांचा अपमान करू नका म्हणून बजावले.
त्यानंतर एकाने ज्ञानेश्वरांना वाळीत टाकणारा ब्राह्मण समाज होता असा उल्लेख केला.
आता मस्त जातीयवादी चर्चा होणार म्हणत मी मजेत सरसावून बसलो,
पण इतक्यात आईने रिमोट उचलत चॅनेल बदलून मराठी मालिका लावली.
>>>>>>>>
पुन्हा आंतर्धर्मीय युद्ध असतातच... आमच्याच बाबाला का? त्या ढमक्याच्या धर्मगुरूला का नाही बोलत? हे म्हणजे याने गाय मारायची तर आम्हाला निदान वासरू मारायची परवानगी नको का???
>>>>>>>
सहमत,
अवांतर - आज व्हॉटसअॅपवर मेसेज फिरतोय.
बाबा रामपाल यांच्या अटकेला आमचा विरोध नाही पण मग शाही इमाम यांना का नाही.... वगैरे वगैरे.. सडकी मेंटॅलिटी, सडका बचाव कि सडके समर्थन..
रामपालचा उल्लेख आदरार्थी करणे हेच मुळात डोक्यात गेले.
आणि हा मेसेज पाठवणारे तुमच्या आमच्यासारखेच सुशिक्षित लोकं.
म्हणूनच मी देव धर्म मानत नाही. जर असलाच ख्रोखर देव या जगात तर त्याला माझ्या नास्तिक असण्याने काही फरक पडत नसणार हे नक्की!
रामपालचा उल्लेख आदरार्थी करणे
रामपालचा उल्लेख आदरार्थी करणे हेच मुळात डोक्यात गेले. > पहिल्यापासुन सगळे प्रतिसाद परत वाचा.
रामपालबाबा नावावरुन तरी
रामपालबाबा नावावरुन तरी हिंदूं वाटतोय हा हिंदूंदेंवतांवरच टिकापण करतोय नेमका हा हिंदूं की मुसलमाना कळतच नाहिय?? कुनाला माहिती आहेका??
Pages