Submitted by आशुचँप on 19 November, 2014 - 14:27
आज रामपाल बाबाचे दिव्य पराक्रम पाहून संताप संताप झालाय. अटक होऊ नये म्हणून या बाबाच्या कमांडोजनी पोलिस पथकावर गोळीबार केला. झालेल्या धुमश्चक्रीत चार बायका आणि एक दीड वर्षाचे बाळ ठार झाले.
अरे काय चाललयं काय....
कामचुकारपणा करायचा म्हणून कामावरून काढून टाकलेला हा इंजिनियर माणूस अचानक बाबा म्हणून काय अवतिर्ण होतो आणि आपला मूर्ख समाज त्याला डोक्यावर काय घेतो सगळेच अनाकलनीय...
या भोंदू बाबाविरुद्ध खूनाचा आरोप असतानाही हे शंख भक्तगण त्याचे समर्थन करतात हे पाहून मान लाजेनी खाली गेली. तसाच तो आसाराम...आणि अन्य अनेक...
इतर अत्यंत फालतू गोष्टींवरून धार्मिक भावना दुखावणारे कुठे आहेत आता. या लोकांमुळे तुमच्या भावना दुखावत नाहीत का. का तो केवळ हिंदु आहे म्हणून त्याने बलात्कार, खून, अपहरण केलेले क्षम्य आहे....
अरे कसले रे लोक...शी...लाज वाटते....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
२५००० हजार भक्त...
२५००० हजार भक्त... पोलिसान्च्या ताफ्याविरोधी हातात पेट्रोल बॉम्ब घेतलेले भक्त... अत्यन्त चिन्ताजनक आणि चिड येणारी परिस्थिती आहे.![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
अनेक वेळा समन्स बजावुनही हा भोन्दू कोर्टात हजर का होत नाही? स्वतःला कायद्यापेक्षा मोठा समजतो?![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
स्वतःची कातडी वाचवण्यासाठी निरपराधी आणि भोळ्या भक्त गणान्चा वापर करतो आहे.
केन्द्राने ५०० सैनिकान्चे पथक पाठवण्याचा निर्णाय घेतला आहे.
आशुचँप , १. >> तसाच तो
आशुचँप ,
१.
>> तसाच तो आसाराम..
चूक. आसाराम बापूंनी पोलिसांशी सहकार्य केलंय.
२.
>> का तो केवळ हिंदु आहे म्हणून त्याने बलात्कार, खून, अपहरण केलेले क्षम्य आहे....
त्याने बलात्कार, अपहरण केलंय का ते माहीत नाही. त्याच्यावर खुनाचा एक आरोप आहे. त्यातून त्याला जामीनही मिळालाय.
तो हिंदू आहे का याविषयी शंका आहे. विकीपादाचार्य म्हणतात की तो कबीरपंथी आहे. या पंथात पारंपारिक हिंदू पद्धतीने पूजाअर्चा, नवविधा भक्ती केली जात नाही.
आ.न.,
-गा.पै.
शेवटी एकदाची झाली अटक
शेवटी एकदाची झाली अटक रामपाला...
चूक. आसाराम बापूंनी पोलिसांशी सहकार्य केलंय.
------- सहकार्य वगैरे अजिबात केले नाही. सहकार्य करायचे असते तर ते (आणि त्यान्चा मुलगा) अनेक आठवडे का बेपत्ता/ फरार का होते?
रामपाल हिंदु आहे की नाही
रामपाल हिंदु आहे की नाही माहित नाही. तो कोणताच धर्म मानत नाही म्हणे. त्याच्या नादाला लागलेला मात्र हिंदु समाज आहे.
हे फक्त हिंदु समाजाबाबत आहे अस नाही. जामा मशिदीचे प्रमुख बुखारी यांच्या विरुध्द अनेक वॉरंटे असताना ते कधीच कोर्टात हजर झाले नाहीत.
कायद्यापेक्षा कोणीही मोठा
कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही ही दाखवून द्या त्या बाबाला. दोषी असेल तर लटकवा लवकरात लवकर.
हे फक्त हिंदु समाजाबाबत आहे
हे फक्त हिंदु समाजाबाबत आहे अस नाही. जामा मशिदीचे प्रमुख बुखारी यांच्या विरुध्द अनेक वॉरंटे असताना ते कधीच कोर्टात हजर झाले नाहीत.>> हिंदू असो नाहीतर आणखी कोणीही असो......स्वतःची बुद्धी गहाण टाकली कि एकच वर्गवारी उरते-------- मुर्खाची
धाग्यात हिंदू वगैरे उल्लेख
धाग्यात हिंदू वगैरे उल्लेख टाळायला हवे होते - एक प्रामाणिक मत - कदाचित याला जबाबदार येथील पुर्वेतिहास वगैरे असावा, तरीही .. ढोंगी आणि पाखंड्यांचा कसलाही धर्म नसतो, वा त्याचे समर्थन कोणताही धर्म करत नसेल .. अर्थात धर्म वगैरे गोष्टींवर जी जन्माने मिळते तिच्यावर माझा मुळातच विश्वास नाही, ती फक्त अफूची गोळी आहे.. काही कमजोर लोकांना देवधर्माच्या आहारी कमीजास्त प्रमाणात गेल्याशिवाय जगण्याची शक्ती मिळत नाही.. आणि मग हे कमजोर लोकच असले शक्तीप्रदर्शन करण्यात धन्यता मानतात.. आणि काही स्वार्थी लोक अश्यांचा योग्य प्रकारे फायदा उचलतात.. इथेही तेच होतेय.
रामपालबाबामुळे कुणाच्या
रामपालबाबामुळे कुणाच्या धार्मिक भावना दुखावत नाहीत का???
दुखावत असतिल कारन त्यांचीविचाररसरनी अशी होती.
रामपाल बाबाची विचारसरणी
– रामपाल कबीर पंथाचा कडवा पाठीराखा
– हिंदू देवी-देवतांची आणि मूर्तिपूजा करायला विरोध, देवळात जायला विरोध करतो
– मी कबीराचा अवतार आहे, असा दावा करतो
– कबीर हाच सर्वोच्च ईश्वर आहे असं म्हणत वेद, गीता, कुराण, बायबलचे दाखले देतो
– ब्रह्मा-विष्णू-महेश ही त्रिमूर्ती थोतांड आहे आणि त्यांच्या भक्तीने मोक्ष मिळणार नाही, असा प्रचार करतो
– विवाहबाह्य संबंध आणि ‘अश्लिल’ नाचगाण्यांना विरोध करतो
www.ibnlokmat.tv/archives/146647
वरील प्रतिक्रियांमधे काही
वरील प्रतिक्रियांमधे काही लोकांच्या भावना दुखल्या आहेत
इतका शस्त्रसाठा आश्रमात होता
इतका शस्त्रसाठा आश्रमात होता बाबा आहे की अजुन कोण ?
हिंदुस्थान सरकारने इथेही एक
हिंदुस्थान सरकारने इथेही एक 'ऑपरेशन ब्लु स्टार' करायला हवे होते.
आणि या बाबाचे म्हणे, हरियाणातील कमी आणि इतर राज्यातील खासकरुन महाराष्ट्रातील भक्तगण अधिक होते.
आणि या बाबाचे म्हणे,
आणि या बाबाचे म्हणे, हरियाणातील कमी आणि इतर राज्यातील खासकरुन महाराष्ट्रातील भक्तगण अधिक होते.
>>>>>
महाराष्ट्रात अनिंस आणि दाभोळकरांमुळे या बाबा लोकांना आपले दुकान मांडणे किंवा फुलवणे कठीण गेले असावे, म्हणून येथील भक्तीच्या शोधात असलेल्या जनतेने परराज्यातील बाबा हुडकला असावा.
तसेही आपल्या देशात भक्त होण्यात धन्यता मानणार्यांना तोटा नाही.
(कृपया याला कुठलाही राजकीय संदर्भ जोडू नये)
(No subject)
उदय, >> सहकार्य करायचे असते
उदय,
>> सहकार्य करायचे असते तर ते (आणि त्यान्चा मुलगा) अनेक आठवडे का बेपत्ता/ फरार का होते?
आसारामबापू कधीही फरार नव्हते. वृत्तपत्रांनी फरार शब्द वापरला म्हणून कोणी फरार होत नसतो. न्यायालयाने फरार घोषित करावा लागतो.
नारायणसाई फरार झाले होते. मात्र मूळ उल्लेखात त्याचं नाव नाहीये. त्याच्या फरार होण्याचं कारण त्याने जिवाला असलेला धोका हे दिलं होतं. साध्वी प्रज्ञासिंह यांना गेले ६ वर्षं विनाआरोप तुरुंगात डांबून ठेवलंय. तिथे त्यांच्यावर प्राणघातक आक्रमणे झाली आहेत. नारायणसाईंची भीती अगदीच अनाठायी नाही.
आ.न.,
-गा.पै.
भक्त इतके निर्लज्ज झाले आहेत
भक्त इतके निर्लज्ज झाले आहेत कि थोडीदेखील लाज नाही आहे
मी कबीराचा अवतार आहे, असा
मी कबीराचा अवतार आहे, असा दावा करतो
– कबीर हाच सर्वोच्च ईश्वर आहे असं म्हणत वेद, गीता, कुराण, बायबलचे दाखले देतो >> याला म्हणतात आम्ही आम्ही गाढवाचे स्वामी.
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/condoms-found-in-rampals-a...
हरयाणात तब्बल ३३ तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी सतलोक आश्रमातून बाबा रामपाल याला अटक केली. त्याच्या अटकेनंतर तात्काळ आश्रमात झडती घेण्यात आली. स्वयंघोषित संत असणाऱ्या बाबा रामपालच्या आश्रमात अनेक आक्षेपार्ह गोष्टी सापडल्याने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. निरोधाची पाकिटे, महिला स्वच्छतागृहात छुपे कॅमेरे, अमली पदार्थ, तसेच बेशुद्ध अवस्थेत पोहचविण्याचे गॅस आणि यासोबत अनेक अश्लील साहित्य आश्रमात आढळून आले. मागील काही दिवसापासून आश्रमात लैंगिक अत्याचार होत असल्याचाही आरोपही महिलांनी केला.
--
असल्या बाबांचे समर्थन करनार्यांना देखील चाबकाने फोडायला पाहिजे![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
दक्षि
दक्षि![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
आले आले, ईथे ही आले,
आले आले, ईथे ही आले, गांधारीचे वंशज आले.
शी भारतीयांची अंधश्रद्धा
शी भारतीयांची अंधश्रद्धा टोकाला गेलीय
बेक्कार स्कँडल उघडकीस आले.
बेक्कार स्कँडल उघडकीस आले. एकूण एक आश्रमांवर छापे टाकले पाहिजेत. कित्येकांच्या आड नको नको ते धंदे होत असतील. सेफ जागा म्हणत जास्तच.
दिवाकर तुम्ही लिहिलेलं खरं
दिवाकर तुम्ही लिहिलेलं खरं असेल तर फार धक्कादा यक आहे.
खरंच भारतीय जनतेने आता तरी आपले डोळे उघडावेत.
भारतीय जनतेबरोबर सरकारने पण
भारतीय जनतेबरोबर सरकारने पण आपले डोळे उघडावे आणी अशा बाबा-बुवा-बाई याना चान्गले चोपुन काढावे, तसच या लोकाना जर कुणा मन्त्र्या- सन्त्र्याचा- बड्या धेन्डाचा पाठिम्बा असेल तर त्यानाही गजा आड करावे.:राग:
काय या रिकाम टेकड्या बायका तरी. जर अध्यात्म हवेच आहे तर जे महान सन्त विभुती आहेत, ( जसे साई बाबा आणी आणखीन महान सन्त वगैरे ) त्यान्चे फोटो लावुन पूजा करा ना घरसबसल्या. उगाच स्वत;ची आणी घरच्या लोकान्च्या अब्रुची लक्तरे कशाला वेशीवर टान्गायची? असे बाबा-बुवान्च्या नादी लागुन ना शान्ती मिळते, ना पैसा मिळतो, ना देव भेटतो.:राग:
दक्षिणा, तशी न्यूजच आहे,
दक्षिणा, तशी न्यूजच आहे, त्यांनी लिंक दिलीय बघा.
आणि अश्यांना पकडू नये म्हणून अनुयायी मरत होते...
गामाजी आसुमलची आणि नार्याची
गामाजी आसुमलची आणि नार्याची बाजू लावून धरण्याचे काय कारण? की प्रत्येक वेळेला वाकड्यात घुसलेच पाहिजे?
(No subject)
ज्यांच्या डोक्यावर बाबांचा
ज्यांच्या डोक्यावर बाबांचा परिणाम होतो त्यांना डॉक्टर देखील बरे करु शकत नाही. २ डॉक्टरांनी प्रयत्न केले पण केस वाया गेली असा निष्कर्ष काढण्यात आला
गामाजी आसुमलची आणि नार्याची
गामाजी आसुमलची आणि नार्याची बाजू लावून धरण्याचे काय कारण?
......
गामाजीना हे बाबाजी लंडनची फ्रँचायजी देणार असतीलजी ..
<<<< बलात्कार, अपहरण केलंय का
<<<< बलात्कार, अपहरण केलंय का ते माहीत नाही. त्याच्यावर खुनाचा एक आरोप आहे. त्यातून त्याला जामीनही मिळालाय.>>>>
जामीन रद्द झाला तरी तो पोलिसांना सरेंडर करेना म्हणूनच त्याला धरायचे आदेश कोर्टाने दिले.
गामाजी बाबाजीवाले
गामाजी बाबाजीवाले![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
Pages