म्युझिक फॉर द रोड - प्रवासात ऐकण्यासाठी हिंदी गाणी

Submitted by सावली on 13 October, 2014 - 11:53

एरवी घरी शांत बसुन ऐकायची गाणी आणि दुरवरच्या प्रवासात ऐकली जाणारी गाणी यात नक्कीच फरक आहे.
लाँग ड्राईव्ह करताना ऐकण्यासाठी हिंदी गाणी इथे सुचवा.
गाणी जोशपुर्ण, धांगडधींगा असलेली अशी हवी आहेत. ( एरवी अशी गाणी ऐकली जात नसल्याने फारशी माहित नाहीत. )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीय मधे पन एक मस्त गाणं आहे . नाव आठवेना.>>>>"अय अय यो काय जांगड्गुत्ता ह्यो, नजरेने केला कल्ला" हे का.
हा पण धागा बघा . http://www.maayboli.com/node/49999 बहुतेक वाहता आहे .पण बरीच छान गाणी आहेत.

माझे १९८०-९० च्या दशकातील आवडते गाणी खास रोड ट्रीप साठी असायचे
सुरवात अर्थातच गोविंदा पासून

१) मै आया तेरे लिये
२) आय इम स्ट्रीट डान्सर
३) याद सताये तेरी कही दिल न लगे जानम आ गले
३) क्या है प्यार बताओ ना दिल - परदेसिबाबू
४) कुछ खोना कुछ पाना है - परदेसिबाबू
५) है नाजूक साजूक हलकी फुलकी
६) स्टोप थैत
७) पकचीकी पक राजाबाबू
८) क्या लगती हाय रब्बा
९) प्रेम जाल मै फस गई मै तो
१०) लेकर तुझको जाऊंगा दुल्हन आनन फानान
११) राम नारायण बाजा बजता
१२) सोने कि सायकल

१३ ) यार बिना चैन कहा रे
१४) पग घुंगरू बांध मीरा नाची
१५) आयम डिस्को डान्सर
१६) दुक्की पे दुक्की हो
१७) प्यार हमे कीस मोड पे ले आया
१८) याद आ राहा है
१९) जहा तेरी ये नझर है

--
whèñ ýºµ ®èållý wåñ† $ºmè†hîñg †º håÞÞèñ, †hè whºlè µñîvè®$è
¢ºñ$Þî®è$ $º †hå† ýºµ® wî$h ¢ºmè$ †®µè

सावली, मी सगळे प्रतिसाद वाचले नाहीत. तू मराठी ऐकतेस का?

मागे बेला शेंडेने गायलेल्या गाण्याचा अल्बम आलेला एक. "ह्र्दयामधले गाणे" त्यातली गाणी ऐक

"रुणझुण रुणझुण नादत पैंजण पैलतटावर नीळसर साजण गं"
"जंतर मंतर रातीन चंद्राची बिंदली चोरून नेली"

वगैरे गाणी आहेत. बीट चांगली आहे. मी काम करताना पण ऐकते Wink

<< १२) सोने कि सायकल >>

तुम्ही गाणं फारच महागडं करून टाकलंत की. ते असं आहे...

चांदी की साईकिल, सोने की सीट; आओ चले डार्लिंग चले डबल सीट - भाभी चित्रपट - गोविंदा, जुही चावला.

अजय अतूल (आपल्याला ढोल ताशा आवडत असेल तर अजूनच मजा येईल.)
महादेवन - where is the party tonight
कुमार सानू - ९० ची टीपीकल गाणी आखो कि गुस्ताखिया
श्रेया घोषाल : खूपच छान गाणी आहेत तीची ( आणि ती सुद्धा) , बरसो रे मेघा ,आमी जे तु मार
आलिशा चिनॉय - तिनका तिनका,

एकटा किन्वा बायको बरोबर असेल तर
गुलाम अलि किन्वा जगजित - चित्रा गझल ;
सुमन कल्याण्पूर , लता , आशा यान्ची जुनी मराठी गाणी ऐकतो.
ग्रुप बरोबर असेल तर पु. ल. देशपान्डे यान्ची व्यक्तिचित्रे त्यान्च्याच आवाजात ! अलिकडेच वेगस - L.A. - 101 - San Jose या प्रवसात चितळे मास्तर , म्हईस वगेरे ऐकले. फार मजा आली.

अय अय यो काय जांगड्गुत्ता ह्यो, नजरेने केला कल्ला >> हो हो Happy
मी उद्या इथे माझी प्रवासी लिस्ट टाकेन Proud

लुंगी डान्स
१२३४ गेट ऑन द डान्स फ्लोअर
बंटी बबली सर्व गाणी.
हम किसीसे कम नही,
शोले
अमर अकबर अ‍ॅन्थनी सर्व गाणी.
बॉबी,
प्रेमरोग

मै जबसे किरेक्ट गाने दालरुं, अब तू बस पैला गिअर दाल और निकल पड. पटाखा गुड्डी रे.

थँक्यु लोकहो. सुचवलेली बरीच गाणी घेतली होती ( अगदी खराब आक्षेपार्ह शब्दवाली नविन गाणी सोडुन). प्रवासात मजा आली.
"मी पप्पांचा ढापून फोन" ऐकलं आणि खुप आवडलं. लेकीला फारच आवडलं आहे.
माऊली माऊली गाणंही आवडलं.
पुन्हा एकदा धन्यवाद Happy

प्रवासासाठीच अजून गाणी सुचवा. ८-९ तासांचे ड्रायव्हिंग आहे.
आजवर किशोर कुमार, रफी-शम्मी, शंकर जयकिशन, आशा, लता, लुटेरा, रांझणा आणि दिलसेपर्यंतचा रहमान, जबवीमेट, आरडी (७०ज आणि ८०ज), माझ्या कॉलेजकाळातली काही गाणी (केदोकेतुम्म होमे रीवर्ना ते लगी आज सावन्की फिर्वो झडी है, एक लड्कीको देखा पासून पार होग्गयाहै तुझ्को तो प्यार सजना वगैरे पर्यंत), माचिस-माया मेमसाव-लेकिन-रूदाली, थोडी नावापुरती विंग्रजी (वॉक लाइक इजिप्शियन, केअरलेस व्हिस्पर्स अशी प्राचीन गाणी), काही हमखास सुफी
असा बराच साठा आहे. जो ऐकून ऐकून थोडा कंटाळा आलाय.
मराठीमधे नवीनमधली आहेत थोडी पण मोस्टली ती बोर होतात मला एखादेदुसरे सोडले तर. साजणवेळा, आख्यान तुकोबाराय, शेवंतीचं बन हे मात्र भरपूर ऐकते. आख्यान तुकोबाराय हे पहाटे ड्रायव्हिंग सुरू करताना फार मस्त वाटते.

आता जरा नव्याने लिस्ट बनवायचीये. सुफी, कव्वाली व त्या फ्लेवरमधे काही, पाश्चात्य काही (हेवी मेटल टाइप नको प्लीज), सेमिक्लासिकल इत्यादींमधे काही सुचवा.
टपोरीही चालतील पण अगदीच बळच टाइपची आय्टेम साँग्ज नको.

अपबिट हवे. झोप येता कामा नये आणि ऐकूनच थकायला व्हावे इतकेही हाय एनर्जी नको.

नी, कोक स्टुडिओ ची गाणी मस्त आहेत. अमित त्रिवेदी बेस्ट - देव डी, क्वीन, अय्या हे अख्खे अल्बम सही आहेत. माझी सध्याची नवीन गाण्यांची यादी देते.. आधी ऐकून मग प्लेलिस्ट मध्ये घे.

देव डी, क्वीन, अय्या << बेस्ट सजेशन्स.. असतील तर पाठव

काही कोक स्टुडिओ बेष्टच आहेत पण त्यातले कोण रेकमेंड करशील ते सांग.

बदलापूर, सुलतान, एक व्हिलन, कोक स्टुडिओ सिजन ९, तनु वेड्स मनू पार्ट २, एअरलिफ्ट......

सोबत लहान मुलं असतील तर दिलवाले.

कोक स्टुडिओ: छाप तिलक, अलिफ अल्ला-जुगनी, आफरीन आफरीन, आया लारीये, आला बाली, पार चना दे, बलिये आका (aaqa), भोले भाले सैंया, ताजदार ए हरम

हिंदी नवीन/जुनी नवीन गाणी - दिल धडकने दो, गल्ला गुडिया, रंगरेज (वडाली ब्रदर्स, तनु वेडस मन्नू), सडी गली (तनु वेडस मन्नू), मुहोब्बत बुरी बिमारी (बॉम्बे वेल्व्हेट), दारू देसी आणि तुम ही हो बंधू (कॉकटेल), मोह मोह के धागे आणि दर्द करारा (दम लगाके हैशा), तितली (चेन्नई एक्सप्रेस), तुने मारी एन्ट्रीयां (गुंडे), जल्ला वल्ला (इश्कजादे), जिया लागे ना (तलाश), समझावन (हंप्टी शर्मा की दुल्हनिया), झेहनसीब (हंसी तो फंसी), झुबीडुबी (थ्री इडियटस), मलंग (धूम ३), मूव्ह युअर बॉडी (जॉनी गद्दार), राधा (स्टुडंट ऑफ द इयर), सवार लू (लुटेरा), किलीमांजारो (रोबोट), खुदा जाने (बचना ए हसीनो), भाग मिल्खा भाग, स्लो मोशन अन्ग्रेजा, झिंदा (भाग मिल्खा भाग), दिल्लीवाली गर्लफ्रेंड, बलम पिचकारी, बद्त्मीज दिल, कबीरा -ये जवानी है दिवानी, दिल मेरा मुफ्त का (एजंट विनोद), जिनामिदो सगळी गाणी, व्हाय दिस कोलावेरी डी, रॉकस्टार सगळी गाणी, इंग्लिश विन्ग्लीश सगळी गाणी, चिकनी चमेली, अभी मुझ में कहीं - अग्निपथ, अंजाना-अनजानी (युवा), ढिंकचिका, कॅरॅक्टर ढिला - रेडी, डार्लिंग (सात खून माफ), उलाला (द डर्टी पिक्चर), दिल्ली (no one killed Jessica), शीला कि जवानी (तीस मार खा), वेक अप सिड -सगळी गाणी, साथिया - सगळी गाणी, रॉक-ऑन, ख्वाब देखे (रेस), रंगीला, रंग दे बसंती, चोर बझारी (लव्ह आज कल), It's the time to disco (कल हो ना हो), where's the party tonight (कभी अलविदा ना केहना), दिल तो बच्चा है जी, बडी धीरे जली - इश्कीया, सजनाजी वारी वारी (honeymoon travels private limited), जाने तू या जाने ना - सगळी गाणी, बँड बाजा बारात - ऐंवें ऐंवें, आधा इश्क, ससुराल गेंदा फूल, मसक्कली - दिल्ली 6, कजरारे (बंटी और बबली), से ना से ना, राईट हियर राईट नाऊ - bluff master, बुलेया, चन्ना मेरेया, ब्रेक अप सॉंग - ए दिल है मुश्कील

मराठी नवीन (सगळ्या प्रकारची )- सैराट सगळी गाणी, वाट दिसू दे, गोंधळ, डोल्बिवाल्या, फँड्री, प्रियकरा, मन मंदिरा, सूर निरागस हो, उमलून आले (अँड जरा हटके), सर सुखाची श्रावणी, तू बुद्धी दे, ओल्या सांज वेळी, गगनझुला, गालावर खळी, नवरी आली, का कळेना, मला वेड लागले, कल्ला, कधी सांजवेळी (आणि काही गारवा/ मिलिंद इंगळे गाणी), कांदे पोहे, नटरंग - सगळी गाणी, मी राधिका, संदीप-सलील -बरीच गाणी, ओंकार अनादी अनंत, जंतर मंतर, राती अर्ध्या राती (दोन्ही बेला शेंडे), ही सांज सुखाने, ऐका दाजीबा, आरसा फितूर झाला (अनुबंध मालिकेचं शीर्षकगीत)

90s pop songs are also good for the road - daler mehndi, KK, Sonu, Colonial cousins, Lucky Ali, Euphoria, Silk route..total nostalgia! पण टंकाळा आला!

Pages