मी एका गावात वाढले . लग्नानंतरही जवळच्या एका छोट्या शहरात स्थायिक झाले. त्या काळात तशीही फ्याशन नव्हतीच, त्यात गावात तर अजिबातच नाही . गावी फक्त साडी . घरी असो वा बाहेर. तशी माहेरीही साडीच वापरायचे . साडी शिवाय दुसरे काही वापरतात हा नाही मनात . हे सर्व ९० च्या पूर्वीचे . ९० च्या दशकात मुंबईतल्या काही स्त्रिया क्वचित कधीतरी मे महिन्यात गावी आल्यावर ड्रेस घालून दिसल्या कि अप्रूप वाटायचे त्याचे. त्या पण क्वचितच दिसायच्या कारण बहुतांश कुटुंबात हे स्वीकारलेच गेले नव्हते. पण कधी आपणहि वापरू असे वाटलेच नाही. नंतर नंतर हे फ्याड वाढत गेले . गावी तिशीतल्या बायका ड्रेस वापरू लागल्या. पण आमच्यासारख्या ४० मधल्या बायका मात्र हे तरुणाईचे छंद वाटायचे. माझ्या मनाला कधीही आपणही ड्रेस वापरावा असे नाही. अगदी माझ्या मुंबईतल्या धाकट्या बहिणीसुद्धा साडीचा वापर निदान मुंबईत तरी कमी केलेला. घरी तर नाहीच. घरी कायम गाऊन वापरायची ति. बाहेर साडी किवा ड्रेस. ९६ साली मी मुंबईला गेलेले बहिणीकडे तेव्हा मी हे पाहिलेले . परंतु मला काही हौस नाही वाटली आणि ३ आठवडे तिथेही कुटुंबाचे नियम पाळत मी जशी गावी होते तशीच राहिले. नंतर २००० मध्ये मी पुन्हा मुंबईला गेले बहिणीकडे निमित्त होते मुलाची १२ विची परीक्षा संपल्याचे. तोपर्यंत बरेच बदल झालेले फ्याशन मध्ये मुंबई मधल्या. परंतु आम्ही गावातल्या बायका मात्र तश्याच. भर मे महिन्यात उकाडा फारच असायचा. एके दिवशी मी आणि बहिण एका नातेवाईकाच्या लग्नाला जाऊन घरी आलो. संध्याकाळचे ७ वाजलेले. घरी येईपर्यंत घामाने चिम्ब. घरी माझा मुलगा आणि बहिणीचे २ मुलगे. बहिणीचा नवरा कामानिमित्त बाहेरगावी गेलेला. बहिणीने सुचवले कि मी गाऊन घालावा. पण मला काही ती कल्पना पटेना. तसे पाहायला गेले तर घरी कुणीच नव्हते. मला नाही आवडत, लोक काय म्हणतील, ह्या वयात हे शोभणार नाही अशी बरीच कारणे दिली, पण बहिण मागेच लागली. शेवटी एकदा नाईलाज म्हणून गाऊन घातला बहिणीचाच. परंतु खोलीतून बाहेर यायचे धाडसच होईना . कसेतरी अवघडल्यासारखे त्या संध्याकाळी घरात मी वागत होते. इस्त्रीचे कपडे घेऊन आलेल्या माणसासमोर मला जायला धीर होईना . असा हा पहिला बदल मुंबईमध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी झाला . बहुतेक कुणालाही काही फरक पडत नव्हता, मी गाऊन घातलाय ह्याचा. पण मला मात्र प्रत्येकाला फरक पडतोय असे वाटत होते. पण एक नक्की. मुंबईतल्या स्त्रियांसाठी जरी गाऊन म्हणजे रेगुलर वेअर असला तरी माझ्यासाठी ती फ्याशन होती. वय आणि कुटुंबाचे नियम ह्यामुळेच मला ती करताना अवघडल्यासारखे होत होते.
कुटुंब वय आणि फ्याशन
Submitted by वनिता प on 3 November, 2014 - 07:24
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमची नोकरी करणारी आई आजही
आमची नोकरी करणारी आई आजही साडीशिवाय काही वेगळे फॅशन करत नाही, ना त्यातही फारसे फॅशनेबल करते. पण नीटनेटकेपणा, टापटिपपणा आणि जात्याच सुंदर असल्याने ती कधीच ओल्ड फॅशन वाटली नाही. ना विचारांनी तशी आहे. साड्यांची आवड मात्र प्रचंड आहे. कोणताही रंग तिला खुलून दिसत असल्याने कलेक्शन सुद्धा अमाप आहे, आवडीने जतन केलेले आहे... असो, आईपुराण खूप झाले. मॉरल ऑफ द स्टोरी - मला वाटते साडी आत्मविश्वासाने आणि कसलाही न्यूनगंड न बाळगता व्यवस्थित कॅरी केली तर आसपासचे जग काय घालतेय आणि ते फॅशनच्या दुनियेत कुठे पोहोचलेय याचे फार काही विशेष वाटू नये.
3 दिवस 23 तासात इतके
3 दिवस 23 तासात इतके व्यवस्थित लिखाण?
जर जेन्युईन आयडी असेल तर किपीटप. गुड गोईंग !!!
असो.. आज सकाळीच माबोवरच असाच 'आई ड्रेस घालुन पिकनिकला निघाली. बरेच लोक्स बघत होते' टाईप लेख वाचला. आता माबोकडे ज्येष्ठ नागरीकही वळू लागले आहेत असे दिसते. याबद्दल मायबोलीचे अभिनंदन !!!
तो लेख वाचूनच मला माझा अनुभव
तो लेख वाचूनच मला माझा अनुभव लिहावेसे वाटले
पियू, मी माबो जॉईन केली
पियू, मी माबो जॉईन केली तेंव्हा मलाही अनुस्वाराखेरिज सगळे अक्षर नीट लिहिता येत होते त्यामुळे सध्या या क्षणी तरी मला जेन्युअन आयडी वाटतोय हा
आज सकाळीच माबोवरच असाच 'आई ड्रेस घालुन पिकनिकला निघाली. बरेच लोक्स बघत होते' टाईप लेख वाचला. आता माबोकडे ज्येष्ठ नागरीकही वळू लागले आहेत असे दिसते. याबद्दल मायबोलीचे अभिनंदन !!!
>>>
+११११११११११११
आई ड्रेस घालून हे कोणत्या
आई ड्रेस घालून हे कोणत्या लेखाबद्दल म्हणत आहात?
अवांतर - मी माबो नुकतीच जॉईन केली असली तरी मला मराठी २००७ सालापासून लिहिता येत होती आणि २००८ सालापासून मी फक्त आणि फक्त मराठीतच लिहू लागलो. परिणामी माझ्या मराठी टाईपिंगचा स्पीड ईंग्लिश टाईपिंगच्या चौपट आहे. मायबोली आणि मराठी टाईपिंग जमण्याचा आपसात संबंध नाही, मायबोली पलीकडेही जग आहेच
आई ड्रेस घालून हे कोणत्या
आई ड्रेस घालून हे कोणत्या लेखाबद्दल म्हणत आहात?
>> http://www.maayboli.com/node/2383
अवांतर - मी माबो नुकतीच जॉईन केली असली तरी मला मराठी २००७ सालापासून लिहिता येत होती आणि २००८ सालापासून मी फक्त आणि फक्त मराठीतच लिहू लागलो. परिणामी माझ्या मराठी टाईपिंगचा स्पीड ईंग्लिश टाईपिंगच्या चौपट आहे.
>> एकतर माझी पोस्ट तुमच्यासाठी नव्हतीच. त्यामुळे पुढच्या स्पष्टिकरणाला फाट्यावर मारते आहे.
मायबोली आणि मराठी टाईपिंग जमण्याचा आपसात संबंध नाही, मायबोली पलीकडेही जग आहेच.
>> अर्थातच आहे. परंतु प्रस्तुत लेखिकेला स्वतःच्या अवलोकनात (पक्षी प्रोफाईलमध्ये) माहिती नीट लिहिता आलेली नाहीये. त्यामुळे तीन दिवसात हि प्रगती पाहुन आश्चर्यमिश्रित आनंद झाला. तुमच्याशी याचा काहीही संबंध नाही.
माझ्याशी त्याचा काहीही संबंध
माझ्याशी त्याचा काहीही संबंध नाही हे मला माहीत आहे. मी ते सहज उल्लेख केला होता. जसे वर रियाने केला. मराठी टंकलेखनाचा आणि आयडी जेन्युईन असण्यानसण्याचा आपसात काही फारसा संबंध नाही हे सांगणे इतकाच हेतू होता. तरी आपल्याला रुचले नसल्यास क्षमस्व.
वरील लिंकबद्दल धन्यवाद.
एक वै.म. - फाट्यावर मारणे हा शब्दप्रयोग बरेच ठिकाणी सर्रास दिसतो पण माझ्यामते तो फारसा काही चांगल्या अर्थाचा वाक्यप्रचार नसावा. खात्री नसल्यास टाळणे उत्तम. खात्री असल्यास मलाही त्याचा अर्थ सांगणे
एक वै.म. - फाट्यावर मारणे हा
एक वै.म. - फाट्यावर मारणे हा शब्दप्रयोग बरेच ठिकाणी सर्रास दिसतो पण माझ्यामते तो फारसा काही चांगल्या अर्थाचा वाक्यप्रचार नसावा. खात्री नसल्यास टाळणे उत्तम<<<
तो चांगल्या अर्थाचा नाही. बायकांनी वापरणे आणखीनच पटत नाही. मध्यंतरी एका सौंदर्यस्पर्धेत एक मुलगी 'असे असे करताना माझी कंप्लीट फाटली' असे म्हणाली होती. तेही खटकले होते.
येस्स त्याच्या वाईट
येस्स त्याच्या वाईट अर्थाबद्दल कल्पना होतीच. फक्त हल्ली कित्येक चांगल्या वा साध्या शब्दांचेही दुसरे अर्थ निघालेत त्यानुसार हा मूळ प्रचलित शब्द साध्या अर्थाचा असावा या हिशोबाने शंका व्यक्त केली.
वनिता, गुगल क्रोम वापरल तर
वनिता, गुगल क्रोम वापरल तर डिलीट करतांना बॅकस्पेस केल्यावर परत स्पेस बार दाबुन मी बॅकस्पेस करते. (अजुन काही दुसर सोलुशन कोणाला माहीत असेल तर प्लिज सांगा. हे अस प्रतेक वेळी करण इर्रीटेटिंग आहे ) नाहीतर तुझ्या प्रोफाईल मधे दिसत तस टाईप होत. हा प्रॉब्लेम फायर फॉक्स/आय ई मधे येत नाही.
हो आणि कीप ईट अप
फाट्याने मारणे म्हणजे. झाडाच्या ओल्या फांद्यानी मारणे (ह्याने जोरात लागत अस म्हणतात) अस मला वाटत होत अजुन काही अर्थ असेल तर माहीत नाही.
प्रश्न फॅशनचा नाही तर प्रश्न
प्रश्न फॅशनचा नाही तर प्रश्न स्वतःला काय आवडते, कंम्फर्टटेबल वाटते याचा असावा. अवघडलेपण येत असेल तर सवयीने ते जाते सुद्धा,तुम्हाला काय घालायचे ते तुमच्याइतके इतर कोणाला कळणार नाही याचा विश्व्वास असला की सगळे कपड्याबाबतचे प्रश्न सुट्तात .साडी ही फॅशनमधे मोडत नाही हा खरा गैरसमज आहे.
साडी ही फॅशनमधे मोडत नाही हा
साडी ही फॅशनमधे मोडत नाही हा खरा गैरसमज आहे. <<
हुश्श कुणीतरी लिहिलं!
कॉलेज लेव्हलला साडी ही
कॉलेज लेव्हलला साडी ही अद्यापही फॅशन मध्येच मोडते.. उगाच नाही कॉलेजमध्ये साडी डे साजरा करत.
मला शहर आणि देश बदलता येत
मला शहर आणि देश बदलता येत नाही. आणि मला टाकताना मुंबई आणि भारत असे टाकायचे होते.
साडी ही फ्याशन आहे हे मान्य आहे. पण बऱ्याचशा गावात साडी वापरणेच बंधनकारक असल्यामुळे फ्याशन करणेच काय हे माहित नव्हते. साडी ऐवजी वेगळे काही परिधान केले जाईल त्यालाच फ्याशन म्हटले जायचे. त्या अर्थाने मी गाऊन वापरण्याला देखील फ्याशन असे म्हटले आहे जो मुंबईच्या बायकांसाठी तेव्हा रेगुलर वेअर होता. आणि हि माझ्यासाठी सुरुवात होती म्हणून मी इथे त्याचे वर्णन केले . गावातल्या किवा नातातल्या कुणालाही ती फ्याशन वाटली असत. आत्ता गावातली देखील परिस्थिती बदलते आहे
वनिता, लेख आवडला. स्वतःला
वनिता, लेख आवडला. स्वतःला आलेला अनुभव प्रामाणिकपणे वर्णन केलेला आहे. लिहित रहा.
बाकी, कुणी शुद्ध लिहू शकतं म्हणून लगेच आयडीवर शंका घेणे??? मजेदार आहे.
सिनि यांना अनुमोदन. बाकी
सिनि यांना अनुमोदन.
बाकी लेखिकेला पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
अवांतर माझी आई आणि काकू,
अवांतर
माझी आई आणि काकू, आत्या सगळ्याच नऊवारी नेसतात्/नेसत. तेंव्हा गोल साडी (सहावार) नेसायची फॅशन आली होती (इति आई) नंतर तो रेग्युलर पोषाख झाला आणि नऊवार फॅशन.
साडी मधे फॅशन करता येत नाही
साडी मधे फॅशन करता येत नाही असा एक जनरल सूर दिसतो आहे लेखात आणि प्रतिक्रीयांमधे.
माझ्या मते ह्या मुद्दलातच गडबड आहे;. कदाचित साडी सारखा फॅशनेबल दुसरा कुठलाही भारतीय ड्रेस नसावा.
साडी मध्ये फ्याशन करता येत
साडी मध्ये फ्याशन करता येत नाही असे माझे म्हणणे नाही . पण गावाच्या लोकांसाठी फ्याशन म्हणजे काय होती आणि तसे काही करणे थोडे कठीण होते हे मला नमूद करायचे आहे.
हो आणि बहुदा हा जुन्या
हो आणि बहुदा हा जुन्या काळातला लेख आहे ना (हे सर्व ९० च्या पूर्वीचे .) तेंव्हा साड्याच सर्रास नेसल्या जात असल्याने साडी नेसली म्हणजे नवल काही वाटत नसावं
आत्ता कसं जिन्स घातलेल्या मुलींना पाहून काही वाटत नाही.पण साडीतली मुलगी असली की मुलं वळून बघतातच तेच ८० च्या काळात जिन्स घातलेली मुलगी बघून लोकांच्या डोळ्यात बदाम येत असतील (वॉट्सअप स्मायली इमॅजिना) आणि साडीवाल्यांना बघुन काहीच वाटत नसेल.
त्यामुळे घरकी मुर्गी डाल बराबर च्या तालात रोजकी साडी नो फॅशन बराबर
साडी ही फॅशनमधे मोडत नाही हा
साडी ही फॅशनमधे मोडत नाही हा खरा गैरसमज आहे.
>>>>>>>>>>
नक्कीच,
पण साडी फॅशनमध्ये येणे हे वेगळे झाले आणि ज्यांना फॅशनचे वावडे आहे म्हणून त्यांनी पारंपारीक साडीच नेसणे हे वेगळे झाले आणि हा लेख यावर आहे असे मला वाटते.
अवांतर - माझ्यामते साडीपेक्षा
अवांतर - माझ्यामते साडीपेक्षा ब्लाऊज जास्त फॅशनमध्ये येतात. किंबहुना ज्यांना साडीमध्ये जास्त फॅशनेबल करायला सुचत नाही ते दूधाची तहान ताकावर म्हणत ब्लाऊजमध्ये फॅशनची हौस भागवतात.
असो, हा आपला प्रांत नाही. सो लेखनसीमा
रोजची साडी नेसण्यात पण फॅशन
रोजची साडी नेसण्यात पण फॅशन करता येतेच ना. करायची इच्छा आणि कल्पनाशक्ती पाहीजे.
रोजची साडी नेसण्यात पण फॅशन
रोजची साडी नेसण्यात पण फॅशन करता येतेच ना. करायची इच्छा आणि कल्पनाशक्ती पाहीजे.
>>>>>
तसे मी रोज जी शॉर्ट आणि बनियान घालतो त्यातही सतराशे साठ फॅशन करतोच की .. पण फॅशन करायचीच नसल्यास आपण जे काही आपले पारंपारीक पोशाख आहे तोच तश्याच पारंपारीक पद्धतीन घालणार ना.. आपल्याकडे महिलांसाठी तो पारंपारीक पोशाख साडी आहे.
पुरुषांमध्येही कित्येक जुन्या लोकांना पांढर्या सदरा लेंग्यात जराही मॉडीफिकेशन चालत नाही अशी कित्येक उदाहरणे पाहिली आहेत. कधी लाईन, चेक्स, प्रिंटची शर्टे न घालता प्लेन पांढरे शर्ट घालणारे बरेच पाहिले आहेत. त्यातही फॅशन होत नाही असे नाही, पण काही जणांना करायचीच नसते.
वनिता, चांगलं लिहिलंय.
वनिता, चांगलं लिहिलंय. पुलेशु.
तसे मी रोज जी शॉर्ट आणि बनियान घालतो त्यातही सतराशे साठ फॅशन करतोच की ..>>> म्हणजे कधीमधी उलटा बनियान, खिसे बाहेर आलेली शॉर्ट वगैरे असेल.
अहो ते ८०च्या काळात चालूये
अहो ते ८०च्या काळात चालूये ओ
विषय काय चर्चा काय
तेच ८० च्या काळात जिन्स
तेच ८० च्या काळात जिन्स घातलेली मुलगी बघून लोकांच्या डोळ्यात बदाम येत असतील <<<
८० च्या काळात पुण्यामुंबईत तरी कॉलेजातल्या मुलींनी जीन्स घालणे इतके दुर्मिळ नव्हते. तेव्हा बर्याच ताया माहिती होत्या जीन्स वापरणार्या.
९० च्या दशकात तर अजिबातच दुर्मिळ नव्हते. जीन्स आणि लूज टीशर्ट हा साधारण गणवेश असल्यासारखा होता. अर्थात सलवार सूटसही वापरले जायचे. नाही असे नाही. हल्ली ज्याला जेगिंग्ज म्हणतात तसला प्रकार ९५-९६ दरम्यान स्ट्रेचेबल जीन्स या नावाने बराच बोकाळला होता. फक्त वरती आम्ही तेव्हा ओव्हरसाइज्ड, ढगळे असे शर्टस घालत असू.
येस! पुण्या मुंबईमधे नॉर्मल
येस! पुण्या मुंबईमधे नॉर्मल असेल ते. गावाकडे नसावं बहुदा!
माझं कोणी त्या काळात पुण्यात नसल्याने आणि माझा जन्मही झालेला नसल्याने मी एकदम काहीच बोलू शकणार नाही या विषयावर. मी आपलं शक्यतांच्या जगात!
तुला अर्थातच जास्त माहीत असेल.
या काकूंनीही त्या गावाकडच्या असल्याने केवळ साडीच नेसलेली पाहिली त्यामुळे ती फॅशन वाटत नसावी असं म्हणायचंय मला. आणि रोज तेच पाहिल्याने त्याचं विषेश वाटत नसावं.
बाकी साडीच आजकालची खरी फॅशन आहे असं म्हणावंस वाटतंय मला. आजच आमच्या क्लाईंट ऑफिसमधले दिवाळी सेलेब्रेशन्चे फोटोज बघत होते.
साडी आणि सलवार कमिज मधले अमेरिकन्स फार गोड दिसतात
फॅशन याचा अर्थ पद्धत. त्या
फॅशन याचा अर्थ पद्धत. त्या त्या काळाची ती ती फॅशन.
नऊवारी नेसणे सोडून पाचवारी नेसणे आपलेसे केले बायकांनी ती ही फॅशनच.
नऊवारी नेसणे सोडून पाचवारी
नऊवारी नेसणे सोडून पाचवारी नेसणे आपलेसे केले बायकांनी ती ही फॅशनच.<<<
ती एक सोयही असेल ना? की फक्त फॅशन?
Pages