दगड, जिऑलॉजी वगैरे.

Submitted by नीधप on 1 November, 2014 - 00:21

विविध ठिकाणी सापडणारे दगड ओळखणे, वर्गीकरण करणे हे शास्त्र जिऑलॉजी (मराठी?) मधेच येते ना?
की याला काही वेगळे नाव आहे?

यासंदर्भातली बेसिक पुस्तके सुचवा.
तसेच हे दगड ओळखता यावेत यासाठी कुठला कोर्स असू शकतो का? पुणे वा मुंबईत आहे का?
यासंदर्भात पुणे/ मुंबईत कोण तज्ञ आहेत? कोण मदत करू शकेल?
पक्षीनिरीक्षणासाठी जशी बेसिक गाइडस उपलब्ध आहेत तशी दगडांसाठीही असावीत किंवा असायला हवीत ना?

माझ्याकडे बरेच दगड आहेत त्यांचे जमल्यास वर्गीकरण करायचे आहे. पण तोच एकमेव हेतू नाही. ही माहिती असल्याने वा नसल्याने माझ्या व्यवसायाला काहीही फरक पडणार नाहीये. हे वर्गीकरण, ओळखणे वगैरे हे केवळ छंद म्हणून, दगडांच्या प्रेमात आहे म्हणून करायचे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिथे आहेत ते कोर्सेस जेमॉलॉजीचे आहेत. मला जेमस्टोन्स/ प्रेशस स्टोन्स बद्दल नकोय माहिती.

जंगलात, समुद्राकाठी, नदीकाठी वगैरे फिरताना सापडणार्‍या दगडांबद्दल माहिती हवी आहे.

मी थोडीफार मदत करु शकते. नवरा भूगर्भशास्त्र ज्न आहे . जीआॅलाॅगी आॅफ इंडिया - गोखले field manual of minerals M. Kuzin N. EGorow ही दोन्ही पुस्तक पुण्यात मिळतील . ९-१०च्या भूगोल सायन्सच्या पुस्तकात बेसिक माहिती मिळू शकेल.

नागपुरातील चंद्रकांत चन्ने यांचे नाव ऐकले आहे काय? ते जे 'बसोली' नावाचे शिबिर घेतात दरवर्षी. त्या शिबिरात हे दगडांचे वर्गीकरण, दगडांची ओळख वगैरे सांगतात. मी शिबिर केले होते१९९६ मी पाचवीत असताना. त्यावेळी मी अगदी भारावून वगैरे गेले होते. मग कित्येक वर्षे दगडे गोळा करणे अशी साधीच हा आवडता छंद होता. पण दुर्दैवाने त्या सरांचे नावच आता आठवत नाहीये.
भुगोलाच्या पुस्तकात जे दगडांचे प्रकार सांगितले जातात आता आठवत असलेले म्हणजे ज्वालामुखी, गाळापासून बनलेले (ज्यात जीवाश्म सापडतात.)
नाव मिळताच कळवते.

अरे वा! माझी सर्वात प्राचीन आवड, मलाही आवडतात दगड गोळा करायला.... त्यातले माळ्यावर जपून ठेवलेले, कामानिमित्त अनेक जागा बदलल्यानंतरही उरलेले दगड नुकतेच मुलांकडे खजिना म्हणून हस्तांतरित करण्यात आलेले आहेत.

त्यातला सगळ्यात प्राचीन ऐवज म्हणजे, कन्याकुमारीला समुद्रकिनार्‍यावर गोळा केलेले दगड.

(अवांतर - त्याच्याच बरोबर आयती विकत घेतलेली वेगवेगळ्या रंगांची रेती, जी एका अरुंद प्लॅस्टिकच्या पिशवीत मधे सील करून मिळत असे. ती देखिल मिळाली. इतक्या वर्षांनंतर न फाटता टिकून राहिली हेच विशेष....)

मंजू, हेच ते पुस्तक का?

http://www.amazon.in/Guide-Field-Geology-N-W-Gokhale/dp/8123907494/ref=s...

प्रा.धोंडीराम पांढरखडे हे पुण्यात पाषाण भागात राहतात ,ते दगडांचे अभ्यासक आहेत. गुगलुन पहा.

हर्मायनी, चन्नेंचं नाव ऐकलं नाही. पण आता गुगल करून पाह्यलं. इंटरेस्टिंग वर्क!

हर्पेन, मी पण लहानपणापासून गोळा करायचे दगड पण मग प्रवासात एवढं उचलून घरी आणणं जमायचंच असम नाही. किंवा चुकून कधी पोचले घरापर्यंत तरी कधीतरी आवराआवरीमधे आई ते टाकून द्यायची. मग बंद पडला तो छंद. आता परत उफाळून आलाय. आणि वेड लागलंय.
तुझ्याकडे असेल खजिना तुला नको असलेला तर इकडे झेलायला झोळी तयारच आहे Happy

दगड गोळा करण्याचा नाद असलेल्यांच्यात मी पण आहे... Happy

लहानपणी भरपूर, भरपूर गोळा केले होते. खूप वर्षं जपूनही ठेवले होते. लग्नानंतर आईनं ते सगळे टाकून दिले.

माझ्याकडे होते दहा रुपयात घेतलेले खनिजांचे दगडांचे सचित्र रंगित छोटेसे पुस्तक. पन्नासेक फोटो होते. भाचीला दिलेले. आता विचारावे लागेल छंद आवडला. मी पूर्वी डोंगरातून हिऱ्याचे(=स्फटिकांचे)धोंडे आणून फिशटैंकमध्ये ठेवायचो.

तू पाहिलेलं असशीलच म्हणा, पण डब्लूडब्लूडब्लू डॉट इन्डियन डॅश स्टोन्स डॉट कॉम नावाची कमर्शियल वेबसाईट आहे. त्यांच्या साईटवर दगडांचे वेगवेगळे नमुने, फोटो व त्यांबद्दल माहिती आहे. दगड ओळखण्यात कितपत उपयोगी ठरेल माहिती नाही, पण बघायला काही हरकत नसावी.

मला नेटवर जे वर्गीकरण मिळतेय त्यातले बरेचसे फोटो हे टम्बल्ड दगडांचे आहेत. टम्बलिंग ही दगडाच्या पॉलिशिंगची एक प्रोसेस असते ज्यात त्याचे रंग झळझळून चमकतात. त्यामुळे सापडलेल्या दगडांपेक्षा ते बरेच वेगळे दिसतात.
या इथे टम्बलिंगचे बिफोर आफ्टर बघायला मिळेल.

nee,
Maharashtrat bahutek basalt ani tyachya anushangane agate che vividh prakar, chalcedony, carnelian vagaire sapadtat. Ya sagalyanna apan gargotya mhanato..
Minerology chi basic pustake baghanyaadhi bharatachya tula relevant asalelya bhagat kay khadak ani khanije sapadtat te adhi baghun ghe.
Bharatar major sapadnare dagad mhanaje basalt, dolerite, granite, limestone, laterite, etc
Minerals kimva rangit dagad ya madhale common prakar - agate che vividh prakar, carnelian, chalcedony, garnet, jasper, quartz, quartzite, amethyst, ani itar..

Anakhi ek - go ni dandekarancha chhand maze vegaLe mhanun pustak ahe tyat dagadanvar ek lekh ahe to interesting ahe
Nashik javal gargoti museum ahe. Tithe kadhi jamlyas ja. Actual dagad ani tyachi naave mastpaiki kalun jatil. Tithale lok madat oan kartil

डॉ करमरकर, शासकीय अभियांत्रिकी औरंगाबाद यांची पुस्तके मिळाली किंवा त्यांना भेटता आले तर पहा. ते या क्षेत्रात अधिकारी आहेत.

वरदा,
>>> Minerology chi basic pustake baghanyaadhi bharatachya tula relevant asalelya bhagat kay khadak ani khanije sapadtat te adhi baghun ghe. <<<
हो तीच इन्फो हवी आहे.

माझ्याकडचं आत्ताचं कलेक्शन बरचसं गोवा आणि सिंधुदुर्गातल्या छोट्या मोठ्या नद्यांच्या काठावरचं आहे.
गारगोटी टाइप कमी आहे. खूप सारे अगदी जेट ब्लॅक ते लाइट ग्रे कलरमधे आहे.
काही लाल, क्वचित यलो ऑकर आहेत.
काही ग्रे वर डार्क ब्लॅक स्पॉटस आहेत.
आसनंम समर्पयामि मधे होता तसे आहेत.

तू अशी वर्णनं देऊन फारसा उपयोग नाही. त्यांचा पोत, रंग वगैरे बघितल्याशिवाय कसं सांगणार ग? मला कामापुरते, म्हणजे दख्खनच्या पठारावर मिळणारे खडक आणि त्यांच्यात आढळणारे गारगोट्यांचे प्रकार ओळखता येतात, आणि खडकांचे इतर महत्वाचे प्रकार.
इंडियन जिऑलॉजीवर पाठ्यपुस्तकं असतील बी एस सी जीऑलॉजीची ती बघ.

पण सगळ्यात बेस्ट म्हणजे एकतर आसपास कुणी ओळखीत जिऑलॉजीचा विद्यार्थी गाठ किंवा मग सिन्नर-नाशिकजवळच्या गारगोटी म्युझियमला तुझ्या कलेक्शनसकट जमेल तेव्हा भेट दे. तुझ्याकडचे दगड जर महाराष्ट्र आणि आसपासमधून गोळा केलेले असतील तर कुणीही बेसिक्स येणारी व्यक्ती ओळखून देईल.

सिन्नरच्या माळेगाव MIDC मधे "गारगोटी" हे दगडांचे संग्रालय आहे...नाशिक्-पुणे रोड ला लागुन... तिथे खुप दगड आहेत.. रंगाचे, आकाराचे...नक्की भेट द्या... सोबत माहिती.

आईच्या तोंडून बऱ्याचदा 'दगडांच्या देशा' ऐकलंय. Happy लोकसत्ता मध्ये मालिका यायची. त्यात संपूर्ण भारतात कोणकोणत्या प्रकारचे दगड आहेत, त्याचे वर्गीकरण इ माहिती होती. लेखक कोणी भूगोलाचे अभ्यासक होते, नाव नाही माहित, पण आता त्याचं पुस्तक किवा काही लेख मिळत नाहीयेत बाहेर. कोणी ऐकले आहे का या लेखांबद्दल?

फेबुवर या दोन पेजेस वर दरदिवशी नवीन नवीन दगडांची माहिती मिळते.

नी, नाशिक जवळ गारगोटी नावाचे एक कायमस्वरूपी प्रदर्शन आहे.ते एकदा बघ. तिथेच कदाचित तुला पुस्तकं मिळतील.
(जवळ्च पैठणी फेम येवला आहे
हे आपलं उगाचच Wink )

व्ही जे टी आय ला एक गणपुले सर होते. ते डोंबिवली ला रहायचे. आता निवृत्त झाले असतील.
त्यांचा संपर्क मिळाला तर पहा. मी त्यांच्याकडून Geology शिकलो होतो. अतिशय उत्तम शिक्षक आणि त्या क्षेत्रातले तज्ञ आहेत ते.

R B Gupte ह्यांनी १ पुस्तक लिहिलेल आहे, जे basic geology साठी चांगलं मानलं जातं. त्यांची स्वतःची खुप चांगली library आहे. आधी स्वतः ते खुप मदत करायचे आणि ते गेल्यावर आता त्यांच्या घरचेही मदत करतात.

ह्याशिवाय, COE, Pune chi geology lab खुप चांगली आहे. अत्यंत दुर्मिळ प्रकारचे दगडही तिथे बघायला मिळतात.