आला आला पाऊस आला

Submitted by पुरंदरे शशांक on 29 July, 2012 - 23:35

आला आला पाऊस आला गातो थेंबांचे गाणे
मनात माझ्या नाचत येते खमंग कणसाचे गाणे

गडगड गडगड मेघ गरजती सळसळसळ पाऊस गाणे
अंगणात या वेचायाला बर्फाचे गंमतदाणे

चिंब भिजूनी ओले होता आईचे किती ओरडणे
चहा आल्याचा मजेत घेता जराजरासे फुर्फुरणे

झाडे, पाने, फुले न्हाऊनी डोलतात किती गंमतीने
मीही गातो, उड्या मारतो, गोल गोलसे भिर्भिरणे......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

हत्तीचा लठ्ठपणा

एका हत्तीला एकदा वाटले
व्हावे आपण बारीक
कोणीतरी सल्ला दिला
"रोज खा बदाम आणि खारीक"
हत्ती बिचारा सल्ल्याप्रमाणे
खरोखरच वागला
त्याच्याही नकळत दिवसेंदिवस
जास्तच फुगू लागला.
(१० जानेवारी १९८८ च्या लोकसत्तामध्ये 'किशोरकुंज' विभागात ही कविता प्रकाशित झाली होती.)